Thursday, October 2, 2014

INDEX

भाग १- थंडशार काळोख्या रात्री

भाग २- दिशा- दर्शन

भाग ३- कालगणना

भाग ४- मृगशिरा नक्षत्र

भाग ५- वृश्र्चिक नक्षय समूह

भाग ६- सप्तर्षि

भाग ७- ध्रुवतारा

भाग ८- ध्रुवाचा ध्रुवपणा

भाग ९- श्रवण नक्षत्र

भाग १०- सिंह नक्षत्र- समूह

भाग ११- हस्त, चित्रा,स्वाति

भाग १२- धनु नक्षत्र समूह

भाग १३- पूर्वा + उत्तरा भाद्रपदा

भाग १४- अभिजित नक्षत्र
--------------------------------------------------------------------------------------
भाग १- थंडशार काळोख्या रात्री
---------------------------------------------------------------------
भाग २- दिशा- दर्शन

     नक्षत्रांचा आढावा घेण्याआधी थोडी उजळणी दिशांची आणिसूर्य- चंद्राच्या गतिची करायला हवी.
    आपण अवाढव्य पृथ्वीच्या भूपृष्ठावर एका टिचभर जागेत रहातो त्यामुळे आपल्याला हा पृष्ठभाग सपाट थाळी सारखा भासतो आणि त्यावर ओठंगलेले आकाश हे एखाद्या अर्धवृत्तकार छत्रीसारखे दिसते. आपण चहूकडे नजर फिरवल्यावर सर्व बाजूंनी आकाश खाली येऊन पृथ्वीला भिडते असे दिसते. असे पृथ्वी व आकाशाच्या संधीचे जे वर्तुळ दिसते त्याला आपण क्षितिज असे म्हणतो.


रोज सकाळी या क्षितिजाआडूळ सूर्य उगवतांना दिसतो. सूर्य उगवण्याची दिशा म्हणजेच पूर्व. त्या आधारे आपण पश्चिम व उत्तर दक्षिण दिशा ठरवतो. व त्यांच्या मधे आपण अश्नेय, ईशान्य, वायव्य व नैगटत्य असे नांव दिलेले आहे. अशा या आठ दिशा क्षितिजाच्या अनुजंगाने ठरतात. आपण उताणे झोपून थेट आकाशाकडे पहोचतत्या दिशेला ऊधर्व व त्याच्या अगदी उलट आकाशाच्या खालच्या अधर्यवृत्ताची जी दिशा असेल तिला अधर या सर्वांबद्दल हजारो वर्षांपासून त्या कथा पसरल्या व आजपर्यंता ऐकल्या जातात त्यांना आपण मिथक म्हणतो. भारतीय
मिथकांमधे असे म्हणतात की या प्रत्येक दिशेसाठी एक- एक- दिक्- पाल आहे.

Azimuthal angle(?)
       आता कल्पना करा कि आपण आपली नजर क्रमाक्रमाने पूर्व क्षितिज ते ख- स्वास्तिक ते पश्चिम क्षितिज असे म्हणतो.अशा प्रकारे दहा दिशा ठरवतो.
     आकाशांत दिसणा-या चांदण्यांची आकृति कल्पून त्यांना नांवे देण्यांत आली आहेत. ---------------- अशी बळवली. तर पूर्व क्षितिजापासून ख स्वास्तिकापर्यंत ८०° अंशाचा कोण तयार होतो. एखादी चांदणी ज्या कोनावर असेल त्या कोनाला तिचा त्या वेळचा azimuthal angle म्हणतात. हा angle क्षितिजा वरच्या कुठुनही मोजता.



------------------------------------------------------------------------------------------
भाग- ३  - कालगणना

    पृथ्वीवरीलसर्व जीवसृष्टीला काळाचे------ आणि हे भान सूर्याच्या-----------
    आपल्याला आकाशाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे तारकापुज दिसतात आणि ते आकाश भ्रमण करतांना दिसतात. म्हणजे आज जिथे जो तारकापुंज दिसेल त्यापासून रात्रीच्या दुस-या काळांत तो सरकलेला दिसेल. तसेच
चार दिवसांनी आधीच्या वेळीच पाहिले तरी त्यांनी जागा बदललेली दिसते.
    बराच काळ त्यांच्याकडे पाहिल्यानंतर माणसाच्या लक्षांत आले की या तारकापुंजांची जागा एकमेकांच्या सापेक्ष बदलत नाही. म्हणजेच आपण नक्षत्रांची नांवे ज्या ओळीने ती नेहमी दिसतील, अश्विनीच्या मागे भरणी, त्यामागे कृत्तिका, त्यामागे रोहिणी...वगैरे. पण चंद्राची जागा मात्र जवळ जवळ रोजच या नक्षत्रांतून त्या नक्षत्रांत बदलते. आणि सूर्य? आपल्या ऋषिंच्या लक्षांत आले की सूर्य पण नक्षत्रमालिकेतून भ्रमण करतो आणि फिरून त्याच नक्षत्रांत परत येण्यासाठी त्याला ३६५ दिवस लागतात.
     आता मी एक गंमत सांगणार आहे ज्यावरून माणसाच्या बुध्दिमत्तेची चुणूक दिसूनयेते. या बुध्दिच्या सहाय्यानेच दोन गोष्टी ठरवल्या- पहिली म्हणजे गणित सोपे केले पाहिजे- त्यासाठी कल्पकता वापरली पाहिजे.
   सोपेपणाचा विचार केला तर ३६५ हा आकडा किचकट आहे- त्याला फक्त पाचाने भाग जातो. पण त्याच्या जवळच दुसरा आकडा आहे- ३६०. याला कितीतरी छोट्या आकड्यांनी भाग जातो, २, ३, ४, ५, ६, ८, ९, १०, १२, १५, १८, २४, ३०, ३६, ४०, ६०, ९०...!
   माझ्या कल्पनेच्या भरांत मला असे वाटते की मग भारतीय ज्योतिषतजज्ञांनी ठरवल की सूर्याच्या एका भ्रमणाला एक वर्ष अस मोजतांना, वर्षाचे बाराच महिने आणि त्यांत तीस दिवस मोजायचे. म्हणजे गणित सोप झाल. आणि आकाशांत सूर्याची गति गोलाकार असते. त्याच चित्र काढायच तेही गोल असेल. त्याचे ३६० भाग पाडायचे. अंश म्हणजे एका दिवसाचे प्रतीक, अशा त्या ३६० अंशामध्ये विभागल्या गेलेल्या वर्तुळातून भमिती (जॉमेट्री) चा जन्म झाला नसेल ना!

आणि चंद्रभ्रमणाचे कांय? माणसाला त्याचे पण तितकेच आकर्षण वाटले असणार! शिवाय चंद्राच्या कोरी पण दररोज बदलतात, तो लहान- मोठा होतो- हा तर अजूनच आकर्षक विषय. म्हणून त्याच्या तिथिंचाही अभ्यास झाला. अशा प्रकारे भारतीय खगोल अभ्यासकांनी वर्ष चंद्रमासाचे पण गणित शिकून घेतले.
    आणि मग एक गंमत झाली. मूळ वर्षांत हवेत ३६५ दिवस. सोईसाठी ३६० दिवसांचा हिशोब. त्यांत चंद्राच्या तिथिंचा विचार केला तर एका महिन्यांत तीस पेक्षा कमी दिवस भरतात- पण मग तिथीचा क्षय, नृदि ही कल्पना पुढे आली. तसेच दर तीन वर्षातून एका अधिक मासाची कल्पना आली. या सर्वांमुळे भारतीय खगोल गणित आणि वास्तविक परिस्थिती यांचा ताळमेळ कायम राहिला.
    ग्रीक- रोमन खगोल तजज्ञांनो हा
प्रश्न वेगळ्या रीतीने सोडवला त्यांनी एकाआड एका महिन्याला एक एक ज्यादा दिवस देऊन टाकला फेब्रुवरीचे दोन दिवस कमी केले. पण तरीही चार वर्षांतून एका दिवसाचा फरक पडतोच म्हणून त्या वर्षी फेब्रु. चा एक दिवस वाढवला. अशी त्यांनी युक्ति केली.
    भारतीयांचे बहुतेक सर्व सण- उत्सव हे चंद्राच्या तिथीवर ठरतात. तसेच २७ नक्षत्रांची संख्या पण थोडी किचकटच. म्हणून १२ राशींची कल्पना पुढे आली. प्रत्येक नक्षत्राचे चार भाग पाडले तर एकूण १०८ भाग होतात, पैकी नऊ भागांची म्हणजे सव्वादोन नक्षत्रांची एक राज होते. हे सोपे काम झाले. सूर्य दर महिन्याला वेगळ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या संक्रमणातून मकर संक्रांत, मेष संक्रांत असे दोन उत्सवाचेदिवस ठरेल.
    या पुस्तकाचा विषय पंचाग शास्त्र किंवा खगोलशास्त्र असा नाही. फक्त साध्या डोळ्यांनी पहातांना आकाशांत दिसणा-या चांदण्या एवढाच आपला विषय आहे. पण अशा कांही गमती जमती माहित असल्या की आपला अभ्यास सोपा होणार असतो.
    जाता जाता आणखीन एक गंमत चंद्राचीतिथी कोणती हे चंद्रकोरीच्या आकारावरून आपल्याला ढोबळ मनाने ठरवता येते. पण महिना कोणता हे कसे ठरवायचे? कारण तो ठरणार सूर्यावरून आणि सूर्याच्या प्रकाशांत चांदण्या दिसत नाहीत. मग ठरल की मध्यरात्री आकाशांत आपल्या अगदी डोक्यावर जे नक्षत्र  दिसेल, त्यावरून महिना ठरवायचा. अशा प्रकारे साधारणपणे एका आड एका नक्षत्राच्या नावावर महिन्यांची नावे ठरली.

अश्विनी नक्षत्रावरून अश्विन महिना.
कृत्रिका नक्षत्रावरूनकार्तिक. मृगशिरा नक्षत्रावरून मार्गशीर्ष.
पुष्य नक्षत्रावरून पौष.
मघा नक्षत्रावरून माघ.
पूर्वा/उत्तरा  (फालगुनी) नक्षत्रावरून फाल्गुन.
चित्रा नक्षत्रावरून चैत्र.
विशाखा नक्षत्रावरून वैशाख.
ज्येष्ठा नक्षत्रावरून ज्येष्ठ.
पूर्वा+ उत्तरा आषाढानक्षत्रावरून आषाढ.
श्रावण नक्षत्रावरून श्रावण.
पूर्वा+ उत्तरा भाद्रपदा नक्षत्रावरून भाद्रपद.
     संस्कृतात एका नांवातून दुसरे नांव तयार करण्याची एक युक्ति आहे. उदाहरणार्थ
वसुदेवाचा मुलगा - वासुदेव
दशहरताचा मुलगा- दाशरती
जनकाची मुलगी- जानकी
भगीरतीची मुलगी(म्ह. - भागीरथी(गंगा) त्याच्या प्रयत्नातून आलेली)
भारताचा मुळ ओळखला जाणारा देश- भारत.
    तसेच नक्षत्र ही आई आणि महिना म्हणजे मुलगा अशी कल्पना करून सर्व महिन्यांची नांव ठरली.
------------------------------------------------------------------------------------------
भाग- ४- मृगशिरा नक्षत्र

     आकाशांतल सर्वांत सुंदर आणि मोड पसरलेलं नक्षत्र म्हणजे मृगशिरा आणि त्यांचाच भाग असलेली व्याधीची चांदणी ही आकाशांत आपल्याला दिसणा-या चांदण्यांपैकी सर्वांत मोठी चांदणी. म्हणून सर्वांत आधी आपण मृग नक्षत्राची ओळाव करून घेऊ.
     आपण मृगाच्या पावसाचे खूप कौतुक करतो. याचे कारण कांय बरं? मृग नक्षत्र लागल याचा अर्थ सूर्याचा        मृग राशीत प्रवेश झाला. अशावेळी मध्यरात्री आपल्या ‘ख’ आकाशांत म्हणजे डोक्याच्या अगदी ब ज्येष्ठा नक्षत्र दिसते- म्हणजेच ज्येष्ठ महिना चालू असतो आणि एकदम चटके देणारे ऊन पडत असते. पाऊस- काळ यायला, आषाढ महिना लागायला थोडा अवकाशि असतो. अशा वेळी अचानक आकांशांत ढग येतात आणि वळवाचा पाऊस सुरु होतो. तो येतो आणि सरसर पडून लगेच थांबतोही. पण त्याने छान गारवा येतो. बरे वाटते म्हणून मृगाच्या पावसाने कौतुक एक अकबर विरबलाची गोष्ट सांगतात. अकबराच्या दरबारात येऊन एक अवलिया विचारू लागला-“सत्तावीसातून नऊ गेले की शून्य- कोण सोडवेल हे कोड?” कुणाला कांही कळेना- सत्तावीस हजार नऊ- म्हणजे
अठरा उरायला हवेत हा अवलिया शून्य का म्हणतो? थोड्या उशीराने (नहमीप्रमाणे) बिरबल आला. राजाने म्हटले- बिरबल तूच हे कोड सोडवू शकशील. बिरबल हसला म्हणाला बरोबर आहे हा अवलिया बोलतो ते. सत्तावीस नक्षत्रांमधून नऊ नक्षत्र कोरडी गेली- मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्र्लेषा... हस्त (म्हणजेच आषाढ, श्रावण आणि भाद्रपद हे पावसाळी महिने) पाऊस पडलाच नाही तर शेतक-याच्या हाती कांय लागेल शून्य!”
    तर मग चला व्याधाची चांदणी मृग नक्षत्र, रोहिणी, पुनर्वसु, ब्रह्हृदय या सर्व चांदण्याची ओळख करून त्यांच्याशी मैत्री करू या आणि या कहाण्या पण आठवणीत ठेऊ या.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                          
-----------------------------------------------------------------------------------------------
भाग-५- वृश्र्चिक नक्षत्र-समूह

मृगासारखच आकाशांत विस्तीर्ण पसरलेला दुसरा नक्षत्रसमूह आहे वृश्र्चिक राशीतील नक्षत्रांचा. वृश्चिक म्हणजे विंचू. तर ही रास आकाशात हुबेबुब
विंचबासारखी दिसते.
    आकाशांत मृग नक्षत्र दिसत असेल तेंव्हा मृग दिसणार नाही. जणू कांही आकाशांत दोघं कायम लपाछपीचा खेळच खेळत असावेत. यामुळे वाळवंटात किंवा समुद्रात प्रवास करणा-या प्रवाशांची किती सोय झाली! रात्रीच्या वेळी दिशा कळण्यासाठी दोघांपैकी कुणीतरी एक आकाशांत असेलच.
   वृश्र्चिक नक्षत्र पाहाण्यासाठी चांगला काळ म्हणजे......
वृश्र्चिक राशीत अनुराधा ज्येष्ठा आणि मूळया तीन नक्षत्रांच्या चांदण्या आहेत. ज्यांना वृश्र्चिकाची छाती किंवा धड म्हणता येईल अशा एकाच आकार व झळाळीच्या तीन चांदण्या, आणि त्यांच्या मागे नांगीच्या आकारांत सजलेल्या १४-१५ लहान मोठ्या चांदण्या डोळ्यांना दिसतात. या पैकी अनुराधा ही चांदणी जराशी लालसर असते.
   डोळ्यांनी दिसणा-या लालसर अशा तीनच चांदण्या आकाशांत आहेत त्या म्हणजे अनुराधा, रोहिणी आणि
मंगळ ज्येष्ठाची चांदणी शुभ्र व खूप मोठी तर मूळ नक्षत्राची चांदणी छोटी पण तिचा लखलखाट खूप असतो.
    जे प्रवासी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात प्रवास करीत असतात, त्यांना दिशादर्शनासाठी ध्रुवतारा व त्या भोवती फिरणारे तारे असतात पण जे प्रवासी दक्षिण गोलार्धात असतील त्यांना ध्रुवतारा दिसणार नाही. पण मृगशिरा नक्षत्र आणि वृश्र्चिक रास मात्र दिक्षिण आकाशांत दिसतात. त्यामुळे त्या प्रवाशांची सोय होते.
------------------------------------------------------------------------------------------------
भाग-६- सप्तर्षि

    सप्तर्षि हे आपल्या पाठ म्हणण्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी किंवा बारा राशींपैकी नाही. पण या सात चांदण्याचे (खरं तर इथे आठ चांदण्या आहेत) इतके महत्व आहे की त्यांना भारतीय ज्योतिष अभ्यासकांनी चक्क सात महत्वाच्या ऋषिंची नांव देऊन टाकली.
    सप्तर्षि हा तारका समूह उत्तर दिशेकडील आकाशांत एखाद्या पतंगाप्रमाणे दिसतो. म्हणजे एक चौकोन आणि त्याला मोठी शेपटी. यातली चौथी चांदणी बरीच फिकट आहे आणि पांचव्या चांदणी जवळ अजून एक बारीक चांदणी आहे. त्या दोन चांदण्यांची नावे आहेत वसिष्ठ आणि अरुंधती. म्हणजे जेंव्हा सातही ऋषिंना आकाशांत जाण्यास सांगितले तेंव्हा फक्त वसिष्ठ-पत्नी अरुंधती हिलाच त्यांच्या बरोबर जाण्याचा भान मिळाला.
   सप्तर्षिं वरून ध्रुव तारा ओळखतात. एरवी ध्रुवाची चांदणी अगदी छोटीशी आहे. सपतर्षिंच्या पैकी २ आणि १ या चांदण्यांना जोडणारी रेघ तशीच ओढत क्षितिजाच्यादिशेने नेली तर त्यांच्या अंतरापेक्षा साधारण  चौपट अंतरावर जी एक छोटी चांदणी दिसते ती म्हणजे ध्रुव. त्यांच्या मधे दुसरी कोणतीच चांदणी नाही, फक्त आकाशच आहे.
    ध्रुवाची चांदणी ओळखण्याची अजून एक खूण आहे, ती आपण पुढच्या भागांत पाहू.

भाग ७- ध्रुवतारा

    मी सहावीत असतानाची गोष्ट. आम्हाला हिंदी आणि पाठोपाठ भूगोलाचा तास असायचा. एकदा हिंदीच्या तासाला नेमकी आम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट होती. आम्ही गोष्टीत खूप रंगून गेलो. ती गोष्ट अशी-
   उत्तानपाद नावाच्या एका राजाला दोन राण्या होत्या सुस्तचि आणि सुनीति. दोघींना एक एक मुलगा होता- सुस्तचिचामुलगा उत्तम आणि सुनीतिचा मुलगा ध्रुव. पण  सुस्तचि ही राजाची आवडती राणी होती. म्हणून सदानकदा उत्तमच आपला राज्याच्या मांडीवर बसायचा. एकदा उत्तम दुसरीकडे खेळत असतांना ध्रुव येऊन राजाच्या मांडीवर बसला. पण थोड्याच वेळांत उत्तम आणि सुस्तचि तिथे आली. उत्तमने राजाच्या मांडीवर बसायचा हट्ट केला. त्याबरोबर सुस्तचिने ध्रुवाला राजाच्या मांडीवरून ढकलून दिले, आणि उत्तमला तिथे बसवले. ध्रुवाला वाटले राजा आपली बाजू घेईल, निदान आपली आई सुनीती तर आपली बाजूघेईल, पण  दोघेही गप्पच राहिले.ध्रुवाला वाईट वाटले. तो घर सोडून निघाला- जंगलाकडे जाऊ लागला. त्याला नारद मुनी भेटले- त्यांनी विचारल- कुठे निघालस? ध्रुव म्हणाला- देवाला शोधतो. त्याला सांगतो मला अशी जागा दे जिथून मला कुणीही उठवू शकणार नाही. नारदाने त्याला विष्णूचा मंत्र देऊन तप करायला सांगितले.
    ब-याच तपश्चर्येनंतर विष्णु प्रसन्न झाल्या. त्याने ध्रुवाला दर्शन देऊन सांगितले- मी प्रसन्न आहे आता तू घरी परत जा. सर्वांशी प्रेमाने वागा. मोठा झाल्यावर तू राजा होशील, तेंव्हा प्रजेची काळजी घे. आणि त्यानंतर तुला आकाशात अटळ स्थआन मिळेल- तुथून तुला कुणीही हलवणार नाही.
   अशा प्रकारे आकाशांत ध्रुवाला अटळ पद मिळाले. पुढच्या तासाला भूगोलाच्या वर्गांत नेमका ध्रुवतारा व सप्तर्षी हाच धडा होता- त्याची मला खूप गंमत वाटली आणि तो धडा नीट लक्षात राहिला.
    ध्रुवाची चांदणी आपल्याला उत्तरेकडे दिसते. ही आकाराने
मध्यम आणि विशेष चमकदार पण नाही. पण ती सदा सवेदा एकाच जागी दिसते हे तिच वैशिष्ट्य.
     आता आपण ध्रुवता-याबद्दलची सर्वांत महत्वाची गोष्ट शिकू या. आपल्याला सूर्य-चंद्र-तारे यांच्या आकाशातील भ्रमन्ती मुळे असे वाटते की जणू पृथ्वी स्थिर आहे आणि हे सर्व ग्रह नक्षत्र फिरत आहेत. पण हे फक्त भासते. प्रत्यक्षात आपण जाणतो की आपली पृथ्वीचा सूर्या भोवती फिरतो आणि इतर ग्रह म्हणजे बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि इत्यादी पण सूर्या भोवती फिरतात. सूर्याच्या दृश्यमान गतिमुळे आपण पूर्व दिशा कोणती ते पटकन ओळखू शकतो पण वाहून महत्वाची गोष्ट अशी कि आपली सूर्य मालिका हीच मुळी ध्रुव ता-या भोवती फिरत असते. पण पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे निराळे आणि सूर्याचे ध्रुवोभोवती फिरणे निराळे असते.
पृथ्वीपण सूर्याभओवती फिरत असल्याने पृथ्वीचे ध्रुवाभोवती फिरणे पण सूर्याच्या भ्रमणासारखेच दिसेल.
    थोडक्यांत आपण उत्तर दक्षिण अशी एक लांबच लांब अक्ष (axis) आहे अशी कल्पना केली तर त्या सूर्य आणि इतर सर्व चांदण्या तया अक्षाभोवती फिरतांना दिसतील. ज्या चांदण्या ख स्वास्तिक आणि उत्तरी क्षितिजाच्या मधे असतील त्यांचे वर्तुळ छोटे असेल आणि ज्या चांदण्या ख- स्वास्तिकाच्या जवळ असतील त्यांचे भ्रमण- वर्तुळ मोठे दिसेल.
    शेजारच्या चित्रांत जरी आपण पृथ्वीला एक ठिपका दाखवला असला तरी आपल्या तुलनेत पृथ्वी एक अवाढव्य चेंडूसारखी आहे आणि ती स्वतः उत्तर-दक्षिण अक्षावर लिहत असते. आपण विषुव्वृत्तावर असलो तर ध्रुव आपल्याला अगदी उत्तर क्षितिजावर दिसेल पण आपण वुषुव् वृत्ताच्या वर उत्तरेकडे १५ अक्षांशावर असलो तर आपल्याला असे भासेल की जणू ध्रुवच उत्तर क्षितिजापासून वर १५ अंशावर आहे. आणि आपण पृथ्वीच्या उत्तरी ध्रुवावरचअसू तेंव्हा आपल्याला ध्रुव क्षितिजापासून ९०º अंशावर म्हणजे अगदी आपल्या डोक्यावर दिसेल. अर्थात् सूर्याचा उजेड असेल तेंव्हा तो दिसणार नाही ही
गोष्ट वेगळी.
     महाराष्ट्राचानकाशा पाहिला तर आपला सर्वांत दक्षिणेच्या बाजूला कोल्हापूर..... अक्षांशावर आहे आणि सर्वांत उत्तरेला नागपूर.... अक्षांशावर आहे. म्हणून कोल्हापूरच्या आकाशांत ध्रुव उत्तर क्षितिजावर अंशावर दिसेल. पुण्याला.... अंशावर आणि नागपूरला... अंशावर दिसेल.
    ध्रुवाच्या चांदणीच्या खाली उत्तर क्षितिजापर्यंत इतर कोणतीच चांदणी दिसणार नाही. आणि आपण विषुव वृत्ताच्या दक्षिणेला असलो तर काय होईल? तिथे ध्रुवतारा दिसणारच नाही.
    इतक्या खुणा सांगितल्या तरी ध्रुवाची चांदणी लहान असल्याने तिला पटकन ओळखता येत नाही. त्याऐवजी एक सोपी खूण आहे- सप्तर्षीवरून ध्रुव ओळखण्याची सप्तर्षींच्या पैकी पहिला व दुस-या चांदणीला जोडणारी रेघ तशीच उत्तर क्षितिजाच्या दिशेने ओढत नेली तर त्याच दिशेलाजी पहिली चांदणी दिसेल तीच ध्रुव या दोन्ही चांदण्यांच्या मधे जेवढे अंतर आहे त्याच्या साधारण चौपट अंतर ध्रुवची चोहली असते.
    सप्तर्षीच्या चांदण्या देखील आकाशांत फिरतच असतात, पण त्या कशाही फिरल्या तरी पहिल्या- दुस-या चांदणीची दिशा नेहमी ध्रुवाकडेच वळलेली असते.
    पण सप्तर्षी सुध्दा वर्षभर दिसत नाहीत. कधी कधी ते क्षितिजाच्या खाली असतात. मात्र त्या वेळेला निश्चितपणे शर्मिष्ठा नावाचा तारका- समूह आकाशांत असले व त्यावरून आपण ध्रुवतारा ओळखू शकतो. पण जे लोक पृथ्वीच्या दक्षिण गोलार्ध्डात रहातात त्यांचे कांय? त्यांना उत्तरेकडील ध्रुवतारा कधीच दिसत नाही. मग त्यांच्या करता दिक्षिणेकडे कुणी ध्रुवतारा आहे कां? नाही. पण त्यांच्याकडे इतर कांही तरी आहेच. ते आपण पुढील भागांत पाहू या.
    आणि आता तुमच्या लक्षांत येईल की आपण आकाशाचे असेही भाग पाडू शकतो- उत्तर क्षितिजापासून  ३० अंशा, दक्षिण शितिजापासून तीस अंश, उत्तर ३० अंश ते ख स्वास्तिक आणि दक्षिण ३० अंश ते ख स्वास्तक आणि त्यातल्या चांदण्या आपण लक्षांत ठेऊ शकतो.
----------------------------------------------------------------------------------------------------
भाग- ८- ध्रुवाचा ध्रुवपणा

    शेजारच्या चित्रांत पृथ्वी व खूप खूप अंतरावरील ध्रुवतारा दाखवण्यांत आला आहे. पृथ्वीचा फिरण्याचा अक्ष दक्षिण- उत्तर असा आहे. म्हणूनच कुठलाही महिना, कोणताही ऋतु असोदिवस-रात्र कोणतीही वेळ असो- पृथ्वीचा अक्ष नेहमीच ध्रुवाच्या दिशेने असतो त्यामुळे ध्रुवाची जागा कधीच बदललेली दिसणार नाही.
    अजून एक मजा आहे. आपण थेट उत्तर ध्रुवावर असलो तर ध्रुव आपल्याला थेट डोक्यावर दिसेल.
 



    पण आपण विषुळ- वृत्तावर असू तेव्हा आपल्या क्षितिजावरील
उत्तरेच्या बाजूला आपल्याला ध्रुवतारा दिसेल- म्हणजे ध्रुवाच उन्नयन शून्य अंशावरअसेल. आपण अशा एखाद्या गांवी रहात असू जिथला अक्षांश २५º आहे- तर तिथे ध्रुव देखील क्षितिजापासून २५ अंशावर दिसेल. थोडक्यांत अक्षांश म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा किती- उंचीवर दिसेल ते समजण्याची खूण.
      अर्थातच विषुळ- वृत्ताच्या दक्षिणेकडे जे भूभाग आहेत. (उदाहरणार्थ- आस्ट्रेलिया) तिथून ध्रुवतारा अजिबात दिसाणार नाही कारण तो त्यांच्या क्षितिजाच्या खाली असेल.
    पृथ्वीच्या अक्षाच्या उत्तर बाजूला जशी ध्रुवाची चांदणी आहे तशी एखादी चांदणी दक्षिण बाजूला नाही. त्यामुळे आपण पृथ्वीच्या दक्षिण गोलार्ध्दावर असलो तर तिकडल्या चांदण्यांची ओळख करून घ्यावी.
--------------------------------------------------------------------------------------------------
भाग ९- श्रवण नक्षत्र

     ध्रुवतारा ओळखण्याच्या खाणाखुणा उत्तर गोलार्ध्दावर रहाणा-यांसाठी ध्रुव तारा महत्वाचा आहे हे आपण पाहिले.  तो आकाराने खूप छोटा असतो. त्याच्या थेट खाली क्षितिजापर्यंत दुसरी चांदणी नसते हे खरे. तरी पण त्याला ओळखण्यासाठी एवढी एकच खूण असेल तर त्याच्या छोट्या आकारामुळे या खुणेवरून ओळखणे थोडे जडच असेल. मात्र त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या चांदण्यांवरून आपण त्याला पटकन शोधू शकतो. असे तीन नक्षत्र समूह आहेत जे आपल्याला उत्तर आकाशांत आलदून पालटून दिसतात.
--------------------------------------------------------------------------------------------------------
भाग- १०- सिंह नक्षत्र समूह