Wednesday, June 10, 2009

भाग -17 -- आपले स्वतःच्या पुस्तकांचे कपाट

भाग -17
tallied with book 24-07-2011
संगणक म्हणजे आपले स्वतःच्या पुस्तकांचे कपाट
अर्थात आपला ब्लॉग - blog
संगणकावर भरपूर वेबसाईट तयार होऊ लागल्या. पण खूप लोकांना असेही वाटू लागले की ते स्वागत-पृष्ठ करा- त्याला सजवा एवढे नखरे हवेत कशाला? चला ही प्रक्रिया आणखीन सोपी करु या. आपण लोकांना त्यांची खूप पुस्तक ठेवायच कपाटच देऊ या. या कपाटाच नांव ठेवल ब्लॉग. आता आपण गूगल किंवा याहू वर जाऊन स्वत:चा ब्लॉग म्हणजे पुस्तकांचे कपाट- त्याला छान नांव-पत्ता देऊन रजिस्टर करायचे. किंबहुना गूगलच्या जी-मेल वर आपण ईमेल साठी रजिस्ट्रेशन केले असेल तर गूगलची ब्लॉगस्पॉट ही सुविधा वापरण्यांसाठी नवे रजिस्ट्रेशन पण करावे लागत नाही.

ब्लॉगस्पॉट सुविधेमध्ये आपला ब्लॉग म्हणजे कपाट उघडल की आपण ठरवायच - आपल्याला नवीन ब्लॉग तयार करायचा आहे की जुन्या ब्मलॉगधील अनुक्रमणिका वाढवायची आहे. आपण विषयानुरूप वेगवेगळे ब्लॉग तयार करू शकतो किंवा एकाच ब्लॉगमधे वेगवेगळे लेख ठेऊ शकतो. जुन्या ब्लॉगमध्ये नवीन अनुक्रमणिका वाढवता येते. असा जो विषय निवडला त्याचे लेखन, चित्र, ऑडीयो, व्हिडीयो यापैकी कांहीही त्या ब्लॉगवर लिहून ठेवता येते.

मीच आतापर्यंत सुमारे ३२ ब्लॉगस् तयार केले आहेत. प्रत्येकाच्या अनुक्रमणिकेत पंधरा ते वीस लेख आहेत. अशा त-हेने सुमारे पांच-सहाशे लेखांचे लेखन आज मला इंटरनेटवर ठेवता आलेले आहे.
http://leenameh.blogspot.com या साईटवर हे लेख वाचता येतील.
------------------------------------------------------------------

No comments: