भाग 9-श्रवण
नक्षत्र
ध्रुवतारा
ओऴखण्याच्या खाणाखुणा
उत्तर गोलार्धावर
राहणार्यांसाठी ध्रुवतारा महत्वाचा आहे हे आपण पाहीले. तो आकाराने खुप छोटा असतो.
त्याच्या थेट खाली क्षितीजापर्यंत दुसरी
चांदणी नसते हे खरे. तरी पण त्याला ओऴखण्यासाठी एवढी एकच खूण असेल तर त्याच्या
छोट्या आकारामुऴे या खुणेवरून ओऴखणे थोडे जडच असेल. मात्र त्याच्या आजूबाजूच्या मोठ्या चांदण्यांवरून आपण
त्याला पटकन शोधू शकतो. असे तीन नक्षत्र समूह आहेत जे आपल्याला उत्तर आकाशांत
आलटून पालटून दिसतात.
No comments:
Post a Comment