थंडशार काळोख्या रात्री भाग 21- 25
भाग 7 – ध्रुवतारा
मी
सहावीत असताना गोष्ट आम्हाला हिंदी आणि पाठोपाठ भूगोलाचा तास असायचा. एकदा
हिंदीच्या तासाला नेमकी आम्हाला ध्रुवबाळाची गोष्ट होती. आम्ही गोष्टीत प रंगून
गेलो. ती गोष्ट अशी...........
उत्तानपाद नावांच्या एका राजाला दोन राण्या होत्या. सुरूची आणि सुनीती.
दोघींना एक एक मुलगा होता. सुरूचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा मुलगा ध्रुव. पण
सुरूची ही राजाची आवडती राणी होती. म्हणून सदानकदा उत्तमच आपला राजाच्या मांडीवर
बसायचा. एकदा उत्तम दुसरीकडे खेऴत असताना ध्रुव येवून राजाच्या मांडीवर बसला. पण
थोड्याच वेऴात उत्तम आणि सुरूची तीथे आली.
उत्तमने राजाच्या मांडीवर बसायचा हट्ट केला. त्याबरोबर सुरूचीने ध्रुवाला
राजाच्या मांडीवरून ढकलून दिले. आणि उत्तमला तीथे बसवले. ध्रुवाला वाटले राजा आपली
बाजू घेईल, ऩीदान आपली आई सुनीती तर आपली बाजू घेईल, पण दोघेही गप्पच राहीले.
ध्रुवाला वाईट वाटले. तो घर सोडून निघाला –
जंगलाकडे जाऊ लागला. त्याला नारद मुनी भेटले, त्यांनी विचारल कुठे निघालास। ध्रुव
म्हणाला देवाला शोधतो, त्याला सांगतो मला अशी जागा दे जिथून मला कुणीही उठवू शकणार
नाही. नारदाने त्याला विष्णूचा मंत्र देऊन तप करायला सांगीतले.
बर्याच तपश्चर्ये नंतर विष्णू प्रसन्न झाला. त्याने ध्रुवाला दर्शन देऊन
सांगितले मी प्रसन्न आहे आता तू घरी परत जा. सर्वांशी प्रेमाने वाग. मोठा झाल्यावर
तू राजा होशील तेव्हा प्रजेची काऴजी घे. आणि त्यानंतर तुला आकाशात स्थान अढऴ स्थान
मिऴेल, तिथून तूला कुणीही हलवणार नाही.
अशा
प्रकारे आकाशांत ध्रवाला अढऴ स्थान मिऴेल. पुढच्या तासाला भूगोलाच्या वर्गांत
नेमका ध्रव तारा व सप्तर्षि हाच धडा होता. त्याची मला खुप गंमत वाटली आणि तो धडा
नीट लक्षात राहीला.
ध्रुवाची चांदणी आपल्याला उत्तरेकडे दिसते. ही
आकाशाने मध्यम आणि विशेष चमकदार पण नाही. पण ती सदा सर्वदा एकाच जागी दिसते, हे
तीचं वैशिष्ट्य.........
आता
आपण ध्रुव तार्याबद्दलची सर्वांत महत्वाची गोष्ट शिकूया. आपल्याला
सुर्य,चंद्र,तारे यांच्या आकाशातील भ्रमनीमुऴे असे वाटते की जणू प्रुथ्वी स्थिर
आहे आणि हे सर्व ग्रह-नक्षत्र फिरत आहेत. पण हे फक्त भासते. प्रत्यक्षात आपण जाणतो
की आपली प्रुथ्वीच सुर्याभोवती फिरते आणि इतर ग्रह म्हणजे ध्रुव,शुक्र,मंगऴ,गुरू,शनी
इत्यादी पण सुर्याभोवती फिरतात. सूर्याच्या द्रुश्यमान गतीमुऴे आपण पूर्व दिशा
कोणती ते पटकन ओऴखू शकतो. पण त्याहून महत्वाची गोष्ट अशी की आपली सुर्यमालीका हीच
मुऴी ध्रुवतार्याभोवती फिरत असते. पण प्रुथ्वीचे सुर्याभोवती फिरणे निराऴे आणि
सुर्याचे ध्रुवाभोवती फिरणे निराळे असते. प्रुथ्वीपण सुर्याभोवती फिरत असल्याने
प्रुथ्वीचे ध्रुवाभोवती फिरणेपण सुर्याच्या भ्रमनासारखेच दिसेल.
थोडक्यात आपण उत्तर- दक्षिण अशी एक लांबच लांब अक्ष
आहे. अशी कल्पना केली तर त्या सुर्य आणि इतर सर्व चांदण्या त्या अक्षाभोवती फिरताना
दिसतील. ज्या चांदण्या श्व-स्वस्तिक आणि उत्तरी क्षितीजाच्या मधे असतील. ज्यांचे
वर्तुऴ छोटे असेल आणि ज्या चांदण्या श्व-स्वस्तिकाच्या जवऴ असतील त्यांचे भ्रमण-
वर्तुऴ मोठे दिसेल.
शेजारच्या चित्रांत जरी आपण प्रुथ्वीला एक ठिपका दाखवला असला तरी आपल्या तुलनेत
प्रुथ्वी एक अवाढव्य चेंडूसारखी आहे अक्षांशावर ती स्वतः उत्तर- दक्षिण अक्षावर
फिरत असते. आपण विषुवव्रुत्तावर असलो तर ध्रुव आपल्याला अगदी उत्तर क्षितीजावर
दिसेल पण आपण विषुवव्रुत्तावर उत्तरेकडे 15 अक्षांशावर असलो तर आपल्याला असे भासेल
की जणू ध्रुवच उत्तर क्षितीजापासून वर 15 अंशावर आहे अक्षांशावर आपण प्रुथ्वीच्या
उत्तरी ध्रुवावरच असू तेव्हा आपल्याला ध्रुव क्षितीजापासून 90 अंशावर म्हणजे अगदी
आपल्या डोक्यावर दिसेल. अर्थात सुर्याचा उजेड असेल तेव्हा तो दिसणार नाही ही गोष्ट
वेगऴी.
महाराष्ट्राचा नकाशा पाहीला तर आपल्या सर्वात दक्षिणेच्या बाजूला कोल्हापूर....
अक्षांशावर आहे आणि सर्वात उत्तरेला नागपूर.... अक्षांशावर आहे. म्हणूण कोल्हापूरच्या
आकाशांत ध्रुव उत्तर क्षितीजावर अंशावर दिसेल. पुण्याला.... अंशावर आणि आपण
विषुवव्रुत्ताच्या दक्षिणेला असलो तर काय
होईल... तीथे ध्रुवतारा दिसणारच नाही. नागपूरला.... अक्षांशावर दिसेल. ध्रुवाच्या
चांदणीच्या खाली उत्तर क्षितीजापर्यंत इतर कोणतीच चांदणी दिसणार नाही.
इतक्या
खुणा सांगीतल्या तरी ध्रुवाची चांदणी लहान असल्याने तिला पटकन ओऴखता येत नाही. त्याऐवजी
एक सोपी खूण आहे- सप्तर्षींवरून ध्रुव ओऴखण्याची........
सप्तर्षींच्या पैकी पहिल्या व दुसर्या चांदणीला
जोडणारी रेघ तशीच उत्तर क्षितीजाच्या दिशेने ओढत नेली तर त्याच दिशेला जी पहिली चांदणी
दिसेल तीच ध्रुव या दोन्ही चांदण्यांच्या मधे जेवढे अंतर आहे त्याच्या साधारण चौपट
अंतर ध्रुवाची चांदणी असते. सप्तर्षींच्या चांदण्या देखील आकाशांत फिरतच असतात.पण
त्या कशाही फिरल्या तरी पहील्या दुसर्या चांदणीची दिशा नेहमी ध्रुवाकडेच वऴलेली
असते.
पण सप्तर्षी सुध्दा वर्षभर दिसत नाहीत. कधी कधी ते क्षितीजाच्या
खाली असतात. मात्र त्या वेऴेला निश्चीतपणे शर्मीष्ठा नावाचा तारका समूह आकाशांत
असतो व त्यावरून आपण ध्रुवतारा ओऴखू शकतो. पण जे लोक प्रुथ्वीच्या दक्षिण गोलार्धात राहतात त्यांचे काय....त्यांना
उत्तरेकडील ध्रुवतारा कधीच दिसत नाही. मग त्यांच्या करता दक्षीणेकडे कुणी
ध्रुवतारा आहे का... नाही. पण त्यांच्याकडे इतर काहीतरी आहेच. ते आपण
पुढील भागात पाहूया.
आणि आता
तुमच्या लक्षांत येईल की आपण आकाशाचे असेही भाग पाहू शकतो. उत्तर क्षितीजापासून 30
अंश, दक्षिण क्षितीजापासून 30 अंश उत्तर 30
अंश ते खस्वस्तिक आणि दक्षिण 30 अंश ते
खस्वस्तिक. आणि त्यातल्या चांदण्या आपण लक्षांत देऊ शकतो.