Thursday, March 12, 2009

भाग -- 7 टाइप रायटर

१४-०६-२०१६ रोजी नव्या प्रतीसाठी एडिटिंग केले-----


भाग -- 7
संगणक म्हणजे टाइप रायटर
शिका सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन
या भागांतील शब्दावली --
KEY = कुंजी,
टाइपरायटर = टंकयंत्र,
टायपिंग = टंकन,
टायपिस्ट = टंकलेखक
फॉण्ट = वर्णाकृती,
फॉण्ट सेट = वर्णाकृतीसंच,
Keyboard = कळपाटी, कळफलक,
की-ले-आउट = अक्षर अनुक्रम, वर्णक्रम
इंट्रानेट = अन्तर्जाल,
इंटरनेट = महाजाल,
फाईल = धारिका
फोल्डर = संचिका

संगणकाचा सर्वांत जास्त उपयोग टाइपरायटर (टंकयंत्र) सारखा केला जातो. पण संगणकावरील टायपिंग म्हणजे टंकयंत्रापेक्षा दहा पट सोपे आणि शंभर पट उठावदार.

टाइपरायटरचा अविष्कार उपयोग 1873 पासून सुरु झाला तो थेट १९८०-१९९० पर्यंत. या यंत्रामध्ये एक की-बोर्ड होता. त्यातील एक खीळ (Key) दाबली की एक काडी उचलली जायची णी पुढे अडकवून ठेवलेल्या कागदावर आपटायची. काडीवर ते ते अक्षर उलटे कोरलेले असायचे. कागद आणि काडीच्या मध्ये एक शाईने भरलेली रिबीन असायची. काडी कागदावर आपटली की शाईमुळे कागदावर ते ते अक्षर उमटायचे. त्याचवेळी शाईची रिबिन आणि कागद थोडे पुढे सरकायचे, म्हणजे दुसरं अक्षर लिहून घेण्यासाठी दोन्ही तयार. इंग्लीश की-बोर्डावर तीन ओळीत A ते Z अक्षरं, चौथ्या ओळीत आकडे, इतर कांही खुणा (उदा. +, =) वगैरे असत. मात्र A ते Z ही अक्षरे अनुक्रमाने नसत. कोणते अक्षर जास्त वापरावे लागते, त्यासाठी कोणते बोट योग्य, कोणती अक्षरे एकापाठोपाठ वापरावी लागतात, त्यांच्या काड्या गुंतू नयेत, वगैरे बराच काथ्याकूट आणि विचार करुन, दाही बोटांचा वापर करुन टायपिंग सोईचे होईल अशा पध्दतीने की-बोर्ड वरील ले-आउट म्हमजे अक्षरांचा अनुक्रम ठरवला होता. सर्वांत जास्त वापरला जाणारा की-बोर्ड अनुक्रम म्हणजे क्वेर्टी - qwerty (ज्यात वरच्या ओळीतील डावीकडची पहिली सहा अक्षरे ही अनुक्रमे q,w,e,r,t,y आहेत असा) पण इतरही कांही वेगळे अनुक्रम असणारे की-बोर्ड वापरात होते.

भारतात इंग्लीश टंकयंत्रांमधे जवळ जवळ शंभर ट्क्के qwerty अनुक्रमच वापरात होता. संगणकाच्या की-बोर्डवर देखील हाच अनुक्रम ठेवल्यामुळे भारतात विकल्या जाणा-या संगणकावर इंग्लिश टायपिंगसाठी qwerty हाच अनुक्रम दिसतो. त्यामुळे ज्यांना टायपिंग येत होते, त्यांची खूप खूप सोय झाली. थोडक्यात ऑफीसमध्ये काम करणा-या तमाम टंकलेखकांची. संगणक संस्कृती वाढली. तसे बॉस देखील संगणकावर कामचलाऊ इंग्लिश टायपिंग शिकून घेऊ लागले.

जुन्याकाळी टंकलेखन तसेच छपाईसाठी वेगवेगळ्या वळणांच्या अक्षरांचे सेट तयार करण्यांत आले. त्यांना फॉण्ट म्हणतात. मराठीत आपण वर्णाकृती म्हणू शकतो. त्या त्या वळणांना विशिष्ट नांव देण्यांत आले. उदा. इंग्लिशमधील एरियल, टाईम्स न्यू रोमन, कूरियर हे फॉण्ट सगळ्या टंकलेखकांच्या परिचयाचे आहेत.

टाइपरायटर वर टंकलेखन करतांना आपल्याला फॉण्ट बदलता येत नसे. हवेच असेल तर वेगळ्या वळणाचा दुसरा टाइपरायटर विकत घ्यावा लागे.

पण संगणक आल्यावर त्या काड्या, ती शाईची रिबिन हा सर्व प्रकार संपला. एका विशिष्ट बटणावर जाऊन संगणकाला फॉण्टचे नांव सांगितले की तो त्या फॉण्टमध्ये लिहायला सुरुवात करतो. आपण मध्येच कांही परिच्छेद निराळ्या फॉण्ट मधे लिहू शकतो, कांही अक्षरांचा आकार लहान-मोठा, जास्त गडद किंवा रंगीतही करू शकतो. किंवा त्यांना रंगीत बॅकग्राउंड देऊ शकतो. म्हणूनच संगणकावरील टायपिंग टंकयंत्रापेक्षा शंभर पट उठावदार होऊ शकते. हे झालं इंग्रजीच्या टायपिंग बद्दल.

मराठीत सुध्दा टंकयंत्राच्या की-बोर्डवरील अक्षरे वर्णक्रमानुसार मुळीच नव्हती. पण जो कांही अक्षर-अनुक्रम होता तो सगळ्या टंकलेखकांना ओळखीचा होता. म्हणून संगणकावर मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर बनविणा-यांनी तोच अक्षर-अनुक्रम संगणकासाठी पण कायम ठेवला जेणेकरुन पूर्वीपासून टंकयंत्रावर टाइप करत होते त्यांची सोय झाली. या अक्षर अनुक्रमाला मराठी टाइपरायटर किंवा गोदरेज अनुक्रम असे म्हणता येईल कारण मराठीसाठी बहुतांशी गोदरेज टंकयंत्र वापरांत होते. शिवाय संगणकावरील लेखन उठावदार दिसण्यासाठी मराठीत सुध्दा निरनिराळ्या वळणांचे खूपसे फॉण्ट-सेट (म्हणजे वर्णाकृतीसंच) उपलब्ध झाले. हे लक्षांत घेऊ या की अक्षरांचे एकसारखे वळण ठरवून तसा नवा फॉण्ट-सेट बनवणे हे कलाकारीचे काम असते. त्यासाठी उत्तम कॅलिग्राफर्सची गरज असते.

पण सॉफ्टवेअर बनविणाऱ्यांनी आणखीन एक गंमत केली. त्यांनी की-बोर्डासाठी इन्स्क्रिप्ट नावांचा एक आणि फोनेटिक नांवाचा एक असे दोन ज्यादा अक्षर-अनुक्रम तयार केले. एका विशिष्ट बटणावर जाउन संगणकाला सांगता येते की तुम्हांला कुठला अनुक्रम वापरायचा आहे.

इनस्क्रिप्ट अनुक्रम फारच छान आहे. त्यांत चार गंमती आहेत. पहिली गंमत अशी की आपण मुळाक्षरे शिकतो - ,,.......क्ष,ज्ञ. तोच अनुक्रम कायम ठेवला. त्यामुळे की-बोर्डावरचा अनुक्रम लक्षांत ठेवायची कटकट संपली. नाहीतर पूर्वी टंकयंत्रावरचा अनुक्रम डोक्यांत पक्का बसावा म्हणून सहा-आठ महिने टायपिंग क्लास लावून प्रॅक्टीस करावी लागत असे, परीक्षा द्यावी लागत असे. आता संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग समजून डोक्यांत बसायला दहा मिनिटे सवय आणी वेगासाठी थोडे दिवस पुरेसे आहेत . कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी शिकावे लागता संगणकावर मराठी टंकन शिकून घेण्याची हमखास पद्धत म्हणजे इन्स्क्रिप्ट.

दुसरी गंमत म्हणजे हा अनुक्रम असा बसवला आहे की सगळे स्वर, कान्हा, मात्रा हे सर्व डावीकडे आहेत - ती डाव्या बोटानी सगळी व्यंजने उजव्या बाजूला आहेत - ती उजव्या बोटांनी टाईप करायची. मराठी भाषेतल्या आपल्या सगळ्या शब्दात व्यंजन आणि स्वर गळ्यांत गळा घालून असतात. या इनस्क्रिप्ट की-बोर्डवर टाईप करतांना आपण सुध्दा उजव बोट, डावं बोट अस टाईप करतो - त्यामुळे तबल्याप्रमाणे आपोआप एक प्रकारची लय निर्माण होते आणि टायपिंग सोप्प होऊन जातं.

इनस्क्रिप्टची तिसरी गंमत अशी की सर्व भारतीय भाषांची लिपी वेगळी असली तरी वर्णमाला सारखी आहे. म्हणून सगळ्या भाषांसाठी सारखाच अनुक्रम ठेवला आहे. आपण मराठीत कांहीही लिहायची प्रॅक्टीस करायची आणि कुणावरही इम्प्रेशन मारायच- बघ हं, मी आता बंगालीत टाइप करुन दाखवीन (किंवा कन्नड, तामिळ, गुजराथी -- कांहीही). शिवाय एकदा मराठीत टाईप करुन झाले असले तरी एक बटण दाबून संगणकाला सांगता येते- बाबा रे, हे लिहिलेलं सर्व कानडी लिपीत बदलून दे- की संगणक ते पण करुन टाकतो. ज्यांना देशप्रेम, भारतीय एकात्मता टिकवण्याची ऊर्मी वगैरे आहे त्यांनी ही इन्स्क्रिप्ट नामक युक्ती नक्की समजून घेऊन तिचा आग्रह धरावा.

संगणक नव्हते - टंकयंत्र होती तेंव्हा प्रत्येक भाषेसाठी की-बोर्डाचा अक्षर-अनुक्रम वेगळा होता. त्यामुळे मराठी टंकन येईल त्याला पंजाबीत टाइप करता येत नसे. पुन्हा वेगळे शिकावे लागे. संगणकावर इनस्क्रिप्ट अनुक्रम वापरला तर ही समस्या खलास.

या चार सोईंमुळे इन्स्क्रिप्ट अनुक्रम भारतीय भाषांसाठी इतका चपखल ठरतो की "संगणकाचे सर्व सॉफ्टवेअर्स जगभर फुकट वाटा, सर्वांना शिकू द्या आणी सर्वांनी झटपट प्रगति करा" असे तत्वज्ञान असलेल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मधे तसे तत्वज्ञान नसलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टममधेही आता हा अनुक्रम वापरला आहे. यामुळे जगभरांत मराठीतून संदेशवहन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो.

फोनेटिक हा अनुक्रम वापरताना रोमन अक्षरे वापरून मराठी लिहिले जाते. खरेतर तो ज्या विदेशी लोकांनी भारतीय वर्णमाला शिकलेली नाही अशा मराठी लिहिणा-यांसाठी आहे.

पण एक गोष्ट महत्वाची. संगणक उघडल्यावर आपल्याला गद्य लेखन करायच आहे की इंटरनेट वरुन पत्र पाठवायचे आहे की चित्र काढायचे आहे हे संगणकाला आपणहून कसे कळणार? तो कांही मनकवडा नसतो. आपणच सांगावे लागते. म्हणजे काय करायचे? तर त्याच्याकडील वर्ड नावाच्या प्रोग्रामवर डबल क्लिक करायचे म्हणजे तो आपल्याला पडद्यावर एक कोरा कागद देतो - मग आपण कोणती लिपी वापरणार आणी कोणता वर्णक्रम वापरणार तेही सांगायचे. मगच त्यावर आपले लेखन लिहायला सुरुवात करायची.

----------------------------------------------------------------------------------------------------
इन्स्क्रिप्ट पद्धतीने केवळ 10 दिवसांत संगणकावर मराठी टायपिंग शिकण्यासाठी खालील लिंक उघडून  पायरी-पायरीने व सोपेपणाने इनस्क्रिप्ट पद्धतीने टंकन शिकता येईल. इथे सरावासाठी दहा धडे दिलेले आहेत
शिवाय खालील 3 मिनिटांच्या चित्रफितीवर प्रात्यक्षिक पहायला मिळते.
-----------------------------------------------------------------------------------------------
संगणकावर मराठी टायपिंग साठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट समजाऊन घेऊ या.
डावी-उजवी बोटे
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक तबल्यासारखी लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास चित्रफीत पहावी.]
इथे इन्स्क्रिप्ट कळपाटीचे चित्र)
दोन मिनिटांत 20 अक्षरे
या लेआऊटमधे मधली ओळ व वरची ओळ अशा जोड्या बनवून अक्षरे मांडली आहेत.
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील HY या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
पहा -- कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे लिहिण्यासाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर
AQ -- ओऔ,
SW -- एऐ,
DE -- अआ,
FR -- इई,
GT —- उऊ
अशी अक्षरे लिहिता येतात. मात्र त्या त्या कुंजीसोबत शिफ्टचा खटका पण लागतो.
आता त्या त्या स्वरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) लिहिण्यासाठी आधी लिहिलेल्या व्यंजनापुढे ती ती कुंजी वापरायची --
अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.

  •  अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
  • ‘ताक’  हा शब्द लिहिण्यासाठी ---  त (L) + काना (E) + क (K) आणि
  • ‘पूजा’ लिहिण्यासाठी ---  प (H) + ऊकार (T) + ज (P)  + काना  (E)    लिहावे लागते.
  • ‘किती’ लिहिण्यासाठी --- क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.

हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
  • काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहिताना कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो हे लक्षांत ठेवायचे..

तुमच्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी-सहावीत जाणाऱ्या मुलीमुलांना देखील ही युक्ती शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घ्या. पहा त्यामुळे त्यांच्यात केवढा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.

उरलेली अक्षरे
उरलेल्या १६ व्यंजनांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र  ही अक्षरे आणि ऋ हा स्वर  अगदी वरच्या ओळीत आकड्यांसोबत बसवलेले आहेत तर म, ण, न, व, ल, ळ, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला १० मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना-मात्रा लावण्याची पद्धत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.

जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील   अच्या कुंजीमुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते.
अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

नवे सॉफ्टवेअर न घेताच, फक्त सुरवातीचे एक सेटिंग करा
आज रोजी बहुतेक सर्वांकडे नवे लॅपटॉप असून त्यावर विन्डोज ७ किंवा त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टिम असते. २००५ सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत.
यामधे मराठीसाठी सुरवातीचे एकदाच करावे लागणारे सेटिंग खालीलप्रमाणे --
संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन "रीजन ऍण्ड लँग्वेज" या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन खिडकी व त्यातील नवी प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेजसाठी इंग्लिशचा पर्याय बाय डिफॉल्ट दिलेला असतो. तिथल्या डॉप-डाऊन मेनूवर टिचकवल्यास कित्येक भाषांचे पर्याय उघडतात. त्यावर हिन्दीचे  किंवा मराठीचे ऑप्शन हवे आहे असे सांगायचे. हे सेटिंग सुरूवातीला एकदाच कधीतरी करून घ्यावे लागते. ते केल्याने संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E म्हणजे इंग्लिश हे अक्षर दिसू लागते. त्यावर लेफ्ट क्लिक करून E ऐवजी M  म्हणजे मराठी हा पर्याय निवडता येतो. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार M असा पर्याय निवडायचा आणि टायपिंगला सुरूवात करायची. 

वरील प्रमाणे देवनागरी सेटिंग सर्व जुन्या संगणकांवर असेलच असे नाही. त्यांची ऑपरेटिंग सिस्टम जर विण्डोज एक्सपी असेल तर त्यावर मराठी सेटिंग करण्यासाठी विण्डोज एक्सपीची इन्स्टॉलेशन सीडी आणून त्यावरून आधी  i386 ही फाईल कॉपी करून घ्यायची की मग वरीलप्रमाणे मराठी सेटिंग करता येते.

वरील उपायाने आपल्या संगणकावर मराठी एनेब्लिंग केल्यानंतर गुगलच्या जी-मेल वर किंवा फेसबुकवरही आपण मराठी टंकन करू शकतो. फक्त टास्कबार वर M  हा पर्याय देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी या टंकन-पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देऊन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून शोध घेतल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.

तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टंकन शिकून महाजालावर  धडाधड मराठी वाङ्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
---------------------------------------------------------------------------------------------------
इनस्क्रिप्ट टंकनाच्या सरावासाठी खालील पाठ उपयोगी पडतील --
पाठ पहिला
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ
ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः
गगागिगीगुगूगेगैगोगौगंगः

पाठ दुसरा
क ख ग घ
खखाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
घघाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
आई, एक, ऐक
काका काकी काकू गंगा
खा, गा, खाकी, घी, खोखो, घोक, 

पाठ तिसरा
त थ द ध च छ ज झ
ट ठ ड ढ
ददादिदीदुदूदेदैदोदौदंदः
टटाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
छछाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
कात काच चाकू, चाक, चकाचक,
टाका ताट तूट तीट ताटातूट
छोटा, खोटा, ठोक,ठीक, डोकं,डिंक
दंगा, टांगा, धोका, झोका, ढाका, ढ, किडा,
चोथा, चौथा, डंका, चौक, गोट, गोटा, गोटी

पाठ चौथा
प फ ब भ र ह ङ
हहाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
भभाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
पापा पार पाच,पाट
रुप, कुरूप, रिपू, रिपरिप
हीरा, हार ,हुरुप  हरहर, हरी, हुरहुर,
भारत भार, भाकरी,भात, भट, भोक, 
पपया यार बया याहू
टीप कात काका चाट चटपट, झटापट, 
पुकार चुकार चुका ताक टीका याहू 
ताट तुटीची काकी काकु कचरा पार
टापटीप कातकरी पाट पाटी टिका चराचर

पाठ पााचवा
ख थ छ ठ फ उ इ अ ए ओ
खोत खान खानपान छान थान थाना
थाप छाप ऊस ओस ओक ठोक
फेक फी पोपट पाट पोट रोख
रोखठोक ठोक 
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
अशाप्रकारे क ते ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची बाराखडी टंकलेखित करणे.

पाठ सहावा
उघड, उंट, ऊद, 
हापूस गादी जाड जाडी बुडबुडा कागद
गाजर हौद, औजार,
धार घार झार खारट, खीर,
भारत भात थाप भार

पाठ सातवा
ऐका, औत, ओज, एक, ऐक, ऐपत
एकटा, एकदा, आत-बाहेर, आहेर, हेरगिरी, 
ए ऐ ओ औ ने सुरू होणारे शब्द आठवून लिहिणे

पाठ आठवा
म ण न व ल ळ स श ष य
वारा  मासा
मामा खिसा 
मन नवल लहान
ससा, शमन, दमन, नमन,
लय, नयन, वळण, यश, यम, माया,

पाठ नववा
ळ श ष ण
माळ शाळा वलय मणका मळा वळण
लळा वाळा नळ निळा
बाळ खेळ वेळ माळ नळ
शूळ शारदा शामक शूर
षटकोण षटकार षटक मेष
बाण खाण वाण सहाण रहाणे

पाठ दहावा 
ज्ञ त्र क्ष श्र ऋ ा ॅ र् ः
ज्ञान ज्ञात ज्ञानदेव ज्ञापन
मात्र गात्र त्राटिका त्रागा त्रास
त्रुटी क्षुब्ध क्षती क्षमा क्षत्रिय
श्री श्रीमती श्रीयुत श्रीराम श्रीकांत
बॉक्स फॉक्स पॉवर लॉन टॅक्स रॉक
ऋतु ऋचा ऋण ऋणको ऋषि

पाठ अकरावा -- ऋ जोडणे
एखादया अक्षराला ृ (रुकार) जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर ृ टाइप करावे. उदा
कृपा कृतार्थ कृष्ण कृषी नृप
दृष्टी सृष्टी वृष्टी

पाठ बारावा - र जोडणे
एखादया अक्षराला खाली र जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर हलन्त (शब्दाचा पाय मोडणारी कळ म्बणजेच अ या अक्षराची कुंजी ) दाबावी, नंतर र अक्षर टिचकवावे. उदा
क्रम भ्रम प्रत व्रत व्रण क्रमांक
एखाद्या अक्षरावर रफार देण्यासाठी उदा. गर्व लिहिताना  प्रथम ग, नंतर र अक्षर,  नंतर हलन्त, त्यानंतर व अक्षर टिचकवावे
सर्व कर्म धर्म शर्थ
आर्त सार्थ अर्थ व्यर्थ अनर्थ
मराठीत क्वचित आडव्या चंद्रकोरीने र जोडतात. असा र येण्यासाठी शिफ्टसोबत र चे अक्षऱ एकत्र टिचकवावे व हलन्त लिहून व पुढील अक्षर लिहावे
उदा. वाऱ्यावर, गु-हाळ, त-हा, सुऱ्याला 
-------------------------------------------------------------------

लेखन करताना ---संगणकावर नवी वर्ड फाईल उघडली किंवा जुनी फाइल उघडलेली असेल तर तिचे आपण कांय कांय करु शकतो-- फाइल उघडल्यावर समोर जी पाटी दिसते त्या पाटीच्या आत जाऊन क्लिक केले की, संगणकाला कळते की, आपल्याला फाईलचे पुढले काम करायचे आहे. या पाटीच्या वरच्या बाजूला एक मेनू-बार (म्हणजे आडव्या ओळीत बरेच कामांचे शब्द) दिलेला असतो. तो समजावून घेऊ या

चित्र 




मेनू-बारवर डावीकडे पहिला शब्द असतो फाईल. त्यावर क्लिक केले तर एक उभा आखलेला सब-मेनू-बार उघडतो. त्यावरही खूपसे पर्याय असतात. फाईल बद्दल जे कांही करायचे असेल ते सांगण्यासाठी फाईल हा मेनू व त्याचा सब-मेनू वापरायचाउदा. Save- फाईलमधील बदल जपून ठेवायचे आहेत का? तर Save वर क्लिक करायचे
Save as हा दुसरा पर्याय - म्हणजे ती फाईल जपून नेमकी कुठे ठेवायची व कोणत्या नावाने?
new - म्हणजे समोर असलेली फाईल बाजूला ठेऊन नवीन कोरी पाटी आपल्या समोर येणार
Open- आपण आधी कुठेतरी जपून ठेवलेली फाइल असेल तेंव्हा open असे सांगितल्यानंतर- संगणक आपल्याला कित्येक पर्याय दाखवून विचारतो की, नेमकी कोणती फाइल उघडायची आहे. त्या फाईलवर जाऊन आपण क्लिक करायचे की ती फाईल उघडते
Print म्हटल्यावर जर संगणकाला ‌प्रिंटर जोडला असेल ती file कागदावर प्रिंट होऊ लागते. हे सुरु होण्यापूर्वी अजून एक खिडकी उघडली जाऊन प्रिंटींगबद्दल आपल्याला खूप गोष्टी विचारल्या जातात. कोणत पान? किती प्रती? कागदावर मार्जिन किती हवे? रंगीत की साधे? उभे की आडवे? हळू हळू आपण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फक्त गरजेपुरतच एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकतो.
pdf -- प्रिंटींगमध्येच हा एक महत्वाचा पर्याय असतो. कागदावर प्रिंट न घेता संगणकावरच अशी वेगळी फाईल बनवायची ज्या फाईलमध्ये बदल करण्याला वाव नसतो- जणू काही कागदावर काढलेली प्रतच. अशा फाईल्सना pdf (portable document format) हे लेबल लावलेले असते व ते जगन्मान्य मानकानुसार आहे. ही फाईल आपण इतरांना पाठवू शकतो. कारण त्यांत चटकन फेरबदल करता येत नाही. विशेषतः लेखनातील रंगसंगती, अलाइनमेंट, इत्यादी जश्याच्या तश्या टिकून रहातात.. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या मूळ फाइलमध्ये चित्र असेल किंवा आपले मराठीतील फॉण्ट तुटून junk दिसतील अशी भीती असेल तेव्हा जर त्या धारिकेला pdf केले तर ती खात्रीलायक मूळ आहे त्याप्रमाणेच दिसते. यासाठी ईमेल करायच्या फाईली खूपदा pdf करुन पाठवतात.मेनू-बारवर फाईल नंतर पुढला मेनू असतो एडिट. edit वर बाण नेला (क्लिक केले) की तिथला सब-मेनू दिसतो व तिथून आपण फाइल मधे दुरुस्त्या करण्यासाठी कांय कांय करु शकतो ते कळते.त्यामधील select all undo हे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण फाइल select करण्यासाठी select all हा पर्याय वापरायचा. file मध्ये आधी जे बरेचसे बदल केले असतील ते एक-एक करुन रद्द करण्यासाठी undo वापरायचा. या शिवाय cut, copy, paste, redo हे पर्याय आहेत.
copy + Paste - आपण आपल्या फाईल मधील एखाद्या भाग select करून copy करु शकतो व त्याला दुसरीकडे किंवा दुस-या एखाद्या फाईलवर paste करु शकतो.
Copy + Paste सारखेच आपण cut + paste देखील करु शकतो.
Delete केलेला भाग फाईल धून पुसून टाकला जातो.
redo वापरून आधी बदललेला भाग पुन्हा पहिल्यासारखा करता येतो.
मेनू-बार वर त्या पुढचे शब्द view, insert, format, tool, table, windows help असे असतात. त्यांची वेगवेगळी कामे आपण सावकाश शिकून चालते.
Here photo of menu bar in words
------------------------------------------------------------------------------------------------------
=======================================================================
भाग -- 7 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे टाइप रायटर
शिका सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन
या भागांतील शब्दावली --
KEY = कुंजी, टाइपरायटर = टंकयंत्र, टायपिंग = टंकन,
फॉण्ट = वर्णाकृती, फॉण्ट सेट = वर्णाकृतीसंच,
Keyboard = कळपाटी, कळफलक, की-ले-आउट = अक्षर अनुक्रम
इंट्रानेट = अन्तर्जाल, इंटरनेट = महाजाल, फाईल = धारिका

संगणकाचा सर्वांत जास्त उपयोग टाइपरायटर (टंकयंत्र) सारखा केला जातो. पण संगणकावरील टायपिंग म्हणजे टंकयंत्रापेक्षा दहा पट सोपे आणि शंभर पट उठावदार.

टाइपरायटरचा अविष्कार व उपयोग 1873 पासून सुरु झाला तो थेट १९८०-१९९० पर्यंत. या यंत्रामध्ये एक की-बोर्ड होता. एक खीळ (Key) दाबली की एक काडी उचलली जायची आणी पुढे अडकवून ठेवलेल्या कागदावर आपटायची. काडीवर ते ते अक्षर उलटे कोरलेले असायचे. कागद आणि काडीच्या मध्ये एक शाईने भरलेली रिबीन असायची. काडी कागदावर आपटली की शाईमुळे कागदावर ते ते अक्षर उमटायचे. त्याचवेळी शाईची रिबिन आणि कागद थोडे पुढे सरकायचे, म्हणजे दुसरं अक्षर लिहून घेण्यासाठी दोन्ही तयार. इंग्लीश की-बोर्डावर तीन ओळीत A ते Z अक्षरं, चौथ्या ओळीत आकडे, इतर कांही खुणा (उदा.+, =) वगैरे असत. मात्र A ते Z ही अक्षरे अनुक्रमाने नसत. कोणते अक्षर जास्त वापरावे लागते, त्यासाठी कोणते बोट योग्य, कोणती अक्षरे एकापाठोपाठ वापरावी लागतात, त्यांच्या काड्या गुंतू नयेत, वगैरे बराच काथ्याकूट आणि विचार करुन, दाही बोटांचा वापर करुन टायपिंग सोईचे होईल अशा पध्दतीने की-बोर्ड वरील ले-आउट म्हमजे अक्षरांचा अनुक्रम ठरवला होता. सर्वांत जास्त वापरला जाणारा की-बोर्ड अनुक्रम म्हणजे क्वेर्टी - qwerty (ज्यात वरच्या ओळीतील डावीकडची पहिली सहा अक्षरे ही अनुक्रमे q,w,e,r,t,y आहेत असा) पण इतरही कांही अनुक्रम होते.

भारतात इंग्लीश टंकयंत्रांमधे जवळ जवळ शंभर ट्क्के qwerty अनुक्रमच वापरात होता. संगणकाच्या की-बोर्डवर देखील हाच अनुक्रम ठेवल्यामुळे भारतात विकल्या जाणा-या संगणकावर इंग्लिश टायपिंगसाठी qwerty हाच अनुक्रम दिसतो. त्यामुळे ज्यांना टायपिंग येत होते, त्यांची खूप खूप सोय झाली. थोडक्यात ऑफीसमध्ये काम करणा-या तमाम टंकलेखकांची. संगणक संस्कृती वाढली तसे बॉस देखील कामचलाऊ इंग्लिश टायपिंग शिकून घेऊ लागले.

जुन्याकाळी टंकलेखन तसेच छपाईसाठी वेगवेगळ्या वळणांच्या अक्षरांचे सेट तयार करण्यांत आले. त्यांना फॉण्ट म्हणतात. मराठीत आपण वर्णाकृती म्हणू शकतो. त्या त्या वळणांना विशिष्ट नांव देण्यांत आले. उदा. इंग्लिशमधील एरियल, टाईम्स न्यू रोमन, कूरियर हे फॉण्ट सगळ्या टंकलेखकांच्या परिचयाचे आहेत.

टाइपरायटर वर टंकलेखन करतांना आपल्याला फॉण्ट बदलता येत नसे. हवेच तर वेगळ्या वळणाचा दुसरा टाइपरायटर विकत घ्यावा लागे.

पण संगणक आल्यावर त्या काड्या, शाईची रिबिन हा सर्व प्रकार संपला. एका विशिष्ट बटणावर जाऊन संगणकाला फॉण्टचे नांव सांगितले की तो त्या फॉण्टमध्ये लिहायला सुरुवात करतो. आपण मध्येच कांही परिच्छेद निराळ्या फॉण्ट मधे लिहू शकतो, कांही अक्षरांचा आकार लहान-मोठा, जास्त गडद किंवा रंगीतही करू शकतो. किंवा त्यांना रंगीत बॅकग्राउंड देऊ शकतो. हे झालं इंग्रजीच्या टायपिंग बद्दल.

मराठीत सुध्दा टंकयंत्राच्या की-बोर्डवरील अक्षरे वर्णक्रमानुसार मुळीच नव्हती. पण जो कांही अक्षर-अनुक्रम होता तो सगळ्या टंकलेखकांना ओळखीचा होता. म्हणून संगणकावर मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर बनविणा-यांनी तोच अक्षर-अनुक्रम संगणकासाठी पण कायम ठेवला जेणेकरुन पूर्वीपासून टंकयंत्रावर टाइप करत होते त्यांची सोय झाली. या अक्षर अनुक्रमाला मराठी टाइपरायटर किंवा गोदरेज अनुक्रम असे म्हणता येईल कारण मराठीसाठी बहुतांशी गोदरेज टंकयंत्र वापरांत होते. शिवाय संगणकावरील लेखन उठावदार दिसण्यासाठी मराठीत सुध्दा निरनिराळ्या वळणांचे खूपसे फॉण्ट सेट (म्हणजे वर्णाकृतीसंच) उपलब्ध झाले.

पण त्यांनी आणखीन एक गंमत केली. त्यांनी की-बोर्डासाठी इन्स्क्रिप्ट नावांचा एक आणि फोनेटिक नांवाचा एक असे दोन ज्यादा अक्षर-अनुक्रम तयार केले. एका विशिष्ट बटणावर जाउन संगणकाला सांगता येते की तुम्हांला कुठला अनुक्रम वापरायचा आहे.

इनस्क्रिप्ट अनुक्रम फारच छान आहे. त्यांत चार गंमती केल्या. पहिली गंमत आपण मुळाक्षरे शिकतो - क,ख,ग.......क्ष,ज्ञ. तोच अनुक्रम कायम ठेवला. त्यामुळे की-बोर्डावरचा अनुक्रम लक्षांत ठेवायची कटकट संपली. नाहीतर पूर्वी टंकयंत्रावरचा अनुक्रम डोक्यांत पक्का बसावा म्हणून सहा-आठ महिने टायपिंग क्लास लावून प्रॅक्टीस करावी लागत असे, परीक्षा द्यावी लागत असे. आता संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग शिकायला पाच मिनिटे पुरेशी आहेत. कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी न शिकावे लागता संगणकावर मराठी टंकन शिकून घेण्याची हमखास पद्धत म्हणजे इन्स्क्रिप्ट.
दुसरी गंमत म्हणजे हा अनुक्रम असा बसवला आहे की सगळे स्वर, कान्हा, मात्रा हे सर्व डावीकडे आहेत - ती डाव्या बोटानी व सगळी व्यंजने उजव्या बाजूला आहेत - ती उजव्या बोटांनी टाईप करायची. मराठी भाषेतल्या आपल्या सगळ्या शब्दात व्यंजन आणि स्वर गळ्यांत गळा घालून असतात. या इनस्क्रिप्ट की-बोर्डवर टाईप करतांना आपण सुध्दा उजव बोट, डावं बोट अस टाईप करतो - त्यामुळे आपोआप एक प्रकारची लय निर्माण होते आणि टायपिंग सोप्प होऊन जातं.

इनस्क्रिप्टची तिसरी गंमत अशी की सर्व भारतीय भाषांची लिपी वेगळी असली तरी वर्णमाला सारखी आहे. म्हणून सगळ्या भाषांसाठी सारखाच अनुक्रम ठेवला आहे. आपण मराठीत कांहीही लिहायची प्रॅक्टीस करायची आणि कुणावरही इम्प्रेशन मारायच- बघ हं, मी आता बंगालीत टाइप करुन दाखवीन (किंवा कन्नड, तामिळ, गुजराथी -- कांहीही). शिवाय एकदा मराठीत टाईप करुन झाले असले तरी एक बटण दाबून संगणकाला सांगता येते- बाबा रे, हे लिहिलेलं सर्व कानडी लिपीत बदलून दे- की संगणक ते पण करुन टाकतो. ज्यांना देशप्रेम, भारतीय एकात्मता टिकवण्याची ऊर्मी वगैरे आहे त्यांनी ही इन्स्क्रिप्ट नामक युक्ती नक्की समजून घेऊन तिचा आग्रह धरावा.

संगणक नव्हते - टंकयंत्र होती तेंव्हा प्रत्येक भाषेसाठी की-बोर्डाचा अक्षर-अनुक्रम वेगळा होता. त्यामुळे मराठी येईल त्याला पंजाबीत टाइप करता येत नसे. पुन्हा वेगळे शिकावे लागे. संगणकावर इनस्क्रिप्ट अनुक्रम वापरला तर ही समस्या खलास.
या चार सोईंमुळे इन्स्क्रिप्ट अनुक्रम भारतीय भाषांसाठी इतका चपखल ठरतो की "संगणकाचे सर्व सॉफ्टवेअर्स जगभर फुकट वाटा, आणि सर्वांना शिकू द्या" असे तत्वज्ञान असलेल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मधे व तसे तत्वज्ञान नसलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टममधेही हा अनुक्रम वापरला आहे.यामुळे जगभरांत मराठीतून संदेशवहन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो.

फोनेटिक हा अनुक्रम रोमन अक्षरे वापरून मराठी लिहिणा-यांसाठी आहे.

पण एक गोष्ट महत्वाची. संगणक उघडल्यावर आपल्याला गद्य लेखन करायच आहे की इंटरनेट वरुन पत्र पाठवायचे आहे की चित्र काढायचे आहे हे संगणकाला आपणहून कसे कळणार? तो कांही मनकवडा नसतो. आपणच सांगावे लागते. म्हणजे काय करायचे? तर त्याच्याकडील वर्ड नावाच्या प्रोग्रामवर डबल क्लिक करायचे म्हणजे तो आपल्याला पडद्यावर एक कोरा कागद देतो- मग आपण कोणती लिपी वापरणार तेही सांगायचे. मगच त्यावर आपले लेखन लिहायला सुरुवात करायची.
----------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य पानावर मागासवर्ग कक्ष (कार्यासन 16-ब) ची लिंक उघडल्यावर इन्स्क्रिप्ट पद्धतीने संगणकावर मराठी टायपिंग शिकण्यासाठी खालील मजकूर आहे --
"मराठी शिकायचे आहे तर 6 महिन्याच्या टायपिंग क्लासची गरज नाही -- केवळ 10 दिवसांत शिकण्यासाठी इथे क्लिक करा." त्यावर टिचकवल्याने खालील लिंक उघडते ज्यावर पायरी-पायरीने व सोपेपणाने इनस्क्रिप्ट पद्धतीने टंकन शिकण्याची सोय आहे. शिवाय सरावासाठी दहा धडे दिलेले आहेत
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf

ही लिंक उघडण्यांत फॉण्ट-समस्या आल्यास ही दुसरी लिंक पहा
http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
शिवाय खालील 3 मिनिटांच्या चित्रफितीवर प्रात्यक्षिक पहायला मिळते.
http://www.youtube.com/watch?gl=GB&hl=en-GB&v=0YspgTEi1xI&feature=related
-------------------------------
संगणकावर मराठी टायपिंग साठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट.
डावी-उजवी बोटे
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास चित्रफीत पहावी.]
इथे इन्स्क्रिप्ट कळपाटीचे चित्र)
दोन मिनिटांत 20 अक्षरे
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील HY या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
गरज असल्यास या लेखात दिलेले कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र पहावे.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर
AQ -- ओऔ,
SW -- एऐ,
DE -- अआ,
FR -- इई,
GT —- उऊ
अशी अक्षरे किंवा काना-मात्रा लिहिता येतात.

अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.

. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क (K) आणि
‘हूक’ लिहिण्यासाठी ह (U) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते.
‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.

हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहायचा असेल तर कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.

तुमच्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी-सहावीत जाणा-या मुलीमुलांना देखील ही युक्ती शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घ्या. पहा त्यामुळे त्यांच्यात केवढा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.

उरलेली अक्षरे
उरलेल्या 16 अक्षरांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र आणि ऋ ही अक्षरे अगदी वरच्या ओळीत आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, ळ, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला 10 मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना-मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.

जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D या अच्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते.
अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

नवे सॉफ्टवेअर न घेताच, फक्त सुरवातीचे एक सेटिंग करा
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर फारच छान. 2000 सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत.
सुरवातीचे एकदाच करावे लागणारे सेटिंग हे तुमच्या संगणक विक्रेत्याने करून द्यावे यासाठी आग्रह धरा. (पण आपणही खालील 1,2,3 पैकी करू शकतो हे विसरू नका. ते न चालल्यास 4था पर्याय मात्र विक्रेताच देऊ शकतो.)
1) *तुम्ही संगणकावर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरायचे ठरवल्यास - काही करावे लागत नाही, सरळ मराठी (देवनागरी) ऑप्शन सांगून सुरुवात करता येते.
2) *तुमची ऑपरेटिंग सिस्टम विन्डोज असेल तरीही सॉफ्टवेअरसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस असे दोन पर्याय असतात, त्यापैकी ओपन ऑफिस हा पर्याय घेतला तरी वेगळे काहीही करावे लागत नाही. शिवाय हे सॉफ्टवेअर फुकट डाउनलोड करता येते व मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रमाणेच यांत वर्ड, एक्सेल, पॉवरप्वॉइंट इत्यादी सर्व प्रोग्राम्स असतात.
3) विन्डोज ऑपरेटिंग सिस्टम व त्यामधे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा पर्याय निवडला असेल तर -
संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन "रीजनल ऍण्ड लँग्वेज सेटिंग" च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेजसाठी इंग्लिशचा पर्याय बाय डिफॉल्ट दिलेला असतो. तिथल्या डॉप-डाऊन मेनूवर टिचकवल्यास कित्येक भाषांचे पर्याय उघडतात. त्वयार मला हिन्दीचे (म्हणजेच देवनागरी किंवा मराठीचे) ऑप्शन हवे आहे असे सांगायचे. हे सेटिंग सुरूवातीला एकदाच कधीतरी करून घ्यावे लागते. ते केल्याने संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसू लागते. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार वर लेफ्ट क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी इंग्रजी ऐवजी Ma म्हणजे मराठी हा पर्याय निवडता येतो. असा पर्याय निवडायचा आणि टायपिंगला सुरूवात करायची.
4) वरील प्रमाणे देवनागरी सेटिंग सर्व संगणकांवर असेल असा समझोता IBM व मायक्रोसॉफ्टने भारत सरकार बरोबर केलेला आहे तरी पण कित्येक संगणकांवर तसे आपणहून उपलब्ध करून दिलेले नसते, आपण आग्रह धरल्यास एक ठेवणीतील सीडी आणून त्यावरून i386 ही फाईल वापरून अक्षरशः एका मिनिटांत ते करून दिले जाते.

वरील कोणत्याही उपायाने आपल्या संगणकावर मराठी एनेब्लिंग केल्यानंतर गुगलच्या जी-मेल वर किंवा याहू-मेल वर आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने टाईप करू शकतो. फक्त टास्कबार वर Ma हा पर्याय देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देउन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून विषय दिल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.

तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून महाजालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी !) धडाधड मराठी वाङ्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
----------------------------------------------------
इन्स्क्रिप्ट टेकनाच्या सरावासाठी खालील पाठ उपयोगी पडतील --
पाठ पहिला
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ त थ द ध च छ ज झ
ट ठ ड ढ प फ ब भ र ह ङ
पाठ दुसरा
क त च ट ा ी ू
काका काकी काकू
काटा कात काच चकाचक, चाकू, चाक,
टाका ताट तूट तीट ताटातूट
पाठ तिसरा
प फ ब भ र ह य ि ु
पापा पर पार
रुह याहू हीरा रिपू रिपरिप
हुरुप रुप हरहर हरि
हार राह भारत भार हरी
पपया यार बया याहू
रिता टीप कात काका चाट चाट
चीट पुकार चुकार चुका ताक टीका
ताट तुटीची काकी काकु कचरा पार
टापटीप कातकरी पाट पाटी टिका चराचर
पाठ चौथा
ख थ छ ठ फ उ इ अ ए ओ
खोत खान खानपान छान थान थाना
थाप छाप ऊस ओस ओक ठोक
फेक फी पोपट पाट पोट रोख
रोखठोक ठोक आई
पाठ पाचवा
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
अशाप्रकारे क ते ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची बाराखडी टंकलेखित करणे.
पाठ सहावा
ह ग द ज ड ब ू ी ै ौ
हापूस गादी जाड जाडी बुडबुडा कागद
गाजर हौद, औजार, ऐपत
पाठ सातवा
घ ध झ ढ भ ऊ ई आ ऐ औ
धार घार झार ऐक, खारट, खीर,
पाठ आठवा
म ण न व ल ळ स श ष य
वारा भारत भात थाप भार मासा
मामा किडा
खिरा खिसा मन नवल लहान
पाठ नववा
ळ श ष ण
माळ शाळ वलय मणका मळा वळण
लळा वाळा नळ निळा
बाळ खेळ वेळ माळ नळ
शूळ शारदा शादी शामक शूर
षटकोण षटकार षटक मेष
बाण खाण वाण सहाण रहाणे

ज्ञ त्र क्ष श्र ऋ ा ॅ र् ः
ज्ञान ज्ञात ज्ञानदेव ज्ञापन
मात्र गात्र त्राटिका त्रागा त्रास
त्रुटी क्षुब्ध क्षती क्षमा क्षत्रिय
श्री श्रीमती श्रीयुत श्रीराम श्रीकांत
बॉक्स फॉक्स पॉवर लॉन टॅक्स रॉक
ऋतु ऋचा ऋण ऋणको ऋषि
पाठ दहावा
एखादया अक्षराला ृ (रुकार) जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर ृ type करावे. उदा
कृपा कृतार्थ कृष्ण कृषी नृप
दृष्टी सृष्टी वृष्टी
एखादया अक्षराला खाली र जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर type करावे. नंतर हलन्त (शब्दाचा पाय मोडणारी कळ - english D अक्षर असलेली) दाबावी, नंतर र अक्षर दाबावे उदा
क्रम भ्रम प्रत व्रत व्रण क्रमांक
एखाद्या अक्षरावर रफार देण्यासाठी उदा. गर्व type करताना प्रथम ग, नंतर र अक्षर दाबावे नंतर हलन्त नंतर व अक्षर दाबावे
सर्व कर्म धर्म शर्थ
आर्त सार्थ अर्थ व्यर्थ अनर्थ
मराठीत क्वचित आडव्या चंद्रकोरीने र जोडतात. असा र येण्यासाठी शिफ्ट व र चे अक्षऱ एकत्र दाबावे व हलन्त (पाय मोडून) व पुढील अक्षर लिहावे
उदा. वा-यावर, गु-हाळ, त-हा
-------------------------------------------------------------------
लेखन करताना ---
संगणकावर नवी वर्ड फाईल उघडली किंवा जुनी फाइल उघडलेली असेल तर तिचे आपण कांय कांय करु शकतो--
फाइल उघडल्यावर समोर जी पाटी दिसते त्या पाटीच्या आत जाऊन क्लिक केले की, संगणकाला कळते की, आपल्याला फाईलचे पुढले काम करायचे आहे. या पाटीच्या वरच्या बाजूला एक मेनू-बार (म्हणजे आडव्या ओळीत बरेच कामांचे शब्द) दिलेला असतो. तो समजावून घेऊ या.







मेनू-बारवर डावीकडे पहिला शब्द असतो फाईल. त्यावर क्लिक केले तर एक उभा आखलेला सब-मेनू-बार उघडतो. त्यावरही खूपसे पर्याय असतात. फाईल बद्दल जे कांही करायचे असेल ते सांगण्यासाठी फाईल हा मेनू व त्याचा सब-मेनू वापरायचा.
उदा. Save- फाईलमधील बदल जपून ठेवायचे आहेत का? तर Save वर क्लिक करायचे.
Save as हा दुसरा पर्याय - म्हणजे ती फाईल जपून नेमकी कुठे ठेवायची व कोणत्या नावाने?
new - म्हणजे समोर असलेली फाईल बाजूला ठेऊन नवीन कोरी पाटी आपल्या समोर येणार.
Open- आपण आधी कुठेतरी जपून ठेवलेली फाइल असेल तेंव्हा open असे सांगितल्यानंतर- संगणक आपल्याला कित्येक पर्याय दाखवून विचारतो की, नेमकी कोणती फाइल उघडायची आहे. त्या फाईलवर जाऊन आपण क्लिक करायचे किंवा कुठेतरी open हा पर्याय असेल तिथे क्लिक करायचे- की ती फाईल उघडते.
Print म्हटल्यावर जर संगणकाला ‌प्रिंटर जोडला असेल ती file कागदावर प्रिंट होऊ लागते. हे सुरु होण्यापूर्वी अजून एक खिडकी उघडली जाऊन प्रिंटींगबद्दल आपल्याला खूप गोष्टी विचारल्या जातात. कोणत पान? किती प्रती? कागदावर मार्जिन किती हवे? रंगीत की साधे? उभे की आडवे? हळू हळू आपण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फक्त गरजेपुरतच एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकतो.
pdf -- प्रिंटींगमध्येच हा एक महत्वाचा पर्याय असतो. कागदावर प्रिंट न घेता संगणकावरच अशी वेगळी फाईल बनवायची ज्या फाईलमध्ये बदल करण्याला वाव नसतो- जणू काही कागदावर काढलेली प्रतच. अशा फाईल्सना pdf (portable document format) हे लेबल लावलेले असते व ते जगन्मान्य मानकानुसार आहे. ही फाईल आपण इतरांना पाठवू शकतो. कारण त्यांत चटकन फेरबदल करता येत नाही, विशेषतः लेखनातील रंगसंगती, अलाइनमेंट, इत्यादी. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या मूळ फाइलमध्ये चित्र असेल किंवा आपले मराठीतील फॉण्ट तुटून junk दिसतील अशी भीती असेल तेव्हा जर त्या धारिकेला pdf केले तर ती खात्रीलायक मूळ आहे त्याप्रमाणेच दिसते. यासाठी ईमेल करायच्या फाईली खूपदा pdf करुन पाठवतात.
मेनू-बारवर फाईल नंतर पुढला मेनू असतो एडिट. edit वर बाण नेला (क्लिक केले) की तिथला सब-मेनू दिसतो व तिथून आपण फाइल मधे दुरुस्त्या करण्यासाठी कांय कांय करु शकतो ते कळते.
त्यामधील select all व undo हे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण फाइल select करण्यासाठी select all हा पर्याय वापरायचा. file मध्ये आधी जे बरेचसे बदल केले असतील ते एक-एक करुन रद्द करण्यासाठी undo वापरायचा. या शिवाय cut, copy, paste, redo हे पर्याय आहेत.
copy + Paste - आपण आपल्या फाईल मधील एखाद्या भाग select करून copy करु शकतो व त्याला दुसरीकडे किंवा दुस-या एखाद्या फाईलवर paste करु शकतो.
Copy + Paste सारखेच आपण cut + paste देखील करु शकतो.
Delete केलेला भाग फाईल कधून पुसून टाकला जातो.
redo वापरून आधी बदललेला भाग पुन्हा पहिल्यासारखा करता येतो.

मेनू-बार वर त्या पुढचे शब्द view, insert, format, tool, table, windows व help असे असतात. त्यांची वेगवेगळी कामे आपण सावकाश शिकून चालते.
Here photo of menubar in words
-----------------------------------------------------------------------

2 comments:

Keshav Nandedkar said...

easy to read in marathi. difficult to type speedily in marathi.

लीना मेहेंदळे said...

आता इतक्या वर्षानंतर काही प्रगति झाली का ?
केल्याने होत आहे रे आधी केलेचा पाहिजे.