संगणकाची जादुई दुनिया
-------------------------------------------
भाग -- 1
संगणक म्हणजे काय?
आजच्या युगांत संगणक हा शब्द सर्वांना माहित आहे. आपल्या देशांत आता डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागले आहेत संगणकामार्फत खूप सुविधा दिल्या जाणार आहेत . म्हणून आपण याची तोंड ओळख करून घ्यायला हवी.
खूप जणांनी संगणक पाहिलेले आहेत आणि त्यातील कित्येकांनी वापरलेलेपण आहेत. तरी पण चटकन कुणालाही विचारा संगणक म्हणजे काय? की तो माणूस गडबडलाच म्हणून समजा. आणि संगणकाच्या वापराबद्दल सुध्दा खूप गैरसमजूती आहेत. ज्यांनी संगणक पाहिला त्यापैकी किमान पन्नास टक्के लोकांना वाटतं - छे छे ते कांही आपल्याला जमणार नाही आणि वापरणं खिशालाही परवणार नाही. मग ज्यांना जमतं ते हसतात- अरे, हे तर किती सोप आहे!
एकूण कांय तर संगणक अशी वस्तू आहे, जी एकाच वेळी कांही लोकांना खूप कठीण वाटते आणि कांही लोकांना खूप सोपी. काहींना वाटतं की ही खिशाला न परवडणारी गोष्ट आहे आणि काहींना वाटतं की हे परवडेल. आणि गंमत म्हणजे अस वाटण्यामध्ये त्यांच्या हुषार असण्याचा किंवा नसण्याचा फारसा संबंध नसतो.
===================================================
हे पुस्तक वाचतांना मूळ संकल्पना तेवढी सोपेपणाने कळावी हा उद्देश आहे. पण थोडे खोलात शिरुन पहायला कांय हरकत आहे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी रेघेच्या खाली त्याच विषयाला धरुन कांही माहिती दिली आहे. ती न वाचताच पुढे गेले तरी चालेल अशा पध्दतीने मुख्य विषयाची मांडणी केली आहे.
----------------------------------------------------------------
भाग- 2
संगणक म्हणजे एक यंत्र
भाग -- 2, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
हे तर खरच. संगणकाबद्दल सगळ्यात आधी हेच सांगावे लागेल की संगणक हे एक यंत्र आहे. आपण खूप यंत्र दिवसभर पहात असतो. सायकल हे एक यंत्र आहे- पॅडल मारल की सायकल चालते आणि आपल्याला इकडून तिकडे नेते. घड्याळ हे एक यंत्र आहे. किल्ली किंवा सेल (बॅटरी) वर चालतं आणि आपल्याला वेळ दाखवतं. असेच फ्रीज, टीव्ही, मोबाईल, लिफ्ट, पम्प, ट्रॅक्टर, कार, स्कूटर ही सगळी यंत्र आहेत.
गावातला विहीरीवरचा रहाट, शेतावरचा पम्प, फवारणीचे यंत्र, स्प्रिंकलर, बोअरवेल व त्यावर बसवलेला हॅन्डपम्प, - ही सगळी यंत्रच आहेत.
पण संगणक आहे जादूगार यंत्र. कारण त्याच्या जवळ एक छोटासा मेंदू असतो - आता हा मेंदू पण यांत्रिक मेंदू असतो ते सोडा, पण मेंदू म्हणजे मेंदू. म्हणून मग संगणक वेगवेगळ्या ब-याच त-हेची कामं करु शकतो. लिहू शकतो, वाचू शकतो, गाण गाऊ शकतो, सिनेमा दाखवतो, सिनेमा बनवतो, चित्र काढतो, आपल्या सोबत खेळतो, जगाच्या एका कोप-यातून दुस-या कोप-यात एका क्षणात संदेश पाठवू शकतो, हीSS भली मोठ्ठी गणित पण करु शकतो आणि हो, चंद्रावर जाण्याला पण मदत करतो.
----------------------------------------------------
भाग- 3
संगणक म्हणजे युक्तीबाज जादूगर
भाग -- 3, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
खरतर संगणक आहे एक युक्त्या करणारा जादूगर. पण
एकदा काही जणांनी मला सांगितले की, संगणक म्हणजे अंधा-या खोलीतील भूत. म्हणून माझ विचारचक्र सुरू झाल ,की यांना कस समजवायच?
भुताला आपण खूप घाबरतो. मुळात खोलीत अंधार असल्याने कांही दिसत नसतं. त्यात आपल्या डोक्यातील भूत-बीत अशा कल्पना बाहेर डोकावू लागतात. मग आपण घाबरतो. पण याला सोपा उपाय हाच की त्या खोलीत उजेड करायचा - एखादी खिडकी उघडायची किंवा दिवा लावायचा की भुताची सगळी भिती एका क्षणात निघून जाते.
संगणकाबद्दलही अशी धास्ती असते की, आपण एखाद चुकीच बटण दाबल की यांत कांही तरी बिघडेल- कुणी तरी आपल्याला ओरडेल. तर मग आधी हे समजून घ्यायला पाहिजे की संगणकात नवख्या माणसाने वापरल्यामुळे बिघडून मोठे नुकसान हा प्रकार फारच क्वचित होतो, जवळ-जवळ नाहीच.
धास्तीचे दुसरे एक कारण आहे. संगणकावरील प्रत्येक काम एका विशिष्ट पध्दतीनेच करावे लागते. ती पध्दत येत नसेल तर संगणक पुढे जातच नाही. अडेलतट्टूसारखा अडून बसतो. अशावेळी नेमकं कांय कराव हे न समजल्यावर आपण इकडचे तिकडचे दोन-पाच प्रयत्न करुन सोडून देतो. पुढे काय करावे हे न सुचल्यामुळे उत्साह संपून जातो, आणि संगणक हा पुन्हा एकदा अंधा-या खोलीतल्या भुतासारखा वाटू लागतो. याचसाठी आपल्याला संगणकाकडून नेमके कांय काय करुन घ्यायचे आहे आणि त्या साठी करायच्या क्रियांचा क्रम हे समजावे लागते. हे इतक सोप आहे की करायला बसेपर्यंत हे सोप आहे हे उमजतच नाही मुळी. करायला बसल की अगदी एक दोन वेळा करुनच हात बसतो, कारण त्यातील जादूच्या युक्त्या कळतात. म्हणूनच संगणक म्हणजे अंधाऱ्या खोलीतील भूत नसून युक्त्या करणारा जादूगर असतो. त्याच्या अगदी छोट्या छोट्या युक्त्या असतात. त्या शिकून घेतल्या पाहिजेत.
भुताची भिती घालवायला आपण एखाद्या मित्राचा हात धरून अंधा-या खोलीत जातो. तसच संगणकाचं. सुरुवातीला याच्या छोट्या छोट्या युक्त्या मित्रांकडून शिकून घेतल्या तर भिती नाही वाटणार. मात्र शिकून झाल्यावर आपणही इतरांना शिकवण्याची मनोवृत्ती ठेवलीच पाहिजे.
-------------------------------------------
भाग- 4
संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल
(या भागांतील शब्दावली -- सीपीयू = कारभारी डबा, स्क्रीन = पडदा , की-बोर्ड = कळपाटी, माउस = उंदीर,
आयकॉन = खूणचित्र, क्लिक = टिचकी)
पाटी-पेन्सिल कुणाला माहित नाही? पाटी-पेन्सिलचा मोठा गुण म्हणजे कांहीही लिहा- कितीही चुका करा- पुसून टाका- पुन्हा लिहा- चुकल अस वाटत असेल तर पुन्हा पुसा आणि लिहा. जे काम झाल ते पुसून टाकल की नवीन गोष्टी लिहायला किंवा नवीन गणित करायला आपली पाटी पुन: तयार.
ज्यांना अस वाटत, की आपल्याला संगणक यावा, पण त्याचसोबत आपल्याला संगणक येईल का अशी भितीपण वाटते, त्यांनी आधी समजून घ्यावे की संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल.
संगणक एखाद्या को-या पाटीसारखाच असतो, पण या पाटीची लांबी आणि रुंदी कितीही वाढवून चालते, त्यामुळे मोठे मोठे लेख, मोठाली चित्र, मोठाली गणित अस या पाटीवर लिहीता येत. लिहीलेल सगळ वाचून काढल्यावर अधे मधे झालेल्या चुका तेवढा भाग पुसून दुरुस्त करता येतात. एखादा परिच्छेद संपूर्ण पुसून पुन्हा नव्याने लिहीता येतो.
पाटी-पेन्सिलने लिहीण्यासाठी तीन गोष्टी लागतात. पाटी, पेन्सिल आणि आपला मेंदू. संगणकाच्या पाटी-पेन्सिलवर लिहीण्यासाठी आपल्या मेंदूच्या सोबत संगणकाचा मेंदू पण वापरावा लागतो. तो मेंदू इतर यांत्रिक भागांसोबत एका मोठ्या चौकोनी डब्यात बंद केलेला असतो.( धूळ इत्यादी पासून सुरक्षेसाठी.) आपण याला कारभारी डबा म्हणू या. कारण संगणकाची नव्वद टक्के कामं या डब्यातील मेंदू व इतर यंत्रांमुळेच होतात. आपण नवा संगणक आणला की समोर या चार गोष्टीच दिसतात – कारभारी डबा (सीपीयू), पडदा (स्क्रीन), की-बोर्ड (कळपाटी) आणी उंदीर (म्हणजे माउस नांवाचं एक उपकरण).
संगणकाचा पडदा ही पाटी, की-बोर्ड व उंदीर (माऊस) या त्याच्या दोन त-हेच्या पेन्सिली आणि कारभारी डबा– सीपीयू. यांचा एकत्र वापर करण्याआधी याना हाताळण्याची युक्ती शिकून घ्यावी लागेल.
कारभारी डबा आणि पडदा हे विजेवर चालतात. म्हणून त्यांना सुरु करायला आधी वीजेचे बटण चालू करायचे. कारभारी आणि पडदा हे एका वेगळ्या जाड तारेने आपसात पण जोडलेले असतात. कारभारीचा मेंदू चालू करण्यासाठी एक वेगळे बटण असते ते पण चालू करावे लागते. मग अंदाजे एक मिनिटात संगणक स्वतःच्या आतली सर्व यंत्रणा सज्ज करतो आणि तुमच्या पुढल्या सूचनेची वाट पहात बसतो.
हल्ली लॅपटॉप वापरणे जास्त सोईचे झाले आहे .त्याची सुरवात देखील त्याच्याकडील पॉवरचे बटण दाबूनच होते
कारभारी यंत्रालाच एका वायरने उंदीर आणि दुस-या वायरने की-बोर्ड जोडलेला असतो. संगणकाला देण्याच्या सर्व सूचना या दोघांच्या सहाय्याने दिल्या जातात.
आपण टेबलावर उंदीर सरकावला की पडद्यावर एक बाण त्याप्रमाणे डावी-उजवीकडे किंवा वर-खाली हलतो. ज्या जागी आपल्याला कांही काम करायच आहे, तिथे बाण आणून ठेवायचा आणि संगणकाला सूचना देण्यास सुरुवात करायची.
संगणकाला आपण काय सूचना दिल्या, त्याला काय समजल्या आणि त्यावर संगणकाने काय केले हे आपल्याला कसे समजावे? याचसाठी संगणकाचा स्क्रीन किंवा पडदा असतो. मी याला पाटी म्हणते कारण आपण पाटीवर लिहीतो, पुसतो, पुन्हा लिहीतो, चुकलेल गणित पुन्हा करतो, तसचं आपल्याला संगणकावर करता येत आणि जे केलं ते या पाटीवर किंवा स्क्रीनवर पहाता येत. चुकल असं वाटल तर पुसून दुरुस्त करता येतं.
इथे पडद्याचा फोटो नव्या प्रकारच्या स्क्रीनचे चित्र, पुढे माउस व कीबोर्डाचे पण
मात्र पडदा सुरु केल्यावर आपल्याला कोरी पाटी न दिसता त्यावर ब-याच आकृत्या व त्याखाली थोडेसे वर्णन लिहीलेले दिसते. कारण पडदा हा फक्त पाटी नसून त्यावर कामांची यादी पण असते. प्रत्येक आकृती म्हणजे एका नवीन कामाची सुरुवात. या आकृतीना इंग्लीशमध्ये आयकॉन म्हणतात. आपण त्यांना खूणचित्र म्हणू या. जे काम करायचे असेल त्या आकृतीवर बाण आणून ठेवायचा आणी कामाला सुरुवात करायची.
हे शिकायला, म्हणजे उंदीर हलवून हवा त्या ठिकाणी बाण कसा आणावा हे शिकायला एखादा दिवस लागू शकतो. खूपदा बाण पडद्याबाहेर पळून जातो आणि आपण म्हणतो मरु दे ते संगणकाच शिक्षण. पण एकदा हात बसला की गंमत येते. आपण म्हणतो आता अजून या उंदीराबद्दल काय काय शिकायचे आहे? चला सांगून टाका.
उंदीराच्या पाठीवर एक चक्री आणि तिच्या डावी-उजवीकडे दोन बटणं असतात. हव्या त्या आकृतीवर बाण नेऊन डावे बटण दाबले की त्या कामाला सुरुवात होते. याला लेफ्ट क्लिक असे म्हणतात. लेफ्ट क्लिकने ते ते काम किंवा ती ती फाईल उघडते आणी आपण त्यांच्या आत पोचून फाईल मधील काम करु शकतो, जसे की एखादा लेख लिहायला सुरुवात केलेली असेल तर ती फाईल उघडून लेखाचा पुढचा भाग लिहीणे.
या उलट आपण जर उजवे बटण दाबले, म्हणजे राईट क्लिक केले तर आपण त्या फाईल संबंधाने कांही काम करु शकतो. उदा. फाईलची प्रत काढणे, मित्रांना पाठवणे, फाईलला कांही तरी नांव देणे किंवा नांव बदलणे इत्यादी.
आणी चक्रीचे काम काय? आपण एखादी फाइल उघडलेली असेल तेंव्हा दोन्ही बटनांच्या मधील चक्री फिरवल्याने त्या फाईलची पाने भराभर मागे-पुढे सरकतात
लेफ्ट क्लिकचा वापर खूप जास्त असल्याने त्याला लेफ्ट क्लिक ऐवजी नुसतं सुटसुटीत क्लिक असच म्हणतात. तसच बहुतेक सर्व संगणकांची सेटिंग अशी करतात ज्यामधे उंदीराचे डावे बटण एकदाच क्लिक केले तर फक्त त्या फाइलची माहिती झरकन समोर येते, प्रत्यक्ष फाइल उघडायला ते बटण घाईघाईने दोनदा क्लिक करावे लागते. म्हणून त्याला डबल क्लिक म्हणतात.
पडद्याला स्क्रीन म्हणतात तसेच डेस्क-टॉप देखील म्हणतात. पण पडद्यावर दिसणा-या कामांची किंवा खूणचित्रांची यादी या अर्थानेही डेस्कटॉप शब्द वापरतात. हा शब्द तरी कुठून आला असेल? आपल्या कार्यालयातील कामाचे टेबल आठवा. त्यावर कांही कामांच्या फाइली असतात आणी इतर कांही सोईच्या वस्तू उदा. फोन, कॉलबेल, पेनं इ. असतात. तोच प्रकार संगणकाच्या डेस्कटॉपचा. त्यावरील कांही खूणचित्रे आपण तिथे ठेवलेल्या फाइलींची आणि कांही खूणचित्रे इतर सोईच्या कामांसाठी लागणा-या प्रोग्राम्सची असतात. त्यातील एखाद्या खूणचित्रावर किंवा फाइलवर क्लिक केल्यावर त्या कामासाठी एक नवी पाटी उघडते आणी अशा त-हेने कामाला सुरुवात होते.
========================================
साधारणपणे जिथे क्लिक हा शब्द असेल त्याचा अर्थ लेफ्ट व डबल क्लिक. राइट क्लिक असा अर्थ असेल तिथे तसा स्पष्ट उल्लेख करतात. तसेच आपल्याला डबल क्लिकची कटकट वाटली तर आपण संगणकाच सेटिंग बदलून एकाच क्लिकने फाईल उघडेल असं करू शकतो.
----------------------------------------------------------------------------------
भाग- 5
संगणक म्हणजे खेळगडी
भाग -- 5, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
संगणकाचा सराव करण्याचा सगळयांत सोपा उपाय म्हणजे संगणकावर खेळण किंवा संगणकाबरोबर खेळण.
यासाठी तीन गोष्टी याव्या लागतील –
संगणक सुरु आणि बंद करणे,
संगणकावर खेळ कुठे आहे ते शोधून खेळ सुरु करणे, आणि
संगणकावर खेळण्यासाठी उंदीर किंवा माऊस वापरता येणे. जॉय स्टिक नांवाची अजून एक पध्दत असते. खूपसे खेळ माउस ऐवजी जॉय स्टिक ने जास्त छान खेळता येतात.
(शिवाय खेळ तर खेळता यायला पाहिजेच.)
आ पणाला हवा तो खेळ संगणकावर कुठे आहे ते शोधायला लागू नये यासाठी त्याचे खूणचित्र डेस्क टॉपवर आणून ठेवणे हा सोपा उपाय आहे. तस एकदा केलं की नंतर कधीही संगणक उघडल्यावर आपण त्या खेळाच्या खूणचित्रावर बाण नेऊन क्लिक केले की खेळ उघडतो आणि आपण खेळायला सुरुवात करु शकतो.
बुध्दिबळ खेळायला दोन गडी लागतात. तरी आपण एकटे संगणकावर बुध्दीबळ खेळू शकतो. कारण दुस-या भिडू ऐवजी संगणकच आपल्याशी खेळतो. आपण अगदी नवखे असलो तर संगणकाला आधीच सांगून टाकायचे की तू पण पहिल्या पातळीवरचा भिडू आहेस अस समजून खेळ. हळूहळू आपण वरच्या पातळीवर जायला सांगितले की, संगणक अधिकाधिक पक्क्या भिडू प्रमाणे खेळू लागतो.
असे कित्येक खेळ संगणकावर असतात. ज्या खेळांना भिडू लागतात तिथे एका किंवा अनेक भिडूंचे डाव संगणक स्वतःच खेळतो. पत्त्यांचे खेळ, कार-रेसिंग, लढाया, गुप्त हेरगिरी असे कित्येक खेळ खेळता येतात. संगणकावर खेळण्यासाठी नवीन खेळ बनवणे हे एखादा नवा सिनेमा बनविण्यापेक्षाही जास्त जिद्दीचे आणी नव्या सिनेमापेक्षा जास्त पैसा मिळवून देणारे काम असते.
मध्यंतरी संगणकावर अति लोकप्रिय झालेला खेळ होता स्टार क्राफ्ट. हा तासनं तास चालतो. कोरियामध्ये याच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटस् होतात आणि जसे दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवतात, तसेच इंटरनेटवर आणी कोरियन टीव्ही वर आता स्टारक्राफ्ट चे सामने पण दाखवतात. यावर कळस म्हणून की काय, बर्कले युनिर्व्हसिटी ने जे बरेच शैक्षणिक धडे तयार केले आहेत, त्यामध्ये स्टारक्राफ्ट खेळावर आधारित सीडी पण आहेत – त्याचे होमवर्क दिलेले आहे, वगैरे – जेणेकरून त्यांतून विद्यार्थ्यांनी गेम थिअरी तसेच स्ट्रॅटेजिक प्लानिंगचे धडे वगैरे शिकायचे असतात.
नुकताच लोकप्रिय झालेला खेळ म्हणजे पोकेमॅन .शिवाय अगदी लहान मुलांनाही गुंगवून ठेवील असेही खेळ असतात.
असा हा खेळकर खेळगडी संगणक.
------------------------------------------------------------
Saturday, March 7, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment