भाग -- 30
संगणक म्हणजे हरिकथा
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
अस म्हणतात की हरि अनंत, हरिकथा अनंत. तसच संगणकावर आपण काय काय करु शकतो, त्याचा विस्तारही अफाट आहे. सामान्यपणे करायचे पत्रलेखन असेल अगर परदेशस्थ मुलाबाळांची दृष्टिभेट हवी असेल, पगार बिलं करायची असतील अगर नाजूक शस्त्रक्रिया असेल, शेयरच्या उलाढाली असतील अगर न्युक्लियर पॉवर स्टेशनमधील रिसर्च असेल, प्रकाशकांना पुस्तकाची अक्षरजुळणी हवी असेल अगर ऋग्वेदादि ग्रंथ मुळ संस्कृतमधून जगाला उपलब्ध करून द्यायचे असतील, तुमचे फोटो, तुम्ही म्हटलेली गाणी, तुमचा नाच किंवा भाषण हे सर्व चिरस्थायीपणे असणा-या पण साध्या डोळ्यांना अदृश्य अशा अवकाशाच्या पटलावर कोरून ठेवायचे असेल तर संगणकावर काम करता येणं आवश्यक.
माणसाला खूप वेळ लाऊन करावी लागणारी व कित्येकदा माणसाला स्वतःला न जमू शकणारी बरीचशी कामं संगणकामार्फत करून घेता येतात हे आपण पाहिलं. मात्र कांही वेळा आपली समजूत होते की माणसं काम करत नसतील तर संगणकालाच सांगूया. ही समजूत चुकीची आहे. कारण माणसाकडे असलेली तळमळ, कल्पकता, प्रेरणा, कामावरील श्रद्दा, हे सर्व संगणक कुठून आणणार? म्हणून ज्या देशातील माणसांच्या या गुणांना संगणकाची जोड मिळेल, ते देश, तो समाज, त्या संस्था अविरतपणे पुढे जातील, पण ज्या देशांत माणसांचे संगणक-कौशल्य न वाढवता फक्त संगणकाच्या माध्यमाने विकास आणायचे प्रयत्न होतील ते फसतील. यासाठी शासनांत तसेच सामान्य जीवनांतही संगणक-शिक्षणाची सोय झाली पाहिजे.
संगणक शिकून घेणं म्हणजे जस बालपणी आपण एकेक नवीन गोष्ट शिकत राहतो आणि प्रत्येक नवीन शिक्षणाने आपल्या समोर एक नवं दालन उघडत जातं, तोच प्रकार आहे. संगणकाच्या अनंत दालनापैकी आपल्या कवेत किती घ्यायची ते प्रत्येकाने स्वतःच ठरवायचे.
------------------------------------------------------------------
राउटर, हब, लॅन इ.
संगणक पिढ्या , भाषा
चॅट ग्रुप्स
संगणक शब्दकोषासाठी मला सुचलेले व न सुचलेले शब्द
Computer - संगणक
Hardware - जड-वस्तू-प्रणाली
Software -
Soft Copy -
Hand Copy -
Click - (प्रचलित) टिचकवा,टिचकी वाजवा, टिकटिकाएँ,
CPU - कारभारी डबा
Screen किंवा Monitor - पडदा, पाटी
Mouse - उंदीर, मूषक
Keyboard - कळपाटी, कळफलक, कुंजीपटल
Typewriter ची काडी - खीळ
Keyboard Layout - कळपाटीचा आकृतिबंध
File - फाइल, धारिका
Folder - संचिका, फाइल-खोका, पेटी, गठ्ठा, गाठोड, संदूक
Zip - आवळणे Zip - गठ्ठर बांधना, unZip - गठ्ठर खोलला
डेस्कटॉप - लेखन-पाटी, पाटी,
लॅपटॉप
इंटरनेट - महाजाल, अंतर्जाल
Icon - खूणचित्र
PDF
------------------------------------------
3) शासनात संगणक किती ?
4) शासनाचे e-governance
5) ERP ?
Friday, June 26, 2009
भाग -- 25 -- चित्रकार
भाग -- 25 -- चित्रकार
संगणक म्हणजे चित्रकार
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
हे वर्णन अगदी चूक आहे. चित्रकाराची कल्पनाशक्ति, त्याच्या कुंचल्याचे सामर्थ्य आणि निरनिराळया प्रतीकं व बिंबांच्या सहाय्याने विषय वस्तूची किंवा चित्राची मांडणी करण्याची चित्रकारांची प्रतिभा हे संगणकाला कधीच येणार नाही.
पण चित्र या विषयी संगणकावर बरेच कांही करता येते. तसेच ते फोटो, गाणी आणि व्हिडियोंच्या बाबतीतही करता येते. विशेषत: आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये थोडेसे बदल किंवा दुरुस्त्या करता येतात. आपण चित्रापासून सुरुवात करु या.
आपल्याकडील एखादे छानसे चित्र स्कॅन करुन संगणकावर फाईलच्या स्वरुपात ठेवता येते. आता मायक्रोसॉफ्ट पेंट किंवा फोटोशापसारख्या प्रोग्रामच्या सहाय्याने ती फाईल उघडून दुरुस्त करायला घेतली की पहिल्यांदा संगणकाच्या पाटीवर ते चित्र दिसतं.
* आपल्याला या चित्राच्या अनेक हुबेहुब प्रतिकृती करुन हव्या तशा मांडून घेता येतात,
* हवे त्या प्रतिकृतिंचे आकार लहान मोठे करता येतात.
* चित्राचे आरसा-प्रतिबिंब तयार करता येते.
* शिवाय चित्रातला एखादा भाग पुसून त्यावर दुसरे काही तरी रंग देता येतात.
* आपण पेंट हा प्रोग्राम सुरु करतांना त्यावर एखादे चित्र उघडले नसेल तर कोरी पाटी उघडते. त्यावर आपण जरी चित्रकार नसलो तरी गोल, त्रिकोण, चौकोन, ढग, झाडांची आऊटलाईन, असे काहीतरी काढून त्यावर रंग भरु शकतो.
* एका चित्रातील काही भाग उचलून (उदाहरणार्थ झाड, चिमण्या- काहीही) दुसर्या चित्रात समाविष्ट करता येतो.
* चित्रातील रेघा गडद किंवा फिक्या करता येतात.
* एखाद्या भागाची रंगसंगीत बदलता येते.
* त्यामध्ये छोटेसे वर्णन पण लिहू शकतो.
* ते मराठी भाषेतूनही असू शकते.
* असे काढलेले चित्र आपण चित्ररूप फाईलीमध्ये सेव्ह (जतन) करू शकतो. त्यातील सर्व रंगसंगती, ठिपके, सूक्ष्म रेषांसहित स्पष्ट उमटावे असे वाटत असेल (जसे चित्रकार, डिझाइनर यांना लागते) तर bitmap या स्वरूपात साठवता येते, पण त्या फाइलचा आकार खूप मोठा असतो - अगदी दहा-वीस MB पर्यन्त. त्यातील स्पष्टता थोडी कमी होऊन चालत असेल तर आपण jpeg या स्वरुपात साठवू शकतो. jpeg फाईल पुढच्या वेळी bitmap मध्ये साठवली तर ती फारच खराब दिसते. म्हणून पुढे मागे जास्त स्पष्ट फाईल लागणार नसेल तरच jpeg फाईल बनवतात. छपाई इत्यादीसाठी बिटमॅप फाईलच वापरतात.
हे झाले अगदी सामान्य माणसाने करायचे काम. पण वस्त्रोद्योगात खूप उपयोगी पडणारे काम संगणक करतो. यासाठी काही छान संगणक सॉफ्टवेअर केलेले आहेत. त्या योगे एकाच डिझाइनला निरनिराळी रंगसंगति दिल्यास ते कसे दिसेल हे आपण संगणकावर पाहू शकतो. फुलं, पानं, कुयर्या ठिपके इत्यादी वापरुन साडीचे डिझाइन तयार केल्यावर त्यातील फुलांचे रंग बदलून, बॅकग्राऊंडचा रंग बदलून, विविध रंगसंगती तपासून त्यातून निवड करता येते. आपण दुकानात गेल्यावर विचारतो याच प्रिंटमध्ये वेगळे रंग आहेत का, तो म्हणतो - हो, हे पाच रंग तुमच्यासमोर ठेवले बघा. हा प्रकार संगणकाच्या प्रोग्राममुळे खूप सोपा झाला आहे. अगदी 1986 मध्ये जेव्हा आपल्या देशात फक्त मोठाल्या वैज्ञानिक संस्थाच संगणक वापरत असत त्या काळात मुंबईच्या सास्मिरा या वस्त्रोद्योगांत रिसर्च करणार्या संस्थेमध्ये मी हे सॉफ्टवेअर पाहून प्रभावित झाले होते व मनोमन त्या संस्थेला शंभर टक्के मार्क देऊन टाकले होते.
हल्ली फॅशन डिझाइनर हे चांगले करियर झाले आहे. त्याच्या विद्यार्थ्यांनी संगणकावर डिझाइन करायला शिकलेच पाहिजे. तीच बाब ऍनिमेशन डिझाइनरची.
आपल्याकडील चित्रांची दुरुस्ती किंवा बदल (editing) साठी आपण पेंट (व तत्सम) प्रोग्राम वापरतो. तसेच आपल्याकडील ध्वनिफीत किंवा चित्रफीतीमध्ये बदल, दुरुस्त्या इत्यादी करण्यासाठी आपल्याला AVI editor व तत्सम प्रोग्राम वापरता येतात. त्यामुळे जर संगणकाला चित्रकार हे वर्णन चालणार असेल तर कलाकार हे ही वर्णन चालू शकेल
------------------------------------------------------------------------------------

भाग -- 13 -- थोडेसे बाजार व्यवस्थापन
भाग -- 13 tallied with book on 24-07-2011
संगणक म्हणजे थोडेसे बाजार व्यवस्थापन
संगणक म्हणजे निर्देश दिलेल्या पद्धती बरहुकूम उपलब्ध माहितीची छाननी करून निष्कर्ष काढू शकणारे यंत्र. जगभर मान्य असलेली ही व्याख्या पाहिली तर फार पुरातन काळातले साधी बेरीज करू शकणारे यंत्र देखील संगणक ठरते. पण आकड्यांची द्विअंश पद्धत वापरून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधाराने संगणकाचा विकास 1945 च्या आसपास सुरू झाला. त्या संगणकाना आजच्या तुलनेत शंभरपट वीज (पॉवर) आणि हजारपट जागा लागत असे. त्यावर वैज्ञानिकांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक संगणक म्हणजे ज्याला जसा हवा तसा बनवला गेला. त्यात कारभारी डब्यासारखी बाहेरील खोळ सुद्धा असायची गरज नव्हती. वेगवेगळ्या PCB वर ट्रायोड व इतर सर्किट्स मांडून त्यांना कसेही जोडून चालायच- मुख्य मुद्दा होता त्याच्याकडून काम करवून घेण्याचा. मात्र सेमीकण्डक्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट या इलेक्ट्रॉनिक्समधील दोन शोधांनंतर वीज आणि जागा दोन्हींची गरज खूप कमी झाली.
मग 1980 च्या सुमारास कधीतरी IBM कंपनीच्या लक्षांत आले की आपण संगणक बनवायची फॅक्टरी टाकून त्यांची मोठया प्रमाणावर विक्री करु शकतो. यासाठी संगणकाच्या जडवस्तूंना प्रमाणबध्द केले (हार्डवेअर स्टॅण्डर्डायझेशन) की झाले. म्हणून त्यांनी असे प्रमाण ठरवायला सुरुवात केली. एक अमुक आकाराचा मदरबोर्ड असेल, त्यावर अमक्या आकाराची हार्डडिस्क असेल व ती या पध्दतीच्या पिनांनी जोडली जाईल - जोडणा-या केबल्स अशा पध्दतीच्या असतील, प्लग, सॉकेट्स अमक्या पध्दतीचे असतील - वगैरे. तसं पाहिलं तर अशा जडवस्तू फार नसतात. त्यामुळे त्याचे प्रमाण ठरवणे आणि त्यांचे मोठे उत्पादन करणे शक्य झाले.
कशा-कशाला प्रमाणभूत केले?
1) कारभारी डब्याच्या आतला मदर बोर्ड.
2) कारभारी डबा आणि मॉनिटरला पॉवर सप्लाय करणाऱ्या केबल्स
3) मॉनिटर व कारभारी डब्याला एकमेकांशी जोडणा-या तारा आणि प्लग-सॉकेट्स
4) माऊस व की बोर्ड जोडणा-या तारा आणि त्यांचे प्लग-सॉकेटस
5) मदर बोर्डावर बसविण्याच्या हार्ड-डिस्क, रॅम, प्रोसेसर चिप, यांचे आकार व जोडण्याचे स्क्रू अथवा पिना.
6) कारभारी डब्याच्या आतील सर्व केबल्समधे एकावेळी सोळा सिग्नल्स घेऊन जाणा-या तारा असतात. त्यांना बस (bus) म्हणतात. त्यांना प्रमाणीभूत केले.
7) मायक्रोफोन व लाऊडस्पीकर जोडणारे प्लग, सॉकेटस
8) सीडी व फ्लॉपी ड्राइव्ह म्हणजे कारभारी डब्यामधे फ्लॉपी किंवा CD टाकण्यासाठी नेमकी जागा आणि आतमध्ये त्यावरील मजकूर वाचण्यासाठी केलेली यंत्रणा.
9) अगदी अलीकडे पेनड्राईव्ह, इंटरनेटसाठी वाय-फाय कार्ड इत्यादी वेगवेगळी उपकरणं निघाली आहेत ती जोडणारे प्लग-सॉकेट्स
वगैरे.
हे प्रमाणक त्यांनी प्रसिद्ध करून टाकले. त्यांचा कॉपीराइट ठेवला नाही. यामुळे काय झाल की इतर कंपन्यांनी देखील हेच प्रमाणक वापरून उपकरणं बनवली व त्यांना IBM compatible असे नांव पडले. मग या कंपन्या ग्राहकांना सांगू शकल्या की तुम्ही आमचा संगणक घ्या, त्याचे स्पेअर पार्टस् कुठेही मिळतील- मुख्य म्हणजे ते प्रमाणभूत असतील त्यामुळे एकाचे दुस-याला चालू शकतील किंवा नादुरुस्त झाल्यास बदलता येतील.
अशा प्रकारे प्रमाणबध्द करणे, फॅक्टरी उत्पादन करून खप वाढविणे, यामुळे झाले काय की संगणकाचा वापर खूप मोठया प्रमाणावर होऊ लागला आणि हळूहळू त्याच्या किंमतीही कमी कमी करता आल्या.
एकीकडे हे होत असतांना दुसरीकडे सॉफ्टवेअरचे तंत्रही विकसित होत होते. संगणकासाठी इंटिग्रेटेड सर्किट ऐवजी मायक्रोप्रोसेसर चिप आल्या ते पुढचे पाऊल होते कारण आकडेमोड करण्याचा चिपचा वेग तसेच साठवण क्षमता आय्.सी. च्या तुलनेत कित्येक हजारपट जास्त होती. एकेका मायक्रोप्रोसेसरचे डिझाइन करायला लाखो डॉलर्सचा खर्च येतो. पण त्यांच्याकडून कामंही तशीच अफाट केली जातात.
संगणक विकासात अगदी सुरवातीला संगणकाला निर्देश देण्यासाठी संगणकाच्या विशिष्ट भाषेत पायरी-पायरीने एक-एक निर्देश लिहून ते संगणकाला सांगावे लागत. एखादा निर्देश चुकला तर संगणक ठप्प होणार, मग आपण एकेका निर्देशाची तपासणी करत कुठे चुकलो ते शोधून काढायचे अशी प्रक्रिया होती. संगणकाच्या विशिष्ट भाषा जसे की बेसिक, कोबोल, फोरट्रॉन इत्यादी शिकून घ्याव्या लागत. तरच प्रोग्रामिंग तज्ज्ञ होता येई. तसे होऊनही एकेका कामाचा प्रोग्रॅम लिहायला कित्येक दिवस लागत असत
संगणकाकरवी काम होण्यामधे कळपाटीच्या माध्यमातून मानवी भाषेला विवेचकापर्य़ंत (प्रोसेसर) पोहोचवणे, तिथे त्या संदेशाची मशीनी भाषेत दखल घेतली जाणे, हार्डडिस्क मधे साठवण होणे, निर्देशाबरहुकूम प्रक्रिया होणे, व मानवी भाषेत रूपान्तर होऊन पुन्हा आपल्याला समजणे एवढे पाच टप्पे आहेत.
या सर्वाचा मूळबिंदु म्हणजे मानवी भाषेला मशीन लँग्वेज मधे बदलून विवेचकाकडे ठराविक जागी पोचवणे. सॉफ्टवेअरच्या विकासांत मशीन लँग्वेज ते असेम्ब्लर, कम्पायलर, प्रोग्रामिंग लँग्वेज, खुद्द प्रोग्राम, व तो वापरून केलेले काम हार्ड डिस्कमधे साठणे असे टप्पे विकसित झाले. . यातील प्रत्यक्ष वापरणाऱ्याने केलेल्या कामाखेरीज इतर सर्व टप्पे एकत्रपणे Standardise करून ऑपरेटिंग सिस्टम (OS) बनवतात. १९९० पासून पुढे हळूहळू अधिकाधिक प्रगत OS बनत गेल्या. यातील विण्डोज व लीनक्स ही नावे आपण ऐकतो.
हे एका उदाहरणावरून समजून घेऊ या. एक खोली, त्यांत ठेवलेली लोहाराची हत्यारं, त्यापासून बनवलेलं किंवा बाहेरून आणलेलं लेथ मशीन, त्याने बनवलेला चाकू, व एक पपई अशी कल्पना करा.खोलीमुळे हे सर्व सामान ठेवण्याची सोय झाली. संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम अशी सोय देते.(मात्र, हत्यारं होती म्हणूनच खोली बांधता आली हे ही विसरून चालत नाही.) हत्यारं वापरून लेथ मशीन, व ते वापरून चाकू बनवणे आणि तो वापरून पपई कापणे हे काम करता येते. आपल्याजवळ जर फक्त खोली व चाकू असले तरी पपई कापता येईल, पण नारळ असेल व तो फोडायला हातोडा लागेल तेंव्हा आपल्या खोलीत एकतर हातोडा हवा, किंवा लेथमशीन ठेवले आहे ते वापरून हातोडा बनवून घ्या व मग नारळ फोडा अशी सोय तरी असली पाहिजे. विण्डोज व लीनक्स सिस्टम मधे हा फरक आहे. लीनक्समधे प्रोग्रामिंगला लागणारी कित्येक उपकरणे सिस्टमसोबतच असतात. पण ज्यांना तयार हत्यारांमधून नेमकेच काम करायचे असेल त्यांना विण्डोज OS सोईची आहे.
मशीन लँग्वेज,असेम्ब्लर,कम्पायलर,प्रोग्रामिंग लँग्वेज,व प्रोग्राम यांचे काम वरील हत्यारं, लेथ मशीन, चाकू किंवा हातोडा यासारखे असते. प्रोग्राम वापरून आपण करतो ते काम पपई कापण्यासारखे असते. आपण दिलेला निर्देश संगणक याच प्रक्रियेतून समजून घेत असतो. यासाठी त्याची एक ऑपरेटिंग सिस्टम असावी लागते. तसेच ठराविक कामांचे प्रोग्राम व त्यांच्या निर्देशांची भाषा - प्रोग्रामिंग लँग्वेज असते. केलेले कामही मानवी भाषेच्या रूपाने दिसावे अशी व्यवस्था असते.
थोडक्यांत, संगणकाला दिले जाणारे सर्व निर्देश मानवी भाषेतूनच देता येतात. वरील वर्णनावरून असे समजून येईल की ढोबळ मानाने या निर्देशांचे तीन प्रकार होतात. ऑपरेटिंग सिस्टमचे निर्देश, प्रोग्रॅमचे निर्देश, व प्रत्यक्ष कामासाठी वापरलेले निर्देश.
यातील ऑपरेटिंग सिस्टमचा विकास हा एवढा कळीचा मुद्दा ठरला की डॉस व विण्डोज ऑपरेटिंग सिस्टमचा जनक बिल गेट हा कित्येक वर्ष जगांतील सर्वांत श्रीमंत माणूस राहिला व त्याची कंपनी मायक्रोसॉफ्ट देखील सर्वाधिक श्रीमंत म्हणून नावारूपाला आली.
पुढारलेल्या चिपा वापरुन मायक्रोसॉफट कंपनीने सॉफ्टवेअरच्या विकासात मोठी झेप घेत संगणकावरचे काम चाकोरीबद्ध करत आणले. या चिपा तयार करणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतात, उदा. इंटेल. 1980 सालच्या सुमारास 8086 चिप उपलब्ध झाली तेंव्हा मायक्रोसॉफ्ट कंपनीने डॉस ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली व इतरांनी रिसर्च करून तयार केलेले कित्येक प्रोग्राम उदा. गद्यलेखनासाठी वर्डस्टार, त्याचप्रमाणे बेसिक, कोबोल इत्यादी संगणकीय भाषा, लोटस व स्प्रेडशीट सारखे संख्या गणनात्मक प्रोग्राम वगैरे डॉस ऑपरेटिंग सिस्टम मार्फत वापरणे सुलभ केले. त्यामुळे आता फक्त डॉसचे थोडेसे प्रोग्रामिंग शिकून संगणकाचा वापर करणे शक्य झाले. खूप तरुण मुली-मुले याकडे वळली. संगणक इंजिनियर होण्यासाठी अजूनही संगणकीय भाषांचे, विशेषतः C++ व जावा यांचे विशिष्ट तंत्र शिकावे लागते. पण तसे न करूनही फक्त संगणकीय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करून, BCA, MCA, BCS, अशा डिग्र्या घेऊन मोठ्या ऑफिसेसचे संगणकीय काम सांभाळणे हे चांगले करियर ऑप्शन मिळाले.
या पुढचा टप्पा म्हणजे नवख्या माणसाला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम मधे सोपेपणाने निर्देश देता यावे म्हणून graphical user interface (GUI), चे तंत्र वापरून खूणचित्रांची पद्धत विकसित केली गेली. त्यानंतरच्या जास्त प्रगत चिप निघाल्यावर मायक्रोसॉफ्टने 1995 मधे डॉसपेक्षा बरीच प्रगत असलेली व खूणचित्र वापरणारी विण्डोज ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली व त्या जोडीला मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे कित्येक रेडिमेड प्रोग्राम बाजारात आणले. याच वर्षी टेलीफोन तारांमार्फत मोठया प्रमाणात व जगभरात इंटरनेटही सुरु करण्यांत आले.

या
दरम्यान ऑपरेटिंग सिस्टमच्या
बाहेरही सॉफ्टवेअरचे प्रयोग
व विकास चालूच होते.
गूगल
-
याहू
सारख्या इंटरनेट सर्व्हिसेस
आल्या.
त्यांच्या
पाठोपाठ लीनक्सची ऑपरेटिंग
सिस्टम आली ज्यामधे रेडिमेड
प्रोग्राममधे बदल करू शकणारे
कम्पायलर्स पण आहेत.
एकदा
लिहिलेली माहिती बदलता येऊ
नये यासाठी pdf
फाईल
तयार करणारी acrobat
कंपनी,
इंटरनेटवरुन
पटापट डाऊनलोड करण्यास मदत
करणारी get
right किंवा
orbit
कंपनी,
झिप-अनझिप
करुन फाइली पाठवण्यास मदत
करणारे अविष्कार,
आपली
वेबसाइट डिझाइन करायला मदत
करणारे सॉफटवेअर्स अशी कित्येक
उदाहरणं देता येतील.
त्या
शोधांसोबतच इंटरनेटच्या
साहाय्याने इतरांच्या संगणकावर
विषाणु (व्हायरस)
टाकणारे,
ते
विषाणु शोधून नष्ट करणारे,
असे
कित्येक शोधही होत राहीले.
फेसबुक
सारखे पोर्टल,
क्लाउडमार्फत
डेटा-व्यवस्थापन,
अमेझॉनसारखी
घरबसल्या खरेदीची सुविधा,
इंटरनेट
बँकिंग,
ऍप
तयार करण्याचे सॉफ्टवेअर
अशा
सगळयांच्या मागे या सुविधांचे
अविष्कार करणारी माणसे व
त्यांची प्रज्ञा कामाला आली.
त्यांच्यामुळे
संगणकाचे तंत्र सोपे झाले,
किमती
कमी झाल्या आणि उपयोग तर इतक्या
प्रकारांनी वाढले की आज प्रत्येक
सुशिक्षित व्यक्तिला संगणकाचे
प्रशिक्षण नसले तरी जाणीव
मात्र हवीच.
============================================================
सॉफ्टवेअरचे
प्रयोग व विकास होण्यात
भारतीय प्रज्ञेचा व तज्ज्ञांचा
मोठा हातभार लागला.
मात्र
ते सर्व टीममधले छोटे सदस्य
याच रूपात राहिले.
वर
उल्लेखिलेली सर्व प्रगत
सॉफ्टवेअर्स परदेशी कंपन्यांच्या
मालकीची आहेत.
अगदी
अलीकडे भारतीय मुळाचे अमेरिकन
नागरिक अशा कंपन्यांमधे वरिष्ठ
पदावर जाऊ लागलेली आहेत.
त्या
दृष्टीने एक देश म्हणून भारत
अजूनही खूप मागे आहे.
--------------------------------------------------------------------------------
Sunday, June 14, 2009
पुणे रेल्वे स्थानकावर संगणक -- हृषीकेश मेहेंदळे
पुणे रेल्वे स्थानकावर संगणक
--हृषीकेश मेहेंदळे.
1 जुलै 1997 च्या आधी कधीतरी
खूप लोकांची खूपं काम जलद गतीने करायची असतात, तेंव्हा संगणक खूप उपयोगी पडतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेल्वेच्या सीट किंवा बर्थ रिझर्वेशनच्या कामात.
रेल्वेने दिवसभरात लाखो लोक ये जा करत असतात. ज्या लोकांना लांबचा प्रवास करायचा असतो त्यांना रिझर्वेशन करावे लागते. कधी कधी जवळचा प्रवास असेल तरी सुध्दा सोईसाठी रिझर्वेशन करतात. इतक्या सगळ्या लोकांचे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये व कधी कधी लांबच्या एखाद्या स्टेशन पासून कुठल्यातरी आणखी तिसऱ्याच स्टेशन पर्यन्त सुध्दा रिझर्वेशन करावे लागते. ज्या काळात संगणक नव्हते त्या काळी लोकांना साधे पुणे मुंबई रिझर्वेशन करायला किती त्रास व्हायचा! मग पुढे गाड्या बदलाव्या लागणारे रिझर्वेशन करायला किती त्रास होत असणार.
आता संगणकर आल्यामुळे हे सर्व फारच सोपे झाले आहे. हे सगळे काम संगणकावर कसे करत असतील? असा माझ्या मनात विचार आला. म्हणून मी पुणे स्टेशनवर हे सर्व बघायला गेलो.
आता संगणक म्हटले की दोन प्रकार असतात -- एक म्हणजे dumb व दुसरे Intelligent तर आता तुम्ही म्हणाल की ह्या dumb व Intelligent ह्या काय भानगडी आहेत बरे?
या दोघांमध्ये एक मोठ्ठा फरक आहे. Intelligent म्हणजे एक संपूर्ण संगणक असतो. म्हणजेच त्यात संगणकाचे सर्व भाग आले. म्हणजेच CPU जो संगणकाचा खरा मेंदू असतो, मॉनिटर जो संगणकावर काय चालले आहे हे दाखवतो, (साधारण T.V प्रमाणेच) की- बोर्ड, ज्याने आपण संगणकाला विविध गोष्टी करायला सांगू शकतो, आणि एक माऊस ज्याचे कामही संगणकाला आदेश सांगण्याचे असते.
मग Dumb Computer म्हणजे काय?
साधारण भाषेत Dumb Computer म्हणजे की- बोर्ड व मॉनिटरची एक जोडी, याला स्वतःला मेंदू नसतो, म्हणून याला आपण ठोंब्या म्हणू.
तुम्ही Computer मध्ये Net working हा शब्द ऐकला असेल. दोन किंवा जास्ती Computers ना एकत्र जोडून वापरण्याची क्रिया म्हणजेच Networking! तर Dumb computer मध्ये त्याच्या पेक्षाही भन्नाट आयडिया वापरतात. त्यात एकाच CPU ला एकाच वेळी खूप लोकं वापरू शकतात. एका इथरनेट (Ethernet) नामक उपकरणाद्वारे एका CPU ला ठोंबे जोडलेले असतात. आणि प्रत्येक ठोंब्याला एक ऑपरेटर वापरू शकतो.
आता तुम्हाला हे सर्व कशाला सांगितले? तर मी जर नुसतेच म्हटले असते की रेल्वे स्टेशनवर Dumb Computer वापरतात तर याचा अर्थ काय लावायचा हे बऱ्याच लोकांना कळले नसते. बरे ते जाऊद्या.
तर आता तुम्ही विचाराल की रेल्वे स्टेशनवर जर फक्त ठोंबेच वापरतात, तर ते संगणक म्हणून बुध्दिचे किंवा युक्तीचे काम कसे काय करतात? बघूया....
पुणे स्टेशनवरून असे ४३ ठोंबे मुंबई मार्गे उपग्रहाद्वारे दिल्लीतल्या मुख्य CPU ला जोडलेले आहेत. पण त्यामध्ये टप्पे आहेत. पुणे स्टेशनचा ईथरनेट मुंबईच्या विभागीय Workstation ला उपग्रहाद्वारे जोडलेला आहे. तसेच नाशिक, भुसावळ, नागपूर इत्यादि स्टेशनवरचे इथरनेट सुद्धा मुंबईच्या विभागीय वर्क स्टेशनला जोडलेले आहेत. असेच कलकत्ता, हैद्राबाद इ. विभागीय रेल्वे केंद्रांचे वर्कस्टेशन सुद्धा दिल्लीच्या CPU ला जोडलेले आहेत. अशा प्रत्येक रिजनल वर्क स्टेशनवर एक Trans- receiver, एक इथरनेट, एक Multiplexer इत्यादि बरीच उपकरणे असतात. शिवाय त्या विभागातील मुख्य स्टेशनवरचे ठोंबे पण वर्क स्टेशनला जोडलेले असतात. या उपग्रहाच्या Network द्वारे दुसऱ्या कुठल्याही स्टेशनवरची स्थिती कळू शकते.
या सगळ्या गुंतागुंतीचा फायदा असा की समजा मला मुंबई - कलकत्ता- दिल्ली असे तिकीट हवे आहे, तर मी पुण्यातल्या पुण्यातच हे कनेक्टिंग तिकीट काढू शकतो, व मला ते कन्फरमेशनसकट मिळू शकते. दुसरा फायदा हा की, समजा माझे हे कलकत्ता-दिल्ली तिकीट १०-३० वाजता कन्फर्म झाले व मला त्या ट्रेनवरची शेवटची जागा मिळाली, समजा कलकत्त्याला कुणी १०-३५ ला रिझर्वेशन करायला आला व त्याला सुद्धा हीच ट्रेन पकडायची असेल तर माझे रिझर्वेशन कायम राहील व त्याला वेटिंग लिस्ट मिळेल. याचे कारण हे की एका स्टेशनवरून दुसऱ्या कुठल्याही स्टेशनची परिस्थिती बघता येते. त्यामुळे मी आधी केलेल्या रिझर्वेशनची नोंद कलकत्त्याला दिसते. व तिथल्या माणसाला थांबवले जाते.
हे सर्व होण्याकरितां सर्व स्टेशनवरची माहिती एकाच ठिकाणी एकाच वेळी लागते. म्हणजे पुण्यात बुध्दिमान संगणक व कलकत्त्यात बुध्दिमान संगणक असले व ते एकमेकापासून सुटे-सुटे असले तर त्यांचा उपयोग नाही. ते जोडलेले असले तरी त्याचा उपयोग नाही कारण असे किती CPU तुम्ही एकमेकांना जोडणार हो! त्याऐवजी ठोंबे असतांना Communication खूपच सोईचे, सोपे व तुलनेने अतिशय कमी खर्चाचे असते. मग या सर्व ठोंब्यांना चालवायला जो मेंदू CPU लागतो तो कुठे आहे बरे? तर हा CPU दिल्ली मध्ये आहे. उपग्रहाव्दारे हा मुंबई-कलकत्ता इ. रिजनल HQ ना जोडलेला आहे. व HQ चे ईथरनेट त्या त्या विभागातील महत्वाच्या स्टेशनवरच्या ईथरनेटला जोडलेला आहे.
मी पुणे स्टेशनवर हे सर्व जेव्हा बघत होतो तेंव्हा त्यांना मी नमुना म्हणून विचारले की उद्याच्या दिल्ली- मुंबई राजधानीची किती रिझर्वेशन शिल्लक आहेत? तेंव्हा ती माहिती त्यांनी तात्काळ काढून दाखवली व तुला रिझर्वेशन हवे का? अस विचारले. अशी पस्तीस हजार रोजची रिझर्वेशन फक्त पुणे स्टेशनवरुन होत असतात, असे ही मला सांगितले. यातली ५-६ हजार तर फक्त पुणे- मुंबई साठीच असतात.
कुठलाही संगणक चालवायला एक आदेश प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टम (OS) लागते जशी Dos, Unix, Win95 (इतर OS सुद्धा बनवता येतात) पण रेल्वे स्टेशनच्या कामा मध्ये फक्त गणिताची गरज असते, जसे पुणे- दिल्ली- झेलमचे सेकंड क्लासचे भाडे किती? समजा मला २ फुल, एक हाफ रिझर्वेशन हवी असतील तर त्यांचे भाडे किती? इत्यादि! म्हणून फोर्ट्रान नावाच्या संगणक भाषेत एक आदेश प्रणाली बनवली व त्यात चालणारे प्रोग्राम बनवले.
त्यामुळे रेल्वेच्या संगणकावर तेवढी ठराविकच म्हणजे गणिताची कामे करता येतात. पण रेल्वेच्या कामाला तेवढ्याचीच गरज असते.
आज पुणे रेल्वे स्टेशनच्या विविध खिडक्यांवर एक एक ठोंबा आहे! शिवाय गांवात जी रेल्वे रिझर्वेशन केंद्र आहेत त्यात सुद्धा पुणे स्टेशनला जोडलेले ठोंबे आहेत. शिवाय लोणावळा, सोलापूर इ. सारख्या लांबच्या स्टेशनावरचे ठोंबे सुद्धा पुण्यालाच जोडलेले आहेत! पुणे स्टेशनवर असे एकूण ४३ ठोंबे जोडलेले आहेत.
आपण फोनने जी रेल्वे इंन्कवायरी करतो ते म्हणजे काय? तर एवढेच की रेल्वे स्टेशनवर बसलेला माणूस ही माहिती वाचून दाखवतो. संगणकामुळे त्याला कुठलीही माहिती मिळू शकते.
पण मग एवढी सगळी माहिती साठवतात कुठे? कशावर? तर ज्या स्टेशनवर गाडी सुटणार आहे त्याच स्टेशनवर रिझर्वेशन चार्टवर ही माहिती साठवलेली असते. संगणकावर सुध्दा असते. म्हणजे रिझर्वेशन लिस्ट हरवली तर Backup म्हणून! पण ही माहिती गरज संपल्यावर पुसून टाकायला लागते, म्हणून लहान अंतरावरच्या गाड्यांची माहिती गाडी सुटल्यावर ३ तासाने व लांबच्या गाड्यांकरिता गाडी सुटल्यावर ४ तासांनी आपोआप ही माहिती पुसली जाते त्यामुळे नवीन माहिती करता जागा तयार होते.
अशा प्रकारे संगणकामुळे रेल्वेचे काम खूपच सोपे होऊन रिझर्वेशन तिकीटासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा कमी झाल्या. आता आयत्या वेळच्या तिकीटाच्या रांगा थांबविण्यासाठी इतर उपाय पण रेल्वे करीत आहे.
हृषिकेश मेहेंदळे
पत्ता-
भाई बंगला,
५०, लोकमान्य कॉलनी,
पौड रोड, कोथरुड,
पुणे- ४११०३८

Saturday, June 13, 2009
भाग -11- संगणक म्हणजे माहीतीचा खजिना
भाग -11
पुस्तकावरून दुरुस्त केले 22-07-2010
संगणक म्हणजे माहीतीचा खजिना --महाजाल आणि जालशोधयंत्रे
अर्थात इंटरनेटवरून सर्चने माहिती घेण्याचे तंत्र
संगणक म्हणजे माहीतीचा खजिना कसा बनतो ते पाहू या. ई-मेल चे संदेश-वहन विशिष्य व्यक्तिसाठी point to point असले तरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन गूगल, याहू सारख्या कंपन्यांनी अशी सुविधा निर्माण केली ज्याव्दारे आपण अवकाशांत आपल्या स्व:तचा मालकीचा एक माहितीचा ढग तयार करु शकतो व तो तिथे कायमपणे रहातो. त्यांतील माहिती गद्य, पद्य, चित्र, गाणी, व्हिडियो अशा सर्व प्रकारची असते. यासाठी आपल्याला अवकाशांतील जागांचे नियोजन करणाऱ्या तसेच ढग तयार करण्याची सुविधा देणाऱ्या अशा दोन्हीं कंपनींकडे पैसे भरून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्या आपल्या ढगाला एक पासवर्ड व एक पत्ता देखील देतात. त्याला संकेतस्थळ म्हणतात. आपल्या ढगाला आपण पब्लिक किंवा सार्वजनिक असे म्हटले असेल तर इतरांना हा पत्ता गाठून तिथे लिहीलेली माहिती वाचता येते किंवा आपण परवानगी देऊ त्याप्रमाणे इतरही कांही कामे करता येतात. मात्र आपल्या ढगावर वैयक्तिक असे वर्णन केले असेल तर तो इतरांना वाचता येत नाही
पासवर्ड वापरून आपण आपल्या माहितीत फेरबदल करतो. म्हणून आपल्या ढगाचा पत्ता इतरांना मुक्तहस्ते द्यायचा पण पासवर्ड नाही द्यायचा. आपला ढग छोट्या आकाराचा असेल (सुमारे 1 गेगाबाइटपेक्षा लहान) व वैयक्तिक स्वरूपाचा असेल तर कित्येक कंपन्या एखादा ढग फुकटही देतात.
या ढगांमधे सगणकाच्या भाषेत वेब साईट, ब्लॉग साईट किंवा पोर्टल असे प्रकार आहेत. गूगल, याहू यांचे स्वत:चे असे ढग तर आहेत. शिवाय ते इतरांच्या ढगांचे प्रबंधन पण करतात. त्यामुळे त्यांना सर्वांचे सार्वजनिक ढग व त्यातील माहिती पहाता येते. या सुविधेचा वापर करून त्यानी पुढचा टप्पा -- म्हणजे स्वत:ची सर्च इंजिन्स तयार केली. म्हणून जर कोणी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाईप केला तर ज्या ज्या ढगांवर, ज्या ज्या माहीतीच्या पानावर भारत हा शब्द आला असेल त्या सर्व पानांची एक यादीच आपल्या समोर ठेवली जाते. आजच मी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाइप केल्यावर संगणकाने मला दाखवले की सगळ्या माहिती ढगांवर मिळून एकूण एक कोटी दोन लाख पानांवर भारत हा शब्द आढळतो व ती यादी शोधून माझ्या समोर ठेवायला गूगलला फक्त 0.21 सेकंद लागले. यातील ज्या पानावर आपण टिचकऊ (क्लिक करू) त्या पानावरची माहिती वाचता येईल.
यावरुन आपल्याला कळेल की. संगणक उघडून त्यावर महाजाल सुरु करुन गूगल सर्च उघडले तर माहितीच्या एका अफाट जगांत नेणारी खिडकी आपल्यासमोर उघडते. आपल्याला हवा असलेला विषय त्यांत लिहायचा की क्षणार्धांत माहिती मिळते. त्यात वृत्तपत्रातील माहिती असते, कांही अख्खे वृत्तपत्रच असते. कित्येक लेखक आपले संबंध पुस्तकच्या पुस्तक स्वतःच्या माहिती-ढगावर टाकून ठेवतात. ते आपण वाचू शकतो. प्रश्न विचारु शकतो. मित्रमंडळ स्थापन करु शकतो.
तर मग चला आणि तयार करा आपापले माहितीचे ढग आणि कळू द्या जगभराला तुमचे विचार.
माहितीच्या ढगासाठी ज्ञानढग किंवा ज्ञानमेघ हा शब्द कसा वाटतो?
--------------------------------------------------------------------

भाग -- 10 --- संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक
भाग -- 10 पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2010
संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक
इंटरनेट -महाजाल
संगणकावर महाजालाद्वारे जगभर फाईली पाठविण्याचा शोध 1983 मधे लागला. त्यासाठी आधीच्या तीन शोधांची मोठी मदत झाली.
पहिला खूप आधीचा शोध लाउडस्पीकरचा - म्हणजेच आपण बोललेला आवाज इलेक्ट्रिक सिग्नल मधे बदलता येतो हा तो शोध. या उपकरणाला मायक्रोफोन म्हणतात. मग तो इलेक्ट्रिक सिग्नल मोठा करायचा आणि पुन्हा त्याचे रूपांतर आवाजांत करून हा मोठा आवाज लोकांना ऐकवायचा.
1885 च्या आसपास जगदीशचंद्र बोस व मार्कोनी या वैज्ञानिकांनी दुसरा शोध लावला. रेडियो तरंगांच्या सहाय्याने इलेक्ट्रिक संदेशांना (पर्यायाने ध्वनि संदेशांना देखील) एका जागेवरुन दुसरीकडे आवाज किंवा संदेश पोचवण्याचं तंत्र त्यांनी शोधल होतं. त्यातूनच पुढे रेडियोचा जन्म झाला. रेडियोसाठी प्रसारण करणा-या आकाशवाणी केंद्रांवरुन तिथले कार्यक्रम रेडियो तरंगाच्या सहाय्याने अवकाशात पाठवतात. त्याचवेळी आपण आपला ट्रान्झिन्टर ट्यून केला असेल तर तो या रेडियो तरंगांना पकडतो, आणि मूळ केंद्रावर चालणारा कार्यक्रम आपल्याला जसाच्या तसा ऐकवतो. पण तो क्षण निघून गेल्यावर आपण तो कार्यक्रम ऐकू शकत नाही. म्हणूनच आकाशवाणी केंद्रावर सहा वाजता लागणारा कार्यक्रम आपण सात वाजता ऐकू शकत नाही. याला रियल टाइम किंवा ऑन-लाईन अप्रोच म्हणजे “ज्या च्या त्या क्षणाला” असे नांव आहे. (हुषार लोकांनी त्यावर तोडगा काढलाच- की सहा वाजता लागलेला कार्यक्रम कुणाला तरी रेकॉर्ड करुन ठेवायला सांगायचे आणि मग तो सावकाश ऐकायचा.)
तसेच या पध्दतीला “ब्रॉडकास्ट पध्दत” असे नांव आहे. कारण केंद्रावरील ट्रान्समिशन ताबडतोब दाहीदिशात पसरते आणि कुणीही ते ऐकू शकतो. सर्वांसाठी खुले!
त्याच्या थोडे आधी म्हणजे 1876 मधे अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell) ने टेलिफोनचा शोध लावला होता. त्यामध्ये एका यंत्रावर बोललेले स्वर लगेच इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतात, आणि टेलिफोनच्या तारेतून दुस-या टोकाला किंवा लांबच्या गावांला पोचतात. तिथल्या रिसीव्हर मध्ये ते पुनः स्वरांच्या रुपाने तिकडच्या माणसाला ऐकू येतात. हे देखील ऑन-लाईनच असते.
यात महत्वाचा मुद्दा असा की फोनवरील संदेश-वहन एका विशिष्ट फोन नंबर वरुन दुस-या विशिष्ट फोन नंबरवरच जाऊ शकते - ते सर्वाना खुले नसते कारण ते ब्रॉडकास्ट पद्धतीने नसते. संदेश पाठवणा-याचा पत्ता (महणजे फोन नंबर) माहीत असतो आणि ज्याला पाठवायचे त्याचा पण फोन नंबर सांगावा लागतो. याला point to point संदेशवहन म्हणतात.
फोनचे संदेशवहन जगभर जाणे गरजेचे असल्याने गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत समुद्रातून, जमीनीखालून, जमीनीवरुन असे तारांचे जाळेच जगभर विणले गेले. त्यासाठी अल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा यासोबत काचेच्या तारा - ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला. ऑप्टिक फायबरची क्षमता व त्यातील संदेशवहनाचा वेग इतर तारांपेक्षा कितीतरी हजारपट अधिक असतात. असे तारांचे जाळे विणणा-या कंपन्या जगांतील अति श्रीमंतांच्या यादीत असतात. संगणकासाठी देखील याच तारा वापरल्या जातात.
यावरुन आपल्या लक्षांत येईल की, सुरुवातीच्या काळापासून संदेश पाठविणा-या दोन त-हा विकसित झाल्या. एका विशिष्ट पत्त्यावरुन दुस-या पत्त्यावर संदेश पाठविणे -- जो फक्त त्याच व्यक्तीला घेता येईल अशी एक पद्धत. फार पूर्वीपासून चालत आलेली टपाल खात्याने पत्र पाठविण्याची पध्दत याच प्रकारची होती हे तुमच्या लक्षात आले असेलच. मात्र टपालाला पोचायला वेळ लागतो ही गैरसोय तर येणारे पत्र हे ऑफ-लाइन म्हणजे ज्याला मिळाले त्याने त्याच्या सोयीने थोडाफार उशीर करून वाचावे असे असते, ही मोठी सोय. ते त्याने वाचले की नाही हे कळायला मार्ग नसतो ही गैरसोय.
दुसरी त-हा म्हणजे ब्रॉडकास्ट पद्धतीने एकाचवेळी कोण्या एका संपूर्ण क्षेत्रात ऐकता येईल अशा पद्धतीने प्रसारित करणे. रेडियो किंवा दूरदर्शनवरुन येणारे संदेश ब्रॉडकास्ट पद्धतीचे म्हणजे कुणीही ऐकावे असे असतात -- पण ऑन लाइन -- म्हणजे ज्या क्षणी ते पोहोचतात त्याच क्षणी ऐकावे लागतात.
संगणकात या दोन्ही सोयीचा मेळ घातलेला आहे. जाणारी ई-मेल टेलिफोनच्या तारांमधून जात असल्याने लगेच पोहोचते. ती point to point पध्दतीची असते, म्हणजे ज्याच्या पत्त्यावर ई-मेल पाठविली त्यालाच ती मिळते, मात्र सोयीने केव्हांही वाचता येते. मोबाइल फोन वर तिथल्या तिथे बोलले जाते पण SMS वर संदेश आल्यास सावकाश वाचता येतो मोबाईल चे संदेशगमन देखील point to point असते. मात्र टेलिव्हजनचे संदेशगमन ब्रॉडकास्ट पध्दतीने असते.
ई-मेल चा प्रवास रेडियो तरंग आणि सॅटेलाइट वरुन तर काही प्रवास तारांमधून होतो
संगणकावरून वाईड एरिया नेटवर्क द्वारे लांबवर फाईली पाठविण्याची सुविधा 1983 मधेच आली. मात्र सामान्य माणसांना सोपेपणाने इंटरनेट वापरणे 1995 पासून शक्य झाले.
----------------------------------------------------------

Friday, June 12, 2009
******* यादी
भूमिका - objective
भाग- 1 -- संगणक म्हणजे काय?
भाग- 2 --संगणक म्हणजे एक यंत्र
भाग- 3--संगणक म्हणजे युक्तीबाज जादूगर
भाग- 4--संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल
भाग- 5--संगणक म्हणजे खेळगडी
भाग- 6 -- संगणक म्हणजे पोस्टमन
भाग- 7 -- संगणक म्हणजे टाइप रायटर
भाग– 8 -- संगणक म्हणजे हरकाम्या
भाग– 9 -- संगणक म्हणजे कपाट
भाग- 10 -- संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक
भाग- 11 -- संगणक म्हणजे माहितीचा खजिना
भाग- 12 -- संगणक म्हणजे अफलातून गणित
भाग- 13 - संगणक म्हणजे थोडेसे बाजार व्यवस्थापन
भाग- 14 - संगणक म्हणजे मायेचा ओलावा
भाग- 15 -- संगणक म्हणजे खिडक्याच खिडक्या
भाग- 16 -- संगणक म्हणजे स्वत:चे पुस्तक
भाग- 17 -- संगणक म्हणजे आपले पुस्तकांचे कपाट
भाग- 18 -- संगणक म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ
भाग १९ -- संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?
भाग- २० - संगणक म्हणजे सारणी लेखक
भाग- २१ - संगणक म्हणजे बुकिंग क्लार्क
भाग- २२ - संगणक म्हणजे पेपर सेटर
भाग- २३ - संगणक म्हणजे बैठक मॅनेजर
भाग- २४ - संगणक म्हणजे अकाउंट क्लार्क
भाग- २५ - संगणक म्हणजे चित्रकार
भाग- २६ - संगणक म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापक
भाग २७ -- संगणक म्हणजे प्रकाशन विश्व
भाग २८ -- संगणक म्हणजे टेलीशॉपिंग
भाग २९ -- संगणक म्हणजे थोडेसे इलेक्ट्रॉनिक्स
भाग- ३० - संगणक म्हणजे हरिकथा
-------------------------------------------
शासकीय कर्मचा-यांना संगणकाबाबत कांय कांय यायला हवे
संगणकावर मराठी टायपिंग
टपाल व्यवस्थापन
संगणक पदनाम कोष
जिल्हाधिकारी यांना सूचना
-------------------------------------------------------
Comments

|
2/3/10
|
नमस्कार लीना मेहेंदळे मॅडम,
तुमचे "संगणकाची जादूई दुनिया" हे पुस्तक वाचून संपवले, आणि लगेच तुम्हाला इमेल पाठवत आहे.
तुमचे पुस्तक अप्रतीम झाले आहे. या पुस्तकाच्या नऊ कोटी प्रती काढून प्रत्येक मराठी माणसाला वाचायला द्यायला हवे, इतके ते उत्तम जमले आहे.
सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या गोष्टी संगणकाबद्दल समजायला हव्यात त्या त्या तुम्ही अगदी सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. या पुढची पायरी म्हणजे प्रत्यक्ष हाताने काम करणे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना संगणकाचा वापर करतांना जो आत्मविश्वास येईल त्याचीच आज गरज आहे.
पुन:श्च एकदा तुमचे अभिनंदन.
आपला,
नितीन निमकर
------------------
|
2/4/10
|
सप्रेम नमस्कार.
प्रत कुठे मिळू शकेल?
सलील कुळकर्णी
--------------------
|
2/7/10
|
आपल्या हातून अजुन असे बरेच काम होवो ही शुभेच्छा
अशोक सराफ
अशोक सराफ
भाग -- 6 -- संगणक म्हणजे पोस्टमन
भाग -- 6
tallied from book 22/07/2011
संगणक म्हणजे पोस्टमन
या भागांतील शब्दावली -
की-बोर्ड = कळपाटी, मेलबॉक्स = टपालपेटी, मोडेम =?, इंटरनेट = महाजाल, इंट्रानेट = अंतर्जाल, ब्राउझर =?, वेबसाइट= संकेतस्थळ, पासवर्ड = कूटशब्द (? आहे तिथे वाचकांनी शब्ग सुचवावेत)
आता आपण संगणकाचा दुसरा उपयोग बघू या. संगणकाचा उपयोग पोस्टमन सारखा करतात.
खरतर संगणक म्हणजे टपालखातच म्हटल पाहिजे. कारण टपालाशी संबंधित सगळी कामं संगणक करतो. पोस्टाची पेटी तोच, पोस्टमास्तर तोच, पत्र घेऊन जाणारं विमानही तोच आणि घरपोच आणून देणारा पोस्टमन देखील तोच.
ही सगळी कामं संगणक कशी करतो? तर टेलिफोन खात्याच्या मदतीने हे एक उत्तर. आपण टेलिफोन खात्याकडे पैसे भरुन टेलिफोन घेतो तसेच अजून पैसे भरुन मोडेम नावांचे यंत्र घ्यायचे. त्या यंत्राची एक तार टेलिफोनच्या सॉकेटमध्ये तर दुसरी संगणकाच्या कारभारी डब्यात खास असवलेल्या इंटरनेट सॉकेटला जोडतात. आपले पत्र किंवा संदेश संगणकातून मोडेमला, तिथून टेलिफोन खात्याच्या इंटरनेट ट्रान्समिशन साठी केलेल्या खास एक्सचेंजला, तिथून सिस्टमच्या तारांमधून दूर देशीच्या टेलिफोन मधील रिसीव्हिंग एक्सचेंज पर्यंत आणि तिथून पुन्हा टेलीफोन व मोडेम मार्फत तिकडल्या संगणकाला मिळतात. या खास सिस्टम मुळे आपली ईमेल शेजारचा गावी, शेजारचा देशी, किंवा जगाचा दुस-या टोकाला पाठवायचा खर्च सारखाच, तसाच लागणारा वेळही सारखाच. या उलट फोन करू तेंव्हा वेगवेगळ्या देशांत फोन पोचवायचे दर वेगवेगळे असतात, व टपाल पोचायला लागणारा वेळ पण कमी-जास्त असतो.
म्हणजे आपल्या घरातील संगणकाने पोस्टमन होऊन जगभर आपली ई-पत्रं पोचवावीत अस वाटत असेल तर आधी ब्रॉडबॅण्ड मोडेम व इंटरनेट सुविधा घ्यावी लागेल. (मोडेमही कित्येक प्रकारचे असतात, पण सध्यासाठी आपण टेलिफोन खात्याचा ब्रॉडबँण्ड मोडेम समजूया). या मोडेम खेरीज अजून दोन सोई लागतात.ब्राउझिंगची आणि प्रत्यक्ष संदेशवहनाची. संगणका सोबतच ब्राउझर सॉफ्टवेअर मिळतात. गूगल क्रोम, इंटरनेट-एक्सप्लोअरर व मोझिला-फायरफॉक्स हे तीन प्रचलित ब्राउझर आहेत. मात्र प्रत्यक्ष संदेशवाहनाचे काम करण्यासाठी गूगल, याहू, हॉटमेल, अशा वेगळ्या संदेशवाहक कंपन्या आहेत, त्या ईमेल व इतर कित्येक वेब-आधारित सुविधा पुरवतात.
टेलिफोन खाते (BSNL) मोडेम मार्फत इंटरनेट सुविधा पुरवते. शिवाय मोबाइल सर्व्हिस मार्फतही इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊ शकते, जसे टाटा इंडिकॉम, रिलायन्स, एअरटेल इत्यादी करतात.
डेस्कटॉपवरचा ब्राउझर उघडला की एखाद्या संदेशवाहक कंपनीचे संदेशवाहक पान उघडले जाते. जसे याहू किंवा गूगल. कधी कधी कोरे पानही उघडले जाते. ते बदलून आपण आपले पत्र ज्या कंपनीमार्फत पाठवायचे असेल त्या कंपनीचे पान उघडायचे.
आता प्रत्यक्ष ई पत्रव्यवहार करण्यासाठी काय करावे लागते ते पाहू. पहिले काम म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी एक ईमेल पत्ता रजिस्ट्रेशन करुन घ्यायचा. समजा मला गूगल कंपनीतर्फे लीनामेह (leenameh) या नावाने ईमेल पत्ता रजिस्टर करायचा आहे, तर गूगलचे संकेतस्थळ उघडून त्यामध्ये साइन अप (sign up) या शब्दावर क्लिक केले की रजिस्ट्रेशनचा एक नमुना फॉर्म समोर येतो. त्यातील प्रश्नांची उत्तरे द्यायची. ईमेल-आयडी काय हवी याचे उत्तर leenameh असे इंग्लिश अक्षरांत लिहायचे. आता लीनामेह असे देवनागरी लिहूनही चालते. पुढला प्रश्न पासवर्ड (कूटशब्द) चा असतो. त्यावर समजा मी jayhind (जयहिन्द- हे ही इंग्लिशमधेच) लिहीले. मग इतर पाच सहा सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. रजिस्ट्रेशन चा फॉर्म भरुन पूर्ण केला की सबमिट बटणावर क्लिक करायचे की आपला ईमेल, नांव-पत्ता इत्यादी त्या कंपनीकडे रजिस्टर होतो. असे रजिस्ट्रेशन सुरुवातीला एकदाच करावे लागते. शिवाय त्यासाठी आपले खरे नांव न देता एखादे वेगळे – हवे तर फॅन्सी नांव देऊन चालते.
आपण कितीही कंपन्यांकडे कितीही वेगवेगळ्या नांव-पत्त्याने रजिस्टर करु शकतो. मात्र एका कंपनीकडे एका नांवाने एकच नोंदणी करता येते. ते नांव आधीच दुस-या कोणी घेतले असेल तर आपल्याला मिळणार नाही. खूपदा एका घरातील सर्व माणसं एकच अकाउंट वापरतात म्हणजे तो अकाउंट उघडून त्यावर आलेला पत्रव्यवहार घरातील सर्वजण वाचू शकतात. असे एकमेकांना एकमेकांचे कार्यक्रम सारखे कळत रहातात. जसा आपल्या घराचा कायम पत्ता असतो आणि त्याचा उपयोग रेशनकार्ड, पासपोर्ट इत्यादीसाठी होतो, तसेच या ई-मेल पत्त्याचे पण कायम स्वरूपी इतर कांही उपयोग असतात.
वरील उदाहरणात माझा ई-मेल पत्ता leenameh@gmail.com असा झाला. यामधील ऍट दि रेट या शब्दासाठी वापरले जाणारे अक्षर @ (वर्तुळाच्या आतील a) -- इतके रुढ झाले आहे की, कळपाटीवर (की-बोर्डवर) वरच्या रांगेत याची कुंजी (की) असतेच. माझा पासवर्ड झाला jayhind. आता जगभर मी कधीही कुठेही गेले तरी कोणताही संगणक उघडून त्यावरील ब्राउझरमार्फत, गूगलचे साइन-इन (sign-in) चे पान उघडू शकते. त्या पानावर दोन खिडक्या लुकलुकत असतात. त्यावरील पहिली खिडकी माझा ईमेल पत्ता (आय् डी) लिहिण्यासाठी व दुसरी पासवर्डसाठी असते. पहिलीवर जाऊन मी leenameh लिहायचे आणि दुसरीवर जाऊन jayhind लिहायचे की माझी खाजगी मेल बॉक्स उघडणार. आपण पासवर्ड लिहितो तेंव्हा संगणकात फक्त टिंबटिंब दिसते. हेतू हा कि शेजारी कुणी बसले असतील तरी त्यांना आपला ईमेंलचा पासवर्ड कळू नये.
(गूगलच्या साइन पानाचे चित्र)
पत्र व्यवहार संपला की त्या पानावर कुठेतरी साइन आउट - sign-out असते. तिथे क्लिक केले की मेल बॉक्स बंद होणार. आपण इतरांच्या संगणकावरून ईमेल पहात असू तेंव्हा आठवणीने साइन आउट करावे.
मेल बॉक्स मधून एखादे पत्र पाठवायचे असेल तर “कंपोज मेल” या बटणावर क्लिक करायचे की आपल्यासमोर पोस्टकार्डवजा एक पान उघडते. त्यावर पत्ता आणि पत्र लिहायच्या दोन वेगवेगळ्या जागा असतात. मला स्वत:लाच पत्र पाठवायचे असेल तर पत्त्याच्या जागी मी leenameh@gmail.com असे लिहायचे. पत्र लिहिण्यासाठी दिलेल्या जागेवर पत्र लिहायचे. हे सर्व झाल्यावर सेंड बटणाने पत्र रवाना करायचे.
अशाप्रकारे संगणकावर पत्र पाठवण्याचे काम शिकून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही. ही पानं वाचायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळांतच या गोष्टी शिकून होतात. दुसरे कोणी मला ई-मेल पाठवू इच्छित असतील तर ते पण leenameh@gmail.com या पत्त्यावर मला ई-मेल पाठवू शकतात. ती माझ्या टपालपेटी (मेल बॉक्स) मधे येऊन थांबेल. मात्र माझा पासवर्ड माहित असल्याशिवाय कुणीही माझी टपालपेटी उघडू शकत नाही.
अशा प्रकारे आपण जगांत कुणालाही पाठवलेले पत्र त्यांना क्षणार्धात मिळू शकते. पण कधीतरी इंटरनेट वर देखील ट्रॅफिक जाम होतो. मग मात्र ई-मेल मिळायला चार-पांच तासही लागू शकतात.
ईमेलचे तंत्र शिकायला अंधाऱ्या खोलीतील भूत घालवणारा मित्राचा हात फारच उपयोगी ठरतो. मग तर नवीन अकाउंट उघडणे, ज्यांचे अकाउंट आहेत अशा मित्रांना ई-पत्र पाठवणे इत्यादी कामें पाचच मिनिटांत शिकता येतात.
चॅटिंग
इंटरनेटवर टपालपेटी (मेलबॉक्स) उघडल्यावर पलीकडील व्यक्ती ऑन-लाइन असेल तर आपण चॅटची सोय वापरून लेखी संदेशांची देवाण-घेवाण तिथल्यातिथे करू शकतो किंवा तिथूनच फोन करू शकतो. यासाठी गूगल चॅट, स्काइप, याहू चॅट,सारखी चांगली सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. आतातर मोबाइलवरील व्हॉट्सॅपने चॅटिंगच्या सोईत या सर्वांना मागे टाकले आहे
=========================================इथून पुढे तपासणे
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या युक्ती --
समजा आपण इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडून याहूमेलवर पोचलो. तिथे साइन-इनच्या पानावर आपले नांव (आय्.डी.) व पासवर्ड सांगून लॉग-इन झाले की आपला मेलबॉक्स उघडतो. त्यांत नवीन आलेल्या ईमेल्सची यादी दिसते. त्यांतील एखादी
ईमेल उघडली की आपल्याला असे पान दिसते---
(book has different and better pictures)
त्यांतील Reply, Forward, व delete या सोई नेहमी लागणा-या.
-- फॉरवर्ड असे सांगून आपण आलेली ईमेल जशीच्या तशी, पुन्हा टाइप न करता इतरांना पाठवू शकतो.
-- ज्यांना वारंवार ईमेल पाठवावी लागते त्यांचे पत्ते contacts या यादीत ठेवले की पुढच्या वेळी संगणक स्वतःच तो पत्ता दाखवतो.
-- एकाच ईमेलवर खूप जणांचे पत्ते लिहिले की एकदाच पाठव (सेंड) सांगितल्यावर संगणक सर्वांना ती ईमेल पाठवतो.
-- कुणी खूप जणांना ईमेल लिहिली, त्यांत आपले नांवही असेल आणि आपल्याला वाटलं की आपले उत्तर पण त्या सर्वांना कळावे तर उत्तर पाठवतांना आपणही reply all सांगायचे. तसे नको असेल तर फक्त reply सांगायचे.
-- एखादी ईमेल पाठवावी की नाही असं असेल तर save draft म्हणून वेगळी ठेऊन द्यायची.
-- आलेल्या ईमेल खूप काळ जपून ठेवता येतात, मग त्यांचा गोंधळ वाढू नये यासाठी folder ही सोय आहे. मेल बॉक्स मधेच आपण folder तयार करायचे आणि move सांगून वेगवेगळ्या मेल्स संबंधित folder मधे टाकून ठेवायच्या.
-- महत्वाच्या ईमेल्सना फ्लॅग किंवा मार्क असे सांगून वेगळे दाखवता येते. किंवा सरळ त्यांना पुन्हा unread चा शिक्का मारायचा की कधीही मेलबॉक्स उघडली की आपले लक्ष जातेच.
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या या युक्ती आहेत.
कधी कधी आपण ब्राउझर उघडल्यावर आपल्याला ABOUT BLANK या नांवाचे कोरे पानच समोर येते. अशा वेळी त्या address bar वर याहू किंवा गूगल लिहिले की त्यांचे पान उघडते व आपण ईमेल पाठवू शकतो.
Lotus notes अथवा outlook express सारख्या कांही सुविधा वापरून आपल्या सर्व ईमेल्स डेस्कटॉपवर ठेऊन त्यांचे व्यवस्थापन करता येते. या सुविधेला मेसेजिंग सोल्यूशन म्हणतात. आता जास्त वेगवान ब्रॉडबॅण्ड मोडेममुळे घरच्या किंवा वैयक्तिक संगणकावर याची गरज उरलेली नाही. मोठ्या कार्यालयांना याचा उपयोग होतो.

Wednesday, June 10, 2009
भाग -17 -- आपले स्वतःच्या पुस्तकांचे कपाट
भाग -17
tallied with book 24-07-2011
संगणक म्हणजे आपले स्वतःच्या पुस्तकांचे कपाट
अर्थात आपला ब्लॉग - blog
संगणकावर भरपूर वेबसाईट तयार होऊ लागल्या. पण खूप लोकांना असेही वाटू लागले की ते स्वागत-पृष्ठ करा- त्याला सजवा एवढे नखरे हवेत कशाला? चला ही प्रक्रिया आणखीन सोपी करु या. आपण लोकांना त्यांची खूप पुस्तक ठेवायच कपाटच देऊ या. या कपाटाच नांव ठेवल ब्लॉग. आता आपण गूगल किंवा याहू वर जाऊन स्वत:चा ब्लॉग म्हणजे पुस्तकांचे कपाट- त्याला छान नांव-पत्ता देऊन रजिस्टर करायचे. किंबहुना गूगलच्या जी-मेल वर आपण ईमेल साठी रजिस्ट्रेशन केले असेल तर गूगलची ब्लॉगस्पॉट ही सुविधा वापरण्यांसाठी नवे रजिस्ट्रेशन पण करावे लागत नाही.
ब्लॉगस्पॉट सुविधेमध्ये आपला ब्लॉग म्हणजे कपाट उघडल की आपण ठरवायच - आपल्याला नवीन ब्लॉग तयार करायचा आहे की जुन्या ब्मलॉगधील अनुक्रमणिका वाढवायची आहे. आपण विषयानुरूप वेगवेगळे ब्लॉग तयार करू शकतो किंवा एकाच ब्लॉगमधे वेगवेगळे लेख ठेऊ शकतो. जुन्या ब्लॉगमध्ये नवीन अनुक्रमणिका वाढवता येते. असा जो विषय निवडला त्याचे लेखन, चित्र, ऑडीयो, व्हिडीयो यापैकी कांहीही त्या ब्लॉगवर लिहून ठेवता येते.
मीच आतापर्यंत सुमारे ३२ ब्लॉगस् तयार केले आहेत. प्रत्येकाच्या अनुक्रमणिकेत पंधरा ते वीस लेख आहेत. अशा त-हेने सुमारे पांच-सहाशे लेखांचे लेखन आज मला इंटरनेटवर ठेवता आलेले आहे.
http://leenameh.blogspot.com या साईटवर हे लेख वाचता येतील.

भाग -- 18 -- काळ्या दगडावरची पांढरी रेघ
भाग -- 18(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणक म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ
संगणकावरील मजकूर व फाईलींची सुरक्षा अशी जपतात.
संगणकाचे सोपेपणा कशांत आहे? तर केलेले काम चुकीचे असेल तर ते पुसून पुन्हा दुरुस्त करता येते. पण मग जे काम सहजासहजी पुसता येऊ नये- त्यांत कुणालाही चटकन बदल करता नये असे जेव्हां गरजेचे असते तेव्हां काय? सर्व कायदेशीर व्यवहार, व्यावसायिक कॉण्ट्रक्ट, शेयरचे व बॅंकांचे व्यवहार असे असतात जिथे एकदा प्रत्येक शब्द काटेकोरपणे तपासून मान्य केल्यानंतर पुन्हा ते कागदपत्र न बदलले जाण्याची खबरदारी घ्यावी लागते. जणू काळ्या दगडावरची न पुसली जाणारी पांढरी रेघच.
यासाठी जेंव्हा आपण ई-मेल पाठवतो, तेव्हा आपल्याला ई-मेल सर्व्हिस पुरविणारी कंपनी (म्हणजे गूगल, याहू इत्यादी) एक ट्रिक करतात. ज्यामुळे आपली ई-मेल पलीकडच्या माणसाला पोहचली की त्यांत बदल होऊ शकत नाही. आता हे खरं की तीच ई-मेल जर त्याने तिस-या माणसाकडे पुनर्क्षेपित (forward ) केली असेल तर त्यावेळी तो त्याच्यात बदल करू शकतो. पण तिस-या माणसाला गेलेली ई-मेल ही कधीच माझी ई-मेल असणार नाही, ती दुस-या माणसाची ई-मेल असेल. माझी ई-मेल कोणती- याचं उत्तर एकच - जी माझ्या संगणकावरुन दुस-या माणसाकडे गेली व त्याच्या संगणकावर दिसत असेल ती. या दोन्ही संगणकांवर ईमेल पाठवल्याचा विषय, तारीख, आणि घड्याळाची अगदी मिनिट-सेकंदापर्यंत वेळ दिलेली असते. खूण पटवण्याचे तेही साधन असते.
म्हणजे यामध्ये आपला पत्रव्यवहार अगदी शंभर टक्के नाही तरी ९५ टक्के सुरक्षित मानला जाऊ शकतो. कारण त्यांत बदल होण्याचा स्कोप फार कमी असतो. अगदी याहू वगैरे मूळ कंपनी देखील कटात सामिल असेल तरच. मात्र जेंव्हा एखाद्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेंव्हा असं करणं अगदीच अशक्य नाही.
संगणकामध्ये अजून एक सोय असते. एका घरातले दोन संगणक किंवा एखाद्या कार्यालयातले शंभर-एक संगणक सुध्दा वायरिंग करुन एकमेकांना जोडता येतात. अशावेळी एका संगणकावरची फाईल दुस-या संगणकासमोर बसलेली व्यक्ती पाहू शकते.
कधी कधी दुसरी व्यक्ती वरिष्ठ अधिकाराची असेल आणि तिला फाईल मधे कांही बदल करायचे असतील तर कांय? यासाठी दुस-या संगणकावरील फाईल उघडून पहातांना Read only किंवा Read and Edit असे दोन पर्याय असतात. Read only पध्दतीने फाईल उघडली असेल तर दुसरी व्यक्ती त्यांत बदल करु शकत नाही. कुणाच्या संगणकावरून कुणाला बदलाचे अधिकार द्यायचे, झालेल्या बदलाच्या नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या इत्यादी गोष्टी ज्या त्या ऑफिसच्या कामाच्या संस्कृतीवरून ठरते.
या सोयींमुळे संगणकावरील काम ब-याच अंशी सुरक्षित आणि सोपे होते. अर्थात ते एकशे एक टक्का खात्रीलायक कधीच होऊ शकत नाही. या संदर्भांत मला एका कुलूप बनविणा-या कंपनीची जाहीरात आठवते. जाहीरातीचे शब्द आहेत- "जगांतले कुठलेच कुलूप चोरासमोर अनंत काळ टिकाव धरु शकत नाही. जे त्यांतल्या त्यात जास्त वेळ टिकाव धरते ते जास्त चांगले" संगणकामध्ये देखील फाईल मध्ये बदल न करता येण्याची सोय त्याच धर्तीची आहे.
मजकूरांत फेरफार होऊन चालणार नाही असे जेव्हां खात्रीलायक करायचे असते तेव्हां तो मजकूर कागदावर लिहून काढून त्यांतील प्रत्येक पानावर सर्व संबंधितांच्या सह्या घेणे हाच खरा उपाय ठरतो. कॉण्ट्रॅक्ट साठी ही पद्धत वापरतात. जमीन व्यवहारात तर ही कागदपत्रे रजिस्ट्रार कडे रजिस्टर पण करून द्यावी लागतात.
संगणकावर देखील डिजीटल सिग्नेचर असा प्रकार आहे पण फारसा प्रचलित नाही कारण सध्यातरी तो किचकट आहे. शिवाय जिथे कायद्यानेच रजिस्टर करणे आवश्यक आहे तिथे तो व्यवहार कागदावर उतरून ठेवावाच लागतो.
--------------------------------------------------------------------
फोटो-
) डेस्कटॉप (पडद्यावर ऑन केलेला)
) माऊस, की-बोर्ड, पेन ड्राइव्ह
) मराठी की बोर्ड ले-आऊट
) एखाद्या चांगल्या वेब साईट चे होम पेज
--------xxxxxxxx-----------------
परिशिष्ट- १ संगणकावर मराठी टायपिंग
परिशिष्ट- २ प्रशासनांत संगणक या लेखातील उतारे
परिशिष्ट- ३ संगणक पदनाम कोण या लेखातील उतारे
परिशिष्ट- ४ मेनू बार, टूल बार, इत्यादी
परिशिष्ट- ५ वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटच प्रोग्राम मधील साम्य- ते प्रोग्राम हाताळणे.

भाग - 16 -- स्वत:चे पुस्तक
भाग -- 16 tallied as per book 24-07-2010
संगणक म्हणजे स्वत:चे पुस्तक
अर्थात वेबसाइट बनवण्याचे तंत्र
या भागांतील शब्दावली --वेबसाईट = संकेतस्थळ, होम पेज = स्वागत-पृष्ठ, अपलोड = जालस्थापना
संगणकाचा वापर आपल्या स्वत: लिहिलेल्या किंवा लिहायच्या पुस्तकासारखा करता येतो. त्याला वेबसाईट म्हणतात.
आपण पुस्तक कां लिहीतो? तर आपले विचार जगाला कळावे म्हणून. संकेतस्थळदेखील याच कारणासाठी करतात.
पुस्तक काढतांना आपल्याला एक छान सजवलेले मुखपृष्ठ लागते. शिवाय अनुक्रमणिकाही असते. संकेतस्थळ तयार करतांना मुखपृष्ठ व अनुक्रमणिका या दोघांना एकत्र करुन स्वागत-पृष्ठ (होम पेज) बनवितांत.
याचा अर्थ असा की स्वागत-पृष्ठ थोडे रंगीबेरंगी, कलात्मक, आकर्षक मांडणीचे असे हवे आणि संकेतस्थळावर जी जी माहिती ठेवणार आहोत, त्याची अनुक्रमणिका देखील त्या पानावरच पाहिजे.
तसं पाहिल तर आपण स्वत: सुध्दा उभ्या आडव्या रेघा काढून ब-यापैकी दिसणारे स्वागत-पृष्ठ तयार करु शकतो. पण एखाद्या वेब डिझाइनरने केलेल स्वागत-पृष्ठ केव्हांही जास्त आकर्षक ठरते.
स्वागत-पृष्ठावर काय अनुक्रमणिका लिहावयाची यासाठी आपण एका शासकीय कार्यालयाचे उदाहरण घेऊ या. त्यातील भाग या पध्दतीचे असतील --
- कार्यालयाची सुरुवात होण्याबाबत शासनाचा आदेश
- प्राथमिक माहिती
- माहिती अधिकार कायद्याखालील आवश्यक माहिती
- उद्दिष्ट, दूरगामी योजना आणि संकल्प (objective vision and mission)
- कामांची व योजनांची यादी
- बजेट
- फॉर्म -- (इतरांनी भरायचे असल्यास)
- नवीन कांही-(ही माहिती सतत बदलती राहील)
- संबंधित कायदा, विविध शासन निर्णय
- यशोगाथा
- वार्षिक अहवाल
इत्यादी.
यातील प्रत्येक भागासाठी स्वागतपानावर एखादे छानसे खूणचित्र किंवा शब्द ठरवायचा आणि प्रत्येक भागातील माहितीसाठी एकेक वेगळे पान तयार करायचे..
या पानांना संकेतस्थळावर टाकण्यासाठी आधी आपले संकेतस्थळ असायला पाहिजे. जसे ईमेल पत्त्यासाठी आपल्याला एखाद्या कंपनीकडे नोंदणी करावी लागते, तसेच संकेतस्थळासाठी देखील वेब-डोमेन रजिस्टर करावे लागते. बऱ्याच कंपन्या ही सुविधा देतात. उदाहरणार्थ गूगल कंपनीच्या गूगलपेजेसवर आपण आपल्या नावांचे संकेतस्थळ रजिस्टर करु शकतो. वैयक्तिक संकेतस्थळे कांही किंमत न भरताही मिळू शकतात. मात्र मोठी कार्यालयीन बेबसाईट असेल तेंव्हा वेब-डोमेन रजिस्टर करणा-या एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडे पैसे भरुन आपली साईट नोंदवून घेणे आवश्यक.
संकेतस्थळ कसे करतात ? यासाठीआपण कांही रेडिमेड सोपे प्रोग्राम वापरु शकतो. उदाहरणार्थ ड्रीमवीव्हर किंवा मायक्रोसाफ्ट फ्रण्टपेज. हा प्रोग्राम उघडला की आपल्यासमोर एखाद्या वहीच्या आकाराएवढे पान उघडते. त्यामध्ये आपण निरनिराळे आयताकृती भाग पाडायचे. प्रत्येक भागात आपण अनुक्रमणिकेतील एकेक शब्द किंवा खूणचित्र ठेवायचे. रेडिमेड प्रोग्रामच्या मदतीने आपण निरनिराळ्या चौकोनांची बॅकग्राउंड रंगीत करु शकतो- त्यातील अक्षरांचे आकार आणि रूप वेगवेगळे ठेवू शकतो- हेतू हा कि हे पान जास्त आकर्षक व्हावे आणि आपली वेबसाईट उघडणा-याला ते वाचावेसे वाटावे. असे स्वागत-पृष्ठ तयार करायचे. मग नवनवीन पाने उघडून त्या पानांवर एकेका भागाचे शीर्षक आणि संपूर्ण माहीती ठेवायची. मग प्रोग्रामच्या सहाय्याने आपले स्वागतपृष्ठ व ही सर्व पाने अपलोड करायची आणी स्वागत-पृष्ठावरील त्या त्या शब्दाला ते ते पान हायपरलिंकने जोडायचं. लिंक म्हणजे जोडणे आणि हायपरलिंक म्हणजे संकेतस्थळावरील पाने महाजालाच्या मदतीने जोडणे. जसं आपण अनुक्रमणिकेतील एखादा भाग वाचावासा वाटला की समोर नमूद केलेले पृष्ठक्रमांक पाहून पान नेमकं उघडतो, तसेच स्वागतपृष्ठावरील एकेका शब्दावर टिचकावले की ते ते हायपरलिंक केलेले पान उघडते. गंमत म्हणजे असे पान तयार करून झाले नसले तरी फक्त शीर्षक टाकलेले पानही जालस्थ (अपलोड) करता येते. म्हणजे आधी प्रत्येक पानाला एक पत्ता मिळून ते स्वागत-पृष्ठाला जोडता येते. त्या पानावर शीर्षकाखाली - "क्षमा करा, अजून इथली माहिती तयार नाही" असे लिहून ठेवावे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तसतसे एकेक पान पूर्ण करून पुन्हा जालस्थ केले तरी त्याचा पत्ता तोच रहात असल्याने स्वागतपानावर काही बदलावे लागत नाही. तसेच वेबसाईट अपलोड झाल्यावर त्यामधील कांही पानांचा मजकूर चुकीचा वाटला किंवा अपटूडेट करावा लागला तर तसे करता येते.
आपल्या संकेतस्थळाबद्दल लोकांनी आपल्याला ईमेल ने सूचना द्याव्या असे वाटत असेल तर स्वागतपृष्ठावर एक चौकोन- व त्यांत "आम्हाला कळवा" असे शब्द लिहून आपल्या ईमेल पत्त्यावर हायपरलिंक करायचे. तसेच आपले संकेतस्थळ किती जणांनी पाहिले ते कळण्यासाठी स्वागतपृष्ठावर एक काऊंटर लावून ठेवता येतो. इकडे एखाद्याने आपली साईट उघडली की काउंटर वर पुढचा आकडा मोजला जातो.
सरकारी कार्यालयांमध्ये बहुधा संकेतस्थळ बनवण्याचे काम एखाद्या वेबडिझाइनरला देतात. मला खूपदा पहायला मिळते की एखाद्याला असे काम दिले, त्या व्यक्तीने वेब रजिस्ट्रेशन स्वतच्या नावांने केलं, तसच पासवर्ड इत्यादी सर्व माहिती स्वतः कडे ठेवली. वेब-साईटचे काम पूर्ण झाले, उद्घाटन वगैरे सोहळेही झाले, आणि पुढे फारसे काम उपलब्ध नाही म्हणून करारपत्र रद्द झाले. मग लक्षांत आले की, वेबसाईट हरवली. कारण डिझाइनरने करार संपताच ती पुसून टाकली होती. या व अशा चुका सरकारी कार्यालयांनी टाळल्या पाहिजेत.
आता तर माहितीच्या अधिकाराचा कायदा आल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांनी संकेतस्थळ तयार करून त्यावर माहिती ठेवणे आवश्यक झाले आहे.
म्हणूनच मग संकोच कशाला? आपले एखादे छोटेसे तरी संकेतस्थळ इंटरनेटवर टाकून पाहिलेच पाहिजे. आणि आतातर थोडे कमी प्रतीचे पण अगदी सोपे असे ब्लॉग-पानही उघडून चालते. त्याची माहिती पुढील भागात.
------------------------------------------------------------------------------------
हायपरलिंकचा वापर किती सोपा आहे ते कळण्यासाठी एक प्रयोग करा. वर्ड हे सॉफ्टवेअर उघडून त्यांत तीन चार परिच्छेद लिहा -- मग एखादा शब्द निवडून मेनु-बार वरील हायपरलिंकच्या आयकॉन वर क्लिक केले की संगणक आपल्याला विचारतो -- कुठे जोडू - त्यांला उत्तर दिले परिच्छेद चार, की लगेच त्या शब्दाचा रंग पालटून निळसर होतो. त्यानंतर कधीही त्या शब्दावर क्लिक केल्याने परिच्छेद चार उघडेल. या प्रयोगांत आपल्या समोर असलेल्या पानावरच हायपरलिंक तयार होते, पण संकेतस्थळ करतांना आपण नवीन पानाचा पत्ता देतो.

भाग - 24 - अकाउंट क्लार्क
भाग -- 24
संगणक म्हणजे अकाउंट क्लार्क
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
पैशाचे हिशोब ठेवणे आपल्याला नेहमीच गरजेचे असते. किती खर्च केला आणि किती आवक झाली. कुठे खर्च केला आणि कुठून आवक झाली. अकाउण्टिंग हे शास्त्र एवढं मोठं आहे की ते शिकण्यासाठी चार वर्षांचा अभ्यासक्रम आहे.
एका माणसाने त्याचा एका दिवसाचा हिशोब असा लिहिला ---
.
.
.
.
फार पूर्वीपासून अकाउण्टिंग मधे दोन महत्वाची सूत्र पाळली जातात -- डबल एण्ट्री आणि लेजर. डबल एण्ट्री चे सूत्र असे की प्रत्येक व्यवहार दोन ठिकाणी स्वतंत्रपणे नोंदवायचा.
पैसे देऊन सामान आणले तर पैशाच्या (कॅशच्या) रजिस्टरमध्ये खर्च दिसेल पण स्टॉक रजिस्टरमध्ये सामानापोटी तेवढी आवक (वाढ) पैशाच्या स्वरूपात दिसेल. सामान विकून पैसे मिळाल्यास कॅश रजिस्टरला आवक पण स्टॉक रजिस्टरला जावक दिसेल. बॅकेतून पैसे काढले तर कॅश रजिस्टरला आवक पण बँक रजिस्टरला जावक दिसेल, या उलट बँकेत पैसे जमा केल्यास कॅश रजिस्टरला जावक व बँक रजिस्टरला आवक दिसेल. दिवसभरातील सर्व आवक रकमांची व सर्व जावक रकमांची स्वतंत्रपणे बेरीज करायची. ती जुळली की हिशोब जुळला म्हणायाचा. नाही जुळली तर प्रत्येक नोंद तपासायची व चूक शोधून काढायची. एकनाथांनी एक पैशाच्या हिशोब लागत नाही म्हणून रात्रभर जागून सर्व नोंदी तपासून शेवटी चूक शोधून काढली व हिशोब जुळवले अशी आख्यायिका सांगतात.
एका सोप्या आणि आदर्श हिशोब वहीचे पान असे दिसेल -
डावीकडील आवक पान
तारीख अनुक्रमांक कारण व वर्णन आवक प्रकार आवक बँकेचे नाव स्टॉकचे पान
कॅश बँक स्टॉक टोटल
उजवीकडील जावक पान
तारीख अनुक्रमांक कारण व वर्णन जावक प्रकार जावक बँकेचे नाव स्टॉकचे पान
कॅश बँक स्टॉक टोटल
दुसरे तत्व लेजरचे. आपल्याकडे येणारे किंवा जाणारे सामान वेगवेगळया प्रकारचे असते. साधा घरातला हिशोब पाहिला तरी तांदूळ, गहू, साखर, साबण, तेल, गॅस, असे विविध प्रकारचे सामान असते. कार्यालय असेल तर वीज, पाणी, पेट्रोल, स्टेशनरी, पगार असे खर्च असतात. हिशोबाच्या मुख्य वहीत फक्त स्टॉक एवढी एकच एण्ट्री असते. म्हणून मग एक वेगळे लेजर रजिस्टर ठेवतात. त्यामध्ये एकेका प्रकारासाठी कांही पानांचा गठ्ठा राखून ठेवला जातो.
सामानाचे (स्टॉकचे ) वर्णन
आवक जावक
तारीख OB दिवसाची आवक टोटल(CB) OB दिवसाची जावक टोटल(CB)
कॅश रजिस्टर हे तारीखवार लिहिले जाते, तर लेजर हे सामानाच्या स्वरूपावर लिहिले जाते व महिन्यच्या शेवटी त्याचा हिशोब काढला की महिन्याच्या उलाढालीचा अंदाज येतो.
हिशोब चोख ठेवायचे असतील तर हे सर्व करावे लागते. म्हणजेच एका व्यवहारपोटी अकाउंट क्लार्कला चार ठिकाणी नोंदी घ्याव्या लागतात.
संगणकावर गाणिती काम करणारं सॉफटवेअर म्हणजे मायक्रोसॉफट एक्सेल किंवा इतर कोणतेही स्प्रेडशीट. यांचा वापर केला तर यातील सॉर्ट या सोईमुळे लेजर रजिस्टर आपोआप तयार होते. कसे ते पहा-
अनुक्रमांक कारण व वर्णन रक्कम आवक की जावक कॅश बँक की स्टॉक सामानाचे स्वरुप
1 2 3 4 5 6
------------------------------------------------------------
१
२
३
४
.
.
.
एकूण
या रजिस्टरमध्ये दिवसभर घडणा-या नोंदी ठेवत जायच्या. दिवसाच्या शेवटी संगणकाला सांगायचे की सर्व नोंदीची फेर मांडणी (सॉर्ट)कर - आधी स्तंभ 4 प्रमाणे, त्या अंतर्गत 5 प्रमाणे व त्या अंतर्गत 6 प्रमाणे.
असे केल्यावर संगणक सर्व आवक नोंदी वेगळया काढणार. आपण फक्त त्यांचा प्रिंट आउट घेऊन कॅश रजिस्टरच्या डाव्या पानावर चिकटवायच्या. जावक नोंदीही वेगळया निघतात त्या उजव्या पानावर चिकटवायच्या.
सर्व आवक नोंदीमध्ये संगणकाने सर्व कॅश नोंदी एकत्र, बँक नोंदी एकत्र व स्टॉक नोंदी एकत्र असे काढलेले असतेच. त्यामध्ये देखील बँकेच्या नांवाप्रमाणे किंवा स्टॉकच्या स्वरूपाप्रमाणे नोंदी एकत्र आणून मिळतात. तेवढया नोंदी प्रिंट काढून लेजर रजिस्टरला चिकटवता येते.
-----------------------------------------------------
ज्या कार्यालयांना अजूनही कागद-रजिस्टर-हार्डकॉपी हे सोपे वाटतात - ते कॅश रजिस्टर व लेजर यांना पूर्णपणे फाटा देत नाहीत. मात्र सर्व नोंदी संगणकावर घेऊन, त्यांची हवी त्या पध्दतीने (रजिस्टरच्या पध्दतीने) मांडणी करुन त्याचे प्रिंट आपल्या रजिस्टरवर चिकटवतात. जी खूप प्रगत कार्यालये आहेत तिथे मात्र या कागदी रजिस्टरना पूर्ण फाटा दिला जातो.
हे झाल एखाद्या व्यापा-याकडील सामानाच्या उलाढली करणा-या अकाउंट क्लार्कच्या सोईबद्दल. तिथे रोज नवेनवे व्यवहार होत असतात. सरकारी कार्यालयांना ठेवावी लागणारी अकाउंट रजिस्टर्स या पेक्षा खूप वेगळी असतात. तरी पण मूळ संकल्पना, म्हणजे आपल्याकडील आकडेवारी सारणीच्या स्वरूपांत लिहून त्यावर फेरमांडणी आणि गणितीय व्यवहार करणे ही संकल्पना कायम रहाते.
एखाद्या टिपिकल शासकीय कार्यालयाच्या अकाउंट क्लार्कचे सर्वांत जास्त किचकट काम म्हणजे पगार बिल, त्याखालोखाल ट्रेझरीकडे टाकावी लागणारी इतर बिले व त्यांचे व्यवस्थापन. हे काम संगणाकामुळे बरेच सोपे झाले आहे किंवा होऊ शकते.
पगार बिलामध्ये कित्येक शीर्षके असतात उदा :-
पगार (substative pay), रजा पगार (leave pay), डी.ए. एरियर्स (महागाई भत्ता थकबाकी), HRA, CLA, Transport Allowance, इत्यादी. सोबत deduction (वजावट), मध्ये GPF, GIS, HR allowances, इत्यादी शीर्षकं असतात. ती वर्षानुवर्षे कायम असतात. पगार बिल दर महिन्याला काढावे लागते. म्हणून मग हे काम तीन ठिकाणी वाटून केले जाते. एका ठिकाणी मास्टर फाईल वर मास्टर-डेटा-बेस एकत्र करतात. जसे की प्रत्येक कर्मचा-याची माहिती. मंत्रालयाचे उदाहरण घ्यायचे तर एकूण 18 मुद्यांवर सर्व कर्मचा-यांची माहिती ठेवलेली आहे. तो नमुना या लेखाच्या शेवटी आहे.
दुस-या ठिकाणी सर्व नियमांचा विचार करुन तयार केलेली सूत्र मांडून त्यानुसार संगणकाने करायच्या गणिताची पद्धत त्याच्या भाषेत प्रोग्राम रूपाने लिहिली असते. उदा. HRA हा बेसिक+ ग्रेड पे च्या 30 टक्के असेल, किंवा ट्रान्सपोर्ट अलावंस अमुक स्लॅबला इतका द्यायचा - हे सूत्र संगणकाला त्याच्या भाषेत सांगायचे. असे सर्व गणिली सूत्र शिकवून संगणकाला पगार बिलातील आकडे मोड करायला सज्ज करायचे.
ही दोन्ही कामे एखाद्या एक्सपर्ट ग्रुपकडे दिली जातात. मास्टर डाटा अगर सूत्रांच्या फाईलमध्ये कुणीही ऊठसूठ ढवळाढवळ करु नये यासाठी सुद्धा हे गरजेचे असते.
तिसरे ठिकाण म्हणजे प्रत्यक्ष पगार बिले करणारे क्लार्क. दर महिन्याला कोण कुठल्या पदावर होते, त्यांचे रजेचे दिवस, प्रमोशन, इन्क्रीमेंट यांची नोंद करुन सर्व कर्मचा-यांचे एकत्रित पगार बिल करणे - हे अकाउंट क्लार्कचे नियमित काम. ती आकडेमोड संगणकाने करावी म्हणून सर्व नांवाच्या नोंदी झाल्यावर संगणकाला सांगायचे की आता मास्टर फाईल आणि सूत्रांच्या फाइल वरुन सूत्र वापर. असे केल्याने इतर सर्व आकडे मोड संगणक करुन देतो. मंत्रालयातील एका टिपिकल विभागाचे मास्टर फाइल व पगार बिलाचे पान कसे दिसते त्याचे नमुने इथे दिलेले आहेत.
ही व्यवस्था झाली पगार बिले तयार करण्यासाठी. पण मंत्रालयाचेच उदाहरण पुढे न्यायचे तर ही बिले करणा-या विभागाइतकेच दोन इतरही विभाग या मधे सहभागी असतात - प्रत्यक्षपणे पे ऍण्ड अकाउंट्स ऑफिस आणि अप्रत्यक्षपणे वित्त विभाग.
वित्त विभागाकडून प्रत्येक विभागासाठी वार्षिक खर्चाची मर्यादा ठरवून दिली जाते. याला अप्रोप्रिएशन बजेट म्हणतात. त्या उपलब्ध रकमेतून कोणत्या मुद्यावर कसा - कसा- किती खर्च काय क्रमाने झाला हे कळावे म्हणून विभागाकडे एक अप्रोप्रिएशन बिल रजिस्टर असायचे - हे देखील अकाउंट क्लार्क हाताने लिहून व स्वत: आकडेमाड करुन तयार करत असे. (अजूनही करतात). त्यामध्ये खालील मुद्यांची महिनावार माहिती घेतली जाते --
पगार बिल, प्रवास भत्ता बिल, मेडिकल बिल, ऑफिस खर्चाचे बिल, अग्रिम देयकांचे बिल इत्यादि.
ही माहिती वित्त विभागाच्या क्लार्कने देखील वेगळया रजिस्टर वर ठेवायची. मग दोघांची माहिती जुळत नाही म्हणून फाईली दहा वेळा वर-खाली फिरणार. त्याऐवजी आता वित्त विभागामधे प्रत्येक विभागाची माहिती संगणकावर खालील प्रमाणे तयार करतात. त्यामुळे कालांतराने दोन ठिकाणी माहिती तयार करण्याचा त्रास वाचेल व दोन्हीकडील माहिती जुळेल. ही पध्दत अजून रुळली नाही. कारण वित्त विभागाने ही माहिती संगणकामध्ये द्यायला सुरुवात केली असली तरी विभागामार्फत मात्र हाती गणित आणि हाती लेखन करूनच त्यांची संगणकासोबत पडताळणी केली जाते. दोन्ही सिस्टमध्ये एकवाक्यता होऊन त्यातील सर्व दोष मिटले हे सिध्द होण्याला अजून १०-१२ महिन्यांचा कालावधी जावा लागेल.
ज्या ठिकाणी संगणकीय पध्दत सिध्द व प्रस्थापित होते तिथे अशा तक्त्यांचा शेवटी एक वाक्य लिहिण्याची पध्दत आहे-
This is a computer generated document - hence no signature is needed.
आपल्याकडे मात्र याला अजून वेळ असल्याने कदाचित असे लिहावे लागेल--
This is a computer generated document - hence signature is a must.
हा जोक मंत्रालयात वापरला जातो. असो.
तयार झालेल्या बिलांची पडताळणी व प्रत्यक्ष पेमेंटचे काम पे ऍण्ड अकाउंट ऑफिस करते. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक बिलाला एक टोकन नंबर दिला जातो. त्यामुळे विभागांकडून येणारी बिले आणि अदा झालेली किंवा शक काढून परत केलेली बिले यांच्यात मेळ रहातो. ही पूर्वापार चालत आलेली पध्दत आता संगणकावर टाकल्याने एकीकडे क्लार्कचे काम कमी झाले. दुसरीकडे पे ऍण्ड अकाउंटच्या माहितीवरून वित्त विभागाला थेटपणे माहिती जाऊन त्यांच्या विभागवार अप्रोप्रिएशन रजिस्टरमध्ये आपोआप नोंद घेतली जाते. या त्रिस्थळी नोंदीमुळे वे ऍण्ड अकाऊंट्स, वित्त विभाग आणि खुद्द विभाग यांच्या देयकांमध्ये मेळ राहतो.
जिल्हया-जिल्हयांतील ट्रेझरी ऑफिसेसचे काम देखील याच धर्तीवर काम सुरू आहे. त्यामुळे संगणकाचा उपयोग करण्याने अकाऊंट क्लार्कचे काम सोपे,सुटसुटीत होणार आहे. दर वर्षाच्या शेवटी मेळ घालणे व पडताळणी करणे यासाठी खूप स्टाफचा खूप वेळ खर्ची पडत असे ते थांबणार आहे. ही बाब पूर्णपणे सिध्द व प्रस्थापित झाली नसली तरी वाटचाल त्याच दिशेने व चांगल्या गतीने चालू आहे.
खाजगी व्यावारी,छोटया कंपन्या यांच्यासाठी देखील याच धर्तीवर महिन्या-महिन्याच्या पगाराचे व इतर हिशोब ठेवणारी टॅली किंवा इतर सॉफटवेअर विकसित करुन त्या त्या मंडळींनी विकलेली आहेत.
या सर्वामुळे आर्थिक व्यवहार बरेच सुरळीत झाले. इतके की शेअर बाजारासाठी सरकारने नियमच केला की, मोठया कंपन्याचे शेअरच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार संगणकामार्फतच होतील.
थोडक्यांत कांय तर सर्व सूज्ञ अकाउंट क्लार्कनी संगणकालाच अकाउंट क्लार्क म्हणून राबवून घ्यायला शिकले पाहिजे.
--------------------------------------------------------------------
भाग - 22- पेपर सेटर
भाग - 22
संगणक म्हणजे पेपर सेटर
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
आपल्या परीक्षा पद्धतीत तात्विक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळीवर खूप सुधारणा होण्याची गरज आहे. यातील खूपशा व्यावहारिक सुधारणा संगणकाचा उपयोग करून अगदी सोप्या पद्धतीने करता येतील. यामुळे कोट्यावधी विद्यार्थी व पालक आणि लाखो शिक्षक व परीक्षेची जबाबदारी उचलणा-या कर्मचा-यांची सोय होईल. फक्त आपल्या लक्षांत यायला हवे की खरेच असे करायला कांय हरकत आहे?
आपण चवथी गणिताच्या परीक्षेचे उदाहरण पाहू या. या पेपरांत जर दहा प्रकारची गणितं विचारली जात असतील तर त्या प्रत्येक प्रकारासाठी शंभर शंभर गणितांची एकेक प्रश्न मंजूषा तयार करायची. हे सगळे प्रश्न संगणकाकडे एका फाइल वर ठेऊन द्यायचे (हजार प्रश्न). आता संगणकाला एक प्रोग्राम असा शिकवायचा की आपण सांगू तेंव्हा त्याने प्रत्येक प्रकारातून कुठलेतरी एक, मात्र प्रत्येक वेळी नवे - अशी दहा गणितं निवडायची अणि आपल्याला एका कागदावर छापून द्यायची. की झाली आपली प्रश्नपत्रिका तयार. ती आपण परीक्षेच्छु विद्यार्थ्याला सोडवायला द्यायची अणि नंतर शिक्षकांकडून तपासून घेऊन त्याचे मार्क ठरवायचे. अशा प्रकारे चट के पट कुणाचीही परीक्षा घेता येईल.
य़ांत कित्येक सोई आहेत. दरवर्षी पेपर सेट करा, त्याची कडेकोट गुप्तता पाळा, ते कोट्यावधी पेपर वेळेत छापून घ्या आणि निरनिराळ्या केंद्रांपर्यंत पोचवा ही सगळी कटकट संपेल. पेपर फुटण्याचा धोका संपेल. सगळ्यांचे टेन्शन जाईल. याचे फायदे पण मोजूया.
(1) ही प्रश्न मंजूषा संगणकावरच न ठेवता माहितीच्या ढगांत ठेवली आणि शिवाय तिथे प्रश्नपत्रिका तयार करून देण्याची सोय देखील ठेवली तर विद्यार्थी कधीही स्वत:ची परिक्षा घेऊन आपला आत्मविश्वास वाढवू शकतात.
(2) विद्यार्थ्यासाठी दर महिन्यात परिक्षा घेण्याची सोय होऊ शकते. लाखो करोडो विद्यार्थी एकाच दिवशी परिक्षेला बसण्याऐवजी ज्यांना जशी हवी तशी परिक्षा दिल्याने सर्वाचेच टेन्शन कमी होईल.
(3) जिथे फक्त (Objective) प्रश्न असतील आणि विद्यार्थ्याने फक्त चारपैकी एका पर्यायावर खूण करायची एवढेच असेल अशा परीक्षा हल्ली हमखास संगणकावरच होतात. पण आपल्या सध्याच्या पध्दतीतील प्रश्नपत्रिका देखील या पध्दतीने तयार होऊ शकते. फक्त पेपर लिहिणे आणि तपासणे पूर्वीच्या पद्धतीने चालू राहील.
याकडे अजून आपल्या विविध परीक्षा घेणा-या बोर्डाचे लक्ष गेलेले नाही, ते लवकर जावो, हीच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या मराठी व हिन्दीच्या परीक्षा भाषा-संचालनालयामार्फत घेण्यांत येतात. तिथे ही पद्धत अर्धी अंमलात येत आहे. म्हणजे त्यांची प्रश्नमंजूषा व संगणक कार्यक्रम तयार होऊन त्यांतूनच प्श्नपत्रिका तयार होते. मात्र थेट परीक्षा-केंद्रावरच पेपर छापून घेण्याची सुविधा अद्याप सुरू करता आलेली नाही.
---------------------------------------------------------------------------------

भाग - 21- बुकिंग क्लार्क
भाग - 21
संगणक म्हणजे बुकिंग क्लार्क
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणकावर आपण स्वत: प्रोग्रॅमिंग करण्याची गरज जशीजशी कमी होत गेली तसा संगणकाचा वापर वैज्ञानिकांच्या, शास्त्रज्ञांच्या आणि तज्ञांच्या खोलीतून बाहेर पडून सामान्य माणसांच्या घरापर्यन्त, कार्यालयात, व्यापार उद्योगात मोठ्या प्रमाणांवर सुरू झाला. व्यापारी जगाने धडाक्याने याचा वापर बुकींग क्लार्क म्हणून करायला सुरूवात केली. अगदी रेल्वे तिकीट बुकींगचेच उदाहरण घेऊया.
फार पूर्वी आम्ही महाराष्ट्रातून बिहारमध्ये रेल्वेने जात असू तेव्हा वाटेत तीन गाड्या बदलाव्या लागत. धरणगावला तिकीट काढून आधी भुसावळ ते मोगलसराय कोलकाता मेलचे रिझर्व्हेशन हवे, पुढे मोगलसराय ते पटणा दुस-या गाडीचे, पुढे पटणा ते बरौनी तिस-या गाडीचे रिझर्व्हेशन लागत असे. मग धरणगावचे स्टेशन मास्तर तार पाठवून भुसावळ, मोगलसराय व पटणा येथे कळवत असत. तिथले स्टेशन मास्तर आमचे त्या त्या गाडीचे रिझर्व्हेशन करून तारेने उत्तर पाठवीत असत. रेल्वेसाठी खास टपाल-तार-यंत्रणा असल्याने आम्हांला रिझव्हर्वेशन झाल्याची माहिती खूप लवकर मिळत असे. आम्ही म्हणायचो, पाहा आपल्या रेल्वेचा कारभार किती कार्यक्षम आहे. आणि प्रवासाबद्दल आम्ही निश्चित राहत असू.
त्या त्या स्टेशन मास्तर कडे तार आवक-जावक रजिस्टर असायचे, त्यात कोणत्या तारा आल्या, पैकी कोणत्या तारांना उत्तर दिले, कुणाचे रिझर्वेशन केले इत्यादि माहिती असे. त्यावरून गाडीच्या वेळेवर रिझर्वेशनचा चार्ट तयार करून प्रवाश्यांच्या सोईसाठी फलाटावर तसेच गाडीच्या डब्यावर पण चिकटविला जात असे. इतकी सर्व काम त्या एक तार आवक-जावक रजिस्टार वरून होत असत. पण त्या पध्दतीत खूप लोकांना खूप वेळ काम करावं लागत असे. भुसावळ रेल्वेच्या स्टेशन मास्तरांनी भुसावळ ते मोगलसराय अस आमच रिझर्वेशन केल्याचं पुढल्या मोठ्या जंक्शनला म्हणजे इटारसीच्या व पुढच्या सर्व जंक्शन्सच्या स्टेशन मास्तरांना सुध्दा कळवावे लागे, जेणेकरून त्यांनी तिथून त्याच सिटांचे रिझर्व्हेशन देऊ नये.
आता रेल्वे प्रशासनाने आपली सर्व स्टेशन्स संगणकावर जोडली आहेत. त्यामुळे आपण आरक्षण करायचे ठरवल्याक्षणी तोपर्यंत झालेल्या बुकिंगची व रिकाम्या असलेल्या सिटांची माहिती मिळत राहते. शिवाय आता पुढचा टप्पा गाठून घरबसल्या आपण आपल्या घरांतील इंटरनेटची सुविधा वापरून रिझर्व्हेशन करूनही चालते आणि तिकीटही आपल्या संगणकावरच उपलब्ध होते, तेवढे आपण प्रिंट करून घ्यायचे. शिवाय एखादा कार्यक्षम स्टेशन मास्तर तासातासालादेखील ही माहिती मागवून योग्य ते नियोजन करू शकतो.
जगभरांतील सर्व विमान तिकिटांचे बुकिंग, मोठमोठ्या हॉटेल्समधील खोल्यांचे बुकिंग हे संगणकावर होऊ लागलेले आहे. ज्या प्रेक्षणीय स्थळांवर आत जायला तिकिट काढावे लागते तेथील व्यवस्थापकांनी आपली वेबसाईट तयार करून तिथेच तिकिट बुकिंगची सोय करायची आणि तुम्ही घरून तिकिट घेऊन तिथल्या रांगेत उभे न रहावे लागता आत जाऊ शकता, अशी सोय पण जगभरात दिली जाते.
महाराष्ट्रात एस.टी.महामंडळाला देखील ही सुविधा देणे शक्य आहे व लौकरच देण्याची योजना आहे.
काही मोठ्या मंदिरांनी ही बुकिंगची पध्दत वापरायला सुरूवात केली आहे. आता समजा तुम्हांला चतुर्थीचा अभिषेक एका ठरावीक गणेश मंदिरात करायचा आहे, पण प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, तर तिथले पुजारी तुमच्या विनंतीनुसार संगणकावर बुकिंग करून घेतात व त्या तिथीला तुमच्या नांवे अभिषेक घालतात. पुढच्या टप्प्यात काही मंदिराची अशी पण योजना आहे की तुमच्या नांवांने केलेल्या एक्सक्ल्यूसिव्ह अभिषेकाची व्हिडिओफीत तुम्हांला नंतर पाहता येईल किंवा त्याचवेळी व्हिडिओ कॉन्फरसिंग पद्धतीने तुम्ही स्वतःच्या खोलीत बसून अभिषेकाच्या पाठांत सहभागी होऊ शकाल.
------------------------------------------------------------------------------

Subscribe to:
Posts (Atom)