Tuesday, August 25, 2009

भाग १९ - संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?

भाग १९ (पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?
hrishi oked on 31-8-09


संगणकाचा वापर कोण कोण कशासाठी करतात ? अगदी अत्युच्च पातळीपासून आपण याचा वेध घेतला तर संगणकाचा वापर वैज्ञानिक, उद्योग-जग, व्यापारी आणि बँका, लेखन-प्रकाशन-व्यवसायिक, शासकीय कार्यालये, माहितीची देवाण-घेणार करणारे, सर्व क्षेत्रातील डिझायनर्स, सांख्यिकी तज्ज्ञ, अणि सामान्य माणसाच्या सामान्य व्यवहारांसाठी, अशा वेगवेगळ्या पातळींवर करतात. पूर्वी यांतील प्रत्येक कामाला संगणक तज्ज्ञाची गरज असायची. आता ऐंशी टक्के कामांना तज्ज्ञाची गरज माही. संगणक क्षेत्रातील हा फार मोठा बदल खूपजणांना, विशेषतः चाळीशी ओलांडून गेलेल्या लोकांना माहित नाही.

संगणकाचा वापर असा करतात --
(1) संगणक वापरामधे सर्वात वरची पातळी वैज्ञानिकांची. संगणकाला सध्या कांय कांय येतं व त्यापेक्षा जास्त गोष्टी त्याच्या मेंदूत कशा ठासल्या जातील हा विचार संगणक क्षेत्रातील शोध-वैज्ञानिक सतत करत असतात. त्यांना सुचलेल्या संकल्पना तपासून पाहण्यासाठी संगणकाचा वापर करतात.

(2) इतर वैज्ञानिक संगणकाचा वापर त्यांना करण्याच्या इतर प्रयोगांसाठी, गणित करणे, गणिती प्रमेय सोडवणे यासाठी करतात.

(3) सर्व वैज्ञानिक प्रयोग शाळांमध्ये जी जी उपकरण येतात व त्यांतून जे जे काम होत असेल, ते ते हल्ली संगणकावर साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी कित्येक उपकरणांतच संगणक हा अविभाज्य अंग बनून गेलेला आहे. एक्स-रे मशीन, इलेक्ट्रॉन बीम, इलेक्ट्रान मायक्रोस्कोप, आयन बीम, स्पेक्ट्रोस्कोप असे कुठलेही वैज्ञानिक उपकरण असेल तरी त्यावर हल्ली संगणक जोडलेला असतो. त्यामुळे मशिनच्या आंत होणारे काम क्षणोक्षणी संगणकावर टिपले जाऊन त्यांचा अभ्यास जास्त चांगल्या पध्दतीने केला जातो. अशा मशीन्सच्या अभावी आपल्या देशांतले शोधकाम मागे पडत चालले आहे.

(4) अत्यंत काटेकोरपणे टाईम कण्ट्रोल आणि प्रोसेस कण्ट्रोल करायची असेल तेव्हा संगणकाचा वापर करतात. उदाहरणार्थ अवकाशांत यान किंवा सॅटेलाईट सोडायचे आहे ते बरोबर ठरल्यावेळी, ठरल्या दिशेलाच उडेल यासाठी लागणारा जबरदस्त कण्ट्रोल फक्त संगणकाच्या माध्यमातून करता येतो. तीच गोष्ट प्रोसेस कण्ट्रोलची. अणु ऊर्जा, पेट्रोलियम कारखाने, साखर कारखाने यासारखे रासायनिक उत्पादनाचे कारखाने त्यांच्याकडील रासायनिक प्रक्रिया विशिष्ट गतीने व पध्दतीने चालत रहावी म्हणून कण्ट्रोलसाठी संगणकाचा वापर करतात.

(5) वैद्यकीय चाचण्या आणि शल्यक्रियांसाठी संगणकाचा फार मोठा वापर होतो- तपासणीमध्ये जे जे दिसेल ते सर्व इलेक्ट्रानिक भाषेत संगणकाकडे साठवले जाते व हे पर्मनंट रेकॉर्ड होऊन रहाते. उदाहरणार्थ- सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरींच्या माध्यमातून जे दृश्य तयार झाले आहे ते, किंवा हल्ली कित्येक ऑपरेशन्स करतांना दुर्बिणीच्या सहाय्याने त्या त्या अवयवांचे मोठे प्रतिबिंब तयार केले जाते ते, प्रत्यक्ष ऑपरेशन होताना व्हिडिओ कॅमेराने टिपलेली चित्रफीत किंवा साधे फोटो हे सर्व संगणंकावर उतरवून घेतले जाते. त्यामुळे तपासणी करणा-या डॉक्टरची सोय होते. तसेच त्या त्या व्यक्तीकडे कायमपणे रेकॉर्ड उपलब्ध रहाते.

(6) सिम्युलेशन टेक्नॉलॉजीमध्ये संगणकामुळे मोठी क्रांतीच आली असे म्हणावे लागेल. त्याच प्रमाणे, आर्किटेक्चर मध्येही त्रिमितीय घरे, वस्तू इत्यादींचे मॉडेल बनवणे, ती वेगवेगळया अंगांनी फिरवून बघणे वगैरे गोष्टी संगणकाच्या माध्यमातून करता येतात. त्याच प्रमाणे नकाशे तयार करणे आणि ते एका स्केलवरुन दुस-या स्केलवर टाकण्याचे काम संगणक बिनचूकपणे अगदी थोडक्या वेळांत करु शकतो. त्यासाठी एरवी कित्येक महिने लागू शकतात. डिझाइन्स साठी संगणक खूपच उपयोगी आहे, मग ते चित्रकारितेमधील डिझाइन असो अगर अर्किटेक्टने करायचे असो. बिल्डिंगचे त्रिमितीय मॉडेल असो अगर त्सुनामीच्या लाटा कशा येतात ते दाखविणारे सिम्युलेशन डिझाइन असो
(7) ऍनिमेशन तयार करणे हे संगणकामुळे कित्येक पटींनी सोपे झाले आहे. एकूणच फिल्म इंडस्ट्री मधे संगणकाचे नाना प्रकारचे उपयोग आहेत.

(8) बँकांचे व्यवहार, उलाढाली, शेअर्स ही कामे संगणकामार्फत करतात.

(9) सर्व सांख्यिकी माहितीच्या मांडणीसाठी व त्यांतून निष्कर्ष काढण्यासाठी संगणक आवश्यक असतो.

(10) संगणकांचा खूप मोठा उपयोग म्हणजे संगणकांसाठी नवे नवे सॉफ्टवेअर्स बनवणे हा पण आहे. या अविष्कारांची सोय आणि सुरुवात ज्यांच्याकडे आहे त्यांनाच पुढचे अविष्कार करणे शक्य होणार आहे.

आपल्या देशांत संगणक उद्योग खूप वाढलेला आहे. पण त्यातील बहुतेक कंपन्या संगणकांचे तंत्र वापरुन लोकांची कामे करणा-या कंपन्या आहेत. नवीन अविष्कार करणा-या किंवा तशी सोय असणा-या कंपन्या खूपच कमी आहेत. जवळ जवळ नाहीच. आपले सरकार आणि विचारवंत लोकच या मुद्दयांचा परामर्श घेण्याचा विचार करतील अशी आशा बाळगू या.

पण या सर्व उपयोगांना मागे टाकेल असा संगणकाचा सर्वमान्य उपयोग म्हणजे कोट्यावधी सामान्य माणसांनी दैनंदिन व्यवहारांत संगणक वापरून स्वतःची करून घेतलेली सोय. किंवा शासन व्यवहारामधून सामान्य माणसाला दिल्या जाणा-या सोईंसाठी संगणकाचा वापर. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांना संगणकाचे कुठलेही शास्त्र न शिकता त्याचा उत्तम वापर करणे शक्य आहे.
------------------------------------------------------------
शासकीय कर्मचा-यांना संगणकाबाबत कांय कांय यायला हवे ---
1) संगणक सुरु व बंद करणे
2) नवीन संगणक बसवतांना त्याच्या कारभारी डब्याच्या बाहेरील हार्डवेअरचे वेगवेगळे पार्ट जोडणे- उदा. प्रिंटर, की बोर्ड, माऊस, मोडेम, स्पीकर, पेनड्राईव्ह इत्यादी.
3) मायक्रोसॉफट ऑफीस किंवा ओपन ऑफीस वापरुन वर्ड, एक्सेल, ईमेल, पॉवर पॉईंट, मेल मर्ज, हे पाच प्रोग्राम वापरता येणे.
4) संगणकातील - फायलींवर सेव्ह, सेव्ह ऍज, कॉपी, कट, पेस्ट, प्रिंट, (एडिट-?), डिलीट, पीडीएफ, झिप, अनझिप, वेबपेज व जीपेग असे संस्कार करता येणे.
5) इंटरनेट सुरू करून गूगल सर्च वापरणे.
6) असलेल्या वेब साईटवर एखादे नवे पान अपलोड करणे.
7) वेब-साइट वरुन माहिती डाऊन लोड करणे.
8) जमल्यास वेब साइट अथवा ब्लॉग बनवणे, पेज अपडेटिंग करणे
9) एक्सेल वापरुन साठवलेल्या माहितीवर सॉर्ट, फिल्टर, चार्ट आणि ग्राफ हे संस्कार करुन त्याद्बारे साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करणे व त्यांतून उपयोगी निष्कर्ष काढून शासनाचे ध्येयधोरण त्यानुरुप ठरवणे.
१०) मायक्रोसॉफट ऑफीस मधील पेंट या सॉप्टवेअरची तोंडओळख व त्या आधारे प्रिंट स्क्रीन या सुविधेचा वापर.

त्यांना हे सर्व सुगमतेने (युक्त्या वापरुन) शिकता यावे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.

या खेरीज वरिष्ठ अधिका-यांना हेही यायला हवे ---
1) संगणक किंवा सॉफटवेर विकत घेतांना तसेच वेब साईट तयार करणे, मेनटेन करणे तसेच संगणकाची तांत्रिक सेवा पुरवणारे इत्यादी सर्वांची कॉण्ट्रॅक्ट ठरवणे, आपली निकड काय आहे ते ओळखणे इ.

2) E-governece च्या उद्देशाने आपल्या विभागाचे कार्यक्रम लोकांपर्यन्त पोचावेत यासाठी कोणी कोणी काय काम करावे ते सांगणारे कण्टेण्ट मॅनेजमेट डॉक्यूमेंटेशन व फॉर्मांचे डिझाईन.

3) शासकीय योजनांचे संगणक आधारित मॉनिटरिंग करणे.
---------------------------------------------------------------
याबद्दल ---?
3) शासनात संगणक किती ?
4) शासनाचे e-governance
5) ERP ?

No comments: