Friday, June 12, 2009

भाग -- 6 -- संगणक म्हणजे पोस्टमन

भाग -- 6
tallied from book 22/07/2011
संगणक म्हणजे पोस्टमन
या भागांतील शब्दावली -
की-बोर्ड = कळपाटी, मेलबॉक्स = टपालपेटी, मोडेम =?, इंटरनेट = महाजाल, इंट्रानेट = अंतर्जाल, ब्राउझर =?, वेबसाइट= संकेतस्थळ, पासवर्ड = कूटशब्द (? आहे तिथे वाचकांनी शब्ग सुचवावेत)

आता आपण संगणकाचा दुसरा उपयोग बघू या. संगणकाचा उपयोग पोस्टमन सारखा करतात.
खरतर संगणक म्हणजे टपालखातच म्हटल पाहिजे. कारण टपालाशी संबंधित सगळी कामं संगणक करतो. पोस्टाची पेटी तोच, पोस्टमास्तर तोच, पत्र घेऊन जाणारं विमानही तोच आणि घरपोच आणून देणारा पोस्टमन देखील तोच.

ही सगळी कामं संगणक कशी करतो? तर टेलिफोन खात्याच्या मदतीने हे एक उत्तर. आपण टेलिफोन खात्याकडे पैसे भरुन टेलिफोन घेतो तसेच अजून पैसे भरुन मोडेम नावांचे यंत्र घ्यायचे. त्या यंत्राची एक तार टेलिफोनच्या सॉकेटमध्ये तर दुसरी संगणकाच्या कारभारी डब्यात खास असवलेल्या इंटरनेट सॉकेटला जोडतात. आपले पत्र किंवा संदेश संगणकातून मोडेमला, तिथून टेलिफोन खात्याच्या इंटरनेट ट्रान्समिशन साठी केलेल्या खास एक्सचेंजला, तिथून सिस्टमच्या तारांमधून दूर देशीच्या टेलिफोन मधील रिसीव्हिंग एक्सचेंज पर्यंत आणि तिथून पुन्हा टेलीफोन व मोडेम मार्फत तिकडल्या संगणकाला मिळतात. या खास सिस्टम मुळे आपली ईमेल शेजारचा गावी, शेजारचा देशी, किंवा जगाचा दुस-या टोकाला पाठवायचा खर्च सारखाच, तसाच लागणारा वेळही सारखाच. या उलट फोन करू तेंव्हा वेगवेगळ्या देशांत फोन पोचवायचे दर वेगवेगळे असतात, व टपाल पोचायला लागणारा वेळ पण कमी-जास्त असतो.



म्हणजे आपल्या घरातील संगणकाने पोस्टमन होऊन जगभर आपली ई-पत्रं पोचवावीत अस वाटत असेल तर आधी ब्रॉडबॅण्ड मोडेम व इंटरनेट सुविधा घ्यावी लागेल. (मोडेमही कित्येक प्रकारचे असतात, पण सध्यासाठी आपण टेलिफोन खात्याचा ब्रॉडबँण्ड मोडेम समजूया). या मोडेम खेरीज अजून दोन सोई लागतात.ब्राउझिंगची आणि प्रत्यक्ष संदेशवहनाची. संगणका सोबतच ब्राउझर सॉफ्टवेअर मिळतात. गूगल क्रोम, इंटरनेट-एक्सप्लोअरर व मोझिला-फायरफॉक्स हे तीन प्रचलित ब्राउझर आहेत. मात्र प्रत्यक्ष संदेशवाहनाचे काम करण्यासाठी  गूगल, याहू, हॉटमेल, अशा  वेगळ्या  संदेशवाहक कंपन्या आहेत, त्या ईमेल व इतर कित्येक वेब-आधारित सुविधा पुरवतात.

टेलिफोन खाते (BSNL) मोडेम मार्फत इंटरनेट सुविधा पुरवते. शिवाय मोबाइल सर्व्हिस मार्फतही इंटरनेट सुविधा उपलब्ध होऊ शकते, जसे टाटा इंडिकॉम, रिलायन्स, एअरटेल इत्यादी करतात.

डेस्कटॉपवरचा ब्राउझर उघडला की  एखाद्या संदेशवाहक कंपनीचे संदेशवाहक पान  उघडले जाते.  जसे याहू किंवा गूगल. कधी कधी कोरे पानही उघडले जाते. ते बदलून आपण  आपले पत्र ज्या कंपनीमार्फत पाठवायचे असेल त्या कंपनीचे पान उघडायचे.

आता प्रत्यक्ष ई पत्रव्यवहार करण्यासाठी काय करावे लागते ते पाहू. पहिले काम म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी एक ईमेल पत्ता रजिस्ट्रेशन करुन घ्यायचा. समजा मला गूगल कंपनीतर्फे लीनामेह (leenameh) या नावाने ईमेल पत्ता रजिस्टर करायचा आहे, तर गूगलचे संकेतस्थळ उघडून त्यामध्ये साइन अप (sign up) या शब्दावर क्लिक केले की रजिस्ट्रेशनचा एक नमुना फॉर्म समोर येतो. त्यातील प्रश्नांची उत्तरे द्यायची. ईमेल-आयडी काय हवी याचे उत्तर leenameh असे इंग्लिश अक्षरांत लिहायचे.  आता लीनामेह असे देवनागरी लिहूनही चालते. पुढला प्रश्न पासवर्ड (कूटशब्द) चा असतो. त्यावर समजा मी jayhind (जयहिन्द- हे ही इंग्लिशमधेच) लिहीले. मग इतर पाच सहा सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. रजिस्ट्रेशन चा फॉर्म भरुन पूर्ण केला की सबमिट बटणावर क्लिक करायचे की आपला  ईमेल, नांव-पत्ता इत्यादी त्या कंपनीकडे रजिस्टर होतो. असे रजिस्ट्रेशन सुरुवातीला एकदाच करावे लागते. शिवाय त्यासाठी आपले खरे नांव न देता एखादे वेगळे – हवे तर फॅन्सी नांव देऊन चालते.

आपण कितीही कंपन्यांकडे कितीही वेगवेगळ्या नांव-पत्त्याने रजिस्टर करु शकतो. मात्र एका कंपनीकडे एका नांवाने एकच नोंदणी करता येते. ते नांव आधीच दुस-या कोणी घेतले असेल तर आपल्याला मिळणार नाही. खूपदा एका घरातील सर्व माणसं एकच अकाउंट वापरतात म्हणजे तो अकाउंट उघडून त्यावर आलेला पत्रव्यवहार घरातील सर्वजण वाचू शकतात. असे एकमेकांना एकमेकांचे कार्यक्रम सारखे कळत रहातात. जसा आपल्या घराचा कायम पत्ता असतो आणि त्याचा उपयोग रेशनकार्ड, पासपोर्ट इत्यादीसाठी होतो, तसेच या ई-मेल पत्त्याचे पण कायम स्वरूपी इतर कांही उपयोग असतात.

वरील उदाहरणात माझा ई-मेल पत्ता leenameh@gmail.com असा झाला. यामधील ऍट दि रेट या शब्दासाठी वापरले जाणारे अक्षर @ (वर्तुळाच्या आतील a) -- इतके रुढ झाले आहे की, कळपाटीवर (की-बोर्डवर) वरच्या रांगेत याची कुंजी (की) असतेच. माझा पासवर्ड झाला jayhind. आता जगभर मी कधीही कुठेही गेले तरी कोणताही संगणक उघडून त्यावरील ब्राउझरमार्फत, गूगलचे साइन-इन (sign-in) चे पान उघडू शकते. त्या पानावर दोन खिडक्या लुकलुकत असतात. त्यावरील  पहिली खिडकी माझा ईमेल पत्ता (आय् डी) लिहिण्यासाठी व दुसरी पासवर्डसाठी असते. पहिलीवर जाऊन मी leenameh लिहायचे आणि दुसरीवर जाऊन jayhind लिहायचे की माझी खाजगी मेल बॉक्स उघडणार. आपण  पासवर्ड लिहितो तेंव्हा संगणकात फक्त टिंबटिंब दिसते. हेतू हा कि शेजारी कुणी बसले असतील तरी त्यांना आपला ईमेंलचा पासवर्ड कळू नये.
(गूगलच्या साइन पानाचे चित्र)

पत्र व्यवहार संपला की त्या पानावर कुठेतरी साइन आउट - sign-out असते. तिथे क्लिक केले की मेल बॉक्स बंद होणार. आपण इतरांच्या संगणकावरून ईमेल पहात असू तेंव्हा आठवणीने साइन आउट करावे.
मेल बॉक्स मधून एखादे पत्र पाठवायचे असेल तर “कंपोज मेल” या बटणावर क्लिक करायचे की आपल्यासमोर पोस्टकार्डवजा एक पान उघडते. त्यावर पत्ता आणि पत्र लिहायच्या दोन वेगवेगळ्या जागा असतात. मला स्वत:लाच पत्र पाठवायचे असेल तर पत्त्याच्या जागी मी leenameh@gmail.com असे लिहायचे. पत्र लिहिण्यासाठी दिलेल्या जागेवर पत्र लिहायचे. हे सर्व झाल्यावर सेंड बटणाने पत्र रवाना करायचे.

अशाप्रकारे संगणकावर पत्र पाठवण्याचे काम शिकून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही. ही पानं वाचायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळांतच या गोष्टी शिकून होतात. दुसरे कोणी मला ई-मेल पाठवू इच्छित असतील तर ते पण leenameh@gmail.com या पत्त्यावर मला ई-मेल पाठवू शकतात. ती माझ्या टपालपेटी (मेल बॉक्स) मधे येऊन थांबेल. मात्र माझा पासवर्ड माहित असल्याशिवाय कुणीही माझी टपालपेटी उघडू शकत नाही.

अशा प्रकारे आपण जगांत कुणालाही पाठवलेले पत्र त्यांना क्षणार्धात मिळू शकते. पण कधीतरी इंटरनेट वर देखील ट्रॅफिक जाम होतो. मग मात्र ई-मेल मिळायला चार-पांच तासही लागू शकतात.

ईमेलचे तंत्र शिकायला अंधाऱ्या खोलीतील भूत घालवणारा मित्राचा हात फारच उपयोगी ठरतो. मग तर नवीन अकाउंट उघडणे, ज्यांचे अकाउंट आहेत अशा मित्रांना ई-पत्र पाठवणे इत्यादी कामें पाचच मिनिटांत शिकता येतात.
चॅटिंग
इंटरनेटवर टपालपेटी (मेलबॉक्स) उघडल्यावर पलीकडील व्यक्ती ऑन-लाइन असेल तर आपण चॅटची सोय वापरून लेखी संदेशांची देवाण-घेवाण तिथल्यातिथे करू शकतो किंवा तिथूनच फोन करू शकतो. यासाठी गूगल चॅट, स्काइप,  याहू चॅट,सारखी चांगली सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. आतातर मोबाइलवरील व्हॉट्सॅपने चॅटिंगच्या सोईत या सर्वांना मागे टाकले आहे
=========================================इथून पुढे तपासणे
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या युक्ती --
समजा आपण इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडून याहूमेलवर पोचलो. तिथे साइन-इनच्या पानावर आपले नांव (आय्.डी.) व पासवर्ड सांगून लॉग-इन झाले की आपला मेलबॉक्स उघडतो. त्यांत नवीन आलेल्या ईमेल्सची यादी दिसते. त्यांतील एखादी
ईमेल उघडली की आपल्याला असे पान दिसते---
(book has different and better pictures)






त्यांतील Reply, Forward, व delete या सोई नेहमी लागणा-या.
-- फॉरवर्ड असे सांगून आपण आलेली ईमेल जशीच्या तशी, पुन्हा टाइप न करता इतरांना पाठवू शकतो.
-- ज्यांना वारंवार ईमेल पाठवावी लागते त्यांचे पत्ते contacts या यादीत ठेवले की पुढच्या वेळी संगणक स्वतःच तो पत्ता दाखवतो.
-- एकाच ईमेलवर खूप जणांचे पत्ते लिहिले की एकदाच पाठव (सेंड) सांगितल्यावर संगणक सर्वांना ती ईमेल पाठवतो.
-- कुणी खूप जणांना ईमेल लिहिली, त्यांत आपले नांवही असेल आणि आपल्याला वाटलं की आपले उत्तर पण त्या सर्वांना कळावे तर उत्तर पाठवतांना आपणही reply all सांगायचे. तसे नको असेल तर फक्त reply सांगायचे.
-- एखादी ईमेल पाठवावी की नाही असं असेल तर save draft म्हणून वेगळी ठेऊन द्यायची.
-- आलेल्या ईमेल खूप काळ जपून ठेवता येतात, मग त्यांचा गोंधळ वाढू नये यासाठी folder ही सोय आहे. मेल बॉक्स मधेच आपण folder तयार करायचे आणि move सांगून वेगवेगळ्या मेल्स संबंधित folder मधे टाकून ठेवायच्या.
-- महत्वाच्या ईमेल्सना फ्लॅग किंवा मार्क असे सांगून वेगळे दाखवता येते. किंवा सरळ त्यांना पुन्हा unread चा शिक्का मारायचा की कधीही मेलबॉक्स उघडली की आपले लक्ष जातेच.
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या या युक्ती आहेत.

कधी कधी आपण ब्राउझर उघडल्यावर आपल्याला ABOUT BLANK या नांवाचे कोरे पानच समोर येते. अशा वेळी त्या address bar वर याहू किंवा गूगल लिहिले की त्यांचे पान उघडते व आपण ईमेल पाठवू शकतो.
Lotus notes अथवा outlook express सारख्या कांही सुविधा वापरून आपल्या सर्व ईमेल्स डेस्कटॉपवर ठेऊन त्यांचे व्यवस्थापन करता येते. या सुविधेला मेसेजिंग सोल्यूशन म्हणतात. आता जास्त वेगवान ब्रॉडबॅण्ड मोडेममुळे घरच्या किंवा वैयक्तिक संगणकावर याची गरज उरलेली नाही. मोठ्या कार्यालयांना याचा उपयोग होतो.

No comments: