Tuesday, May 28, 2013

zzz भाग 8- ध्रुवाचा ध्रुवपणा scan pages 31- 35

थंडशार काळोख्या रात्री भाग 31- 35

 भाग 8-ध्रुवाचा ध्रुवपणा
    शेजारच्या चित्रांत प्रुथ्वी व खुप खुप अंतरावरील ध्रुवतारा दाखवण्यात आला आहे.  प्रुथ्वीचा फिरण्याचा अक्ष दक्षिण-उत्तर असा आहे. म्हणूनच कुठलाही महिना, कोणताही ऋतु असो. दिवस-रात्र कोणतीही वेऴ असो प्रुथ्वीचा अक्ष नेहमीच ध्रुवाच्या दिशेने असतो त्यामुऴे ध्रुवाची जागा कधीच बदललेली दिसणार नाही.
अजून एक मजा आहे. आपण जरा थेट ध्रुवावर असलो तर ध्रुव आपल्याला थेट डोक्यावर दिसेल.
पण आपण विषुव-व्रुत्तावर असू तेव्हा आपल्या क्षितीजावरील उत्तरेच्या बाजूला आपल्याला ध्रुवतारा दिसेल, म्हणजे ध्रुवाच उन्नयन शून्य अंशावर असेल. आपण अश्या एखाद्या गावी रहात असू जिथला अक्षांश 25 अंश आहे. तर तिथे ध्रुव देखिल क्षितीजापासून 25 अंशावर दिसेल. थोडक्यात अक्षांश म्हणजेच आपल्याला ध्रुवतारा दिसेल ते समजण्याची खूण.
       अर्थातच विषुव-व्रुत्ताच्या दक्षिणेकडे जे भूभता आहेत,(उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया) तिथून ध्रुवतारा अजिबात दिसणार नाही कारण तो त्यांच्या क्षितीजाच्या खाली आसेल.
क्षितीजा अक्षाच्या उत्तर बाजूला जशी ध्रूवाची चांदणी आहे तशी एखादी चांदणी दक्षिण बाजूला नाही.त्यामुऴे आपण क्षितीजा दक्षिण गोलार्धावर असलो तर तिकडल्या चांदण्यांची ओऴख करून द्यावी.