भाग -- 18(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणक म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ
संगणकावरील मजकूर व फाईलींची सुरक्षा अशी जपतात.
संगणकाचे सोपेपणा कशांत आहे? तर केलेले काम चुकीचे असेल तर ते पुसून पुन्हा दुरुस्त करता येते. पण मग जे काम सहजासहजी पुसता येऊ नये- त्यांत कुणालाही चटकन बदल करता नये असे जेव्हां गरजेचे असते तेव्हां काय? सर्व कायदेशीर व्यवहार, व्यावसायिक कॉण्ट्रक्ट, शेयरचे व बॅंकांचे व्यवहार असे असतात जिथे एकदा प्रत्येक शब्द काटेकोरपणे तपासून मान्य केल्यानंतर पुन्हा ते कागदपत्र न बदलले जाण्याची खबरदारी घ्यावी लागते. जणू काळ्या दगडावरची न पुसली जाणारी पांढरी रेघच.
यासाठी जेंव्हा आपण ई-मेल पाठवतो, तेव्हा आपल्याला ई-मेल सर्व्हिस पुरविणारी कंपनी (म्हणजे गूगल, याहू इत्यादी) एक ट्रिक करतात. ज्यामुळे आपली ई-मेल पलीकडच्या माणसाला पोहचली की त्यांत बदल होऊ शकत नाही. आता हे खरं की तीच ई-मेल जर त्याने तिस-या माणसाकडे पुनर्क्षेपित (forward ) केली असेल तर त्यावेळी तो त्याच्यात बदल करू शकतो. पण तिस-या माणसाला गेलेली ई-मेल ही कधीच माझी ई-मेल असणार नाही, ती दुस-या माणसाची ई-मेल असेल. माझी ई-मेल कोणती- याचं उत्तर एकच - जी माझ्या संगणकावरुन दुस-या माणसाकडे गेली व त्याच्या संगणकावर दिसत असेल ती. या दोन्ही संगणकांवर ईमेल पाठवल्याचा विषय, तारीख, आणि घड्याळाची अगदी मिनिट-सेकंदापर्यंत वेळ दिलेली असते. खूण पटवण्याचे तेही साधन असते.
म्हणजे यामध्ये आपला पत्रव्यवहार अगदी शंभर टक्के नाही तरी ९५ टक्के सुरक्षित मानला जाऊ शकतो. कारण त्यांत बदल होण्याचा स्कोप फार कमी असतो. अगदी याहू वगैरे मूळ कंपनी देखील कटात सामिल असेल तरच. मात्र जेंव्हा एखाद्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेंव्हा असं करणं अगदीच अशक्य नाही.
संगणकामध्ये अजून एक सोय असते. एका घरातले दोन संगणक किंवा एखाद्या कार्यालयातले शंभर-एक संगणक सुध्दा वायरिंग करुन एकमेकांना जोडता येतात. अशावेळी एका संगणकावरची फाईल दुस-या संगणकासमोर बसलेली व्यक्ती पाहू शकते.
कधी कधी दुसरी व्यक्ती वरिष्ठ अधिकाराची असेल आणि तिला फाईल मधे कांही बदल करायचे असतील तर कांय? यासाठी दुस-या संगणकावरील फाईल उघडून पहातांना Read only किंवा Read and Edit असे दोन पर्याय असतात. Read only पध्दतीने फाईल उघडली असेल तर दुसरी व्यक्ती त्यांत बदल करु शकत नाही. कुणाच्या संगणकावरून कुणाला बदलाचे अधिकार द्यायचे, झालेल्या बदलाच्या नोंदी कशा पद्धतीने ठेवायच्या इत्यादी गोष्टी ज्या त्या ऑफिसच्या कामाच्या संस्कृतीवरून ठरते.
या सोयींमुळे संगणकावरील काम ब-याच अंशी सुरक्षित आणि सोपे होते. अर्थात ते एकशे एक टक्का खात्रीलायक कधीच होऊ शकत नाही. या संदर्भांत मला एका कुलूप बनविणा-या कंपनीची जाहीरात आठवते. जाहीरातीचे शब्द आहेत- "जगांतले कुठलेच कुलूप चोरासमोर अनंत काळ टिकाव धरु शकत नाही. जे त्यांतल्या त्यात जास्त वेळ टिकाव धरते ते जास्त चांगले" संगणकामध्ये देखील फाईल मध्ये बदल न करता येण्याची सोय त्याच धर्तीची आहे.
मजकूरांत फेरफार होऊन चालणार नाही असे जेव्हां खात्रीलायक करायचे असते तेव्हां तो मजकूर कागदावर लिहून काढून त्यांतील प्रत्येक पानावर सर्व संबंधितांच्या सह्या घेणे हाच खरा उपाय ठरतो. कॉण्ट्रॅक्ट साठी ही पद्धत वापरतात. जमीन व्यवहारात तर ही कागदपत्रे रजिस्ट्रार कडे रजिस्टर पण करून द्यावी लागतात.
संगणकावर देखील डिजीटल सिग्नेचर असा प्रकार आहे पण फारसा प्रचलित नाही कारण सध्यातरी तो किचकट आहे. शिवाय जिथे कायद्यानेच रजिस्टर करणे आवश्यक आहे तिथे तो व्यवहार कागदावर उतरून ठेवावाच लागतो.
--------------------------------------------------------------------
फोटो-
) डेस्कटॉप (पडद्यावर ऑन केलेला)
) माऊस, की-बोर्ड, पेन ड्राइव्ह
) मराठी की बोर्ड ले-आऊट
) एखाद्या चांगल्या वेब साईट चे होम पेज
--------xxxxxxxx-----------------
परिशिष्ट- १ संगणकावर मराठी टायपिंग
परिशिष्ट- २ प्रशासनांत संगणक या लेखातील उतारे
परिशिष्ट- ३ संगणक पदनाम कोण या लेखातील उतारे
परिशिष्ट- ४ मेनू बार, टूल बार, इत्यादी
परिशिष्ट- ५ वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटच प्रोग्राम मधील साम्य- ते प्रोग्राम हाताळणे.
--------xxxxxxxx-----------------
Wednesday, June 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment