Sunday, February 22, 2009

संगणकाची जादुई दुनिया --To be tallied with book

संगणकाची जादुई दुनिया
-------------------------------------------
भाग -- 1 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे काय?
आजच्या जगांत संगणक हा शब्द सर्वांना माहित आहे. खूप जणांनी संगणक पाहिलेले आहेत आणि त्यातील कित्येकांनी वापरलेले पण आहेत.
तरी पण चटकन कुणालाही विचारा संगणक म्हणजे काय? की तो माणूस गडबडलाच म्हणून समजा. आणि संगणकाच्या वापराबद्दल सुध्दा खूप गैरसमजूती आहेत. ज्यांनी संगणक पाहिला त्यापैकी किमान पन्नास टक्के लोकांना वाटत - छे छे ते कांही आपल्याला जमणार नाही आणि वापरण खिशाला परवडू शकणार नाही. मग ज्यांना जमतं ते हसतात- अरे, हे तर किती सोप आहे! म्हणून संगणक अशी वस्तू आहे, जी एकाच वेळी कांही लोकांना खूप कठीण वाटते आणि कांही लोकांना खूप सोपी. काहींना वाटतं की ही खिशाला न परवडणारी गोष्ट आहे आणि काहींना वाटतं की हे परवडेल. आणि गंमत म्हणजे अस वाटण्यामध्ये त्यांच्या हुषार असण्याचा किंवा नसण्याचा फारसा संबंध नसतो.
---------------------------------------------------
भाग- 2 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे एक यंत्र
हे तर खरच. संगणकाबद्दल सगळ्यात आधी हेच सांगावे लागेल की संगणक हे एक यंत्र आहे. आपण खूप यंत्र दिवसभर पहात असतो. सायकल हे एक यंत्र आहे- पॅडल मारल की सायकल चालते आणि आपल्याला इकडून तिकडे नेते. घड्याळ हे एक यंत्र आहे. किल्ली किंवा सेल (बॅटरी) वर चालतं आणि आपल्याला वेळ दाखवतं. असेच फ्रीज, टीव्ही, मोबाईल, लिफ्ट, पम्प, ट्रक्टर, कार, स्कूटर ही सगळी यंत्र आहेत.
गावातला विहीरीवरचा रहाट, शेतावरचा पम्प, फवारणीचे यंत्र, स्प्रिंकलर, बोरवेल व त्यावर बसवलेला हॅन्डपम्प- ही सगळी यंत्रच आहेत.
पण संगणक आहे जादूगार यंत्र. कारण त्याच्या जवळ एक छोटासा मेंदू असतो- आता हा मेंदू पण यांत्रिक मेंदू असतो ते सोडा, पण मेंदू म्हणजे मेंदू. म्हणून मग संगणक वेगवेगळ्या ब-याच त-हेची कामं करु शकतो. लिहू शकतो, वाचू शकतो, गाण गाऊ शकतो, सिनेमा दाखवतो, सिनेमा बनवतो, चित्र काढतो, आपल्या सोबत खेळतो, जगाच्या एका कोप-यातून दुस-या कोप-यात एका क्षणात संदेश पाठवू शकतो, हीSS भली मोठ्ठी गणित पण करु शकतो आणि हो, चंद्रावर जाण्याला मदत पण करू शकतो.
----------------------------------------------------
भाग- 3 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे युक्तीबाज जादूगर
खरतर संगणक आहे एक युक्त्या करणारा जादूगर. पण खूप लोकांना अस वाटतं की, संगणक म्हणजे अंधा-या खोलीतील भूत. भुताला आपण खूप घाबरतो. मुळात खोलीत अंधार असल्याने कांही दिसत नसतं. त्यात आपल्या डोक्यातच भूत-बीत अशा ज्या कल्पना बसलेल्या असतात, त्या अशावेळी बाहेर डोकावू लागतात. मग आपण घाबरतो. पण याला सोपा उपाय हाच की त्या खोलीत उजेड करायचा - एखादी खिडकी उघडायची किंवा दिवा लावायचा की भुताची सगळी भिती एका क्षणात निघून जाते.
संगणकाची भिती कां वाटते? तर अशी धास्ती असते की, आपण एखाद चुकीच बटण दाबल की यांत कांही तरी बिघडेल- कुणी तरी आपल्याला ओरडेल. म्हणून आधी हे समजून घ्यायला पाहिजे की संगणकात नवख्या माणसाने वापरल्यामुळे बिघडून मोठे नुकसान हा प्रकार फारच क्वचित होतो, जवळ-जवळ नाहीच.
धास्तीचे दुसरे कारण असे की, संगणकावरील प्रत्येक काम एका विशिष्ट पध्दतीनेच करावे लागते. ती पध्दत येत नसेल तर संगणक पुढे जातच नाही. अडेलतट्टूसारखा अडून बसतो. अशावेळी नेमकं कांय कराव हे न समजल्यावर आपण दोन-पाच इकडचे तिकडचे प्रयत्न करुन सोडून देतो. पुढे काय करावे हे न सुचल्यामुळे उत्साह संपून जातो, आणि संगणक हा पुन्हा एकदा अंधा-या खोलीतल्या भुतासारखा वाटू लागतो. याचसाठी आपल्याला संगणकाकडून नेमके कांय काय करुन घ्यायचे आहे आणि त्या कामासाठी कराव्या लागणा-या क्रियांचा क्रम काय हे समजावे लागते. हे इतक सोप आहे की करायला बसेपर्यंत हे सोप आहे हे उमजतच नाही मुळी. करायला बसल की अगदी एक दोन वेळा करुनच हात बसतो, कारण त्यातील जादूच्या युक्त्या कळतात. म्हणूनच संगणक म्हणजे अंधा-या खोलीतील भूत नसून युक्त्या करणारा जादूगर असतो. त्याच्या अगदी छोट्या छोट्या युक्त्या असतात. त्या शिकून घेतल्या पाहिजेत.

भुताची भिती घालवायचा आणखी एक उपाय असतो तो म्हणजे एखाद्या मित्राचा हात धरून अंधा-या खोलीत जाणे. तसच संगणकाचं. सुरुवातीला याच्या छोट्या छोट्या युक्त्या मित्रांकडून शिकून घेतल्या तर भिती नाही वाटणार. मात्र शिकून झाल्यावर आपणही इतरांना शिकवण्याची मनोवृत्ती ठेवलीच पाहिजे.
--------------
हे पुस्तक वाचतांना मूळ संकल्पना तेवढी सोपेपणाने कळावी हा उद्देश आहे. पण थोडे खोलांत शिरून पहायला कांय हरकत आहे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी रेघेच्या खाली त्याच विषयाला धरून कांही माहिती दिली आहे. ती न वाचतांच पुढे गेले तरी चालेल अशा पद्धतीने मूळ विषयाची मांडणी केली आहे.
---------------------------------------------------------------------------------
भाग- 4 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल
अर्थात स्क्रीन, की-बोर्ड व माउस ची माहिती
या भागांतील शब्दावली -- सीपीयू = कारभारी डबा; स्क्रीन = पडदा; की-बोर्ड = कळपाटी, कळफलक; माउस = उंदीर; आयकॉन = खूणचित्र;
क्लिक = टिचकी

पाटी-पेन्सिल कुणाला माहित नाही? पाटी-पेन्सिलचा मोठा गुण म्हणजे कांहीही लिहा- कितीही चुका करा- पुसून टाका- पुन्हा लिहा- चुकल अस वाटत असेल तर पुन्हा पुसा आणि लिहा. जे काम झाल ते पुसून टाकल की नवीन गोष्टी लिहायला किंवा नवीन गणित करायला आपली पाटी पुन: तयार.
ज्यांना अस वाटत, की आपल्याला संगणक यावा, पण त्याचसोबत आपल्याला संगणक येईल का अशी भितीपण वाटते, त्यांच्यासाठी लक्षांत ठेवण्याची पहिली गोष्ट ही की संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल.
संगणक एखाद्या को-या पाटीसारखाच असतो, शिवाय या पाटीची लांबी आणि रुंदी कितीही वाढवून चालते, त्यामुळे मोठे मोठे लेख, मोठाली चित्र, मोठाली गणित अस या पाटीवर लिहीता येत. लिहीलेल सगळ वाचून काढल्यावर अधे मधे झालेल्या चुका तेवढा भाग पुसून दुरुस्त करता येतात. एखादा परिच्छेद संपूर्ण पुसून पुन्हा नव्याने लिहीता येतो.
पाटी-पेन्सिलने लिहीण्यासाठी तीन गोष्टी लागतात. पाटी, पेन्सिल आणि आपला मेंदू. संगणकाच्या पाटी-पेन्सिलवर लिहीण्यासाठी आपल्या मेंदूच्या सोबत संगणकाचा मेंदू पण वापरावा लागतो. तो मेंदू इतर यंत्रांसोबत एका मोठ्या चौकोनी डब्यात बंद केलेला असतो.( धूळ इत्यादी पासून सुरक्षेसाठी.) आपण याला कारभारी डबा म्हणू या. कारण संगणकाची नव्वद टक्के काम या डब्यातील मेंदू व यंत्रांमुळेच होतात.
(सीपीयूचे चित्र)
आपण नवा संगणक आणला की समोर या चार गोष्टीच दिसतात – कारभारी डबा (सीपीयू), पडदा (स्क्रीन), की-बोर्ड व उंदीर (माऊस).
संगणकाचा पडदा (स्क्रीन) ही पाटी, की-बोर्ड व उंदीर (माऊस) या त्याच्या दोन त-हेच्या पेन्सिली आणि संगणक नावाचा जो चौकोनी डबा आपण बघतो तो कारभारी – (सीपीयू), यांचा एकत्र वापर म्हणजेच या गोष्टी हाताळण्याची युक्ती शिकून घ्यावी लागेल. कारभारी आणि पडदा हे विजेवर चालतात. म्हणून त्यांना सुरु करायला आधी वीजेचे बटण चालू करायचे.
कारभारी आणि पडदा हे एका वेगळ्या जाड तारेने आपसात पण जोडलेले असतात. कारभारीचा मेंदू चालू करण्यासाठी त्यावर मेंदू चालू करण्याचे एक वेगळे बटण असते ते पण चालू करावे लागते. मग अंदाजे एक मिनिटात संगणक आपली आतली सर्व यंत्रणा सज्ज करतो आणि तुमच्या पुढल्या सूचनेची वाट पहात बसतो.
(कळपाटी - की बोर्डचे चित्र)
कारभारी यंत्रालाच एका वायरने उंदीर आणि दुस-या वायरने की-बोर्ड जोडलेला असतो. संगणकाला देण्याच्या सर्व सूचना या दोघांच्या सहाय्याने दिल्या जातात. आपण टेबलावर उंदीर सरकावला की पडद्यावर एक बाण त्याप्रमाणे डावी-उजवीकडे किंवा वर-खाली हलतो. ज्या जागी आपल्याला कांही काम करायच आहे, तिथे बाण आणून ठेवायचा आणि संगणकाला सूचना देण्यास सुरुवात करायची.
(माउस व मॉनीटरचे चित्र)
संगणकाला आपण काय सूचना दिल्या, त्याला काय समजल्या आणि त्यावर संगणकाने काय केले हे आपल्याला कसे समजावे? याचसाठी संगणकाचा स्क्रीन किंवा पडदा असतो. मी याला पाटी म्हणते कारण आपण पाटीवर लिहीतो, पुसतो, पुन्हा लिहीतो, चुकलेल गणित पुन्हा करतो, तसचं आपल्याला संगणकावर करता येत आणि ते या पाटीवर किंवा स्क्रीनवर पहाता येत. चुकल असं वाटल तर पुसून दुरुस्त करता येतं.
मात्र पडदा सुरु केल्यावर आपल्याला कोरी पाटी न दिसता त्यावर ब-याच आकृत्या व त्याखाली कांही तरी थोडेसे लिहीलेले दिसते. कारण पडदा हा फक्त पाटी नसून त्यावर कामांची यादी पण असते. प्रत्येक आकृती म्हणजे एका नवीन कामाची सुरुवात. या आकृतीना इंग्लीशमध्ये आयकॉन म्हणतात. आपण त्यांना खूणचित्र म्हणू या. जे काम करायचे असेल त्या आकृतीवर बाण आणून ठेवायचा आणी कामाला सुरुवात करायची.
हे शिकायला, म्हणजे उंदीर हलवून हवे त्या ठिकाणी बाण कसा आणावा हे शिकायला एखादा दिवस लागू शकतो. खूपदा बाण पडद्याबाहेर पळून जातो आणि आपण म्हणतो मरु दे ते संगणकाच शिक्षण. पण एकदा हात बसला की गंमत येते. आपण म्हणतो आता अजून या उंदीराबद्दल काय काय शिकायचे आहे? चला सांगून टाका.
उंदीराच्या पाठीवर एक चक्री आणि तिच्या डावी-उजवीकडे दोन बटणं असतात. हव्या त्या आकृतीवर बाण नेऊन डावे बटण दाबले की त्या कामाला सुरुवात होते. याला लेफ्ट क्लिक असे म्हणतात. लेफ्ट क्लिकने ते ते काम किंवा ती ती फाईल उघडते आणी आपण त्यांच्या आत पोचून फाईल मधील काम करु शकतो. जसे की एखादा लेख लिहायला सुरुवात केलेली असेल तर ती फाईल उघडून लेखाचा पुढचा भाग लिहीणे.
या उलट आपण जर उजवे बटण दाबले, म्हणजे राईट क्लिक केले तर आपण त्या फाईल संबंधाने कांही काम करु शकतो. उदा. फाईलची प्रत काढणे, मित्रांना पाठवणे, फाईलला कांही तरी नांव देणे किंवा नांव बदलणे इत्यादी. आणि चक्रीचे कांय काम ? आपण एखादी फाईल उघडलेली असेल तेंव्हा
दोन्ही बटनांच्या मधील चक्री फिरवल्याने त्या फाईलची पाने भराभर मागे-पुढे सरकतात.
लेफ्ट क्लिकचा वापर खूप जास्त असल्याने त्याला लेफ्ट क्लिक ऐवजी नुसतं सुटसुटीत क्लिक असच म्हणतात. तसच बहुतेक सर्व संगणकांची सेटिंग अशी करतात ज्यामधे उंदीराचे डावे बटण एकदाच दाबले तर फक्त त्या फाइलची माहिती झरकन समोर येते, प्रत्यक्ष फाइल उघडायला ते बटण घाईघाईने दोनदा क्लिक करावे लागते. म्हणून त्याला डबल क्लिक म्हणतात.
पडद्याला स्क्रीन म्हणतात तसेच डेस्क-टॉप देखील म्हणतात. पण पडद्यावर दिसणा-या कामांची किंवा खूणचित्रांची यादी या अर्थानेही डेस्कटॉप शब्द वापरतात. हा शब्द तरी कुठून आला असेल? आपल्या कार्यालयातील कामाचे टेबल आठवा. त्यावर कांही कामांच्या फाइली असतात आणी इतर कांही सोईच्या वस्तू उदा. फोन, कॉलबेल, पेनं इ. असतात. तोच प्रकार संगणकाच्या डेस्कटॉपचा. त्यावरील कांही खूणचित्रे आपण तिथे ठेवलेल्या फाइलींची आणि कांही खूणचित्रे इतर सोईच्या कामांसाठी लागणा-या प्रोग्राम्सची असतात. त्यातील एखाद्या कामावर किंवा फाइलवर क्लिक केल्यावर त्या कामासाठी एक पाटी उघडते आणी अशा त-हेने कामाला सुरुवात होते.
---------------------------
साधारणपणे जिथे क्लिक हा शब्द असेल त्याचा अर्थ लेफ्ट व डबल क्लिक. राइट क्लिक असा अर्थ असेल तिथे तसा स्पष्ट उल्लेख करतात. तसेच आपल्याला डबल क्लिकची कटकट वाटली तर आपण संगणकाच सेटिंग बदलून एकाच क्लिकने फाईल उघडेल असं करू शकतो.
------------------------------------------------------------------------------------------------------
भाग- 5 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे खेळगडी
संगणकाचा सराव करण्याचा सगळयांत सोपा उपाय म्हणजे संगणकावर खेळण किंवा संगणकाबरोबर खेळण.
यासाठी तीन गोष्टी याव्या लागतील –
संगणक सुरु आणि बंद करणे,
संगणकावर खेळ कुठे आहे ते शोधून खेळ सुरु करणे, आणि
संगणकावर खेळण्यासाठी उंदीर किंवा माऊस वापरता येणे. जॉय स्टिक नांवाची अजून एक पध्दत असते. खूपसे खेळ जॉय स्टिक ने जास्त छान खेळता येतात.
(शिवाय खेळ पण खेळता यायला पाहिजेच.)
आपणाला हवा ते खेळ संगणकावर कुठे आहे ते शोधत बसण्याऐवजी डेस्क टॉपवर आणून ठेवणे हा सोपा उपाय आहे. तस एकदा केलं की नंतर कधीही संगणक उघडल्यावर आपण त्या खेळाच्या आकृतीवर बाण नेऊन लेफ्ट क्लिक केले की खेळ उघडतो आणि आपण खेळायला सुरुवात करु शकतो.
बुध्दिबळ खेळायला दोन गडी लागतात. तरी आपण एकटे संगणकावर बुध्दीबळ खेळू शकतो. कारण दुस-या भिडू ऐवजी संगणकच आपल्याशी खेळतो. आपण अगदी नवखे असलो तर संगणकाला आधीच सांगून टाकायचे की तू पण पहिल्या पातळीवरचा भिडू आहेस अस समजून खेळ. हळूहळू आपण वरच्या पातळीवर जायला सांगितले की, संगणक अधिकाधिक पक्क्या भिडू प्रमाणे खेळू लागतो.
असे कित्येक खेळ संगणकावर असतात. पत्त्यांचे खेळ, कार-रेसिंग, लढाया, गुप्त हेरगिरी असे कित्येक खेळ खेळता येतात. संगणकावर खेळण्यासाठी नवीन खेळ बनवणे हे एखादा नवा सिनेमा बनविण्यापेक्षाही जास्त जिद्दीचे काम असते.
सध्या संगणकावर अति लोकप्रिय झालेला खेळ आहे स्टार क्राफ्ट. हा तासनं तास चालतो. कोरियामध्ये याच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटस् होतात आणि जसे दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवतात, तसेच आता स्टारक्राफ्ट चे सामने पण दाखवतात. यावर कळस म्हणून की काय, बर्कले युनिर्व्हसिटी ने घरी बसून शिकण्यासाठी ज्या ब-याच शैक्षणिक सीडी काढल्या आहेत, त्यामध्ये स्टारक्राफ्ट शिकण्यासाठी पण सीडी आहेत- होमवर्क दिलेले आहे, वगैरे.
असा हा खेळकर खेळगडी संगणक.
-------------------------------------------------------------
भाग -- 6
tallied from book 22/07/2011
संगणक म्हणजे पोस्टमन
या भागांतील शब्दावली -
की-बोर्ड = कळपाटी, मेलबॉक्स = टपालपेटी, मोडेम =?, इंटरनेट = महाजाल, इंट्रानेट = अंतर्जाल, ब्राउझर =?, वेबसाइट= संकेतस्थळ, पासवर्ड = गुप्तशब्द (? आहे तिथे वाचकांनी शब्द सुचवावेत)

आता आपण संगणकाचा दुसरा उपयोग बघू या. संगणकाचा उपयोग पोस्टमन सारखा करतात.
खरतर संगणक म्हणजे टपालखातच म्हटल पाहिजे. कारण टपालाशी संबंधित सगळी कामं संगणक करतो. पोस्टाची पेटी तोच, पोस्टमास्तर तोच, पत्र घेऊन जाणारं विमानही तोच आणि घरपोच आणून देणारा पोस्टमन देखील तोच.

ही सगळी कामं संगणक कशी करतो? तर टेलिफोन खात्याच्या मदतीने हे एक उत्तर. आपण टेलिफोन खात्याकडे पैसे भरुन टेलिफोन घेतो तसेच अजून पैसे भरुन मोडेम नावांचे यंत्र घ्यायचे. त्या यंत्राची एक तार टेलिफोनच्या सॉकेटमध्ये तर दुसरी संगणकाच्या कारभारी डब्याच्या प्लगला जोडतात. आपले पत्र किंवा संदेश संगणकातून मोडेमला, तिथून टेलिफोन खात्याच्या इंटरनेट ट्रान्समिशन साठी केलेल्या खास एक्सचेंजला, तिथून सिस्टमच्या तारांमधून दूर देशीच्या टेलिफोन मधील रिसीव्हिंग एक्सचेंज पर्यंत आणि तिथून पुन्हा मोडेम मार्फत तिकडल्या संगणकाला मिळतात. या खास सिस्टम मुळे आपली ईमेल शेजारचा गावी, शेजारचा देशी, किंवा जगाचा दुस-या टोकाला पाठवायचा खर्च सारखाच, तसाच लागणारा वेळही सारखाच. या उलट फोन करू तेंव्हा वेगवेगळ्या देशांत फोन पोचवायचे दर वेगवेगळे असतात, व टपाल पोचायला लागणारा वेळ पण कमी-जास्त असतो.

म्हणजे आपल्या घरातील संगणकाने पोस्टमन होऊन जगभर आपली ई-पत्रं पोचवावीत अस वाटत असेल तर आधी मोडेम व इंटरनेट सुविधा घ्यावी लागेल. (मोडेमही कित्येक प्रकारचे असतात, पण सध्यासाठी आपण टेलिफोन खात्याने दिलेला मोडेम किंवा ब्रॉडबँण्ड वापरूया). या मोडेम खेरीज अजून दोन सोई लागतात. संगणका सोबतच ब्राउझर सॉफ्टवेअर मिळतात, त्यापैकी इंटरनेट-एक्सप्लोअरर व मोझिला-फायरफॉक्स हे दोन जास्त प्रचलित आहेत. मात्र प्रत्यक्ष संदेशवाहनाचे काम करण्यासाठी त्याहून वेगळ्या कंपन्या आहेत. सध्या गूगल, याहू, रेडिफमेल, अशा कित्येक संदेशवाहक कंपन्या आहेत, त्या ईमेल व इतर कित्येक वेब-आधारित सुविधा पुरवतात. टेलिफोन खाते (BSNL) मोडेम मार्फत इंटरनेट सुविधा पुरवते. पण मोबाइल सर्व्हिस मार्फतही इंटरनेट सुविधा उपलब्ध करता येते, जे टाटा इंडिकॉम, रिलायन्स, एअरटेल इत्यादी करतात.

डेस्कटॉपवरचे मोझिला किंवा इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडले की आपोआप यापैकी एखाद्या संदेशवाहक कंपनीची वेबसाइट (मराठीत – संकेतस्थळ) म्हणजे जणू त्यांचे हेड ऑफीसच उघडले जाते. ते बदलून आपण हव्या त्या दुस-या कंपनीची वेबसाइट पण उघडू शकतो. आपले पत्र ज्या कंपनीमार्फत पाठवायचे असेल ते संकेतस्थळ उघडायचे (जसे याहू किंवा गूगल).

त्यानंतर पहिले काम म्हणजे आपण आपल्या स्वतःसाठी एक ईमेल पत्ता रजिस्ट्रेशन करुन घ्यायचा. समजा मला याहू कंपनीतर्फे लीनामेह (leenameh) या नावाने ईमेल पत्ता रजिस्टर करायचा आहे, तर याहूचे संकेतस्थळ उघडून त्यामध्ये साइन अप (sign up) या शब्दावर क्लिक केले की रजिस्ट्रेशनचा एक नमुना फॉर्म समोर येतो. त्यातील प्रश्नांची उत्तरे द्यायची. ईमेल-आयडी काय हवी याचे उत्तर leenameh (लीनामेह) असे इंग्लिश अक्षरांत लिहायचे. पुढला प्रश्न पासवर्ड (गुप्तशब्द) चा असतो. त्यावर समजा मी jayhind (जयहिन्द- हे ही इंग्लिशमधेच) लिहीले. रजिस्ट्रेशन चा फॉर्म भरुन पूर्ण केला की सबमिट बटणावर क्लिक करायचे की आपला अर्ज, ईमेल नांव-पत्ता इत्यादी त्या कंपनीकडे रजिस्टर होतो. असे रजिस्ट्रेशन सुरुवातीला एकदाच करावे लागते. शिवाय त्यासाठी आपले खरे नांव न देता एखादे वेगळे – हवे तर फॅन्सी नांव देउन चालते.

आपण कितीही कंपन्यांकडे कितीही वेगवेगळ्या नांव-पत्त्याने रजिस्टर करु शकतो. मात्र एका कंपनीकडे एका नांवाने एकच नोंदणी करता येते. ते नांव आधीच दुस-या कोणी घेतले असेल तर आपल्याला मिळणार नाही. खूपदा एका घरातील सर्व माणसं एकच अकाउंट वापरतात म्हणजे तो अकाउंट उघडून त्यावर आलेला पत्रव्यवहार घरातील सर्वजण वाचू शकतात. असे एकमेकांना एकमेकांचे कार्यक्रम सारखे कळत रहातात. जसा आपल्या घराचा कायम पत्ता असतो आणि त्याचा उपयोग रेशनकार्ड, पासपोर्ट इत्यादीसाठी होतो, तसेच या ई-मेल पत्त्याचे पण कायम स्वरूपी इतर कांही उपयोग असतात.

वरील उदाहरणात माझा ई-मेल पत्ता leenameh@yahoo.com असा झाला. यामधील ऍट दि रेट या शब्दासाठी वापरले जाणारे अक्षर @ (वर्तुळाच्या आतील a) -- इतके रुढ झाले आहे की, कळपाटीवर (की-बोर्डवर) वरच्या रांगेत याची कुंजी (की) असतेच. माझा पासवर्ड झाला jayhind. आता जगभर मी कधीही कुठेही गेले तरी कोणताही संगणक उघडून त्यावर इंटरनेट-एक्सप्लोअरर अगर मोझिला मार्फत, याहूचे साइन-इन (sign-in) चे पान उघडू शकते. त्या पानावर दोन खिडक्या लुकलुकत असतात. त्यावर पहिली खिडकी माझा ईमेल पत्ता (आय् डी) लिहिण्यासाठी व दुसरी पासवर्डसाठी असते. पहिलीवर जाऊन मी leenameh लिहायचे आणि दुसरीवर जाऊन jayhind लिहायचे की माझी खाजगी मेल बॉक्स उघडणार. आपण हा पासवर्ड लिहितो तेंव्हा संगणकात फक्त टिंबटिंब दिसते. हेतू हा कि शेजारी कुणी बसले असतील तरी त्यांना आपला ईमेंलचा पासवर्ड कळू नये.
(याहूच्या साइन पानाचे चित्र)
पत्र व्यवहार संपला की त्या पानावर कुठेतरी साइन आउट - sign-out असते तिथे क्लिक केले की मेल बॉक्स बंद होणार. आपण इतरांच्या संगणकावरून ईमेल पहात असू तेंव्हा आठवणीने साइन आउट करावे.
मेल बॉक्स मधून एखादे पत्र पाठवायचे असेल तर “कंपोज मेल” या बटणावर क्लिक करायचे की आपल्यासमोर पोस्टकार्डवजा एक पान उघडते. त्यावर पत्ता आणि पत्र लिहायच्या दोन वेगवेगळ्या जागा असतात. मला स्वत:लाच पत्र पाठवायचे असेल तर पत्त्याच्या जागी मी leenameh@yahoo.com असे लिहायचे. पत्र लिहिण्यासाठी दिलेल्या जागेवर पत्र लिहायचे. हे सर्व झाल्यावर सेंड बटणाने पत्र रवाना करायचे.

अशाप्रकारे संगणकावर पत्र पाठवण्याचे काम शिकून घेण्यासाठी फार वेळ लागत नाही. ही पानं वाचायला जेवढा वेळ लागला तेवढ्या वेळांतच या गोष्टी शिकून होतात. दुसरे कोणी मला ई-मेल पाठवू इच्छित असतील तर ते पण leenameh@yahoo.com या पत्त्यावर मला ई-मेल पाठवू शकतात. ती माझ्या टपालपेटी (मेल बॉक्स) मधे येऊन थांबेल. मात्र माझा पासवर्ड माहित असल्याशिवाय कुणीही माझी टपालपेटी उघडू शकत नाही.

अशा प्रकारे आपण जगांत कुणालाही पाठवलेले पत्र त्यांना क्षणार्धात मिळू शकते. पण कधीतरी इंटरनेट वर देखील ट्रॅफिक जाम होतो. मग मात्र ई-मेल मिळायला चार-पांच तासही लागू शकतात.

ईमेलचे तंत्र शिकायला अंधा-या खोलीतील भूत घालवणारा मित्राचा हात फारच उपयोगी ठरतो. मग तर नवीन अकाउंट उघडणे, ज्यांचे अकाउंट आहेत अशा मित्रांना ई-पत्र पाठवणे इत्यादी कामें पाचच मिनिटांत शिकता येतात.

इंटरनेटवर टपालपेटी (मेलबॉक्स) उघडल्यावर पलीकडील व्यक्ती ऑन-लाइन असेल तर आपण चॅटची सोय वापरून लेखी संदेशांची देवाण-घेवाण तिथल्यातिथे करू शकतो किंवा तिथूनच फोन करू शकतो. यासाठी याहू चॅट, गूगल चॅट, स्पाईक, सारखी चांगली सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत.
-----------------------------------------
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या युक्ती --
समजा आपण इंटरनेट-एक्सप्लोअरर उघडून याहूमेलवर पोचलो. तिथे साइन-इनच्या पानावर आपले नांव (आय्.डी.) व पासवर्ड सांगून लॉग-इन झाले की आपला मेलबॉक्स उघडतो. त्यांत नवीन आलेल्या ईमेल्सची यादी दिसते. त्यांतील एखादी
ईमेल उघडली की आपल्याला असे पान दिसते---
(book has different and better pictures)






त्यांतील Reply, Forward, व delete या सोई नेहमी लागणा-या.
-- फॉरवर्ड असे सांगून आपण आलेली ईमेल जशीच्या तशी, पुन्हा टाइप न करता इतरांना पाठवू शकतो.
-- ज्यांना वारंवार ईमेल पाठवावी लागते त्यांचे पत्ते contacts या यादीत ठेवले की पुढच्या वेळी संगणक स्वतःच तो पत्ता दाखवतो.
-- एकाच ईमेलवर खूप जणांचे पत्ते लिहिले की एकदाच पाठव (सेंड) सांगितल्यावर संगणक सर्वांना ती ईमेल पाठवतो.
-- कुणी खूप जणांना ईमेल लिहिली, त्यांत आपले नांवही असेल आणि आपल्याला वाटलं की आपले उत्तर पण त्या सर्वांना कळावे तर उत्तर पाठवतांना आपणही reply all सांगायचे. तसे नको असेल तर फक्त reply सांगायचे.
-- एखादी ईमेल पाठवावी की नाही असं असेल तर save draft म्हणून वेगळी ठेऊन द्यायची.
-- आलेल्या ईमेल खूप काळ जपून ठेवता येतात, मग त्यांचा गोंधळ वाढू नये यासाठी folder ही सोय आहे. मेल बॉक्स मधेच आपण folder तयार करायचे आणि move सांगून वेगवेगळ्या मेल्स संबंधित folder मधे टाकून ठेवायच्या.
-- महत्वाच्या ईमेल्सना फ्लॅग किंवा मार्क असे सांगून वेगळे दाखवता येते. किंवा सरळ त्यांना पुन्हा unread चा शिक्का मारायचा की कधीही मेलबॉक्स उघडली की आपले लक्ष जातेच.
ईमेल प्रभावीपणे वापरण्याच्या या युक्ती आहेत.

कधी कधी आपण ब्राउझर उघडल्यावर आपल्याला ABOUT BLANK या नांवाचे कोरे पानच समोर येते. अशा वेळी त्या address bar वर याहू किंवा गूगल लिहिले की त्यांचे पान उघडते व आपण ईमेल पाठवू शकतो.
Lotus notes अथवा outlook express सारख्या कांही सुविधा वापरून आपल्या सर्व ईमेल्स डेस्कटॉपवर ठेऊन त्यांचे व्यवस्थापन करता येते. या सुविधेला मेसेजिंग सोल्यूशन म्हणतात. आता जास्त वेगवान ब्रॉडबॅण्ड मोडेममुळे घरच्या किंवा वैयक्तिक संगणकावर याची गरज उरलेली नाही. मोठ्या कार्यालयांना याचा उपयोग होतो.
-------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -- 7 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे टाइप रायटर
शिका सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन
या भागांतील शब्दावली --
KEY = कुंजी, टाइपरायटर = टंकयंत्र, टायपिंग = टंकन,
फॉण्ट = वर्णाकृती, फॉण्ट सेट = वर्णाकृतीसंच,
Keyboard = कळपाटी, कळफलक, की-ले-आउट = अक्षर अनुक्रम
इंट्रानेट = अन्तर्जाल, इंटरनेट = महाजाल, फाईल = धारिका

संगणकाचा सर्वांत जास्त उपयोग टाइपरायटर (टंकयंत्र) सारखा केला जातो. पण संगणकावरील टायपिंग म्हणजे टंकयंत्रापेक्षा दहा पट सोपे आणि शंभर पट उठावदार.

टाइपरायटरचा अविष्कार व उपयोग 1873 पासून सुरु झाला तो थेट १९८०-१९९० पर्यंत. या यंत्रामध्ये एक की-बोर्ड होता. एक खीळ (Key) दाबली की एक काडी उचलली जायची आणी पुढे अडकवून ठेवलेल्या कागदावर आपटायची. काडीवर ते ते अक्षर उलटे कोरलेले असायचे. कागद आणि काडीच्या मध्ये एक शाईने भरलेली रिबीन असायची. काडी कागदावर आपटली की शाईमुळे कागदावर ते ते अक्षर उमटायचे. त्याचवेळी शाईची रिबिन आणि कागद थोडे पुढे सरकायचे, म्हणजे दुसरं अक्षर लिहून घेण्यासाठी दोन्ही तयार. इंग्लीश की-बोर्डावर तीन ओळीत A ते Z अक्षरं, चौथ्या ओळीत आकडे, इतर कांही खुणा (उदा.+, =) वगैरे असत. मात्र A ते Z ही अक्षरे अनुक्रमाने नसत. कोणते अक्षर जास्त वापरावे लागते, त्यासाठी कोणते बोट योग्य, कोणती अक्षरे एकापाठोपाठ वापरावी लागतात, त्यांच्या काड्या गुंतू नयेत, वगैरे बराच काथ्याकूट आणि विचार करुन, दाही बोटांचा वापर करुन टायपिंग सोईचे होईल अशा पध्दतीने की-बोर्ड वरील ले-आउट म्हमजे अक्षरांचा अनुक्रम ठरवला होता. सर्वांत जास्त वापरला जाणारा की-बोर्ड अनुक्रम म्हणजे क्वेर्टी - qwerty (ज्यात वरच्या ओळीतील डावीकडची पहिली सहा अक्षरे ही अनुक्रमे q,w,e,r,t,y आहेत असा) पण इतरही कांही अनुक्रम होते.

भारतात इंग्लीश टंकयंत्रांमधे जवळ जवळ शंभर ट्क्के qwerty अनुक्रमच वापरात होता. संगणकाच्या की-बोर्डवर देखील हाच अनुक्रम ठेवल्यामुळे भारतात विकल्या जाणा-या संगणकावर इंग्लिश टायपिंगसाठी qwerty हाच अनुक्रम दिसतो. त्यामुळे ज्यांना टायपिंग येत होते, त्यांची खूप खूप सोय झाली. थोडक्यात ऑफीसमध्ये काम करणा-या तमाम टंकलेखकांची. संगणक संस्कृती वाढली तसे बॉस देखील कामचलाऊ इंग्लिश टायपिंग शिकून घेऊ लागले.

जुन्याकाळी टंकलेखन तसेच छपाईसाठी वेगवेगळ्या वळणांच्या अक्षरांचे सेट तयार करण्यांत आले. त्यांना फॉण्ट म्हणतात. मराठीत आपण वर्णाकृती म्हणू शकतो. त्या त्या वळणांना विशिष्ट नांव देण्यांत आले. उदा. इंग्लिशमधील एरियल, टाईम्स न्यू रोमन, कूरियर हे फॉण्ट सगळ्या टंकलेखकांच्या परिचयाचे आहेत.

टाइपरायटर वर टंकलेखन करतांना आपल्याला फॉण्ट बदलता येत नसे. हवेच तर वेगळ्या वळणाचा दुसरा टाइपरायटर विकत घ्यावा लागे.

पण संगणक आल्यावर त्या काड्या, शाईची रिबिन हा सर्व प्रकार संपला. एका विशिष्ट बटणावर जाऊन संगणकाला फॉण्टचे नांव सांगितले की तो त्या फॉण्टमध्ये लिहायला सुरुवात करतो. आपण मध्येच कांही परिच्छेद निराळ्या फॉण्ट मधे लिहू शकतो, कांही अक्षरांचा आकार लहान-मोठा, जास्त गडद किंवा रंगीतही करू शकतो. किंवा त्यांना रंगीत बॅकग्राउंड देऊ शकतो. हे झालं इंग्रजीच्या टायपिंग बद्दल.

मराठीत सुध्दा टंकयंत्राच्या की-बोर्डवरील अक्षरे वर्णक्रमानुसार मुळीच नव्हती. पण जो कांही अक्षर-अनुक्रम होता तो सगळ्या टंकलेखकांना ओळखीचा होता. म्हणून संगणकावर मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर बनविणा-यांनी तोच अक्षर-अनुक्रम संगणकासाठी पण कायम ठेवला जेणेकरुन पूर्वीपासून टंकयंत्रावर टाइप करत होते त्यांची सोय झाली. या अक्षर अनुक्रमाला मराठी टाइपरायटर किंवा गोदरेज अनुक्रम असे म्हणता येईल कारण मराठीसाठी बहुतांशी गोदरेज टंकयंत्र वापरांत होते. शिवाय संगणकावरील लेखन उठावदार दिसण्यासाठी मराठीत सुध्दा निरनिराळ्या वळणांचे खूपसे फॉण्ट सेट (म्हणजे वर्णाकृतीसंच) उपलब्ध झाले.

पण त्यांनी आणखीन एक गंमत केली. त्यांनी की-बोर्डासाठी इन्स्क्रिप्ट नावांचा एक आणि फोनेटिक नांवाचा एक असे दोन ज्यादा अक्षर-अनुक्रम तयार केले. एका विशिष्ट बटणावर जाउन संगणकाला सांगता येते की तुम्हांला कुठला अनुक्रम वापरायचा आहे.

इनस्क्रिप्ट अनुक्रम फारच छान आहे. त्यांत चार गंमती केल्या. पहिली गंमत आपण मुळाक्षरे शिकतो - क,ख,ग.......क्ष,ज्ञ. तोच अनुक्रम कायम ठेवला. त्यामुळे की-बोर्डावरचा अनुक्रम लक्षांत ठेवायची कटकट संपली. नाहीतर पूर्वी टंकयंत्रावरचा अनुक्रम डोक्यांत पक्का बसावा म्हणून सहा-आठ महिने टायपिंग क्लास लावून प्रॅक्टीस करावी लागत असे, परीक्षा द्यावी लागत असे. आता संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग शिकायला पाच मिनिटे पुरेशी आहेत. कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी न शिकावे लागता संगणकावर मराठी टंकन शिकून घेण्याची हमखास पद्धत म्हणजे इन्स्क्रिप्ट.
दुसरी गंमत म्हणजे हा अनुक्रम असा बसवला आहे की सगळे स्वर, कान्हा, मात्रा हे सर्व डावीकडे आहेत - ती डाव्या बोटानी व सगळी व्यंजने उजव्या बाजूला आहेत - ती उजव्या बोटांनी टाईप करायची. मराठी भाषेतल्या आपल्या सगळ्या शब्दात व्यंजन आणि स्वर गळ्यांत गळा घालून असतात. या इनस्क्रिप्ट की-बोर्डवर टाईप करतांना आपण सुध्दा उजव बोट, डावं बोट अस टाईप करतो - त्यामुळे आपोआप एक प्रकारची लय निर्माण होते आणि टायपिंग सोप्प होऊन जातं.

इनस्क्रिप्टची तिसरी गंमत अशी की सर्व भारतीय भाषांची लिपी वेगळी असली तरी वर्णमाला सारखी आहे. म्हणून सगळ्या भाषांसाठी सारखाच अनुक्रम ठेवला आहे. आपण मराठीत कांहीही लिहायची प्रॅक्टीस करायची आणि कुणावरही इम्प्रेशन मारायच- बघ हं, मी आता बंगालीत टाइप करुन दाखवीन (किंवा कन्नड, तामिळ, गुजराथी -- कांहीही). शिवाय एकदा मराठीत टाईप करुन झाले असले तरी एक बटण दाबून संगणकाला सांगता येते- बाबा रे, हे लिहिलेलं सर्व कानडी लिपीत बदलून दे- की संगणक ते पण करुन टाकतो. ज्यांना देशप्रेम, भारतीय एकात्मता टिकवण्याची ऊर्मी वगैरे आहे त्यांनी ही इन्स्क्रिप्ट नामक युक्ती नक्की समजून घेऊन तिचा आग्रह धरावा.

संगणक नव्हते - टंकयंत्र होती तेंव्हा प्रत्येक भाषेसाठी की-बोर्डाचा अक्षर-अनुक्रम वेगळा होता. त्यामुळे मराठी येईल त्याला पंजाबीत टाइप करता येत नसे. पुन्हा वेगळे शिकावे लागे. संगणकावर इनस्क्रिप्ट अनुक्रम वापरला तर ही समस्या खलास.
या चार सोईंमुळे इन्स्क्रिप्ट अनुक्रम भारतीय भाषांसाठी इतका चपखल ठरतो की "संगणकाचे सर्व सॉफ्टवेअर्स जगभर फुकट वाटा, आणि सर्वांना शिकू द्या" असे तत्वज्ञान असलेल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मधे व तसे तत्वज्ञान नसलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टममधेही हा अनुक्रम वापरला आहे.यामुळे जगभरांत मराठीतून संदेशवहन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो.

फोनेटिक हा अनुक्रम रोमन अक्षरे वापरून मराठी लिहिणा-यांसाठी आहे.

पण एक गोष्ट महत्वाची. संगणक उघडल्यावर आपल्याला गद्य लेखन करायच आहे की इंटरनेट वरुन पत्र पाठवायचे आहे की चित्र काढायचे आहे हे संगणकाला आपणहून कसे कळणार? तो कांही मनकवडा नसतो. आपणच सांगावे लागते. म्हणजे काय करायचे? तर त्याच्याकडील वर्ड नावाच्या प्रोग्रामवर डबल क्लिक करायचे म्हणजे तो आपल्याला पडद्यावर एक कोरा कागद देतो- मग आपण कोणती लिपी वापरणार तेही सांगायचे. मगच त्यावर आपले लेखन लिहायला सुरुवात करायची.
----------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य पानावर मागासवर्ग कक्ष (कार्यासन 16-ब) ची लिंक उघडल्यावर इन्स्क्रिप्ट पद्धतीने संगणकावर मराठी टायपिंग शिकण्यासाठी खालील मजकूर आहे --
"मराठी शिकायचे आहे तर 6 महिन्याच्या टायपिंग क्लासची गरज नाही -- केवळ 10 दिवसांत शिकण्यासाठी इथे क्लिक करा." त्यावर टिचकवल्याने खालील लिंक उघडते ज्यावर पायरी-पायरीने व सोपेपणाने इनस्क्रिप्ट पद्धतीने टंकन शिकण्याची सोय आहे. शिवाय सरावासाठी दहा धडे दिलेले आहेत
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf

ही लिंक उघडण्यांत फॉण्ट-समस्या आल्यास ही दुसरी लिंक पहा
http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
शिवाय खालील 3 मिनिटांच्या चित्रफितीवर प्रात्यक्षिक पहायला मिळते.
http://www.youtube.com/watch?gl=GB&hl=en-GB&v=0YspgTEi1xI&feature=related
-------------------------------
संगणकावर मराठी टायपिंग साठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट.
डावी-उजवी बोटे
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास चित्रफीत पहावी.]
इथे इन्स्क्रिप्ट कळपाटीचे चित्र)
दोन मिनिटांत 20 अक्षरे
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील HY या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
गरज असल्यास या लेखात दिलेले कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र पहावे.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर
AQ -- ओऔ,
SW -- एऐ,
DE -- अआ,
FR -- इई,
GT —- उऊ
अशी अक्षरे किंवा काना-मात्रा लिहिता येतात.

अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.

. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क (K) आणि
‘हूक’ लिहिण्यासाठी ह (U) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते.
‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.

हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहायचा असेल तर कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.

तुमच्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी-सहावीत जाणा-या मुलीमुलांना देखील ही युक्ती शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घ्या. पहा त्यामुळे त्यांच्यात केवढा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.

उरलेली अक्षरे
उरलेल्या 16 अक्षरांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र आणि ऋ ही अक्षरे अगदी वरच्या ओळीत आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, ळ, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला 10 मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना-मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.

जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D या अच्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते.
अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

नवे सॉफ्टवेअर न घेताच, फक्त सुरवातीचे एक सेटिंग करा
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर फारच छान. 2000 सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत.
सुरवातीचे एकदाच करावे लागणारे सेटिंग हे तुमच्या संगणक विक्रेत्याने करून द्यावे यासाठी आग्रह धरा. (पण आपणही खालील 1,2,3 पैकी करू शकतो हे विसरू नका. ते न चालल्यास 4था पर्याय मात्र विक्रेताच देऊ शकतो.)
1) *तुम्ही संगणकावर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरायचे ठरवल्यास - काही करावे लागत नाही, सरळ मराठी (देवनागरी) ऑप्शन सांगून सुरुवात करता येते.
2) *तुमची ऑपरेटिंग सिस्टम विन्डोज असेल तरीही सॉफ्टवेअरसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस असे दोन पर्याय असतात, त्यापैकी ओपन ऑफिस हा पर्याय घेतला तरी वेगळे काहीही करावे लागत नाही. शिवाय हे सॉफ्टवेअर फुकट डाउनलोड करता येते व मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रमाणेच यांत वर्ड, एक्सेल, पॉवरप्वॉइंट इत्यादी सर्व प्रोग्राम्स असतात.
3) विन्डोज ऑपरेटिंग सिस्टम व त्यामधे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा पर्याय निवडला असेल तर -
संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन "रीजनल ऍण्ड लँग्वेज सेटिंग" च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेजसाठी इंग्लिशचा पर्याय बाय डिफॉल्ट दिलेला असतो. तिथल्या डॉप-डाऊन मेनूवर टिचकवल्यास कित्येक भाषांचे पर्याय उघडतात. त्वयार मला हिन्दीचे (म्हणजेच देवनागरी किंवा मराठीचे) ऑप्शन हवे आहे असे सांगायचे. हे सेटिंग सुरूवातीला एकदाच कधीतरी करून घ्यावे लागते. ते केल्याने संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसू लागते. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार वर लेफ्ट क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी इंग्रजी ऐवजी Ma म्हणजे मराठी हा पर्याय निवडता येतो. असा पर्याय निवडायचा आणि टायपिंगला सुरूवात करायची.
4) वरील प्रमाणे देवनागरी सेटिंग सर्व संगणकांवर असेल असा समझोता IBM व मायक्रोसॉफ्टने भारत सरकार बरोबर केलेला आहे तरी पण कित्येक संगणकांवर तसे आपणहून उपलब्ध करून दिलेले नसते, आपण आग्रह धरल्यास एक ठेवणीतील सीडी आणून त्यावरून i386 ही फाईल वापरून अक्षरशः एका मिनिटांत ते करून दिले जाते.

वरील कोणत्याही उपायाने आपल्या संगणकावर मराठी एनेब्लिंग केल्यानंतर गुगलच्या जी-मेल वर किंवा याहू-मेल वर आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने टाईप करू शकतो. फक्त टास्कबार वर Ma हा पर्याय देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देउन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून विषय दिल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.

तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून महाजालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी !) धडाधड मराठी वाङ्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
----------------------------------------------------
इन्स्क्रिप्ट टेकनाच्या सरावासाठी खालील पाठ उपयोगी पडतील --
पाठ पहिला
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ त थ द ध च छ ज झ
ट ठ ड ढ प फ ब भ र ह ङ
पाठ दुसरा
क त च ट ा ी ू
काका काकी काकू
काटा कात काच चकाचक, चाकू, चाक,
टाका ताट तूट तीट ताटातूट
पाठ तिसरा
प फ ब भ र ह य ि ु
पापा पर पार
रुह याहू हीरा रिपू रिपरिप
हुरुप रुप हरहर हरि
हार राह भारत भार हरी
पपया यार बया याहू
रिता टीप कात काका चाट चाट
चीट पुकार चुकार चुका ताक टीका
ताट तुटीची काकी काकु कचरा पार
टापटीप कातकरी पाट पाटी टिका चराचर
पाठ चौथा
ख थ छ ठ फ उ इ अ ए ओ
खोत खान खानपान छान थान थाना
थाप छाप ऊस ओस ओक ठोक
फेक फी पोपट पाट पोट रोख
रोखठोक ठोक आई
पाठ पाचवा
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
अशाप्रकारे क ते ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची बाराखडी टंकलेखित करणे.
पाठ सहावा
ह ग द ज ड ब ू ी ै ौ
हापूस गादी जाड जाडी बुडबुडा कागद
गाजर हौद, औजार, ऐपत
पाठ सातवा
घ ध झ ढ भ ऊ ई आ ऐ औ
धार घार झार ऐक, खारट, खीर,
पाठ आठवा
म ण न व ल ळ स श ष य
वारा भारत भात थाप भार मासा
मामा किडा
खिरा खिसा मन नवल लहान
पाठ नववा
ळ श ष ण
माळ शाळ वलय मणका मळा वळण
लळा वाळा नळ निळा
बाळ खेळ वेळ माळ नळ
शूळ शारदा शादी शामक शूर
षटकोण षटकार षटक मेष
बाण खाण वाण सहाण रहाणे

ज्ञ त्र क्ष श्र ऋ ा ॅ र् ः
ज्ञान ज्ञात ज्ञानदेव ज्ञापन
मात्र गात्र त्राटिका त्रागा त्रास
त्रुटी क्षुब्ध क्षती क्षमा क्षत्रिय
श्री श्रीमती श्रीयुत श्रीराम श्रीकांत
बॉक्स फॉक्स पॉवर लॉन टॅक्स रॉक
ऋतु ऋचा ऋण ऋणको ऋषि
पाठ दहावा
एखादया अक्षराला ृ (रुकार) जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर ृ type करावे. उदा
कृपा कृतार्थ कृष्ण कृषी नृप
दृष्टी सृष्टी वृष्टी
एखादया अक्षराला खाली र जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर type करावे. नंतर हलन्त (शब्दाचा पाय मोडणारी कळ - english D अक्षर असलेली) दाबावी, नंतर र अक्षर दाबावे उदा
क्रम भ्रम प्रत व्रत व्रण क्रमांक
एखाद्या अक्षरावर रफार देण्यासाठी उदा. गर्व type करताना प्रथम ग, नंतर र अक्षर दाबावे नंतर हलन्त नंतर व अक्षर दाबावे
सर्व कर्म धर्म शर्थ
आर्त सार्थ अर्थ व्यर्थ अनर्थ
मराठीत क्वचित आडव्या चंद्रकोरीने र जोडतात. असा र येण्यासाठी शिफ्ट व र चे अक्षऱ एकत्र दाबावे व हलन्त (पाय मोडून) व पुढील अक्षर लिहावे
उदा. वाऱ्यावर, गुऱ्हाळ, तऱ्हा
-------------------------------------------------------------------
लेखन करताना ---
संगणकावर नवी वर्ड फाईल उघडली किंवा जुनी फाइल उघडलेली असेल तर तिचे आपण कांय कांय करु शकतो--
फाइल उघडल्यावर समोर जी पाटी दिसते त्या पाटीच्या आत जाऊन क्लिक केले की, संगणकाला कळते की, आपल्याला फाईलचे पुढले काम करायचे आहे. या पाटीच्या वरच्या बाजूला एक मेनू-बार (म्हणजे आडव्या ओळीत बरेच कामांचे शब्द) दिलेला असतो. तो समजावून घेऊ या.
Here photo of menubar in words






मेनू-बारवर डावीकडे पहिला शब्द असतो फाईल. त्यावर क्लिक केले तर एक उभा आखलेला सब-मेनू-बार उघडतो. त्यावरही खूपसे पर्याय असतात. फाईल बद्दल जे कांही करायचे असेल ते सांगण्यासाठी फाईल हा मेनू व त्याचा सब-मेनू वापरायचा.
उदा. Save- फाईलमधील बदल जपून ठेवायचे आहेत का? तर Save वर क्लिक करायचे.
Save as हा दुसरा पर्याय - म्हणजे ती फाईल जपून नेमकी कुठे ठेवायची व कोणत्या नावाने?
new - म्हणजे समोर असलेली फाईल बाजूला ठेऊन नवीन कोरी पाटी आपल्या समोर येणार.
Open- आपण आधी कुठेतरी जपून ठेवलेली फाइल असेल तेंव्हा open असे सांगितल्यानंतर- संगणक आपल्याला कित्येक पर्याय दाखवून विचारतो की, नेमकी कोणती फाइल उघडायची आहे. त्या फाईलवर जाऊन आपण क्लिक करायचे किंवा कुठेतरी open हा पर्याय असेल तिथे क्लिक करायचे- की ती फाईल उघडते.
Print म्हटल्यावर जर संगणकाला ‌प्रिंटर जोडला असेल ती file कागदावर प्रिंट होऊ लागते. हे सुरु होण्यापूर्वी अजून एक खिडकी उघडली जाऊन प्रिंटींगबद्दल आपल्याला खूप गोष्टी विचारल्या जातात. कोणत पान? किती प्रती? कागदावर मार्जिन किती हवे? रंगीत की साधे? उभे की आडवे? हळू हळू आपण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फक्त गरजेपुरतच एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकतो.
pdf -- प्रिंटींगमध्येच हा एक महत्वाचा पर्याय असतो. कागदावर प्रिंट न घेता संगणकावरच अशी वेगळी फाईल बनवायची ज्या फाईलमध्ये बदल करण्याला वाव नसतो- जणू काही कागदावर काढलेली प्रतच. अशा फाईल्सना pdf (portable document format) हे लेबल लावलेले असते व ते जगन्मान्य मानकानुसार आहे. ही फाईल आपण इतरांना पाठवू शकतो. कारण त्यांत चटकन फेरबदल करता येत नाही, विशेषतः लेखनातील रंगसंगती, अलाइनमेंट, इत्यादी. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या मूळ फाइलमध्ये चित्र असेल किंवा आपले मराठीतील फॉण्ट तुटून junk दिसतील अशी भीती असेल तेव्हा जर त्या धारिकेला pdf केले तर ती खात्रीलायक मूळ आहे त्याप्रमाणेच दिसते. यासाठी ईमेल करायच्या फाईली खूपदा pdf करुन पाठवतात.
मेनू-बारवर फाईल नंतर पुढला मेनू असतो एडिट. edit वर बाण नेला (क्लिक केले) की तिथला सब-मेनू दिसतो व तिथून आपण फाइल मधे दुरुस्त्या करण्यासाठी कांय कांय करु शकतो ते कळते.
त्यामधील select all व undo हे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण फाइल select करण्यासाठी select all हा पर्याय वापरायचा. file मध्ये आधी जे बरेचसे बदल केले असतील ते एक-एक करुन रद्द करण्यासाठी undo वापरायचा. या शिवाय cut, copy, paste, redo हे पर्याय आहेत.
copy + Paste - आपण आपल्या फाईल मधील एखाद्या भाग select करून copy करु शकतो व त्याला दुसरीकडे किंवा दुस-या एखाद्या फाईलवर paste करु शकतो.
Copy + Paste सारखेच आपण cut + paste देखील करु शकतो.
Delete केलेला भाग फाईल कधून पुसून टाकला जातो.
redo वापरून आधी बदललेला भाग पुन्हा पहिल्यासारखा करता येतो.

मेनू-बार वर त्या पुढचे शब्द view, insert, format, tool, table, windows व help असे असतात. त्यांची वेगवेगळी कामे आपण सावकाश शिकून चालते.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -- 8
संगणक म्हणजे हरकाम्या
अर्थात संगणक वापरायच्या छोट्या छोट्या युक्त्या
(पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2011)
या भागांतील शब्दावली -- रिसायकल बिन = कचरा कुंडी, हार्डवेअर = जडवस्तुप्रणाली

मागे सांगितल तस, इतर यंत्र त्यांचे एखादे ठराविकच काम करु शकतात पण संगणकाला मात्र खूप त-हेची काम करता येतात. प्रत्येक वेगळ्या कामासाठी त्याच्याकडे एक वेगळा प्रोग्राम असतो. तो प्रोग्राम उघडून आपण संगणकाकडून ते काम करुन घेऊ शकतो. म्हणून तो हरकाम्या. प्रोग्रामबरहुकूम काम करण्याची मक्तेदारी आणी जिम्मेदारी कारभारी डब्याच्या आतील प्रोसेसर चिपची असते.

या हरकाम्याला आपण नेहमी नेहमी जे काम सांगणार असू त्या त्या प्रोग्रामची खूणचित्रे डेस्कटॉप वर ठेवायची म्हणजे संगणक सुरु केल्या केल्या त्या कामांची खूणचित्रे आपल्याला समोर दिसतात. तिथे माऊस नेऊन डबल क्लिक केले की तो प्रोग्राम सुरु होतो.
संगणकातील हार्डवेयरला मराठीत जडवस्तूप्रणाली म्ङणता येईल. ही संगणकातील यंत्र, तर प्रोग्राम म्हणजे संगणकाचे तेत्र.
आपण नवा संगणक घेतला की साधारणपणे संगणकावर वारंवार करतो ती कामे अशी -----
• लेखन काम करण्यासाठी वर्ड या प्रोग्रामच्या खूणचित्रावर- डबल क्लिक
• गाण ऐकण्यासाठी मीडीया प्लेयर या प्रोग्रामच्या खूणचित्रावर
• चित्र काढण्यासाठी पेंट किंवा फोटोशॉप प्रोग्रामवर
• इंटरनेट ने पत्र पाठवणे किंवा आलेली पत्र उघडून वाचण्यासाठी फायरफॉक्स किंवा इंटरनेट एक्सप्लोअरर वर
• सारणी किंवा चार्ट तयार करण्यासाठी एक्सेल किंवा तत्सम प्रोग्रामच्या खूणचित्रावर
• काही फाइली खूप मोठ्या झाल्या तर त्यांना करकचून बांधून त्यांचा आकार छोटा करणं व कामाच्या वेळी पुन्हा उघडणं – यासाठी झिप-अनझिप या खूणचित्रावर
• माय डॉक्युमेंटस नावांच्या खूणचित्रावर डबल क्लिक केले की त्यातील सर्व फायलींची यादी आपल्यासमोर येते. आपल्या जुन्या फायली पहाण्यासाठी हे करावे.
• एक्सप्लोअर – संगणकात ही महत्वाची सोय आहे जिचा वापर पटकन शिकून घेतला पाहिजे. स्टार्टवर राइट क्लिक करून दिसणा-या यादीतील एक्सप्लोअर हे बटण क्लिक केले किंवा माय कम्प्युटर या खूणचित्रावर डबल क्लिक केले तर कम्प्युटर मध्ये कुठे कुठे कांय काय आहे ते सर्व दिसते. हार्डडिस्कचे किती कप्पे पाडले आहेत, व कोणत्या कप्प्यांत किती व कोणत्या फाइली आहेत ते एकत्र किवा एकएकटे पहाता येते तसेच फायली व फोल्डर्सचा आकार किती मोठा आहे तेही बघता येते.
• स्टार्ट नावाच्या खूणचित्राचा वापर-?
ही गंमतीची गोष्ट आहे. संगणक तर सुरु झालेलाच असतो. पण स्टार्टच्या खूणचित्रावर डबल क्लिक केले की इतर बरीच खूणचित्रे दिसतात आणि त्यातच शेवटी शट-डाऊन हे खूणचित्र असते. त्यावर डबल क्लिक केले की संगणक स्वत:ला बंद करु लागतो. जसा संगणक सुरु होण्यासाठी एकाध मिनिट वेळ द्यावा लागतो. तसेच संगणक बंद होण्यासाठी पण एकाध मिनिट लागत. तो बंद झाला की पडद्यावर संकेत मिळतो. मगच विजेची बटणं बंद करावी. आधी करु नये.
• सर्च नावांच्या खूणचित्रावर डबल क्लिक केले की एक खिडकी आपल्यासमोर येते. आपल्याला एखादी फाइल नेमकी कुठे आहे हे आठवत नसेल तेंव्हा या खिडकीत त्या फाइलचे नांव लिहिले किंवा त्यांतील काही अक्षरे लिहिली की संगणक शोधून सांगतो फाइल कुठे आहे.
• संगणकाकडे एक कचरा कुंडी - रिसायकल बिन पण असते. आपण डिलीट म्हटलेल्या सर्व फायली या रिसायकल बिन मध्ये टाकल्या जातात. त्या खूणचित्रावर डबल क्लिक करुन आपण त्या फायलींची यादी पाहू शकतो- एखादी फाईल रिस्टोअर असे सांगून संगणकावर परत आणू शकतो. रिसायकल बिन मधील फाइलला पुन्हा एकदा डिलीट सांगितले तरच ती संगणकातून पूर्णपणे नष्ट केली जाते, तोपर्यंत नाही.
• याचप्रमाणे संगणकावर व्हिडीओ बघणे, व्हिडीओ तयार करणे, व्हायरस इन्फेक्शन पासून वाचवणे, वेब पेज तयार करणे, चित्र बघणे, यासारखी कामं केली जातात.
हे सगळं काम सोपं करण्यासाठी त्या त्या प्रोग्रामची खूणचित्र डेस्कटॉप वर आणून ठेवली की नवख्या माणसाला प्रारंभिक तयारीवर फार मेहनत न घेता सरळ कामाला सुरुवात करता येते.

आपण खूपसे प्रोग्राम संगणकावर ठेवतो व नंतर ते वापरुन आपल्याला हव्या त्या फाइल्स तयार करतो, आणि संगणकांत साठवून ठेवतो. हे एका उदाहरणातून समजून घेऊ या. आपल्या जवळ लिखाणाचे खूप साहित्य असतं - पेन, पेन्सिल, रबर, कागद. ही सर्व उपकरणं आहेत- सोय उपलब्ध करुन देणारी. ही वापरुन आपण हवे तर कागदावर एखादी छान गोष्ट लिहू शकतो, आणि हवे तर केलेल्या खरेदीचा हिशोब पण लिहू शकतो. असे खूप काही लिहून झाल्यावर कुठे काय लिहिले ते कळावे म्हणून प्रत्येक लिखाणाला एक शीर्षक देतो. शिवाय ते लिखाण ज्या विषयाचे असेल त्या विषयाचे एखादे लेबल पण लिखाणाला लावतो - हेतू हा की ते पटकन वेगळे ओळखता व शोधता यावे.

संगणकांत देखील ही पध्दत वापरतात. आपण जो जो प्रोग्राम वापरुन फाइली तयार करतो त्या त्या प्रोग्रामचे लेबल त्या फायलींना दिलेल्या नावापुढे चिकटवले जाते.
- वर्ड हा कार्यक्रम वापरुन केलेल्या फाइलला .doc हे लेबल चिकटते.
- कोणत्याही zip केलेल्या file पुढे .zip हे लेबल चिकटते.
- पेंट वापरुन काढलेल्या चित्राच्या फाइलला .bmp किंवा .jpg किंवा .gif हे लेबल चिकटते. किती सूक्ष्म वर्णन जपून ठेवायचे आहे त्याबरहुकूम आपण लेबलची निवड करतो.
- फाइलमध्ये कांही बदल केला जाऊ नये या साठी pdf फाइल केली असल्यास त्याला .pdf हे लेबल चिकटते.
- एक्सेल प्रोग्राम वापरुन सारणी केली असल्यास .xls
- साधे नोटपॅड वापरुन कांही लिहिले असल्यास .txt
- पॉवर पॉईंट हा कार्यक्रम वापरुन एखादे प्रेझेंटेशन तयार केले असल्यास त्याला .ppt.
- इंटरनेटवर टाकण्यासाठी webpage तयार केले असल्यास त्याला .html
अशा प्रकारे लेबल्स चिकटवली जातात.
Explore किंवा search वापरुन सर्व फाइलींची यादी बघतांना आपल्याला पर्याय असतो. आपण संगणकाला सांगू शकतो की सर्व फाइली त्यांच्या नांवाप्रमाणे नांवातील अद्याक्षराप्रमाणे क्रम लावून दाखव. किंवा लेबल्स प्रमाणे क्रम लाव किंवा ज्या तारखेला फाइल तयार झाली त्या प्रमाणे क्रम लाव किंवा ती जपून कोणत्या कप्प्यांत ठेवली आहे त्या प्रमाणे क्रम लाव. तसेच फाईल शोधताना सांगू शकतो की फक्त अमुक लेबलच्या फायलींमधे शोध.

अशा प्रकारे फाइलींचे क्रम उलट-सुलट करुन अधून मधून एकदा सर्व फाइलींची नांवे वाचण्याची सवय चांगली असते. त्यामुळे आपण जुन्या निरुपयोगी फाइल्स काढून टाकणे इत्यादी गोष्टी करु शकतो.
मेनू-बारवर फाइलच्या सबमेनू मध्ये अगदी खाली आपण नुकत्याच हाताळलेल्या चार-सहा फाइलींची नांवे असतात. त्यामुळे त्यांच्या संबंधाने काम करायचे असेल तर त्यांना दुसरीकडे शोधावे लागत नाही.
----------------------------------------------------------
मराठी संगणक शब्दकोषासाठी मला सुचलेले व न सुचलेले शब्द
Computer - संगणक
Hardware - जड-वस्तू-प्रणाली
Software - आज्ञावली
application Software - उपयोजित आज्ञावली
Hard Copy - मुद्रित प्रत
Soft Copy -
Click - (प्रचलित) टिकटिकाएँ, टिचकी वाजवा
CPU - कारभारी डबा
digital-
analogue -
Screen - पडदा
Monitor - पाटी
Mouse -
Keyboard - कळपाटी - कळफलक
Typewrite - ची काडी - खीळ
Keyboard Layout -
File - फाइल -- धारिका
Folder - संचिका, खोका, पेटी, गठ्ठा, गाठोड, संदूक
Zip - आवळणे Zip - गठ्ठर बांधना गठ्ठर खोलला
डेस्कटॉप - लेखन-पाटी, पाटी
लॅपटॉप
इंटरनेट - (महाजाल) - अंतर्जाल
Icon - खूणचित्र
प्रोसेसर - विवेचक
हार्ड डिस्क - संग्राहक
PDF
------------------
2nd January, 2009 (Friday)
1) Mail Merge
2) Outlook Express
3) शासनात संगणक किती ?
4) शासनाचे e-governance
5) ERP ?
6) संगणकाची इलेकट्रानिक भाषा (e-data storage)
--------------------------------------------------------------------------------------------------
भाग--9 (पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2011)
संगणक म्हणजे कपाट
अर्थात संगणकावरील फाइलींचे व्यवस्थापन
या भागांतील शब्दावली -- फाइल= धारिका; फोल्डर = संचिका; हार्ड डिस्क = संग्राहक; प्रोसेसर = विवेचक.

आपल्या कपाटात बरेच कप्पे असतात आणि आपण त्यामध्ये आपल्या सोयीने वर्गवारी करुन वस्तू ठेवतो. त्यातला एखादा कप्पा आपण कुलूपबंदपण करुन ठेवतो. शिवाय कपाटात आपण कांही गाठोडी बांधून ठेवतो व प्रत्येक गाठोडयात ब-याच गोष्टी असतात. संगणकावर तेच करायचे असते.

यासाठी संगणकावरील प्रोग्राम, फाइली आणी फोल्डर या तीन गोष्टी समजावून घेऊया. प्रोग्राम हे कांही तज्ज्ञ मंडळींनी विकसित केलेले तंत्र असते व खास-खास कामांसाठी खास प्रोग्राम करतात. तसेच खूपसे स्टॅण्डर्ड प्रोग्रामही आहेत. यांचा वापर करून आपण जी कामें करतो त्यातून वेगवेगळ्या फाइली (धारिका) तयार होतात. त्यांना एकत्र ठेवायचे असेल तर संगणकांत एखादे फोल्डर (संचिका) तयार करायचे आणि हव्या त्या फाइली त्यांत ठेवायच्या.

संगणकाचा कारभारी डबा म्हणजेच प्रोसेसर बॉक्स आपण उघडून बघत नाही. हार्डवेअर शिकणारे किंवा शिकलेले विद्यार्थी बघतात. (तस आपणही बघू शकतो म्हणा, कारण निव्वळ एका स्क्रू ड्रायव्हरने डब्याचे बाजूचे दारं उघडता येते) त्याच्या आत वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळ्या पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड)वर चिप्स, सर्किट्स वगैरे वगैरे असतात. त्यातला सर्वांत प्रमुख भाग म्हणजे काम करण्यासाठी मेंदू -- म्हणजे प्रोसेसर चिप. या मेंदूला स्वतःच्या कामामधील तात्पुरती माहिती साठवायला लागणारी पाटी म्हणजे रॅम(RAM) आणि कामाच्या फाइली कायमस्वरूपी जपून ठेवण्यासाठी लागते ती हार्ड डिस्क. ही हार्ड डिस्क म्हणजेच कपाट. प्रोसेसरला विवेचक आणि हार्ड डिस्कला संग्राहक असे छान मराठी शब्द वापरता येतील.

आपण संगणक विकत घेतानाच आपल्याला किती मोठी हार्ड डिस्क घ्यायची ते ठरवतो. जेंव्हा विक्रेत्याचा इंजिनियर आपल्याला सुरुवातीचे सेटिंग करुन देत असतो, तेव्हांच त्याला हार्ड डिस्क चे दोन किंवा तीन भाग करायला सांगायचे. या भागांना C,D,E, अशी नांवं देण्याची पद्धत असून C drive मध्ये सर्व प्रोग्राम ठेवण्याची पद्धत आहे. त्याच्यांत कधी कधी बिघाड होतो. अशावेळी सी-ड्राईव्ह पूसून टाकायचा. सर्व स्टॅण्डर्ड प्रोग्राम्सच्या प्रमाणभूत सीडी बाजारात मिळतात. त्यावरून पुन्हा सर्व प्रोग्राम्स सी-ड्राईव्हवर आणून बसवता येतात म्हणजेच रिलोड करता येतात. मात्र आपण केलेल्या कामांच्या फाईली C drive वर न ठेवता D drive वर ठेवायच्या, म्हणजे सी-ड्राईव्ह पुसला तरी फाइली सुरक्षित रहातात.
माय डाक्यूमेंट हे सी-ड्राईव्हवर असते. आपण नव्या केलेल्या फाइली तिथेच ठेवल्या जातात. म्हणून मधून मधून त्या फाईली डी ड्राईव्हवर नेऊन ठेवल्या की सुरक्षित राहतात.

कपाटात आपण कधी कधी एकाच विषयाच्या खूपशा गोष्टी एका गाठोड्यात बांधून ठेवतो व हव तेंव्हा ते गाठोडच हलवतो. तोच प्रकार संगणकात करता येतो. संगणकाला नवी संचिका – न्यू फोल्डर उघडायला सांगायचे आणि हव्या त्या फाली किंवा इतर संचिका त्यांत नेऊन ठेवायच्या. त्या संचिकेला आपल्या सोइचे नांव द्यायचे. अशी ही संपूर्ण संचिका गाठोड्यासारखी फक्त एका सूचनेने दुस-या ड्राईव्ह मध्ये नेऊन ठेवता येते. म्हणजे प्रत्येक फाइल न फाइल उचलून ठेवावी लागत नाही.
इंटरनेट द्वारे फक्त फाइली पाठविता येतात. संचिका पाठवता येत नाही. मात्र संचिकेला Zip केले की त्याची एक झिप फाईल तयार होते- ती इंटरनेटवर पाठवता येते. ज्याला मिळेल त्याने आपल्या संगणकावर ती फाईल उतरवून घ्यायची आणि अनझिप करायची (म्हणजे गाठोडे उघडायचे) की त्या सर्व फाइली चुटकीसरशी त्या संगणकावर उपलब्ध होतात.

अजून एक महत्वाची बाब- कपाटात आपण एखाद्या छोट्या कप्प्याला कुलूप लावू शकतो किंवा पूर्ण कपाटालाच. तसच आपण एखाद्या फाइलला, किंवा फोल्डरला किंवा ड्राईव्हला किंवा पूर्ण संगणकालाच कुलूप लावू शकतो. त्या कुलूपाच्या किल्लीला पासवर्ड म्हणतात. तो पासवर्ड दिल्याशिवाय कुणालाही ती फाईल उघडता येत नाही. या आणि अशा इतर ब-याच पध्दती वापरुन संगणकावरचे काम गोपनीय व सुरक्षित ठेवले जाऊ शकते.

सामान्यपणे आपल्याला एवढी सुरक्षा बाळगण्याची गरज नसते. मात्र जिथे बॅंकांचे व्यवहार होतात, गोपनीय कागद साठवावयाचे असतात, किंवा जिथे एखाद्या फॅक्टरीचे उत्पादन क्षणोक्षणी संगणकाने कण्ट्रोल करतात, तिथे अशी सुरक्षा अत्यावश्यक असते.
---------------------------------------
नवे फोल्डर --
संगणकात नवे फोल्डर कसे उघडायचे? तर पडद्यावरील रिकाम्या जागेत कुठेही राईट क्लिक केले की जो सब-मेनू उघडतो त्यामध्ये न्यू या शब्दावर उंदीर न्यायचा -- की आपल्याला फोल्डर असा पर्याय दिसतो, तिथे टिचकवले की एक New folder तयार होऊन समोर दिसते. या संचिकेला हवे ते नांव देऊन टाकायचे व नंतर आपल्याला हव्या त्या धारिका (फाइली) या संचिकेत आणून ठेवायच्या.
सर्व्हर --
कामाच्या सोईसाठी आपण खूपसे संगणक एकत्र जोडू शकतो. ते एकाच इमारतीत असतील तेंव्हा जोडणीच्या पद्धतीला लॅन (LAN- Local Area Network) म्हणतात आणि खूप लांब-लांब -- इतर शहरांत, इतर देशांत, किंवा शहराच्या विरुद्ध टोकालाही असतील तेंव्हा जोडणीच्या पद्धतीला वॅन (WAN- Wide Area Network) म्हणतात.
या दोन्ही प्रसंगी जोडलेल्या सगळ्या संगणकांमधून एखाद्याला मुख्य संगणक असे ठरवले तर कामात खूप सोय होते. अशा प्रमुख नेमलेल्या संगणकाला सर्व्हर म्हणतात.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -- 10 (पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2011)
संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक

संगणकावर इंटरनेटव्दारे जगभर फाईली पाठविण्याचा शोध 1983 मधे लागला. त्यासाठी आधीच्या तीन शोधांची मोठी मदत झाली.
पहिला खूप आधीचा शोध लाउडस्पीकरचा - म्हणजेच आपण बोललेला आवाज इलेक्ट्रिक सिग्नल मधे बदलता येतो हा तो शोध. या उपकरणाला मायक्रोफोन म्हणतात. मग तो इलेक्ट्रिक सिग्नल मोठा करायचा आणि पुन्हा त्याचे रूपांतर आवाजांत करून हा मोठा आवाज लोकांना ऐकवायचा.
1885 च्या आसपास जगदीशचंद्र बोस व मार्कोनी या वैज्ञानिकांनी दुसरा शोध लावला. रेडियो तरंगांच्या सहाय्याने एका जागेवरुन दुसरीकडे आवाज किंवा संदेश पोचवण्याचं तंत्र त्यांनी शोधल होतं. त्यातूनच पुढे रेडियोचा जन्म झाला. रेडियोसाठी प्रसारण करणा-या आकाशवाणी केंद्रांवरुन तिथले कार्यक्रम रेडियो तरंगाच्या सहाय्याने अवकाशात पाठवतात. त्याचवेळी आपण आपला ट्रान्झिन्टर ट्यून केला असेल तर तो या रेडियो तरंगांना पकडतो, आणि मूळ केंद्रावर चालणारा कार्यक्रम आपल्याला जसाच्या तसा ऐकवतो. पण तो क्षण निघून गेल्यावर आपण तो कार्यक्रम ऐकू शकत नाही. म्हणूनच आकाशवाणी केंद्रावर सहा वाजता लागणारा कार्यक्रम आपण सात वाजता ऐकू शकत नाही. याला रियल टाइम किंवा ऑन-लाईन अप्रोच म्हणजे “ज्या च्या त्या क्षणाला” असे नांव आहे. (हुषार लोकांनी त्यावर तोडगा काढलाच- की सहा वाजता लागलेला कार्यक्रम कुणाला तरी रेकॉर्ड करुन ठेवायला सांगायचे आणि मग तो सावकाश ऐकायचा.)
तसेच या पध्दतीला “ब्रॉडकास्ट पध्दत” असे नांव आहे. कारण केंद्रावरील ट्रान्समिशन ताबडतोब दाहीदिशात पसरते आणि कुणीही ते ऐकू शकतो. सर्वांसाठी खुले!

त्याच्या थोडे आधी म्हणजे 1876 मधे अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell) ने टेलिफोनचा शोध लावला होता. त्यामध्ये एका यंत्रावर बोललेले स्वर लगेच इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतात, आणि टेलिफोनच्या तारेतून दुस-या टोकाला किंवा लांबच्या गावांला पोचतात. तिथल्या रिसीव्हर मध्ये ते पुनः स्वरांच्या रुपाने तिकडच्या माणसाला ऐकू येतात. हे देखील ऑन-लाईनच असते.

यात महत्वाचा मुद्दा असा की फोनवरील संदेश-वहन एका विशिष्ट फोन नंबर वरुन दुस-या विशिष्ट फोन नंबरवरच जाऊ शकते - ते सर्वाना खुले नसते कारण ते ब्रॉडकास्ट पद्धतीने नसते. संदेश पाठवणा-याचा पत्ता (महणजे फोन नंबर) माहीत असतो आणि ज्याला पाठवायचे त्याचा पण फोन नंबर सांगावा लागतो. याला point to point संदेशवहन म्हणतात.
फोनचे संदेशवहन जगभर जाणे गरजेचे असल्याने गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत समुद्रातून, जमीनीखालून, जमीनीवरुन असे तारांचे जाळेच जगभर विणले गेले. त्यासाठी अल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा यासोबत काचेच्या तारा - ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला. ऑप्टिक फायबरची क्षमता व त्यातील संदेशवहनाचा वेग इतर तारांपेक्षा कितीतरी हजारपट अधिक असतात. असे तारांचे जाळे विणणा-या कंपन्या जगांतील अति श्रीमंतांच्या यादीत असतात. संगणकासाठी देखील याच तारा वापरल्या जातात.

यावरुन आपल्या लक्षांत येईल की, सुरुवातीच्या काळापासून संदेश पाठविणा-या दोन त-हा विकसित झाल्या. एका विशिष्ट पत्त्यावरुन दुस-या पत्त्यावर संदेश पाठविणे -- जो फक्त त्याच व्यक्तीला घेता येईल अशी एक पद्धत. फार पूर्वीपासून चालत आलेली टपाल खात्याने पत्र पाठविण्याची पध्दत याच प्रकारची होती हे तुमच्या लक्षात आले असेलच. मात्र टपालाला पोचायला वेळ लागतो ही गैरसोय तर येणारे पत्र हे ऑफ-लाइन म्हणजे ज्याला मिळाले त्याने त्याच्या सोयीने थोडाफार उशीर करून वाचावे असे असते, ही मोठी सोय. ते त्याने वाचले की नाही हे कळायला मार्ग नसतो ही गैरसोय.
दुसरी त-हा म्हणजे ब्रॉडकास्ट पद्धतीने एकाचवेळी कोण्या एका संपूर्ण क्षेत्रात ऐकता येईल अशा पद्धतीने प्रसारित करणे. रेडियो किंवा दूरदर्शनवरुन येणारे संदेश ब्रॉडकास्ट पद्धतीचे म्हणजे कुणीही ऐकावे असे असतात -- पण ऑन लाइन -- म्हणजे ज्या क्षणी ते पोहोचतात त्याच क्षणी ऐकावे लागतात.
संगणकात या दोन्ही सोयीचा मेळ घातलेला आहे. जाणारी ई-मेल टेलिफोनच्या तारांमधून जात असल्याने लगेच पोहोचते. ती point to point पध्दतीची असते, म्हणजे ज्याच्या पत्त्यावर ई-मेल पाठविली त्यालाच ती मिळते, मात्र सोयीने केव्हांही वाचता येते. मोबाइल वरील SMS मधे सुद्धा हीच सोय असते पण त्यांत छोटेसे संदेशच पाठवता येतात.
ई-मेल चा प्रवास बव्हंशी तारेतून, क्वचित थोडे अंतर रेडिओ तरंगाच्या माध्यमातून व कधीकधी सेटेलाइट च्या माध्यमातून होतो. मोबाईल चे संदेशगमन देखील point to point असते. मात्र टेलिव्हजनचे संदेशगमन ब्रॉडकास्ट पध्दतीने असते.
संगणकावरून वाईड एरिया नेटवर्क द्वारे लांबवर फाईली पाठविण्याची सुविधा 1983 मधेच आली मात्र सामान्य माणसांना सोपेपणाने इंटरनेट वापरणे 1995 पासून शक्य झाले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -11
पुस्तकावरून दुरुस्त केले 22-07-2010

संगणक म्हणजे माहीतीचा खजिना
अर्थात इंटरनेटवरून सर्चने माहिती घेण्याचे तंत्र

संगणक म्हणजे माहीतीचा खजिना कसा बनतो ते पाहू या. ई-मेल चे संदेश-वहन point to point असले तरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन गूगल, याहू सारख्या कंपन्यांनी अशी सुविधा निर्माण केली ज्याव्दारे आपण अवकाशांत आपल्या स्व:तचा एक माहितीचा ढग तयार करु शकतो व तो तिथे कायमपणे रहातो. त्यांतील माहिती गद्य, पद्य, चित्र, गाणी, व्हिडियो अशा सर्व प्रकारची असते. यासाठी आपल्याला अवकाशांतील जागांचे नियोजन करणा-या तसेच ढग तयार करण्याची सुविधा देणा-या अशा दोन्हीं कंपनींकडे पैसे भरून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्या आपल्या ढगाला एक पासवर्ड व एक पत्ता देखील देतात. इतरांना हा पत्ता गाठून तिथे लिहीलेली माहिती वाचता येते किंवा आपण परवानगी देऊ त्याप्रमाणे इतरही कांही कामे करता येतात. पासवर्ड वापरून आपण आपल्या माहितीत फेरबदल करतो. म्हणून आपल्या ढगाचा पत्ता इतरांना मुक्तहस्ते द्यायचा पण पासवर्ड नाही द्यायचा. आपला ढग छोट्या आकाराचा असेल (सुमारे 1 गेगाबाइटपेक्षा लहान) व वैयक्तिक स्वरूपाचा असेल तर कित्येक कंपन्या एखादा ढग फुकटही देतात.

या ढगांमधे सगणकाच्या भाषेत वेब साईट, ब्लॉग साईट किंवा पोर्टल असे प्रकार आहेत. गूगल, याहू यांचे स्वत:चे असे ढग तर आहेत. शिवाय ते इतरांच्या ढगांचे प्रबंधन पण करतात. त्यामुळे त्यांना सर्वांचे सर्व ढग- व त्यातील माहिती पहाता येते. या सुविधेचा वापर करून त्यानी पुढचा टप्पा -- म्हणजे स्वत:ची सर्च इंजिन्स तयार केली. म्हणून जर कोणी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाईप केला तर ज्या ज्या ढगांवर, ज्या ज्या माहीतीच्या पानावर भारत हा शब्द आला असेल त्या सर्व पानांची एक यादीच आपल्या समोर ठेवली जाते. आजच मी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाइप केल्यावर संगणकाने मला दाखवले की सगळ्या माहिती ढगांवर मिळून एकूण एक कोटी दोन लाख पानांवर भारत हा शब्द आढळतो व ती यादी शोधून माझ्या समोर ठेवायला गूगलला फक्त 0.21 सेकंद लागले. यातील ज्या पानावर आपण टिचकऊ (क्लिक करू) त्या पानावरची माहिती वाचता येईल.
यावरुन आपल्याला कळेल की. संगणक उघडून त्यावर इंटरनेट सुरु करुन गूगल सर्च उघडले तर माहितीच्या एका अफाट जगांत नेणारी खिडकी आपल्यासमोर उघडते. आपण केवळ हवा असलेला विषय त्यांत लिहायचा की क्षणार्धांत माहिती मिळते. त्यात वृत्तपत्रातील माहिती असते, कांही अख्खे वृत्तपत्रच असते. कित्येक लेखक आपले संबंध पुस्तकच्या पुस्तक स्वतःच्या माहिती- ढगांवर टाकून ठेवतात. ते आपण वाचू शकतो. प्रश्न विचारु शकतो. मित्रमंडळ स्थापन करु शकतो.
तर मग चला आणि तयार करा आपापले माहितीचे ढग आणि कळू द्या जगभराला तुमचे विचार.
माहितीच्या ढगासाठी ज्ञानढग हा शब्द कसा वाटतो?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भाग -- 15
tallied with book 22-07-2010
संगणक म्हणजे खिडक्याच खिडक्या

हे वर्णन कांही शंभर टक्के बरोबर नाही. पण सामान्य माणसाला आपल्या नित्यनियमित कामांसाठी सोईचा असा संगणक १९९५ च्या सुमारास जगभराच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणांत आला. त्यात वापरलेल्या पध्दतीला आपण खिडक्यांची पध्दत म्हणू शकतो.

आपल्या घराला भरपूर खिडक्या असतात. एक खिडकी उघडली की एक दृश्य दिसतं- दुसरी उघडली की दुसरं दृश्य दिसत. संगणकावर पण आपण हव तर एकच खिडकी उघडायची किंवा एकाच वेळी सात-आठ पण उघडू शकतो. एक खिडकी म्हणजे एक प्रोग्राम किंवा एक काम. या खिडक्यांचा आकार लहान मोठा करता येतो, अगदी एका बिंदुएवढा सुध्दा. म्हणजे संगणकाच्या पाटीवर आपल्याला हव्या तितक्या खिडक्या उघडून काम करता येते. एका खिडकीत जाऊन तिथल्या प्रोग्राम चे काम सुरु करायचे मग ती खिडकी छोटी करुन ठेवायची, संगणक तिथले काम करीत राहतो. तोपर्यंत आपण दुसरी खिडकी उघडून तिथले काम सुरु करुन संगणकाला कांय त्या सूचना द्यायच्या. अशात-हेने एकाचवेळी खूप कामं करत रहायची- एखाद्या मोठ्या कंपनीच्या टॉप एक्झिक्यूटिव्ह प्रमाणे! याला मल्टीटास्किंग असे छान नांव पडले.

या खिडक्यांची अजून एक गंमत आहे- खिडक्या उघडणे, मिटणे, लहान मोठी करणे, त्यावर केलेले काम जपून ठेवणे, ते काम नको असेल तर कचराकुंडीत टाकणे, या सर्व प्रकारची कामं सगळ्या खिडक्यांवर एकाच पध्दतीने करतात, त्यामुळे एकदा का या कामांची सवय झाली की आपल्या डोक्याला फार विचार करावा लागत नाही.

संगणकावर स्टार्ट बटणावर राइट क्लिक केले की, एक नवा मेनू उघडतो, त्यापैकी एक्सप्लोअर या शब्दावर क्लिक केले की आपल्याला संगणकातील सर्व ड्राईव्हस्, संचिका, धारिका (फाईली), आणि प्रोग्राम्स ची अनुक्रमणिका वाचता येते. तसेच आपण एखादा ड्राईव्ह किंवा संचिका उघडायला सांगितले की अजून एक खिडकी उघडून त्यामध्ये असलेल्या संचिका, धारिका, आणि प्रोग्रामची अनुक्रमणिका दिसते. त्यांतील हवी ती धारिका आपण उघडून, वाचू शकतो किंवा काम करू शकतो. त्याच वेळी ब्राउझर उघडला तर एक वेगळी खिडकी उघडून त्यावर अंतर्जालाची कामं करता येतात.

विंडोज ऑपरेटिंग सिस्टम सारख्याच ज्या इतर जास्त सोईच्या ऑपरेटिंग सिस्टम बाजारात उतरत आहेत (उदा. लीनक्स किंवा ऍपल कंपनीची मॅक) त्या सुध्दा खिडक्यांची ही पध्दत वापरतात.
संगणक बंद करायच्या आधी आपण उघडलेल्या सर्व खिडक्या बंद करुन मगच संगणकाला शट डाऊन म्हणजे बंद हो असे सांगावे.
--------------------------------------------------------------

No comments: