भूमिका
संगणकासंबंधी पुस्तक लिहाव अस मला का वाटल ? तस पाहिल तर या विषयावर पुष्कळ पुस्तक लिहिली गेली आहेत - इंग्रजी सोबत मराठीतूनही लिहिली गेली आणि आता तर शाळा कॉलेजेस मधून संगण्रक शिक्षण सुरु झाल्याने अभ्यासक्रमातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. लहानमोठया व्यापारी व स्वयंसेवी संस्थांमध्ये आणि मध्यमवर्गीयांच्या घरांतही वैयक्तिक वापरासाठी मोठया संख्येने संगणक रुजू झाले आहेत. त्यांच्याकडील तरुण पिढीला संगणक चांगल्यापैकी वापरता येतो.
हे पुस्तक लिहितांना माझ्यासमोर कोण व्यक्ती आहेत? कोणासाठी हे पुस्तक आहे? सर्व प्रथम माझ्यासमोर आहे तो शासकीय कार्यालयांतील स्टाफ. सुमारे 20 लक्ष कर्मचा-यांना संगणकातील कांय कांय व किती किती येत याची सरासरी काढली तर त्यांना जेवढे यायला हवे त्यापैकी फक्त वीस टक्के येते असे माझे ढोबळ निरीक्षण आहे. तेही गेल्या दहा वर्षांत रुजू झालेल्या व तुलनेने तरुण असलेल्या स्टाफमुळे.
खरं तर शासनांत संगणक वापरण्यासाठी वैज्ञानिकांना असते तितकी प्रवीणता नकोच आहे. संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये तज्ज्ञता असणेही गरजेचे नाही. तरीही शासनात संगणकाचा प्रभावी वापर न होण्याची दोन कारणे मला दिसतात. शासनांत संगणक संस्कृति यावी या धोरणाने 1981 मधेच केंद्र सरकारने प्रत्येक जिल्हयांत NIC चा संगणक कोऑर्डिनेटर नेमला होता. पण स्टाफ ट्रेनिंगचे धोरण ठरवले गेले नाही. त्या काळी संगणक तंत्र आरंभिक अवस्थेत असल्याने ट्रेनिंग सोपे नव्हते हे कारण कबूल करता येईल. 1985-90 च्या दरम्यान संगणकातील हार्डवेअर्सचे स्टॅण्डर्डायझेशन होउन बाजारात कमर्शियल स्केलवर संगणक आले, तसेच सॉफ्टवेअर्सचे तंत्रही विकसित झाल्याने प्रोग्रॅमिंग तज्ज्ञतेची गरज धाडकन दहा टक्क्याइतकी कमी झाली, मात्र ट्रेनिंगचा विचार झाला नाही. तेथून 1995 पर्यन्त संगणक वापरासाठी थोड्या प्रमाणांत प्रोग्रॅमिंग तज्ज्ञतेची गरज लागत होती. त्या काळांत ज्या उत्साही अधिका-यांनी संगणक संस्कृती रुजवण्याचा विचार केला त्यापैकी कित्येकांनी तज्ज्ञांच्या व ट्रेनिंगच्या अपुरेपणामुळे ते प्रयत्न सोडून दिले. ज्यांनी आग्रहाने प्रयत्न सुरु ठेवले त्यांनी आउट-सोर्सिंगवर सर्व भिस्त ठेवली. या दरम्यान जो स्टाफ संगणक शिक्षणाबाबत उत्साही होता त्यांचा उत्साह जाऊन हे आपल्यासाठी नाही -बरे झाले- शिकण्याची कटकट संपली अशी नकारात्मक भावना त्या शासकीय कर्मचा-यांमध्ये पसरली. 1995 नंतर संगणक वापरांत जो सोपेपणा आला त्याची दखल घेऊन पुन्हा स्टाफ ट्रेनिंगकडे वळावे हे प्रयत्न कोणी अधिकारी करेनात कारण तोपर्यंत आउटसोर्सिंगची संस्कृति वेगाने पसरली व ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि स्टाफ ट्रेनिंग हे शब्द शासकीय कोषामधून हरवले. आता पुन्हा एकदा कर्मचारी वर्गाला या शिक्षणाची गरज वाटू लागली आहे. त्याच्यासाठी हे पुस्तक निश्चितपणे उपयोगी ठरेल.
दुसरीकडे माझ्या डोळ्यासमोर अशी सर्व साहित्यिक मंडळी आहेत ज्यांच्यामुळे मराठी भाषा समृद्ध होत असते आणि तरीही या समृद्धीचा वेग शतपटीने वाढण्यासाठी संगणक किती उपयोगी पडू शकतो याचा विचार त्यांनी केलेला नाही. मधुमंगेश कर्णिकांसारखे प्रथितयश लेखक एकदा मला म्हणाले -- मराठी लेखक अजूनही फार मोठया प्रमाणावर संगणक वापरत नाहीत. कारण सुरुवात कुठून कशी केली तर संगणकाचा इतर फापट-पसारा न शिकावा लागता आपल्या कामापुरतं निवडून आपण शिकू शकतो- हे माहीत नसत. या पुस्तकामुळे अशा मंडळींना संगणकामधील जे जे आवश्यक तेवढंच नेमकेपणाने ओळखून शिकून घेता येईल.
त्याचसोबत माझ्या डोळ्यासमोर माझी आई होती- तिला वेळ जाण्यासाठी वाचन व टीव्हीशिवाय कांही तरी स्वत:चे असे हवे होते- तिला मराठी टायपिंग व ईमेल शिकवले- म्हटले, आता लिही आपल्या आठवणी आणि पाठव ईमेल आपल्या नातवंडांना- दोघेही खूष! वयाच्या 81 व्या वर्षी तिला सायबर-सॅव्ही झालेली पाहून तिच्या भावंडांनाही गप्पांसाठी एक नवा विषय मिळाला.
माझ्यासमोर तिसरा गट अशा लाखो मुलीमुलांचा आहे ज्यांना शाळा शिकायला मिळाली नाही किंवा जुजबी शिक्षण मिळालं. पण संगणक दिसला की त्यांचेही डोळे लकाकतात आणि हे आपल्यालाही शिकायला मिळाव अस स्वप्न बाळगायला सुरुवात होते. त्याला मोठा खो देणारा विचारही लगेच येतो की आपल्याला तर इंग्लिश येत नाही मग संगणक कसा येणार? पण हे पुस्तक त्यांनी वाचलं अगर कुणी या पुस्तकावरून त्यांना समजावलं की त्यांनाही मराठी टायपिंग पासून सुरुवात करून संगणक शिकता येईल तर या देशातील एका मोठ्या गटाला निराळाच आनंद आणि आत्मविश्वास मिळवता येईल. माझ्या घरी कामाला येणा-या अशाच एका जेमतेम सातवी शिकलेल्या कामगाराला मी माझ्या संगणकावर मराठी शिकवून फावल्या वेळांत त्याने माझी सुमारे तीस पाने टाईप करून दिली. काम सोडतांना त्याने विनंति केली -- बाईसाहेब, मला याचे प्रिंट-आउट द्या. मी ते घरी जपून ठेवीन -- मलाही संगणक वापरता आला हे मी सर्वांना दाखवू शकेन.
संगणक या विषयावर मी वेळोवेळी लेख लिहिले आहेत. संगणकाला फक्त बायनरी अंकांची पध्दत कळते, आपण व्यवहारांत मात्र दशांश अंकपध्दती वापरतो -- तर मग संगणकाच्या अफलातून गणिती पध्दती बरहुकूम आपली नेहमीची पध्दत कशी बसवली जाते किंवा आपल्या पध्दतीची गणितं संगणक बायनरी म्हणजे द्बिअंश पध्दतीने कशी सोडवतो हा लेख 1980 मध्ये तरुण भारत पुणे साठी लिहिला. त्यानंतर संगणक पदनाम कोष - हा लेख मटामधे 1986 साली लिहिला. त्यामधे संगणकाचे हार्ड व स़ॉफ्टवेअर, नवे तंत्र यांची माहिती व बरेच मराठी पर्यायी शब्द सुचवले होते. भाषा संचालनालयाने मात्र अजूनही संगणक पदनाम कोषाचे सुरू केलेले नाही. त्यानंतर संगणकांत सोपेपणा आल्यामुळे त्याचा फायदा उठवत शासन व्यवहारांत संगणक कसा वापरावा यासंबंधी 1997 मध्ये साप्ताहिक विवेकच्या दिवाळी अंकातील लेख तसेच शासनांतीलल संगणक प्रणाली- हा लोकसत्तातील लेख वाचून खूप जणांनी असे कांही पुस्तक लिहिण्यांस सुचविले. संगणकावर इन्सक्रिप्ट की-बोर्डच्या पध्दतीने मराठी लिहिणे किती सोपे व ते जागतिक पातळीवर स्टॅण्डर्डाइझ झालेल्या युनिकोड प्रणालीमधे वापरले असल्याने किती फायद्याचे याबाबत- 2004 मधे छोटी फिल्म व 2008 मधे लोकसत्तेत लेख इत्यादि प्रयत्न चालू होते. याच दरम्यान रवींद्र देसाई यांचे विण्डोज मधील वर्ड व एक्सेल या दोन प्रोग्राम्सची अत्यंत सविस्तर व खुमासदार ओळख करुन देणारे "क कम्प्यूटरचा" व संगणकामागचे विज्ञान आणि भविष्याचा वेध घेणारे अच्युत गोडबोले यांचे "संगणक युग" ही दोन पुस्तके खूप गाजली. शिवाय शाळा कॉलेजच्या पाठ्यक्रमामधली पुस्तके होतीच.
तरी पण संगणकाच्या विविधांगी उपयोगांची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध नव्हते असे दिसून आले. 1996 मध्ये नाशिक येथे विभागीय आयुक्त या पदावर रुजू झाल्यावर माझ्या लक्षात आले की तिथे सारणी किंवा तक्ते लेखनासाठी वर्ड हा प्रोग्राम वापरत. म्हणून मी स्वत:च माझे PA मंडळी व कांही इतर कर्मचारी यांचा एक वर्ग घेऊन टाकला व त्यांना सारणीसाठी वर्ड न वापरता एक्सेल का व कसे वापरावे हे शिकवले. हे व असे ट्रेनिंग सेटलमेंट आयुक्त असतांना त्या ऑफिसला व शेती महामंडळातील स्टाफला पण दिले. आता 2009 मध्ये मंत्रालयातील माझ्या सेक्शनमधील लोकांना मला हेच शिकवावे लागते ही विशेष काळजीची बाब आहे. पण ते उत्साहाने शिकल्यानेच मला हे पुस्तक लिहून पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली ही माझ्यापेक्षा त्यांची उपलब्धि म्हणावी लागेल.
तमाम शासकीय कर्मचारी, चाळीशीच्या पुढे गेलेले साहित्यिक, वानप्रस्थांत विरंगुळा शोधणारे ज्येष्ट नागरिक आणि शाळा चुकलेले तरीही नवे तंत्र शिकण्याचे स्वप्न बाळगणारे तरुण नागरिक अशा सर्वांना या पुस्तकात दिलेल्या संगणकाच्या छोटया छोटया युक्त्या निश्चित उपयोगी पडतील. निदान या युक्त्या आपण कधीही वापरू शकू असा आत्मविश्वास निर्माण झाला तरी पुस्तकाचे उद्दिष्ट सफल होईल.
-------------------------------------------------------
Thursday, August 27, 2009
Tuesday, August 25, 2009
भाग 12 अफलातून गणित (and morse code)
भाग 12 (अंसुने टाइप केलेले सगळे अजून दुरुस्तीसाठी वापरलेले नाही शेवट पहावा)
संगणक म्हणजे अफलातून गणित पुस्तकाप्रमाणे तपासले 24-07-2011 later delete portion below double-line after checking whole book
या भागांतील शब्दावली -- decimal system = दशांश पद्धत, binary system = द्व्यंक पद्धत
संगणक म्हणजे एक युक्तिबाज जादूगर असतो, कारण त्याच्याकडे एक मेंदू असतो वगैरे ठीक आहे. पण हा मेंदू येतो कुठून? आणि माणसाकडे मेंदू असतो या वाक्याचा तरी नेमका अर्थ काय? मेंदूमुळे काय होते?
मेंदूमुळे आपल्याला वेगवेगळया वस्तूंचे वेगळेपण ओळखता येते आणि त्यामुळे आपण पुढे काय करावे हे ठरवता येते. वेगवेगळया रंगांचे वेगळेपण, आवाजांचे, स्पर्शांचे, वासांचे आणि चवींचे वेगळेपण, आपण ओळखू शकतो. याहून महत्वाचे म्हणजे मानवी उत्क्रांती होत असतांना माणसाचा मेंदू कधी तरी आकडे मोजायला शिकला. या घटनेला काही हजार वर्ष झाली असावीत. मानवाला आकडयांची संकल्पना सुचली तेव्हा कदाचित हाताची दहा बोटे त्याच्या समोर असतील.
ज्यांनी कुणी अंकांचा शोध लावला त्यांची कल्पना शक्ती अफाटच म्हणावी लागेल. त्यांनी १ ते ९ हे आकडे तर कल्पकतेने मांडलेच शिवाय शून्य या अफलातून आकड्याची पण योजना केली. १ ते ९ हे आकडे एकापेक्षा एक ज्येष्ठ - मोठे असतात, त्यांना एक वर्तुळकारांत मांडायच आणि ९ नंतर एका वर्तुळाची चक्कर मारुन आल्याप्रमाणे पुन: पहिल्या जागेवर यायचं, आणि यावेळी एक वर्तुळ पूर्ण झाल्याचा संकेत म्हणून एकाच्या जोडीला शून्य (0) पण लिहायचं, असा २ आकडी अंक तयार करायचा- या सगळ्याला कांय दिव्य दृष्टीच लागली असेल. मग दुसऱ्या फेरीत पुनः एकावर एक ११, एकावर दोन १२ अस करत करत एकावर नऊ १९ पर्यंत आले की पुढे २ वर्तुळं पूर्ण झाल्याचा संकेत म्हणून दोनवर शून्य २०, त्यापुढे तीन वर शून्य तीस............... ही दिव्य जादू ज्याला सगळ्यांत आधी समजली तो आनंदाने किती नाचला असेल? अथर्व वेदाच्या कांही सूक्तांमधे अशा पद्धतीने आकडे समजून व शिकून घ्यावेत असे वर्णन दिले आहे.
अस जेंव्हा दर नऊ आकड्यांनी एक वर्तुळ पूर्णत्वाच्या जवळ येऊन पुढला आकडा लिहीण्यासाठी शून्य वापरलं जाते, तेव्हां अंक लिहीण्याच्या या पध्दतीला दशमान किंवा दशांश पध्दत असे म्हणतात. एक ते नऊ या आकड्यांना मूळांक असे म्हणतात. आणि हा शोध आपण भारतीयांनी कित्येक हजारो वर्षापूर्वी लावला होता. त्यातूनच पुढे गणित शास्त्र जन्माला आल. गणित किंवा गणना करता येण म्हणजे मेंदूला अफाट चालना.
आता अशा जगाची कल्पना करु या जिथे मूळ आकड्यांपैकी फक्त एक एवढाच माहित आहे. तो झाला की पुढल्या आकड्यासाठी पुन: शून्याची जोड घ्यावी लागते.
अशा जगांत १ हा आपल्या १ सारखाच लिहीला जाईल. पण २ नावांचा आकडा नसेल, त्याऐवजी १ व जोडीला शून्य म्हणजे १० अस लिहाव लागेल. याला दहा अस वाचू नका - गोंधळ होईल, त्याऐवजी एक-शून्य असं वाचा. आता त्यापुढचा आकडा एक-एक असा लिहीला जाईल. आणि त्यापुढचा लिहीण्यासाठी पुन: शून्याची जोड घेऊन एक-शून्य-शून्य असे लिहावे लागेल. अशा जगांत आपले दशांश आकडे कसे लिहीलेले दिसतील ते पाहू या.
१ - १
२ - १०
३ - ११
४ - १००
५ - १०१
६ - ११०
७ - १११
८ - १०००
९ - १००१
१० - १०१०
११ - १०११
१२ - ११००
१३ - ११०१
१४ - १११०
१५ - ११११
१६ - १००००
आकडे मांडायच्या या पद्धतीला द्व्यंक पद्धत (binary) असे म्हणतात.
अशा या आकड्यांनी आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर करता येईल कां? हो करता येतो- आणि ते गणित सोडवतांना धमाल गंमत येते. तसं ते खूप सोपं असत. उदाहरणादाखल एक करुनच पाहूया.
आणि खरोखरच द्व्यंक पद्धतीत २० ही संख्या १०१०० अशी लिहिली जाते व ६ ही संख्या ११० अशी लिहिले जाते.
आपण दशांश पद्धतीची उजळणी केली आणि द्व्यंक पद्धत समजाऊन घेतली. आता फुली-गोळ्याची एक गंमत पाहू या. समजा माझ्याकडे फुली किंवा गोळे असलेली खूप लेबल्स आहेत पण वस्तूंवर एका वेळी एकच लेबल चिकटवायचे आहे, तर या लेबलांकडे बघून मला फक्त x आणि 0 असे दोनच प्रकारचे ढीग तयार करता येतील. मात्र मी एका वेळी दोन लेबलं चिकटवायची असं ठरवलं तर तर मला xx, x0, 0x, 00 असे चार प्रकारचे ढीग मिळतील.
एका वेळी तीन लेबल्स वापरून चालत असेल तर आठ प्रकारचे ढीग मिळतील --
xxx, xx0, x0x, x00, 0xx, 0x0, 00x, 000
याचे सूत्र आपण लिहू शकतो...
एका वेळी 1 लेबल वापरले तर ओळखता येणार -- 2 प्रकार
एका वेळी 2 लेबलं वापरली तर ओळखता येणार -- 4 प्रकार
एका वेळी 3 लेबल वापरली तर ओळखता येणार -- 8 प्रकार
एका वेळी 4 लेबल वापरली तर ओळखता येणार -- 16 प्रकार
एका वेळी 8 लेबल वापरली तर ओळखता येणार -- 256 प्रकार
एका वेळी 16 लेबल वापरली तर ओळखता येणार -- 65536 प्रकार.
या खेळाचा वापर कुठे झाला असेल? तो झाला तार खात्यांत. तो करणारा वैज्ञानिक होता मोर्स. त्याच्या सिंगल-वायर टेलीग्राफी या पद्धतीत एका तारेतून तो दोनच त-हेचे सिग्नल पाठवू शकत होते. एक छोटया वेळेचा आणि एक मोठया वेळेचा, डिड् आणि डाSS ( किंवा डॉट . आणि डॅश - ).
आता फुली-गोळ्याच्या गणितावरून आपण शिकलो की एकेका सिग्नलचा संकेत पाठवायचा म्हटला तर एकूण दोन प्रकारचे संकेत पाठवता येतील. दोन सिग्नलची जोडी करुन संकेत पाठवायच ठरवल तर चार प्रकारचे, तीन सिग्नलचा ग्रुप केला तर आठ प्रकारचे आणि चार सिग्नलचा ग्रुप केला तर सोळा प्रकारचे संकेत पाठवता येतील. 16 + 8 + 4 + 2 = 30 असे 30 प्रकार होऊ शकतात. इंग्रजीमधील अक्षरे फक्त सव्वीस. म्हणजे जर प्रत्येक अक्षराचा एक सांकेतिक ग्रुप ठरवून टाकला तर त्या त्या ग्रुप-सिग्नल वरुन ते ते अक्षर ओळखता येईल. शून्य ते नऊ या आकड्यांसाठी पाच सिग्नलांचे ग्रुप आणि कॉमा, फुलस्टॉप व प्रश्नचिह्नासाठी सहा सिग्नलांचे ग्रुप अशा ते-हेने मोर्स कोडचा जन्म झाला. या पध्दतीने संदेश पाठवण्याची प्रथा इतकी रुजली की, टपाल आणि तार खात्यापैकी तार विभाग फक्त याच कामासाठी होता. दुस-या महायुध्दात तारखात्याच्या या संदेश यंत्रांनी मोठी कामगिरी बजावली.
मोर्स कोडिंग मधे कोणत्या अक्षराला कोणता ग्रुप ठरवला तो तक्ता गंमत म्हणून या लेखाच्या शेवटी दिला आहे.
थोडक्यात दोनच वेगळे सिग्नल हातात असतांना त्यांचे निरनिराळे ग्रुपिंग करून त्यामधून भाषा व्यक्त करण्याची युक्ति माणसाने शोधली. माझ्या मते संगणकाचा शोध लागण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल होते.
याच प्रकारे समजा आपण आठ बल्बांची एक माळ केली. त्यातल्या ज्या बल्ब पर्यंत एक वीजप्रवाह पोचेल तो बल्ब पेटेल, त्याला आपण १ म्हणायचा आणि ज्या बल्बपर्यंत वीज प्रवाह पोचणार नाही तो पेटणार नाही त्याला आपण 0 म्हणायचं. अशी व्यवस्था केली तर त्या माळेतले कोणकोणते बल्ब पेटले, त्या अनुक्रमाला आपण एखाद्या ठराविक अक्षराची खूण किंवा अक्षऱसाखळी असे म्हणू शकतो. मोर्सने त्याच्या कोडचा आवाका चार सिग्नलचा अर्थात तसा लहानच ठेवला होता व फक्त कॅपिटल लेटर्स वापरून काम भागवले होते. त्या ऐवजी आठ बल्बांची माळ केली तर वरील फुली-गोळ्यांच्या गणिताप्रमाणे 256 ग्रुप मिळतील. सगळी इंग्रजी अक्षरे, विराम चिह्न, अंक इत्यादींना एक-एक अनुक्रम बहाल करून टाकता येईल. संगणकाची प्रोसेसर चिप आठ-आठ बल्बांच्या त्या अनुक्रमावरून ओळखेल की नेमके कोणते अक्षर लिहायचे आहे, आणि संगणकाच्या पडद्यावर नेमके तेच अक्षर लिहून दाखवेल. यामधील बल्बची गरज माणसाला, पण यंत्रांना बल्ब नसला, फक्त वीजप्रवाह आहे का नाही तेवढे ओळखता आले तरी पुरते. मग कुठल्या कुठल्या तारेवर वीजप्रवाह आहे ते तपासून संगणक ते अक्षर ओळखणार. अशा आठ संकेतांच्या अक्षरसाखळीला बाइट असं नांव पडले.
आठ-आठ तारांचा जो संच करतात, त्याला BUS म्हणतात. त्यातील प्रत्येक तारेला वेगवेगळा वीजपुरवठा केला जातो. हल्ली आठ तारांच्या ऐवजी सोळा, बत्तीस किंवा चौसष्ट तारांची BUS वापरतात. त्यांना कोटयावधी सिग्नल वेगळेपणाने ओळखू येतात.
अशा रीतीने खूप मोठ्या जागेत, खूप वीज वापरून आणि आठ-आठ वीजप्रवाहांच्या ग्रुपचे संकेत वापरून काम करणारे संगणक 1945 मधेच उपयोगांत आलेले होते. सेमीकण्डक्टरच्या शोधामुळे मोठे वीजप्रवाह बाद करून त्या ऐवजी अतिसूक्ष्म वीजप्रवाहावर चालणारी छोटी यंत्र वापरणं शक्य झालं.
म्हणजे पहा हं, फक्त वीजप्रवाह आहे की नाही एवढ्या वरुन आपण गणिती भाषेला मानवी भाषेत बदलू शकतो . संगणकाकडे मेंदू असतो याचा नेमका अर्थ एवढाच की आठ तारांच्या ग्रुप पैकी कुठे-कुठे वीज आहे किंवा नाही एवढ तपासून तो त्याचा भाषिक अर्थ काढू शकतो. इतकच नाही तर त्यामधील आकडे ओळखून गणित करायचे असेल तर तेही करू शकतो.
इथे चित्र या चित्रातील पेटलेल्या बल्ब वरून आपण हा आकडा लिहू-०१००१०१० याचा गणिती अर्थ ७४ असा होईल पण अक्षर म्हणून समजायचे असेल तर J हे अक्षर असेल.
आकड्यांचा शोध लावून आणि गणित शास्त्रात प्रगती करुन माणसाने प्रगतिचे आतापर्यंतचे टप्पे गाठले. गणित समजणारं, गणित करु शकणारं अस यंत्र असल्यामुळेच संगणकदेखील इतर सर्व यंत्राच्या तुलनेत श्रेष्ठ ठरलेला आहे. या एका गणित विद्येच्या बीजातून मोठा वृक्ष वाढला आणि त्याने संगणकामध्ये अचाट कामं करण्याची अफाट क्षमता निर्माण केली.
=======================================
Morse code
मोर्सची गोष्ट चटका लावून जाणारी आहे. एक उत्कृष्ट चित्रकार अशी ख्याती असलेला हा माणूस वॉशिंग्टन मघे मोठे पेंटिंग करत असतांना बायको दूरच्या गांवी आजाराने एकाकी झुंजत मरण पावते. तेंव्हा इतर सर्व सोडून तो संचारयंत्रणा द्रुतगामी कशी होईल या एकाच ध्येयाने पछाडतो व सन 1825 ते 1840 या काळांत सिंगल-वायर टेलीग्राफी या नावाने एका तारेतून संदेश पाठवण्याचा शोध लावतो. मोर्सच्या लक्षांत आले की तो दोनच त-हेचे सिग्नल पाठवू शकत होते. एक छोटया वेळेचा आणि एक मोठया वेळेचा, डिड् आणि डाSS ( किंवा डॉट . आणि डॅश - ). त्यांचेच ग्रुपिंग करून त्याने मोर्सकोडची रचना केली.
पुढे सन 1890 ते 1900 या काळांत जगदीशचंद्र बोस, ह्यूजेस आणि माकोंनी यांच्या प्रयोगांमधून बिनतारी संदेश यंत्रांचा (वायरलेस टेलीग्राफी) शोध लागला तेव्हा मोर्सचीच कोडिंग पद्धत वापरली
यामधे मोर्सने फक्त कॅपिटल अक्षरेच वापरली हे तुमच्या लक्षांत आले असेलच.
शिवाय इंग्रजीत जास्त वापराव्या लागणा-या अक्षरांना त्याने एक किंवा दोनच सिग्नल वापरले उदा. E साठी . T साठी - तर कमी वापराच्या Z साठी ---- असे विचारपूर्वक ठरवले होते.
मोर्स कोड मध्ये संदेश पाठवणारा व संदेश घेणारा, दोन्हीं माणसे होती त्यामुळे एक अक्षर सांगून संपले, हे दर्शविण्यासाठी पॉज ही तिसरी खूप पण वापरता येत होती. सगणकांत मात्र दोन शब्दांमधील जागा सोडण्यासाठी जो space bar वापरतात त्याला देखील एक सांकेतिक ग्रुप ठरवलेला असतो.
===============================================
कुठल्याही दशांश आकड्याला झटकन द्व्यंक आकडयांत बदलण्याची एक लघू -गुरू पद्धत वैदिक गणितात दिलेली आहे. तर अग्निपुराणांत गंमत म्हणून एक त्रिअंक पद्धत पण मांडून दाखवली आहे. त्यातील आकडे असे दिसतील ---
1
2
10
11
12
20
21
22
100
101
102
110
111
112
120
121
122
200
201
202
210
211
212
220
221
222
1000
वगैरे.
इथे ते १०, १००, १००० हे आकडे आहेत त्यांचे मूल्य दशांश पद्धतीत अनुक्रमे ३, ९ (तीनचा वर्ग), व २७ (तीनचा घन) आहे.
गणिताच्या जगांत अशा गमती जमती खूप आहेत.

वर सांगितलेल्या 8 तारांतील प्रत्येक सिग्नलला बिट म्हणतात, व असे 8 सिग्नल एकत्र केले की त्याला बाईट म्हणतात. 8 बिटचा एकेक बाईट वापरून 256 वेगवेगळ्या अक्षरसाखळ्या बनू शकतात. इंग्रजीचे काम एवढ्याने झकास भागले कारण इंग्रजीत फक्त २६ अक्षरे आहेत. त्यामुळे स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, सर्व विराम चिह्ने, आकडे, ही सगळी काही बसवता आली. इंग्रजी अक्षरासाठी संकेताचे हे प्रमाणकीकरण (standardisation) 1960 मधेच सुरू झालेले होते.
याला ASCII standard असे नांव पडले. इंग्रजीची वर्णमाला ग्रीक, लॅटिन, रोमन असा प्रवास करत तयार झालेली आहे. त्याच वर्णमाला घेतलेल्या आणि रोमनसोबत काही कमी-अधिक विशेष अक्षरखुणा घेतलेल्या भाषा उदा. फ्रेंच, जर्मन, स्वीडीश, इटालियन या सर्व भाषा देखील वरील 256 साखळ्यात बसून गेल्या. पूर्व यूरोपीय देशांत लॅटिनशी साम्य असणारी सिरीलिक वर्णमाला वापरतात, उदा रशियन भाषेसाठी. त्यांची जादा अक्षर-चिह्ने आहेत, ती पण बसवता आली. त्या सर्व अक्षर-चिह्नांचे कोड ठरले. ते आपल्याला सोबतच्या तक्त्यांत दिसतात.
Symb Decimal Binary Symb Decimal Binary
A 65 01000001 a 97 01100001
B 66 01000010 b 98 01100010
C 67 01000011 c 99 01100011
D 68 01000100 d 100 01100100
E 69 01000101 e 101 01100101
F 70 01000110 f 102 01100110
G 71 01000111 g 103 01100111
H 72 01001000 h 104 01101000
I 73 01001001 i 105 01101001
J 74 01001010 j 106 01101010
K 75 01001011 k 107 01101011
L 76 01001100 l 108 01101100
M 77 01001101 m 109 01101101
N 78 01001110 n 110 01101110
O 79 01001111 o 111 01101111
P 80 01010000 p 112 01110000
Q 81 01010001 q 113 01110001
R 82 01010010 r 114 01110010
S 83 01010011 s 115 01110011
T 84 01010100 t 116 01110100
U 85 01010101 u 117 01110101
V 86 01010110 v 118 01110110
W 87 01010111 w 119 01110111
X 88 01011000 x 120 01111000
Y 89 01011001 y 121 01111001
Z 90 01011010 z 122 01111010
वरील सारणीत आपण पहातो की A साठी 01000001 ही अक्षर-साखळी तर a साठी 01100001 ठरली. संगणकाच्या दृष्टीने फक्त उजवीकडून सहाव्या या एकाच ठिकाणी फरक पडला. अक्षर-साखळ्या ठरवतांना हे भान ठेवणे खूप गरजेचे असते. कारण संगणकाला शक्य तितके कमी काम करावे लागले तरच तो कार्यक्षम.
======================================
आठ-बिटची अक्षर-साखळी व आठ तारांची बस यांचे काम छान जुळले पण इतर कित्येक भाषांच्या अक्षर-चिह्नांना आठ-बिटची अक्षर-साखळी पुरत नव्हती. मग 1987 पासून जागतिक स्तरावर सोळा-बिटच्या अक्षर-चिह्नांचा विचार होऊ लागला. युनीकोड हे वेगळे स्टॅण्डर्ड त्यासाठी जास्त उपयोगी ठरत होते. मग जागतिक पातळीवर युनिकोड कन्सोर्शियमची स्थापना होऊन त्यांनी सर्व भाषांतील प्रमाणकांप्रमाणे त्यांच्या कोडिंगचे प्रयत्न सुरू केले.
आता थोडा या भाषांचा विचार करू.
जगांत एकूण चार वर्णमाला आहेत –
1) ब्राह्मी व त्यांतून उद्भवलेल्या वर्णमाला ज्या भारत, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया, तिबेट, श्रीलंका यंथील मूळ भाषांच्या वर्णमाला आहेत.
2) चायनीज, मंगोलियन, जपान व बरेच अंशी कोरियन भाषेची वर्णमाला
3) अरेबिक फारसी, व त्यासदृश भाषांच्या वर्णमाला
4) ग्रीकमधून उद्भवलेल्या किंवा त्या सदृश लॅटिन, रोमन., सिरीलीक इत्यादी यूरोपीय वर्णमाला.
पहिल्या तीन वर्णमालांसाठी २५६ अक्षर-चिह्न अपुरी पडत होती. सोळा-बिटांची अक्षर-साखळी वापरली तर 65536 प्रकारचे संकेत उपलब्ध होऊन अरेबिक व चायनीज वर्णमाला त्यांत बसवता येतात. यासाठी सर्व अरेबिक देशांनी तसेच चीन-जपान-कोरिया या त्रिकुटाने स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या भाषांसाठी युनीकोड स्टॅण्डर्ड कसे असेल ते ठरवले व जगभरातील सर्व संगणकीय मंडळींनी ते स्वीकारले. त्याच वेळी हार्डवेअरमधेही प्रगती होत होती त्यामुळे सोळा तारांची बस उपलब्ध होताच अरेबिक व चीनी वर्णमाला वापरणाऱ्यांचे काम वेगाने वाढत गेले. आता या सर्व भाषांमधे वैयक्तिक वापराप्रमाणेच प्रकाशन क्षेत्रातही झपाटयाने काम होऊ लागले आहे
भारतियांनी हे अजून केलेले नाही कारण इच्छाशक्ति व दूरदृष्टिचा अभाव. यामुळे देश म्हणून आपल्याकडील प्रकाशनकामाची गति मंदावलेलीच रहात आहे.
मात्र जागतिक युनीकोड कन्सॉर्शियमने पुढाकार घेऊन भारतीय भाषांसाठी एका टप्प्यापर्यंत स्टॅण्डर्ड तयार केले. सर्वसामान्यांच्या वापरात असणाऱ्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टम व लीनक्स ऑपरेटिंग सिस्टम या दोघांना ते चालते. आपल्या संगणकात विण्डोज सिस्टम असेल तर प्रत्येक भारतीय भाषेसाठी एका फॉण्टची सोय आहे तर लीनक्स सिस्टम घेतल्यास पाच-सहा सुंदर फॉण्टसेटची सोय आहे. त्यामुळे इंटरनेट, ईमेल, वेबसाईट सारख्या वेब-व्यवहाराला हे फॉण्ट वापरता येतात. पण प्रकाशन व्यवसायासाठी ते पुरेसे नाहीत. त्यासाठी विविध कंपन्यांचे फॉण्टसेट्स असणारी सॉफ्टवेअर विकत घ्यावी लागतात. पण या कंपन्यांचे फॉण्ट्स एकमेकाना किंवा वेब-व्यवहाराला चालत नाहीत. त्यामुळे प्रकाशनाचा वेग मंदच रहातो.
================================================
भारतीय माणूस तसा खूप हुशार पण देशाची प्रगति, दूरदृष्टि इत्यादी गोष्टींचे भान नसलेला. सोळा-बिट साखळ्यांची सोय झाल्याबरोबर चीन-जपान-कोरियाने त्यांच्या भाषांमधली लिप्यात्मक एकता टिकवून धरण्यासाठी एकत्र येऊन खास स्टॅण्डर्ड ठरवले व युनीकोडने तेच स्वीकारावे यासाठी राजकीय पातळीवर आग्रह धरला. अरबी वर्णमालेची एकात्मता टिकवणारे स्टॅण्डर्ड देखील ठरले. भारतीयांनी आपली वैचारिक गोंधळ व फाटाफुटीची परंपरा अजून टिकवून ठेवली आहे. युनीकोड मधे ई-मेलची सोय होत असतानाच दुसरे गोंधळ झाले आहेत. त्याबाबत पुढील एका भागांत वाचू या.
इंग्रजीऐवजी स्वतःची मातृभाषा वापरल्याने संगणकीय प्रगती होते का या प्रश्नाच्या उत्तरासाठी ही आकडेवारी पहा आणि ही समजूत चुकीची आहे हे ओळखून घ्या कारण चीनची संगणक-साक्षरता इंग्रजीसाठी अडून राहिली नाही.
2004 साक्षरता इंग्रजी-साक्षरता संगणक-साक्षरता
भारत 52 टक्के 25 टक्के 09 टक्के
चीन 88 टक्के 11 टक्के 53 टक्के
--------------------------------------------------------------------------------
==========================================================
DELETING BELOW MENTIONED PORTION HERE AND SHIFTING --(NOT IN TOTO) TO CH 29
--------------------------------------------------------------------------
भारतीय माणूस तसा खूप हुशार पण दूरदृष्टि नसलेला. त्यामुळे १९८५ ते २०१६ या काळात काय गोंधळ झाले व अजूनही चालू आहेत ते पाहू या. 1988 मधे भारत सरकारचा इलेक्ट्रॉनिक्स विभाग व सी-डॅक यांनी भारतीय अक्षर-साखळींसाठी, आठ-बिट सिस्टम चे ISCII हे स्टॅण्डर्ड ठरवण्याची कमिटी स्थापन केली. संस्कृत वर्णमाला ध्वनी-संकेतांवर आधारित आहे. याच संकल्पनेचा उपयोग करून सर्व भारतीय भाषांसाठी एकच असे उपयुक्त कोड तयार झाले, शिवाय त्याच ध्वनी-संकेतांवर आधारित व शिकायला खूप सोपा असा इन्सक्रिप्ट की-बोर्ड डिझाइन केला गेला. प्रयोगादाखल रेल्वेच्या डब्यावरील रिझर्वेशन चार्टचा एकच मजकूर सर्व भारतीय लिप्यांमधे देऊन हे सोपे व चांगले असल्याचे दाखवून दिले. हे स्टॅण्डर्ड प्रयत्नपूर्वक आखलेले असून त्याला 1991 मधे BIS (Bureau of Indian Standards ) ची मान्यता पण मिळाली. ISCII स्टॅण्डर्ड व इन्सक्रिप्ट-कीबोर्डचे डिझाइन या सी-डॅकच्या दोन मोठ्या उपलब्धी होत्या.
पण या आरंभिक उत्तम कामानंतर सी-डॅकचे धोरण बदलले. संपूर्ण देशााला एक स्टॅण्डर्ड असण्याचे महत्व त्यांना समजलेच नाही. संगणकीय फॉण्ट व भाषा सॉफ्ट बनवणार्या कंपन्यांनी हेच स्टॅण्डर्ड वापरावे किंवाअशी सक्ती कोणीच केली नाही. याच सुमारास संगणकावर मराठी लेखनासाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कित्येक कंपन्या निघाल्या. त्या सर्व एकमेकांना स्पर्धा करीत राहिल्याने त्यांनी स्टॅण्डर्ड कोड न वापरता स्वतःचे टॉपसीक्रेट कोड बनवले. हे करताना कारण मात्र असे दिले गेले की सर्व भारतीय भाषा पूर्णत्वाने लिहिता येण्यासाठी २५६ संकेतचिह्न अपुरी आहेत. म्हणून आमच्या ग्राहकांच्या गरजेनुसार आम्ही वेगळे कोड वापरू. मुख्य म्हणजे केंद्र सरकारची कंपनी असूनही सी-डॅक पण त्या स्पर्धेत उतरली. त्यांनीही स्वतः केलेले स्टॅण्डर्ड कोड न वापरता वेगळे, टॉपसीक्रेट कोड वापरले. स्टॅण्डर्ड कोड वापरले तर ते सर्वांना खुले व उपलब्ध असते. तसे न केल्यामुळे संगणकीय मजकुराच्या देवाण-घेवाणीत कधीच एकरूपता आली नाही. "या हृदयीचे त्या हृदयी घातले" हा ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्या मराठीत "या हृदयीचे त्या हृदयी कळोच नये" असा प्रकार झाला, प्रत्येक सॉफ्टवेअर कंपनी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे अक्षर-आखणी करत होती. शिवाय या सर्वांनी सॉफ्टवेअरची किंमतही भरमसाठ म्हणजे रू.15000 च्या पुढे ठेवली. त्याचवेळी इंग्रजी लेखनाचे सॉफ्टवेअर मात्र संगणकाचा घटक म्हणून फुकट किंवा अत्यल्प किंमतीत मिळत. अशा प्रकारे बाजाराच्या स्पर्धेत भाषेची समृध्दी गौण ठरली, आणि इंग्रजीच्या तुलनेत मराठीचा वापर नगण्यच राहिला. २००५ नंतर ही परिस्थिती सुधारण्याच्या नावाखाली सरकारने व सीडॅकने इंग्रजीचे वर्चस्व अधिकच वाढेल असे नवे धोरण अमलात आणले.
संगणक वापरायला इंग्रजी यावेच लागते ही सामान्य माणसाची समजूत झाली त्याचे हे मोठे कारण होते. इतके महागडे सॉफटवेअर निव्वळ भाषाप्रेमापोटी घ्यावे असे सामान्य माणसाला कसे वाटणार किंवा कसे परवडणार? शिवाय इतके करुनही जे लिहिले ते दुस-या संगणकावर वाचता येत नाही. तिथे देखील तेच महागडे सॉफटवेअर घेतलेले नसेल तर आधीच्या संगणकावरील अक्षरे तिथे चौकोन, फुल्या, असे कांहीतरी junk (जंक) रूपांत दिसतात. पुढे ईमेल आले त्यावरही हे मराठी लेखन पाठवणे अशक्य झाले, तिथेही ते जंक दिसू लागले. हा गोंधळ आजही कायम आहे.
1988-95 या काळांत विण्डोज सारखी प्रगत ऑपरेटिंग सिस्टम किंवा ईमेल अजून आलेले नव्हते. तरीही भारतीयांनी 256 अक्षर-साखळ्यामधे आपल्या भाषा बसवल्या. ISCII standard व इन्सक्रिप्ट-अनुक्रम तयार केले. या दोन उपलब्धी होत्या. इतर टंक कंपन्यांनी केलेले कामही उपलब्धीच होती. कारण त्यांच्यामुळे भारतांतील संगणक-साक्षरता इतर देशांच्या तुलनेत जास्त वाढत होती. मात्र कोड गौप्य आणि महाग ठेवण्याचा दुराग्रह वाढतच राहीला तो या सर्व उपलब्धींवर पाणी ओतत होता. एकाने केलेल्या कामाचा उपयोग दुस-याला होत नव्हता, उलट त्याला कां म्हणून उपयोग करू द्यायचा अशी वृत्ती होती. सर्वांचे लँग्वेज कोड एकच असते तर हा उपयोग झाला असताच शिवाय तेच लँग्वेज कोड ऑपरेटिंग सिस्टमचा हिस्सा बनून मिळावा असा आग्रह मायक्रोसॉफ्टकडे संगठित रीत्या करता आला असता. त्या ऐवजी भारतीयांना दूरगामी चिंतन करता येत नाही हेच चित्र उभे रहात होते.
1995 च्या पुढे जागतिक पातळीवर युनिकोड सारखे 65536 संकेतचिह्न उपलब्ध असणारे स्टॅण्डर्ड टप्प्याटप्प्याने येऊ लागले त्यावर अरेबिक व चीनीसकट इतर भाषांनी आपल्या अक्षर-साखळ्यांचे प्रमाणकीकरण करून घेऊन त्याची सुसूत्रता व देवाणघेवाण वेगाने वाढू लागली. भारतीयांनी मात्र कित्येक घोळ चालू ठेऊन आपल्या वर्णमालेसाठी अजूनही एका स्टॅण्डर्डचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे आजही आपल्याकडे गद्यसंकलनाची एकात्मता आली नाही. 1988-95 या काळांत मिळालेला पुढाकार मागे पडून व सुरुवातीला संगणक-साक्षरतेबाबत इतरांच्या पुढे राहूनही कामाची सुसूत्रता, देवाणघेवाण याबाबतीत आपण सातत्याने मागे पडत चाललो आहोत.
अजूनही महाराष्ट्रात विविध सॉफ्टवेअर पुरवणार्या कंपन्या व स्वत: सी-डॅक त्यांचेच गुप्त कोड भरमसाठ किंमतीला विकत आहेत आणि मराठीचे नुकसान करत आहेत. युनीकोड स्टॅण्डर्ड वापरा असा सरकारी आदेश असूनही तसेच युनीकोड स्टॅण्डर्ड वापरणा-या लीनक्ससारख्या प्रगत ऑपरेटिंग सिस्टम मोफत उपलब्ध असूनही नॉन-स्टॅण्डर्ड उत्पादने चालू आहेत. हाच प्रकार सर्व राज्यांत व केंद्रांतही चालू आहे.
खरे तर सी-डॅकसकट सर्वांनी आतापर्यंत विकसित केलेले शंभरएक फॉण्टचे कोड बदलून सर्व फॉण्टसाठी युनीकोड स्टॅण्डर्डचे कोड आणावे, ते कोड सर्वांना अनिर्बंध व फुकट वापरू द्यावे, व इथून पुढे कुठलेही नवे फॉण्ट विकसित करतांना युनिकोड स्टॅण्डर्ड वापरावे हे तीन उपाय राबवले तर भारतीय वाङ्मयाची झेप तत्काळ कितीतरी पटींनी वाढेल. त्याच जोडीला ज्यांनी आतापर्यंत इतर सॉफ्टवेअर वापरून हजारो पाने लिहून काढली आहेत ती नव्या युनीकोड मधे बदलून घेण्याची सोयही उपलब्ध व्हावी (सध्या टीबीआयएल व प्रखर इत्यादी कनव्हर्टर्समुळे ही सोय झालेली आहे.)
नोंदीसाठी नोंद घ्यायला हरकत नाही की स्पर्धेत राहून एकही फॉण्ट फुकट न देणा-या सी-डॅकने 1993-97 या काळांत त्यांच्या संकेतस्थळावरून फक्त एका पानापुरते लीपलाईट हे सॉफ्टवेअर सर्व भारतीय लिपींसाठी फ्री-डाउनलोड उपलब्ध केले होते व त्यामुळे थोडे काम होत होते. इन्सक्रिप्ट आधारित असल्याने ते सोपे होते. पण मग ती सोय काढून घेऊन इंग्रजी माध्यमातून फोनेटिकचा वापर करून लिहिल्यावर पडद्यावर मराठीत मजकूर दिसेल असे एक सॉफ्टवेअर फुकट पुरवले. "तुमची कोणतीही भारतीय भाषा असो, इंग्रजीत टायपिंग करा, पडद्यावर तुमच्या लिपीत दिसेल" असे ते सॉफ्टवेअर होते. त्यामुळे "आपली लिपी हवीच कशाला? आहे सोय तर इंग्रजी टायपिंग वापरा की" असाही एक मतप्रवाह सुरू झाला. त्यामुळे पुढील दहा वर्षांत आपल्या भारतीय लिप्या संगणकावरून हरवण्याचा धोका निर्माण झाला आहे. एक वेगळा धोकाही ओळखायला हवा. युनिकोड मधे इतर चांगले घडत असले तरी पण त्यांत भारतीय लिपींची एकात्मता, जो आपल्या लिपींचा खरा आधार आहे व जो सी-डॅकने पूर्वी इन्सक्रिप्टमधे जपला होता तोच काढून टाकला आहे. यावरही आपण तत्काळ पाउल उचलण्याची गरज आहे.
नुकतेच (2009) महाराष्ट्र शासनाच्या आग्रहावरून सी-डॅकने पुन्हा एकदा लीपलाईटची फ्री-डाउनलोड सोय फक्त मराठीपुरती उपलब्ध केली आहे. युनीकोड उपलब्ध होईपर्यंत तो एक बरा पर्याय आहे. परंतू ही बातमी त्यांच्या संकेतस्थळाच्या मुख्य पानावर ठेवलेली नाही तसेच ही सोय गॅरंटीने कधीपर्यंत राहील आणि इतर भारतीय भाषांसाठी कां नाही हे प्रश्न उरतातच.
यावर भारतीयता जपू पहाणा-या सर्वच भाषाप्रेमींनी जागरूकता दाखवणे गरजेचे आहे.
-------------------------------------------------------------------

चीनी लोकांनी
इंग्रजी साक्षरतेच्या मागे न लागता आधी चीनी भाषेतून संगणक साक्षरता वाढवली .मग
आता आपण त्यांच्यापेक्षा मागे रहातो असा गळा काढण्यांत कांय
अर्थ?

Typed by ASHU
ही दृष्टि येत नाही तोपर्यत
भारतीय भाषांचे दुर्दैव कायम रहाणार . भारतात संगणक हा फक्त उच्चशिक्षितांनी व
इंग्रजी भाषेतूनच वापरण्यासाठी आहे अशी भ्रामक समजूत पसरली. त्यामुळे सामान्य
जनतेने या तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष केले. भारतीय भाषासाठी संगणकाचे सॉफ्टवेअर तयार
करणा-या कंपन्यांना स्वतःचा माल खपावा यासाठी स्टॅण्डर्ड नको होत . सीडॅक मधील
वैज्ञानिकांनी
१६तारांची BUS गृहीत धरुन जे स्टॅण्डर्ड तयार केले ते BIS व युनीकोड
कन्सॉर्शियलने मान्य करूनही
त्यांच्याकडे पडून राहिले कारण खुद्द सीडॅकनेच त्याचा पाठपुरावा करायचे
सोडून स्वतःचे वेगळे गुप्त कोडिंग असलेले सॉफ्टवेअर बाजारात उतरवले . सरकारातील
व्यवहार इंग्रजीत असल्याने तिथले अधिकारीही इकडे लक्ष देईनात . त्यामुळे एकीकडे
भाषिक सॉफ्टवेअर विकणा-या कोणत्याही कंपनीला
स्टॅण्डडीयझेशन नको होते.
दुसरीकडे ज्या मायक्रोसॉफ्ट
कंपनीच्या हाती संपूर्ण भारतीय बाजार स्वारस्य नव्हते तिलाही यात ५६
दुसरीकडे भारत सरकारला
भाषिक स्टॅडर्डायझेशनची फिकिर किंवा
दृष्टी नव्हती .तिसरीकडे५६
१९९५-९६मधे लीनक्स ऑपरेटिंग
सिस्टम ही मायक्रोसॉफ्टला टक्कर देणारी नवी सिस्टम आल्यावर चित्र थोडेसे पालटले
आता......५६
तरीही जोपर्यत भारत सरकारला ५६
आणि दूरदृष्टि राष्ट्रधर्म
अजिवात न जाणणारा५६
स्वतःठरवून युनिकोडला तेच
स्वीकारायला लावले ५६
ठेवत रिकवून ठेवले आहेत५६
यासाठी योग्य तो जागतिक दबाव
आणला५६
वेगवेगळ्या भाषा बोलणा-या तमाम
मुस्लिम देशांनी५६
भाग १९ - संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?
भाग १९ (पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणक म्हणजे आहे तरी कुणासाठी?
hrishi oked on 31-8-09
संगणकाचा वापर कोण कोण कशासाठी करतात ? अगदी अत्युच्च पातळीपासून आपण याचा वेध घेतला तर संगणकाचा वापर वैज्ञानिक, उद्योग-जग, व्यापारी आणि बँका, लेखन-प्रकाशन-व्यवसायिक, शासकीय कार्यालये, माहितीची देवाण-घेणार करणारे, सर्व क्षेत्रातील डिझायनर्स, सांख्यिकी तज्ज्ञ, अणि सामान्य माणसाच्या सामान्य व्यवहारांसाठी, अशा वेगवेगळ्या पातळींवर करतात. पूर्वी यांतील प्रत्येक कामाला संगणक तज्ज्ञाची गरज असायची. आता ऐंशी टक्के कामांना तज्ज्ञाची गरज माही. संगणक क्षेत्रातील हा फार मोठा बदल खूपजणांना, विशेषतः चाळीशी ओलांडून गेलेल्या लोकांना माहित नाही.
संगणकाचा वापर असा करतात --
(1) संगणक वापरामधे सर्वात वरची पातळी वैज्ञानिकांची. संगणकाला सध्या कांय कांय येतं व त्यापेक्षा जास्त गोष्टी त्याच्या मेंदूत कशा ठासल्या जातील हा विचार संगणक क्षेत्रातील शोध-वैज्ञानिक सतत करत असतात. त्यांना सुचलेल्या संकल्पना तपासून पाहण्यासाठी संगणकाचा वापर करतात.
(2) इतर वैज्ञानिक संगणकाचा वापर त्यांना करण्याच्या इतर प्रयोगांसाठी, गणित करणे, गणिती प्रमेय सोडवणे यासाठी करतात.
(3) सर्व वैज्ञानिक प्रयोग शाळांमध्ये जी जी उपकरण येतात व त्यांतून जे जे काम होत असेल, ते ते हल्ली संगणकावर साठवून ठेवणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी कित्येक उपकरणांतच संगणक हा अविभाज्य अंग बनून गेलेला आहे. एक्स-रे मशीन, इलेक्ट्रॉन बीम, इलेक्ट्रान मायक्रोस्कोप, आयन बीम, स्पेक्ट्रोस्कोप असे कुठलेही वैज्ञानिक उपकरण असेल तरी त्यावर हल्ली संगणक जोडलेला असतो. त्यामुळे मशिनच्या आंत होणारे काम क्षणोक्षणी संगणकावर टिपले जाऊन त्यांचा अभ्यास जास्त चांगल्या पध्दतीने केला जातो. अशा मशीन्सच्या अभावी आपल्या देशांतले शोधकाम मागे पडत चालले आहे.
(4) अत्यंत काटेकोरपणे टाईम कण्ट्रोल आणि प्रोसेस कण्ट्रोल करायची असेल तेव्हा संगणकाचा वापर करतात. उदाहरणार्थ अवकाशांत यान किंवा सॅटेलाईट सोडायचे आहे ते बरोबर ठरल्यावेळी, ठरल्या दिशेलाच उडेल यासाठी लागणारा जबरदस्त कण्ट्रोल फक्त संगणकाच्या माध्यमातून करता येतो. तीच गोष्ट प्रोसेस कण्ट्रोलची. अणु ऊर्जा, पेट्रोलियम कारखाने, साखर कारखाने यासारखे रासायनिक उत्पादनाचे कारखाने त्यांच्याकडील रासायनिक प्रक्रिया विशिष्ट गतीने व पध्दतीने चालत रहावी म्हणून कण्ट्रोलसाठी संगणकाचा वापर करतात.
(5) वैद्यकीय चाचण्या आणि शल्यक्रियांसाठी संगणकाचा फार मोठा वापर होतो- तपासणीमध्ये जे जे दिसेल ते सर्व इलेक्ट्रानिक भाषेत संगणकाकडे साठवले जाते व हे पर्मनंट रेकॉर्ड होऊन रहाते. उदाहरणार्थ- सोनोग्राफीमध्ये ध्वनिलहरींच्या माध्यमातून जे दृश्य तयार झाले आहे ते, किंवा हल्ली कित्येक ऑपरेशन्स करतांना दुर्बिणीच्या सहाय्याने त्या त्या अवयवांचे मोठे प्रतिबिंब तयार केले जाते ते, प्रत्यक्ष ऑपरेशन होताना व्हिडिओ कॅमेराने टिपलेली चित्रफीत किंवा साधे फोटो हे सर्व संगणंकावर उतरवून घेतले जाते. त्यामुळे तपासणी करणा-या डॉक्टरची सोय होते. तसेच त्या त्या व्यक्तीकडे कायमपणे रेकॉर्ड उपलब्ध रहाते.
(6) सिम्युलेशन टेक्नॉलॉजीमध्ये संगणकामुळे मोठी क्रांतीच आली असे म्हणावे लागेल. त्याच प्रमाणे, आर्किटेक्चर मध्येही त्रिमितीय घरे, वस्तू इत्यादींचे मॉडेल बनवणे, ती वेगवेगळया अंगांनी फिरवून बघणे वगैरे गोष्टी संगणकाच्या माध्यमातून करता येतात. त्याच प्रमाणे नकाशे तयार करणे आणि ते एका स्केलवरुन दुस-या स्केलवर टाकण्याचे काम संगणक बिनचूकपणे अगदी थोडक्या वेळांत करु शकतो. त्यासाठी एरवी कित्येक महिने लागू शकतात. डिझाइन्स साठी संगणक खूपच उपयोगी आहे, मग ते चित्रकारितेमधील डिझाइन असो अगर अर्किटेक्टने करायचे असो. बिल्डिंगचे त्रिमितीय मॉडेल असो अगर त्सुनामीच्या लाटा कशा येतात ते दाखविणारे सिम्युलेशन डिझाइन असो
(7) ऍनिमेशन तयार करणे हे संगणकामुळे कित्येक पटींनी सोपे झाले आहे. एकूणच फिल्म इंडस्ट्री मधे संगणकाचे नाना प्रकारचे उपयोग आहेत.
(8) बँकांचे व्यवहार, उलाढाली, शेअर्स ही कामे संगणकामार्फत करतात.
(9) सर्व सांख्यिकी माहितीच्या मांडणीसाठी व त्यांतून निष्कर्ष काढण्यासाठी संगणक आवश्यक असतो.
(10) संगणकांचा खूप मोठा उपयोग म्हणजे संगणकांसाठी नवे नवे सॉफ्टवेअर्स बनवणे हा पण आहे. या अविष्कारांची सोय आणि सुरुवात ज्यांच्याकडे आहे त्यांनाच पुढचे अविष्कार करणे शक्य होणार आहे.
आपल्या देशांत संगणक उद्योग खूप वाढलेला आहे. पण त्यातील बहुतेक कंपन्या संगणकांचे तंत्र वापरुन लोकांची कामे करणा-या कंपन्या आहेत. नवीन अविष्कार करणा-या किंवा तशी सोय असणा-या कंपन्या खूपच कमी आहेत. जवळ जवळ नाहीच. आपले सरकार आणि विचारवंत लोकच या मुद्दयांचा परामर्श घेण्याचा विचार करतील अशी आशा बाळगू या.
पण या सर्व उपयोगांना मागे टाकेल असा संगणकाचा सर्वमान्य उपयोग म्हणजे कोट्यावधी सामान्य माणसांनी दैनंदिन व्यवहारांत संगणक वापरून स्वतःची करून घेतलेली सोय. किंवा शासन व्यवहारामधून सामान्य माणसाला दिल्या जाणा-या सोईंसाठी संगणकाचा वापर. कारण या दोन्ही प्रकारच्या लोकांना संगणकाचे कुठलेही शास्त्र न शिकता त्याचा उत्तम वापर करणे शक्य आहे.
------------------------------------------------------------
शासकीय कर्मचा-यांना संगणकाबाबत कांय कांय यायला हवे ---
1) संगणक सुरु व बंद करणे
2) नवीन संगणक बसवतांना त्याच्या कारभारी डब्याच्या बाहेरील हार्डवेअरचे वेगवेगळे पार्ट जोडणे- उदा. प्रिंटर, की बोर्ड, माऊस, मोडेम, स्पीकर, पेनड्राईव्ह इत्यादी.
3) मायक्रोसॉफट ऑफीस किंवा ओपन ऑफीस वापरुन वर्ड, एक्सेल, ईमेल, पॉवर पॉईंट, मेल मर्ज, हे पाच प्रोग्राम वापरता येणे.
4) संगणकातील - फायलींवर सेव्ह, सेव्ह ऍज, कॉपी, कट, पेस्ट, प्रिंट, (एडिट-?), डिलीट, पीडीएफ, झिप, अनझिप, वेबपेज व जीपेग असे संस्कार करता येणे.
5) इंटरनेट सुरू करून गूगल सर्च वापरणे.
6) असलेल्या वेब साईटवर एखादे नवे पान अपलोड करणे.
7) वेब-साइट वरुन माहिती डाऊन लोड करणे.
8) जमल्यास वेब साइट अथवा ब्लॉग बनवणे, पेज अपडेटिंग करणे
9) एक्सेल वापरुन साठवलेल्या माहितीवर सॉर्ट, फिल्टर, चार्ट आणि ग्राफ हे संस्कार करुन त्याद्बारे साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करणे व त्यांतून उपयोगी निष्कर्ष काढून शासनाचे ध्येयधोरण त्यानुरुप ठरवणे.
१०) मायक्रोसॉफट ऑफीस मधील पेंट या सॉप्टवेअरची तोंडओळख व त्या आधारे प्रिंट स्क्रीन या सुविधेचा वापर.
त्यांना हे सर्व सुगमतेने (युक्त्या वापरुन) शिकता यावे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
या खेरीज वरिष्ठ अधिका-यांना हेही यायला हवे ---
1) संगणक किंवा सॉफटवेर विकत घेतांना तसेच वेब साईट तयार करणे, मेनटेन करणे तसेच संगणकाची तांत्रिक सेवा पुरवणारे इत्यादी सर्वांची कॉण्ट्रॅक्ट ठरवणे, आपली निकड काय आहे ते ओळखणे इ.
2) E-governece च्या उद्देशाने आपल्या विभागाचे कार्यक्रम लोकांपर्यन्त पोचावेत यासाठी कोणी कोणी काय काम करावे ते सांगणारे कण्टेण्ट मॅनेजमेट डॉक्यूमेंटेशन व फॉर्मांचे डिझाईन.
3) शासकीय योजनांचे संगणक आधारित मॉनिटरिंग करणे.
---------------------------------------------------------------
याबद्दल ---?
3) शासनात संगणक किती ?
4) शासनाचे e-governance
5) ERP ?

Subscribe to:
Posts (Atom)