Thursday, March 12, 2009

भाग -- 7 टाइप रायटर

१४-०६-२०१६ रोजी नव्या प्रतीसाठी एडिटिंग केले-----


भाग -- 7
संगणक म्हणजे टाइप रायटर
शिका सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन
या भागांतील शब्दावली --
KEY = कुंजी,
टाइपरायटर = टंकयंत्र,
टायपिंग = टंकन,
टायपिस्ट = टंकलेखक
फॉण्ट = वर्णाकृती,
फॉण्ट सेट = वर्णाकृतीसंच,
Keyboard = कळपाटी, कळफलक,
की-ले-आउट = अक्षर अनुक्रम, वर्णक्रम
इंट्रानेट = अन्तर्जाल,
इंटरनेट = महाजाल,
फाईल = धारिका
फोल्डर = संचिका

संगणकाचा सर्वांत जास्त उपयोग टाइपरायटर (टंकयंत्र) सारखा केला जातो. पण संगणकावरील टायपिंग म्हणजे टंकयंत्रापेक्षा दहा पट सोपे आणि शंभर पट उठावदार.

टाइपरायटरचा अविष्कार व उपयोग 1873 पासून सुरु झाला तो थेट १९८०-१९९० पर्यंत. या यंत्रामध्ये एक की-बोर्ड होता. त्यातील एक खीळ (Key) दाबली की एक काडी उचलली जायची आणी पुढे अडकवून ठेवलेल्या कागदावर आपटायची. काडीवर ते ते अक्षर उलटे कोरलेले असायचे. कागद आणि काडीच्या मध्ये एक शाईने भरलेली रिबीन असायची. काडी कागदावर आपटली की शाईमुळे कागदावर ते ते अक्षर उमटायचे. त्याचवेळी शाईची रिबिन आणि कागद थोडे पुढे सरकायचे, म्हणजे दुसरं अक्षर लिहून घेण्यासाठी दोन्ही तयार. इंग्लीश की-बोर्डावर तीन ओळीत A ते Z अक्षरं, चौथ्या ओळीत आकडे, इतर कांही खुणा (उदा. +, =) वगैरे असत. मात्र A ते Z ही अक्षरे अनुक्रमाने नसत. कोणते अक्षर जास्त वापरावे लागते, त्यासाठी कोणते बोट योग्य, कोणती अक्षरे एकापाठोपाठ वापरावी लागतात, त्यांच्या काड्या गुंतू नयेत, वगैरे बराच काथ्याकूट आणि विचार करुन, दाही बोटांचा वापर करुन टायपिंग सोईचे होईल अशा पध्दतीने की-बोर्ड वरील ले-आउट म्हमजे अक्षरांचा अनुक्रम ठरवला होता. सर्वांत जास्त वापरला जाणारा की-बोर्ड अनुक्रम म्हणजे क्वेर्टी - qwerty (ज्यात वरच्या ओळीतील डावीकडची पहिली सहा अक्षरे ही अनुक्रमे q,w,e,r,t,y आहेत असा) पण इतरही कांही वेगळे अनुक्रम असणारे की-बोर्ड वापरात होते.

भारतात इंग्लीश टंकयंत्रांमधे जवळ जवळ शंभर ट्क्के qwerty अनुक्रमच वापरात होता. संगणकाच्या की-बोर्डवर देखील हाच अनुक्रम ठेवल्यामुळे भारतात विकल्या जाणा-या संगणकावर इंग्लिश टायपिंगसाठी qwerty हाच अनुक्रम दिसतो. त्यामुळे ज्यांना टायपिंग येत होते, त्यांची खूप खूप सोय झाली. थोडक्यात ऑफीसमध्ये काम करणा-या तमाम टंकलेखकांची. संगणक संस्कृती वाढली. तसेच बॉस देखील संगणकावर कामचलाऊ इंग्लिश टायपिंग शिकून घेऊ लागले.

जुन्याकाळी टंकलेखन तसेच छपाईसाठी वेगवेगळ्या वळणांच्या अक्षरांचे सेट तयार करण्यांत आले. त्यांना फॉण्ट म्हणतात. मराठीत आपण वर्णाकृती म्हणू शकतो. त्या त्या वळणांना विशिष्ट नांव देण्यांत आले. उदा. इंग्लिशमधील एरियल, टाईम्स न्यू रोमन, कूरियर हे फॉण्ट सगळ्या टंकलेखकांच्या परिचयाचे आहेत.

टाइपरायटर वर टंकलेखन करतांना आपल्याला फॉण्ट बदलता येत नसे. हवेच असेल तर वेगळ्या वळणाचा दुसरा टाइपरायटर विकत घ्यावा लागे.

पण संगणक आल्यावर त्या काड्या, ती शाईची रिबिन हा सर्व प्रकार संपला. एका विशिष्ट बटणावर जाऊन संगणकाला फॉण्टचे नांव सांगितले की तो त्या फॉण्टमध्ये लिहायला सुरुवात करतो. आपण मध्येच कांही परिच्छेद निराळ्या फॉण्ट मधे लिहू शकतो, कांही अक्षरांचा आकार लहान-मोठा, जास्त गडद किंवा रंगीतही करू शकतो. किंवा त्यांना रंगीत बॅकग्राउंड देऊ शकतो. म्हणूनच संगणकावरील टायपिंग टंकयंत्रापेक्षा शंभर पट उठावदार होऊ शकते. हे झालं इंग्रजीच्या टायपिंग बद्दल.

मराठीत सुध्दा टंकयंत्राच्या की-बोर्डवरील अक्षरे वर्णक्रमानुसार मुळीच नव्हती. पण जो कांही अक्षर-अनुक्रम होता तो सगळ्या टंकलेखकांना ओळखीचा होता. म्हणून संगणकावर मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर बनविणा-यांनी तोच अक्षर-अनुक्रम संगणकासाठी पण कायम ठेवला जेणेकरुन पूर्वीपासून टंकयंत्रावर टाइप करत होते त्यांची सोय झाली. या अक्षर अनुक्रमाला मराठी टाइपरायटर किंवा गोदरेज अनुक्रम असे म्हणता येईल कारण मराठीसाठी बहुतांशी गोदरेज टंकयंत्र वापरांत होते. शिवाय संगणकावरील लेखन उठावदार दिसण्यासाठी मराठीत सुध्दा निरनिराळ्या वळणांचे खूपसे फॉण्ट-सेट (म्हणजे वर्णाकृतीसंच) उपलब्ध झाले. हे लक्षांत घेऊ या की अक्षरांचे एकसारखे वळण ठरवून तसा नवा फॉण्ट-सेट बनवणे हे कलाकारीचे काम असते. त्यासाठी उत्तम कॅलिग्राफर्सची गरज असते.

पण सॉफ्टवेअर बनविणाऱ्यांनी आणखीन एक गंमत केली. त्यांनी की-बोर्डासाठी इन्स्क्रिप्ट नावांचा एक आणि फोनेटिक नांवाचा एक असे दोन ज्यादा अक्षर-अनुक्रम तयार केले. एका विशिष्ट बटणावर जाउन संगणकाला सांगता येते की तुम्हांला कुठला अनुक्रम वापरायचा आहे.

इनस्क्रिप्ट अनुक्रम फारच छान आहे. त्यांत चार गंमती आहेत. पहिली गंमत अशी की आपण मुळाक्षरे शिकतो - क,ख,ग.......क्ष,ज्ञ. तोच अनुक्रम कायम ठेवला. त्यामुळे की-बोर्डावरचा अनुक्रम लक्षांत ठेवायची कटकट संपली. नाहीतर पूर्वी टंकयंत्रावरचा अनुक्रम डोक्यांत पक्का बसावा म्हणून सहा-आठ महिने टायपिंग क्लास लावून प्रॅक्टीस करावी लागत असे, परीक्षा द्यावी लागत असे. आता संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग समजून डोक्यांत बसायला दहा मिनिटे व सवय आणी वेगासाठी थोडे दिवस पुरेसे आहेत . कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी न शिकावे लागता संगणकावर मराठी टंकन शिकून घेण्याची हमखास पद्धत म्हणजे इन्स्क्रिप्ट.

दुसरी गंमत म्हणजे हा अनुक्रम असा बसवला आहे की सगळे स्वर, कान्हा, मात्रा हे सर्व डावीकडे आहेत - ती डाव्या बोटानी व सगळी व्यंजने उजव्या बाजूला आहेत - ती उजव्या बोटांनी टाईप करायची. मराठी भाषेतल्या आपल्या सगळ्या शब्दात व्यंजन आणि स्वर गळ्यांत गळा घालून असतात. या इनस्क्रिप्ट की-बोर्डवर टाईप करतांना आपण सुध्दा उजव बोट, डावं बोट अस टाईप करतो - त्यामुळे तबल्याप्रमाणे आपोआप एक प्रकारची लय निर्माण होते आणि टायपिंग सोप्प होऊन जातं.

इनस्क्रिप्टची तिसरी गंमत अशी की सर्व भारतीय भाषांची लिपी वेगळी असली तरी वर्णमाला सारखी आहे. म्हणून सगळ्या भाषांसाठी सारखाच अनुक्रम ठेवला आहे. आपण मराठीत कांहीही लिहायची प्रॅक्टीस करायची आणि कुणावरही इम्प्रेशन मारायच- बघ हं, मी आता बंगालीत टाइप करुन दाखवीन (किंवा कन्नड, तामिळ, गुजराथी -- कांहीही). शिवाय एकदा मराठीत टाईप करुन झाले असले तरी एक बटण दाबून संगणकाला सांगता येते- बाबा रे, हे लिहिलेलं सर्व कानडी लिपीत बदलून दे- की संगणक ते पण करुन टाकतो. ज्यांना देशप्रेम, भारतीय एकात्मता टिकवण्याची ऊर्मी वगैरे आहेत त्यांनी ही इन्स्क्रिप्ट नामक युक्ती नक्की समजून घेऊन तिचा आग्रह धरावा.

संगणक नव्हते - टंकयंत्र होती तेंव्हा प्रत्येक भाषेसाठी की-बोर्डाचा अक्षर-अनुक्रम वेगळा होता. त्यामुळे मराठी टंकन येईल त्याला पंजाबीत टाइप करता येत नसे. पुन्हा वेगळे शिकावे लागे. संगणकावर इनस्क्रिप्ट अनुक्रम वापरला तर ही समस्या खलास.

या चार सोईंमुळे इन्स्क्रिप्ट अनुक्रम भारतीय भाषांसाठी इतका चपखल ठरतो की "संगणकाचे सर्व सॉफ्टवेअर्स जगभर फुकट वाटा, सर्वांना शिकू द्या आणी सर्वांनी झटपट प्रगति करा" असे तत्वज्ञान असलेल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मधे व तसे तत्वज्ञान नसलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टममधेही आता हा अनुक्रम वापरला आहे. यामुळे जगभरांत मराठीतून संदेशवहन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो.

फोनेटिक हा अनुक्रम वापरताना रोमन अक्षरे वापरून मराठी लिहिले जाते. खरेतर तो ज्या विदेशी लोकांनी भारतीय वर्णमाला शिकलेली नाही अशा मराठी लिहिणा-यांसाठी आहे.

पण एक गोष्ट महत्वाची. संगणक उघडल्यावर आपल्याला गद्य लेखन करायच आहे की इंटरनेट वरुन पत्र पाठवायचे आहे की चित्र काढायचे आहे हे संगणकाला आपणहून कसे कळणार? तो कांही मनकवडा नसतो. आपणच सांगावे लागते. म्हणजे काय करायचे? तर त्याच्याकडील वर्ड नावाच्या प्रोग्रामवर डबल क्लिक करायचे म्हणजे तो आपल्याला पडद्यावर एक कोरा कागद देतो - मग आपण कोणती लिपी वापरणार आणी कोणता वर्णक्रम वापरणार तेही सांगायचे. मगच त्यावर आपले लेखन लिहायला सुरुवात करायची.

----------------------------------------------------------------------------------------------------
इन्स्क्रिप्ट पद्धतीने केवळ 10 दिवसांत संगणकावर मराठी टायपिंग शिकण्यासाठी खालील लिंक उघडून  पायरी-पायरीने व सोपेपणाने इनस्क्रिप्ट पद्धतीने टंकन शिकता येईल. इथे सरावासाठी दहा धडे दिलेले आहेत
शिवाय खालील 3 मिनिटांच्या चित्रफितीवर प्रात्यक्षिक पहायला मिळते.
-----------------------------------------------------------------------------------------------
संगणकावर मराठी टायपिंग साठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट समजाऊन घेऊ या.
डावी-उजवी बोटे
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक तबल्यासारखी लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास चित्रफीत पहावी.]
इथे इन्स्क्रिप्ट कळपाटीचे चित्र)
दोन मिनिटांत 20 अक्षरे
या लेआऊटमधे मधली ओळ व वरची ओळ अशा जोड्या बनवून अक्षरे मांडली आहेत.
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील HY या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
पहा -- कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे लिहिण्यासाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर
AQ -- ओऔ,
SW -- एऐ,
DE -- अआ,
FR -- इई,
GT —- उऊ
अशी अक्षरे लिहिता येतात. मात्र त्या त्या कुंजीसोबत शिफ्टचा खटका पण लागतो.
आता त्या त्या स्वरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) लिहिण्यासाठी आधी लिहिलेल्या व्यंजनापुढे ती ती कुंजी वापरायची --
अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.

  •  अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
  • ‘ताक’  हा शब्द लिहिण्यासाठी ---  त (L) + काना (E) + क (K) आणि
  • ‘पूजा’ लिहिण्यासाठी ---  प (H) + ऊकार (T) + ज (P)  + काना  (E)    लिहावे लागते.
  • ‘किती’ लिहिण्यासाठी --- क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.

हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
  • काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहिताना कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो हे लक्षांत ठेवायचे..

तुमच्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी-सहावीत जाणाऱ्या मुलीमुलांना देखील ही युक्ती शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घ्या. पहा त्यामुळे त्यांच्यात केवढा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.

उरलेली अक्षरे
उरलेल्या १६ व्यंजनांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र  ही अक्षरे आणि ऋ हा स्वर  अगदी वरच्या ओळीत आकड्यांसोबत बसवलेले आहेत तर म, ण, न, व, ल, ळ, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला १० मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना-मात्रा लावण्याची पद्धत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.

जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील   अच्या कुंजीमुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते.
अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

नवे सॉफ्टवेअर न घेताच, फक्त सुरवातीचे एक सेटिंग करा
आज रोजी बहुतेक सर्वांकडे नवे लॅपटॉप असून त्यावर विन्डोज ७ किंवा त्यापुढील ऑपरेटिंग सिस्टिम असते. २००५ सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत.
यामधे मराठीसाठी सुरवातीचे एकदाच करावे लागणारे सेटिंग खालीलप्रमाणे --
संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन "रीजन ऍण्ड लँग्वेज" या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन खिडकी व त्यातील नवी प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेजसाठी इंग्लिशचा पर्याय बाय डिफॉल्ट दिलेला असतो. तिथल्या डॉप-डाऊन मेनूवर टिचकवल्यास कित्येक भाषांचे पर्याय उघडतात. त्यावर हिन्दीचे  किंवा मराठीचे ऑप्शन हवे आहे असे सांगायचे. हे सेटिंग सुरूवातीला एकदाच कधीतरी करून घ्यावे लागते. ते केल्याने संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E म्हणजे इंग्लिश हे अक्षर दिसू लागते. त्यावर लेफ्ट क्लिक करून E ऐवजी M  म्हणजे मराठी हा पर्याय निवडता येतो. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार M असा पर्याय निवडायचा आणि टायपिंगला सुरूवात करायची. 

वरील प्रमाणे देवनागरी सेटिंग सर्व जुन्या संगणकांवर असेलच असे नाही. त्यांची ऑपरेटिंग सिस्टम जर विण्डोज एक्सपी असेल तर त्यावर मराठी सेटिंग करण्यासाठी विण्डोज एक्सपीची इन्स्टॉलेशन सीडी आणून त्यावरून आधी  i386 ही फाईल कॉपी करून घ्यायची की मग वरीलप्रमाणे मराठी सेटिंग करता येते.

वरील उपायाने आपल्या संगणकावर मराठी एनेब्लिंग केल्यानंतर गुगलच्या जी-मेल वर किंवा फेसबुकवरही आपण मराठी टंकन करू शकतो. फक्त टास्कबार वर M  हा पर्याय देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी या टंकन-पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देऊन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून शोध घेतल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.

तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टंकन शिकून महाजालावर  धडाधड मराठी वाङ्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
---------------------------------------------------------------------------------------------------
इनस्क्रिप्ट टंकनाच्या सरावासाठी खालील पाठ उपयोगी पडतील --
पाठ पहिला
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ
ककाकिकीकुकूकेकैकोकौकंकः
गगागिगीगुगूगेगैगोगौगंगः

पाठ दुसरा
क ख ग घ
खखाखिखीखुखूखेखैखोखौखंखः
घघाघिघीघुघूघेघैघोघौघंघः
आई, एक, ऐक
काका काकी काकू गंगा
खा, गा, खाकी, घी, खोखो, घोक, 

पाठ तिसरा
त थ द ध च छ ज झ
ट ठ ड ढ
ददादिदीदुदूदेदैदोदौदंदः
टटाटिटीटुटूटेटैटोटौटंटः
छछाछिछीछुछूछेछैछोछौछंछः
कात काच चाकू, चाक, चकाचक,
टाका ताट तूट तीट ताटातूट
छोटा, खोटा, ठोक,ठीक, डोकं,डिंक
दंगा, टांगा, धोका, झोका, ढाका, ढ, किडा,
चोथा, चौथा, डंका, चौक, गोट, गोटा, गोटी

पाठ चौथा
प फ ब भ र ह ङ
हहाहिहीहुहूहेहैहोहौहंहः
भभाभिभीभुभूभेभैभोभौभंभः
पापा पार पाच,पाट
रुप, कुरूप, रिपू, रिपरिप
हीरा, हार ,हुरुप  हरहर, हरी, हुरहुर,
भारत भार, भाकरी,भात, भट, भोक, 
पपया यार बया याहू
टीप कात काका चाट चटपट, झटापट, 
पुकार चुकार चुका ताक टीका याहू 
ताट तुटीची काकी काकु कचरा पार
टापटीप कातकरी पाट पाटी टिका चराचर

पाठ पााचवा
ख थ छ ठ फ उ इ अ ए ओ
खोत खान खानपान छान थान थाना
थाप छाप ऊस ओस ओक ठोक
फेक फी पोपट पाट पोट रोख
रोखठोक ठोक 
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
अशाप्रकारे क ते ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची बाराखडी टंकलेखित करणे.

पाठ सहावा
उघड, उंट, ऊद, 
हापूस गादी जाड जाडी बुडबुडा कागद
गाजर हौद, औजार,
धार घार झार खारट, खीर,
भारत भात थाप भार

पाठ सातवा
ऐका, औत, ओज, एक, ऐक, ऐपत
एकटा, एकदा, आत-बाहेर, आहेर, हेरगिरी, 
ए ऐ ओ औ ने सुरू होणारे शब्द आठवून लिहिणे

पाठ आठवा
म ण न व ल ळ स श ष य
वारा  मासा
मामा खिसा 
मन नवल लहान
ससा, शमन, दमन, नमन,
लय, नयन, वळण, यश, यम, माया,

पाठ नववा
ळ श ष ण
माळ शाळा वलय मणका मळा वळण
लळा वाळा नळ निळा
बाळ खेळ वेळ माळ नळ
शूळ शारदा शामक शूर
षटकोण षटकार षटक मेष
बाण खाण वाण सहाण रहाणे

पाठ दहावा 
ज्ञ त्र क्ष श्र ऋ ा ॅ र् ः
ज्ञान ज्ञात ज्ञानदेव ज्ञापन
मात्र गात्र त्राटिका त्रागा त्रास
त्रुटी क्षुब्ध क्षती क्षमा क्षत्रिय
श्री श्रीमती श्रीयुत श्रीराम श्रीकांत
बॉक्स फॉक्स पॉवर लॉन टॅक्स रॉक
ऋतु ऋचा ऋण ऋणको ऋषि

पाठ अकरावा -- ऋ जोडणे
एखादया अक्षराला ृ (रुकार) जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर ृ टाइप करावे. उदा
कृपा कृतार्थ कृष्ण कृषी नृप
दृष्टी सृष्टी वृष्टी

पाठ बारावा - र जोडणे
एखादया अक्षराला खाली र जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर हलन्त (शब्दाचा पाय मोडणारी कळ म्बणजेच अ या अक्षराची कुंजी ) दाबावी, नंतर र अक्षर टिचकवावे. उदा
क्रम भ्रम प्रत व्रत व्रण क्रमांक
एखाद्या अक्षरावर रफार देण्यासाठी उदा. गर्व लिहिताना  प्रथम ग, नंतर र अक्षर,  नंतर हलन्त, त्यानंतर व अक्षर टिचकवावे
सर्व कर्म धर्म शर्थ
आर्त सार्थ अर्थ व्यर्थ अनर्थ
मराठीत क्वचित आडव्या चंद्रकोरीने र जोडतात. असा र येण्यासाठी शिफ्टसोबत र चे अक्षऱ एकत्र टिचकवावे व हलन्त लिहून व पुढील अक्षर लिहावे
उदा. वाऱ्यावर, गु-हाळ, त-हा, सुऱ्याला 
-------------------------------------------------------------------

लेखन करताना ---संगणकावर नवी वर्ड फाईल उघडली किंवा जुनी फाइल उघडलेली असेल तर तिचे आपण कांय कांय करु शकतो-- फाइल उघडल्यावर समोर जी पाटी दिसते त्या पाटीच्या आत जाऊन क्लिक केले की, संगणकाला कळते की, आपल्याला फाईलचे पुढले काम करायचे आहे. या पाटीच्या वरच्या बाजूला एक मेनू-बार (म्हणजे आडव्या ओळीत बरेच कामांचे शब्द) दिलेला असतो. तो समजावून घेऊ या. 

चित्र 




मेनू-बारवर डावीकडे पहिला शब्द असतो फाईल. त्यावर क्लिक केले तर एक उभा आखलेला सब-मेनू-बार उघडतो. त्यावरही खूपसे पर्याय असतात. फाईल बद्दल जे कांही करायचे असेल ते सांगण्यासाठी फाईल हा मेनू व त्याचा सब-मेनू वापरायचा. उदा. Save- फाईलमधील बदल जपून ठेवायचे आहेत का? तर Save वर क्लिक करायचे. 
Save as हा दुसरा पर्याय - म्हणजे ती फाईल जपून नेमकी कुठे ठेवायची व कोणत्या नावाने?
new - म्हणजे समोर असलेली फाईल बाजूला ठेऊन नवीन कोरी पाटी आपल्या समोर येणार. 
Open- आपण आधी कुठेतरी जपून ठेवलेली फाइल असेल तेंव्हा open असे सांगितल्यानंतर- संगणक आपल्याला कित्येक पर्याय दाखवून विचारतो की, नेमकी कोणती फाइल उघडायची आहे. त्या फाईलवर जाऊन आपण क्लिक करायचे की ती फाईल उघडते. 
Print म्हटल्यावर जर संगणकाला ‌प्रिंटर जोडला असेल ती file कागदावर प्रिंट होऊ लागते. हे सुरु होण्यापूर्वी अजून एक खिडकी उघडली जाऊन प्रिंटींगबद्दल आपल्याला खूप गोष्टी विचारल्या जातात. कोणत पान? किती प्रती? कागदावर मार्जिन किती हवे? रंगीत की साधे? उभे की आडवे? हळू हळू आपण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फक्त गरजेपुरतच एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकतो.
pdf -- प्रिंटींगमध्येच हा एक महत्वाचा पर्याय असतो. कागदावर प्रिंट न घेता संगणकावरच अशी वेगळी फाईल बनवायची ज्या फाईलमध्ये बदल करण्याला वाव नसतो- जणू काही कागदावर काढलेली प्रतच. अशा फाईल्सना pdf (portable document format) हे लेबल लावलेले असते व ते जगन्मान्य मानकानुसार आहे. ही फाईल आपण इतरांना पाठवू शकतो. कारण त्यांत चटकन फेरबदल करता येत नाही. विशेषतः लेखनातील रंगसंगती, अलाइनमेंट, इत्यादी जश्याच्या तश्या टिकून रहातात.. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या मूळ फाइलमध्ये चित्र असेल किंवा आपले मराठीतील फॉण्ट तुटून junk दिसतील अशी भीती असेल तेव्हा जर त्या धारिकेला pdf केले तर ती खात्रीलायक मूळ आहे त्याप्रमाणेच दिसते. यासाठी ईमेल करायच्या फाईली खूपदा pdf करुन पाठवतात.मेनू-बारवर फाईल नंतर पुढला मेनू असतो एडिट. edit वर बाण नेला (क्लिक केले) की तिथला सब-मेनू दिसतो व तिथून आपण फाइल मधे दुरुस्त्या करण्यासाठी कांय कांय करु शकतो ते कळते.त्यामधील select all व undo हे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण फाइल select करण्यासाठी select all हा पर्याय वापरायचा. file मध्ये आधी जे बरेचसे बदल केले असतील ते एक-एक करुन रद्द करण्यासाठी undo वापरायचा. या शिवाय cut, copy, paste, redo हे पर्याय आहेत.
copy + Paste - आपण आपल्या फाईल मधील एखाद्या भाग select करून copy करु शकतो व त्याला दुसरीकडे किंवा दुस-या एखाद्या फाईलवर paste करु शकतो.
Copy + Paste सारखेच आपण cut + paste देखील करु शकतो.
Delete केलेला भाग फाईल मधून पुसून टाकला जातो.
redo वापरून आधी बदललेला भाग पुन्हा पहिल्यासारखा करता येतो.
मेनू-बार वर त्या पुढचे शब्द view, insert, format, tool, table, windows व help असे असतात. त्यांची वेगवेगळी कामे आपण सावकाश शिकून चालते.
Here photo of menu bar in words
------------------------------------------------------------------------------------------------------
=======================================================================
भाग -- 7 tallied with book on 22/07/2011
संगणक म्हणजे टाइप रायटर
शिका सोप्या पद्धतीने मराठी टंकलेखन
या भागांतील शब्दावली --
KEY = कुंजी, टाइपरायटर = टंकयंत्र, टायपिंग = टंकन,
फॉण्ट = वर्णाकृती, फॉण्ट सेट = वर्णाकृतीसंच,
Keyboard = कळपाटी, कळफलक, की-ले-आउट = अक्षर अनुक्रम
इंट्रानेट = अन्तर्जाल, इंटरनेट = महाजाल, फाईल = धारिका

संगणकाचा सर्वांत जास्त उपयोग टाइपरायटर (टंकयंत्र) सारखा केला जातो. पण संगणकावरील टायपिंग म्हणजे टंकयंत्रापेक्षा दहा पट सोपे आणि शंभर पट उठावदार.

टाइपरायटरचा अविष्कार व उपयोग 1873 पासून सुरु झाला तो थेट १९८०-१९९० पर्यंत. या यंत्रामध्ये एक की-बोर्ड होता. एक खीळ (Key) दाबली की एक काडी उचलली जायची आणी पुढे अडकवून ठेवलेल्या कागदावर आपटायची. काडीवर ते ते अक्षर उलटे कोरलेले असायचे. कागद आणि काडीच्या मध्ये एक शाईने भरलेली रिबीन असायची. काडी कागदावर आपटली की शाईमुळे कागदावर ते ते अक्षर उमटायचे. त्याचवेळी शाईची रिबिन आणि कागद थोडे पुढे सरकायचे, म्हणजे दुसरं अक्षर लिहून घेण्यासाठी दोन्ही तयार. इंग्लीश की-बोर्डावर तीन ओळीत A ते Z अक्षरं, चौथ्या ओळीत आकडे, इतर कांही खुणा (उदा.+, =) वगैरे असत. मात्र A ते Z ही अक्षरे अनुक्रमाने नसत. कोणते अक्षर जास्त वापरावे लागते, त्यासाठी कोणते बोट योग्य, कोणती अक्षरे एकापाठोपाठ वापरावी लागतात, त्यांच्या काड्या गुंतू नयेत, वगैरे बराच काथ्याकूट आणि विचार करुन, दाही बोटांचा वापर करुन टायपिंग सोईचे होईल अशा पध्दतीने की-बोर्ड वरील ले-आउट म्हमजे अक्षरांचा अनुक्रम ठरवला होता. सर्वांत जास्त वापरला जाणारा की-बोर्ड अनुक्रम म्हणजे क्वेर्टी - qwerty (ज्यात वरच्या ओळीतील डावीकडची पहिली सहा अक्षरे ही अनुक्रमे q,w,e,r,t,y आहेत असा) पण इतरही कांही अनुक्रम होते.

भारतात इंग्लीश टंकयंत्रांमधे जवळ जवळ शंभर ट्क्के qwerty अनुक्रमच वापरात होता. संगणकाच्या की-बोर्डवर देखील हाच अनुक्रम ठेवल्यामुळे भारतात विकल्या जाणा-या संगणकावर इंग्लिश टायपिंगसाठी qwerty हाच अनुक्रम दिसतो. त्यामुळे ज्यांना टायपिंग येत होते, त्यांची खूप खूप सोय झाली. थोडक्यात ऑफीसमध्ये काम करणा-या तमाम टंकलेखकांची. संगणक संस्कृती वाढली तसे बॉस देखील कामचलाऊ इंग्लिश टायपिंग शिकून घेऊ लागले.

जुन्याकाळी टंकलेखन तसेच छपाईसाठी वेगवेगळ्या वळणांच्या अक्षरांचे सेट तयार करण्यांत आले. त्यांना फॉण्ट म्हणतात. मराठीत आपण वर्णाकृती म्हणू शकतो. त्या त्या वळणांना विशिष्ट नांव देण्यांत आले. उदा. इंग्लिशमधील एरियल, टाईम्स न्यू रोमन, कूरियर हे फॉण्ट सगळ्या टंकलेखकांच्या परिचयाचे आहेत.

टाइपरायटर वर टंकलेखन करतांना आपल्याला फॉण्ट बदलता येत नसे. हवेच तर वेगळ्या वळणाचा दुसरा टाइपरायटर विकत घ्यावा लागे.

पण संगणक आल्यावर त्या काड्या, शाईची रिबिन हा सर्व प्रकार संपला. एका विशिष्ट बटणावर जाऊन संगणकाला फॉण्टचे नांव सांगितले की तो त्या फॉण्टमध्ये लिहायला सुरुवात करतो. आपण मध्येच कांही परिच्छेद निराळ्या फॉण्ट मधे लिहू शकतो, कांही अक्षरांचा आकार लहान-मोठा, जास्त गडद किंवा रंगीतही करू शकतो. किंवा त्यांना रंगीत बॅकग्राउंड देऊ शकतो. हे झालं इंग्रजीच्या टायपिंग बद्दल.

मराठीत सुध्दा टंकयंत्राच्या की-बोर्डवरील अक्षरे वर्णक्रमानुसार मुळीच नव्हती. पण जो कांही अक्षर-अनुक्रम होता तो सगळ्या टंकलेखकांना ओळखीचा होता. म्हणून संगणकावर मराठी टायपिंगचे सॉफ्टवेअर बनविणा-यांनी तोच अक्षर-अनुक्रम संगणकासाठी पण कायम ठेवला जेणेकरुन पूर्वीपासून टंकयंत्रावर टाइप करत होते त्यांची सोय झाली. या अक्षर अनुक्रमाला मराठी टाइपरायटर किंवा गोदरेज अनुक्रम असे म्हणता येईल कारण मराठीसाठी बहुतांशी गोदरेज टंकयंत्र वापरांत होते. शिवाय संगणकावरील लेखन उठावदार दिसण्यासाठी मराठीत सुध्दा निरनिराळ्या वळणांचे खूपसे फॉण्ट सेट (म्हणजे वर्णाकृतीसंच) उपलब्ध झाले.

पण त्यांनी आणखीन एक गंमत केली. त्यांनी की-बोर्डासाठी इन्स्क्रिप्ट नावांचा एक आणि फोनेटिक नांवाचा एक असे दोन ज्यादा अक्षर-अनुक्रम तयार केले. एका विशिष्ट बटणावर जाउन संगणकाला सांगता येते की तुम्हांला कुठला अनुक्रम वापरायचा आहे.

इनस्क्रिप्ट अनुक्रम फारच छान आहे. त्यांत चार गंमती केल्या. पहिली गंमत आपण मुळाक्षरे शिकतो - क,ख,ग.......क्ष,ज्ञ. तोच अनुक्रम कायम ठेवला. त्यामुळे की-बोर्डावरचा अनुक्रम लक्षांत ठेवायची कटकट संपली. नाहीतर पूर्वी टंकयंत्रावरचा अनुक्रम डोक्यांत पक्का बसावा म्हणून सहा-आठ महिने टायपिंग क्लास लावून प्रॅक्टीस करावी लागत असे, परीक्षा द्यावी लागत असे. आता संगणकावर इनस्क्रिप्ट पद्धतीने मराठी टायपिंग शिकायला पाच मिनिटे पुरेशी आहेत. कमी शिक्षण झालेल्या लोकांना इंग्रजी न शिकावे लागता संगणकावर मराठी टंकन शिकून घेण्याची हमखास पद्धत म्हणजे इन्स्क्रिप्ट.
दुसरी गंमत म्हणजे हा अनुक्रम असा बसवला आहे की सगळे स्वर, कान्हा, मात्रा हे सर्व डावीकडे आहेत - ती डाव्या बोटानी व सगळी व्यंजने उजव्या बाजूला आहेत - ती उजव्या बोटांनी टाईप करायची. मराठी भाषेतल्या आपल्या सगळ्या शब्दात व्यंजन आणि स्वर गळ्यांत गळा घालून असतात. या इनस्क्रिप्ट की-बोर्डवर टाईप करतांना आपण सुध्दा उजव बोट, डावं बोट अस टाईप करतो - त्यामुळे आपोआप एक प्रकारची लय निर्माण होते आणि टायपिंग सोप्प होऊन जातं.

इनस्क्रिप्टची तिसरी गंमत अशी की सर्व भारतीय भाषांची लिपी वेगळी असली तरी वर्णमाला सारखी आहे. म्हणून सगळ्या भाषांसाठी सारखाच अनुक्रम ठेवला आहे. आपण मराठीत कांहीही लिहायची प्रॅक्टीस करायची आणि कुणावरही इम्प्रेशन मारायच- बघ हं, मी आता बंगालीत टाइप करुन दाखवीन (किंवा कन्नड, तामिळ, गुजराथी -- कांहीही). शिवाय एकदा मराठीत टाईप करुन झाले असले तरी एक बटण दाबून संगणकाला सांगता येते- बाबा रे, हे लिहिलेलं सर्व कानडी लिपीत बदलून दे- की संगणक ते पण करुन टाकतो. ज्यांना देशप्रेम, भारतीय एकात्मता टिकवण्याची ऊर्मी वगैरे आहे त्यांनी ही इन्स्क्रिप्ट नामक युक्ती नक्की समजून घेऊन तिचा आग्रह धरावा.

संगणक नव्हते - टंकयंत्र होती तेंव्हा प्रत्येक भाषेसाठी की-बोर्डाचा अक्षर-अनुक्रम वेगळा होता. त्यामुळे मराठी येईल त्याला पंजाबीत टाइप करता येत नसे. पुन्हा वेगळे शिकावे लागे. संगणकावर इनस्क्रिप्ट अनुक्रम वापरला तर ही समस्या खलास.
या चार सोईंमुळे इन्स्क्रिप्ट अनुक्रम भारतीय भाषांसाठी इतका चपखल ठरतो की "संगणकाचे सर्व सॉफ्टवेअर्स जगभर फुकट वाटा, आणि सर्वांना शिकू द्या" असे तत्वज्ञान असलेल्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम मधे व तसे तत्वज्ञान नसलेल्या मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज ऑपरेटिंग सिस्टममधेही हा अनुक्रम वापरला आहे.यामुळे जगभरांत मराठीतून संदेशवहन करण्यासाठी याचा छान उपयोग होतो.

फोनेटिक हा अनुक्रम रोमन अक्षरे वापरून मराठी लिहिणा-यांसाठी आहे.

पण एक गोष्ट महत्वाची. संगणक उघडल्यावर आपल्याला गद्य लेखन करायच आहे की इंटरनेट वरुन पत्र पाठवायचे आहे की चित्र काढायचे आहे हे संगणकाला आपणहून कसे कळणार? तो कांही मनकवडा नसतो. आपणच सांगावे लागते. म्हणजे काय करायचे? तर त्याच्याकडील वर्ड नावाच्या प्रोग्रामवर डबल क्लिक करायचे म्हणजे तो आपल्याला पडद्यावर एक कोरा कागद देतो- मग आपण कोणती लिपी वापरणार तेही सांगायचे. मगच त्यावर आपले लेखन लिहायला सुरुवात करायची.
----------------------------------------
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य पानावर मागासवर्ग कक्ष (कार्यासन 16-ब) ची लिंक उघडल्यावर इन्स्क्रिप्ट पद्धतीने संगणकावर मराठी टायपिंग शिकण्यासाठी खालील मजकूर आहे --
"मराठी शिकायचे आहे तर 6 महिन्याच्या टायपिंग क्लासची गरज नाही -- केवळ 10 दिवसांत शिकण्यासाठी इथे क्लिक करा." त्यावर टिचकवल्याने खालील लिंक उघडते ज्यावर पायरी-पायरीने व सोपेपणाने इनस्क्रिप्ट पद्धतीने टंकन शिकण्याची सोय आहे. शिवाय सरावासाठी दहा धडे दिलेले आहेत
http://gad.maharashtra.gov.in/marathi/dcmNew/news/bin/inscript-typing.pdf

ही लिंक उघडण्यांत फॉण्ट-समस्या आल्यास ही दुसरी लिंक पहा
http://bhasha-hindi.blogspot.com/2009/02/blog-post.html
शिवाय खालील 3 मिनिटांच्या चित्रफितीवर प्रात्यक्षिक पहायला मिळते.
http://www.youtube.com/watch?gl=GB&hl=en-GB&v=0YspgTEi1xI&feature=related
-------------------------------
संगणकावर मराठी टायपिंग साठी इनस्क्रिप्ट की-बोर्ड ले-आऊट.
डावी-उजवी बोटे
इनस्क्रिप्ट की बोर्ड ले आऊट मधे सर्व व्यंजने उजव्या बोटांनी व सर्व स्वर डाव्या बोटांनी लिहितात त्यामुळे टायपिंग मधे आपोआप एक लय निर्माण होऊन टायपिंग शिकणे व करणे खूप सोपे जाते.
[पुढील मजकूर वाचण्याआधी शक्य असल्यास चित्रफीत पहावी.]
इथे इन्स्क्रिप्ट कळपाटीचे चित्र)
दोन मिनिटांत 20 अक्षरे
संगणकाच्या की-बोर्ड वर मधल्या ओळीतील K व वरच्या ओळीतील I अशी KI ही जोडी पहा. K या अक्षराच्या कुंजीने क, ख, आणि I च्या कुंजीने ग, घ, लिहिता येते. याच प्रमाणे पुढील LO या कुंजींच्या जोडीने त, थ आणि द, ध लिहिता येते. L च्या पुढील दोन कुंजी च, छ, ज, झ साठी तर त्या पुढील दोन ट, ठ, ड, ढ साठी आहेत. K च्या डावी कडील HY या कुंजींनी प, फ, ब, भ लिहिता येते. म्हणजे मराठी वर्णमालेची ही 20 अक्षरे शिकायला फारसा वेळ लागत नाही -- दोन मिनिटे पुरतात - याला कारण आपण शाळेतील इयत्ता पहिली मधे घोकलेली क ते ज्ञ ही वर्णमाला आणि या वर्णमालेच्या आधाराने तयार केलेला इनस्क्रिप्ट पद्धतीचा की-बोर्ड. या पैकी प्रत्येक कठिण अक्षरासाठी (ख, घ, छ, झ, थ, ध ...) कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.
गरज असल्यास या लेखात दिलेले कळपाटीचे (की-बोर्ड चे) चित्र पहावे.
पुढल्या 20 स्वरांना अजून दोन मिनिटं
तशीच आपण बाराखडीही घोकलेली असते. त्यापैकी अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ही दहा अक्षरे आणि त्या अक्षरांनी लावायच्या काना मात्रा (अ सोडून) अशा वीस गोष्टींसाठी डाव्या हाताने डावीकडील मधल्या व वरच्या ओळीतील जोडी जोडीने पाच-पाच खटके (कुंजी) वापरतात. त्यांचा क्रम थोडा उलट - सुलट आहे - ओऔ, एऐ, अआ, इई, उऊ असा तो क्रम सोईसाठी लावला आहे. की-बोर्डावर
AQ -- ओऔ,
SW -- एऐ,
DE -- अआ,
FR -- इई,
GT —- उऊ
अशी अक्षरे किंवा काना-मात्रा लिहिता येतात.

अशा युक्तीने काकू, बाबू, दादू लिहिण्यासाठी
क (K) + काना (E) + क (K) + ऊकार (T) = काकू
ब (Y) + काना (E) + ब (Y) + ऊकार (T) = बाबू
द (O) + काना (E) + द (O) + ऊकार (T) = दादू
अशी युक्ती आहे.

. अकारान्त अक्षरासाठी अकाराचा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही.
‘ताक’ या शब्दासाठी त (L) + काना (E) + क (K) आणि
‘हूक’ लिहिण्यासाठी ह (U) + ऊकार (T) + क (K) लिहावे लागते.
‘किती’ हा शब्द लिहिण्यासाठी क (K) + इकार (F) + त (L) + ईकार (R) असे लिहायचे असते.

हे इतकं सोप्प आहे की तीन चार वेळा करून याचा सोपेपणा कळला की आपल्याला एक वेगळाच आनंद होतो.
काना-मात्रा लिहिण्याऐवजी प्रत्यक्ष तो स्वर लिहायचा असेल तर कुंजीसोबत शिफ्ट हा खटका पण दाबावा लागतो.

तुमच्या घरात येणारी पाचवी सहावी शिकलेली पण इंग्रजी न येणारी कामवाली मंडळी किंवा त्यांच्या पाचवी-सहावीत जाणा-या मुलीमुलांना देखील ही युक्ती शिकवून पहिल्याच दिवशी त्यांच्याकडून या वीसही अक्षरांच्या बाराखडयांची प्रॅक्टिस करून घ्या. पहा त्यामुळे त्यांच्यात केवढा प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. संगणक शिकण्यासाठी इंग्रजी येत नसल्याने अडून रहात नाही याचे भानही त्यांना येते.

उरलेली अक्षरे
उरलेल्या 16 अक्षरांपैकी ज्ञ, त्र, क्ष, श्र आणि ऋ ही अक्षरे अगदी वरच्या ओळीत आकड्यांसोबत ऍडजस्ट केली आहेत तर म, ण, न, व, ल, ळ, स, श, ष, य ही अक्षरे खालच्या ओळीत (कांही शिफ्ट की सोबत तर कांही शिफ्ट की शिवाय) आहेत. K शेजारील JU या जोडीने र, ह, ङ, आहेत तर ड च्या पुढे ञ आहे. यांच्या जागा डोक्यांत बसण्यासाठी थोडीशी प्रॅक्टीस लागते. कुणाला 10 मिनिटे पुरतील तर एखाद्याला एक दिवस लागेल. पण त्यांना काना-मात्रा लावण्याची पध्दत आधी सांगितल्याप्रमाणेच आहे.

जोडाक्षर
अकार असलेल्या अक्षरासाठी अ चा खटका (D) मुद्दाम वापरावा लागत नाही. त्याऐवजी अकार काढून टाकण्यासाठी त्याचा वापर करतात.
म्हणजे दत्त या शब्दासाठी
दत्त = द (O) + त (L) + अकार काढल्याची खूण (D) + त (L).
यातील D या अच्या खटक्यामुळे त चा पाय मोडला जाऊन जोडाक्षराची तयारी होते.
अशा प्रकारे तुमच्या घरी असलेल्या संगणकावर मराठी शिकण्याची ही सोप्पी पध्दत आहे.

नवे सॉफ्टवेअर न घेताच, फक्त सुरवातीचे एक सेटिंग करा
तुमच्याकडील संगणक पेन्टियम जातीचा असून त्यावर विन्डोज XP ही ऑपरेटिंग सिस्टिम असेल तर फारच छान. 2000 सालानंतर ज्यांनी संगणक घेतले ते बहुतेक या त-हेचे आहेत.
सुरवातीचे एकदाच करावे लागणारे सेटिंग हे तुमच्या संगणक विक्रेत्याने करून द्यावे यासाठी आग्रह धरा. (पण आपणही खालील 1,2,3 पैकी करू शकतो हे विसरू नका. ते न चालल्यास 4था पर्याय मात्र विक्रेताच देऊ शकतो.)
1) *तुम्ही संगणकावर लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम वापरायचे ठरवल्यास - काही करावे लागत नाही, सरळ मराठी (देवनागरी) ऑप्शन सांगून सुरुवात करता येते.
2) *तुमची ऑपरेटिंग सिस्टम विन्डोज असेल तरीही सॉफ्टवेअरसाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस किंवा ओपन ऑफिस असे दोन पर्याय असतात, त्यापैकी ओपन ऑफिस हा पर्याय घेतला तरी वेगळे काहीही करावे लागत नाही. शिवाय हे सॉफ्टवेअर फुकट डाउनलोड करता येते व मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रमाणेच यांत वर्ड, एक्सेल, पॉवरप्वॉइंट इत्यादी सर्व प्रोग्राम्स असतात.
3) विन्डोज ऑपरेटिंग सिस्टम व त्यामधे मायक्रोसॉफ्ट ऑफिस हा पर्याय निवडला असेल तर -
संगणक सुरू करून स्टार्ट - सेटिंग - कण्ट्रोल पॅनेल मधे जाऊन "रीजनल ऍण्ड लँग्वेज सेटिंग" च्या आयकॉन वर डबल क्लिक केल्याने एक नवीन प्रश्नावली तुमच्या समोर येते. तिथे लँग्वेजसाठी इंग्लिशचा पर्याय बाय डिफॉल्ट दिलेला असतो. तिथल्या डॉप-डाऊन मेनूवर टिचकवल्यास कित्येक भाषांचे पर्याय उघडतात. त्वयार मला हिन्दीचे (म्हणजेच देवनागरी किंवा मराठीचे) ऑप्शन हवे आहे असे सांगायचे. हे सेटिंग सुरूवातीला एकदाच कधीतरी करून घ्यावे लागते. ते केल्याने संगणकाच्या खालच्या पट्टीत जो टास्कबार आहे तिथे E (म्हणजे इंग्लिश) हे अक्षर दिसू लागते. विन्डोज मधील वर्ड हा प्रोगाम उघडल्या नंतर टास्कबार वर लेफ्ट क्लिक करून आपल्याला टायपिंग साठी इंग्रजी ऐवजी Ma म्हणजे मराठी हा पर्याय निवडता येतो. असा पर्याय निवडायचा आणि टायपिंगला सुरूवात करायची.
4) वरील प्रमाणे देवनागरी सेटिंग सर्व संगणकांवर असेल असा समझोता IBM व मायक्रोसॉफ्टने भारत सरकार बरोबर केलेला आहे तरी पण कित्येक संगणकांवर तसे आपणहून उपलब्ध करून दिलेले नसते, आपण आग्रह धरल्यास एक ठेवणीतील सीडी आणून त्यावरून i386 ही फाईल वापरून अक्षरशः एका मिनिटांत ते करून दिले जाते.

वरील कोणत्याही उपायाने आपल्या संगणकावर मराठी एनेब्लिंग केल्यानंतर गुगलच्या जी-मेल वर किंवा याहू-मेल वर आपण याच पध्दतीने मराठीत अगदी सोप्पेपणाने टाईप करू शकतो. फक्त टास्कबार वर Ma हा पर्याय देण्याचे लक्षांत ठेवायचे. गूगल च्या www.blogspot.com या साइट मार्फत ब्लॉग करायचे असतील, तरी वरील टायपिंगच्या पध्दतीने आपले पुस्तक थेट संगणकावरच लिहिले जाऊ शकते. या ब्लॉगच्या शीर्षकाला मराठी अक्षरांतून नांव देउन शिवाय इंग्लिश अक्षरातूनही द्यावे म्हणजे गूगल सर्च करणा-यांनी मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी कोणत्याही भाषेतून विषय दिल्यास त्यांना तुमचे ब्लॉग सापडतात.

भारतीय लेखक कुठे आहेत
एका माहिती पत्रावरून असे दिसून येते की सर्व भारतीय भाषा मिळून इंटरनेटवर टाकलेल्या पानांची संख्या 1 कोटीच्याही खाली आहे - त्याचवेळी इंग्रजी भाषेत मात्र इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या पानांची संख्या पद्म, महापद्म (इंग्लिश भाषेत सांगायचे तर ट्रिलियन्स ऑफ पेजेस) एवढी आहे.

तेंव्हा भारतीय लेखकांनी थोड्याशा प्रयत्नाने मराठी लिपिचे टायपिंग शिकून महाजालावर (का याला इन्द्रजाल म्हणू या कारण हे ही किती मायावी !) धडाधड मराठी वाङ्‌मय उपलब्ध करून देण्याने आपल्या साहित्य संस्कृतीचे चांगले जतन होऊ शकेल.
----------------------------------------------------
इन्स्क्रिप्ट टेकनाच्या सरावासाठी खालील पाठ उपयोगी पडतील --
पाठ पहिला
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
क ख ग घ त थ द ध च छ ज झ
ट ठ ड ढ प फ ब भ र ह ङ
पाठ दुसरा
क त च ट ा ी ू
काका काकी काकू
काटा कात काच चकाचक, चाकू, चाक,
टाका ताट तूट तीट ताटातूट
पाठ तिसरा
प फ ब भ र ह य ि ु
पापा पर पार
रुह याहू हीरा रिपू रिपरिप
हुरुप रुप हरहर हरि
हार राह भारत भार हरी
पपया यार बया याहू
रिता टीप कात काका चाट चाट
चीट पुकार चुकार चुका ताक टीका
ताट तुटीची काकी काकु कचरा पार
टापटीप कातकरी पाट पाटी टिका चराचर
पाठ चौथा
ख थ छ ठ फ उ इ अ ए ओ
खोत खान खानपान छान थान थाना
थाप छाप ऊस ओस ओक ठोक
फेक फी पोपट पाट पोट रोख
रोखठोक ठोक आई
पाठ पाचवा
क का कि की कु कू के कै को कौ कं कः
अशाप्रकारे क ते ज्ञ पर्यंतच्या सर्व अक्षरांची बाराखडी टंकलेखित करणे.
पाठ सहावा
ह ग द ज ड ब ू ी ै ौ
हापूस गादी जाड जाडी बुडबुडा कागद
गाजर हौद, औजार, ऐपत
पाठ सातवा
घ ध झ ढ भ ऊ ई आ ऐ औ
धार घार झार ऐक, खारट, खीर,
पाठ आठवा
म ण न व ल ळ स श ष य
वारा भारत भात थाप भार मासा
मामा किडा
खिरा खिसा मन नवल लहान
पाठ नववा
ळ श ष ण
माळ शाळ वलय मणका मळा वळण
लळा वाळा नळ निळा
बाळ खेळ वेळ माळ नळ
शूळ शारदा शादी शामक शूर
षटकोण षटकार षटक मेष
बाण खाण वाण सहाण रहाणे

ज्ञ त्र क्ष श्र ऋ ा ॅ र् ः
ज्ञान ज्ञात ज्ञानदेव ज्ञापन
मात्र गात्र त्राटिका त्रागा त्रास
त्रुटी क्षुब्ध क्षती क्षमा क्षत्रिय
श्री श्रीमती श्रीयुत श्रीराम श्रीकांत
बॉक्स फॉक्स पॉवर लॉन टॅक्स रॉक
ऋतु ऋचा ऋण ऋणको ऋषि
पाठ दहावा
एखादया अक्षराला ृ (रुकार) जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर टाइप करावे. नंतर ृ type करावे. उदा
कृपा कृतार्थ कृष्ण कृषी नृप
दृष्टी सृष्टी वृष्टी
एखादया अक्षराला खाली र जोडण्यासाठी प्रथम ते अक्षर type करावे. नंतर हलन्त (शब्दाचा पाय मोडणारी कळ - english D अक्षर असलेली) दाबावी, नंतर र अक्षर दाबावे उदा
क्रम भ्रम प्रत व्रत व्रण क्रमांक
एखाद्या अक्षरावर रफार देण्यासाठी उदा. गर्व type करताना प्रथम ग, नंतर र अक्षर दाबावे नंतर हलन्त नंतर व अक्षर दाबावे
सर्व कर्म धर्म शर्थ
आर्त सार्थ अर्थ व्यर्थ अनर्थ
मराठीत क्वचित आडव्या चंद्रकोरीने र जोडतात. असा र येण्यासाठी शिफ्ट व र चे अक्षऱ एकत्र दाबावे व हलन्त (पाय मोडून) व पुढील अक्षर लिहावे
उदा. वा-यावर, गु-हाळ, त-हा
-------------------------------------------------------------------
लेखन करताना ---
संगणकावर नवी वर्ड फाईल उघडली किंवा जुनी फाइल उघडलेली असेल तर तिचे आपण कांय कांय करु शकतो--
फाइल उघडल्यावर समोर जी पाटी दिसते त्या पाटीच्या आत जाऊन क्लिक केले की, संगणकाला कळते की, आपल्याला फाईलचे पुढले काम करायचे आहे. या पाटीच्या वरच्या बाजूला एक मेनू-बार (म्हणजे आडव्या ओळीत बरेच कामांचे शब्द) दिलेला असतो. तो समजावून घेऊ या.







मेनू-बारवर डावीकडे पहिला शब्द असतो फाईल. त्यावर क्लिक केले तर एक उभा आखलेला सब-मेनू-बार उघडतो. त्यावरही खूपसे पर्याय असतात. फाईल बद्दल जे कांही करायचे असेल ते सांगण्यासाठी फाईल हा मेनू व त्याचा सब-मेनू वापरायचा.
उदा. Save- फाईलमधील बदल जपून ठेवायचे आहेत का? तर Save वर क्लिक करायचे.
Save as हा दुसरा पर्याय - म्हणजे ती फाईल जपून नेमकी कुठे ठेवायची व कोणत्या नावाने?
new - म्हणजे समोर असलेली फाईल बाजूला ठेऊन नवीन कोरी पाटी आपल्या समोर येणार.
Open- आपण आधी कुठेतरी जपून ठेवलेली फाइल असेल तेंव्हा open असे सांगितल्यानंतर- संगणक आपल्याला कित्येक पर्याय दाखवून विचारतो की, नेमकी कोणती फाइल उघडायची आहे. त्या फाईलवर जाऊन आपण क्लिक करायचे किंवा कुठेतरी open हा पर्याय असेल तिथे क्लिक करायचे- की ती फाईल उघडते.
Print म्हटल्यावर जर संगणकाला ‌प्रिंटर जोडला असेल ती file कागदावर प्रिंट होऊ लागते. हे सुरु होण्यापूर्वी अजून एक खिडकी उघडली जाऊन प्रिंटींगबद्दल आपल्याला खूप गोष्टी विचारल्या जातात. कोणत पान? किती प्रती? कागदावर मार्जिन किती हवे? रंगीत की साधे? उभे की आडवे? हळू हळू आपण त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन फक्त गरजेपुरतच एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायला शिकतो.
pdf -- प्रिंटींगमध्येच हा एक महत्वाचा पर्याय असतो. कागदावर प्रिंट न घेता संगणकावरच अशी वेगळी फाईल बनवायची ज्या फाईलमध्ये बदल करण्याला वाव नसतो- जणू काही कागदावर काढलेली प्रतच. अशा फाईल्सना pdf (portable document format) हे लेबल लावलेले असते व ते जगन्मान्य मानकानुसार आहे. ही फाईल आपण इतरांना पाठवू शकतो. कारण त्यांत चटकन फेरबदल करता येत नाही, विशेषतः लेखनातील रंगसंगती, अलाइनमेंट, इत्यादी. मुख्य म्हणजे जेव्हा आपल्या मूळ फाइलमध्ये चित्र असेल किंवा आपले मराठीतील फॉण्ट तुटून junk दिसतील अशी भीती असेल तेव्हा जर त्या धारिकेला pdf केले तर ती खात्रीलायक मूळ आहे त्याप्रमाणेच दिसते. यासाठी ईमेल करायच्या फाईली खूपदा pdf करुन पाठवतात.
मेनू-बारवर फाईल नंतर पुढला मेनू असतो एडिट. edit वर बाण नेला (क्लिक केले) की तिथला सब-मेनू दिसतो व तिथून आपण फाइल मधे दुरुस्त्या करण्यासाठी कांय कांय करु शकतो ते कळते.
त्यामधील select all व undo हे खूप महत्वाचे आहेत. पूर्ण फाइल select करण्यासाठी select all हा पर्याय वापरायचा. file मध्ये आधी जे बरेचसे बदल केले असतील ते एक-एक करुन रद्द करण्यासाठी undo वापरायचा. या शिवाय cut, copy, paste, redo हे पर्याय आहेत.
copy + Paste - आपण आपल्या फाईल मधील एखाद्या भाग select करून copy करु शकतो व त्याला दुसरीकडे किंवा दुस-या एखाद्या फाईलवर paste करु शकतो.
Copy + Paste सारखेच आपण cut + paste देखील करु शकतो.
Delete केलेला भाग फाईल कधून पुसून टाकला जातो.
redo वापरून आधी बदललेला भाग पुन्हा पहिल्यासारखा करता येतो.

मेनू-बार वर त्या पुढचे शब्द view, insert, format, tool, table, windows व help असे असतात. त्यांची वेगवेगळी कामे आपण सावकाश शिकून चालते.
Here photo of menubar in words
-----------------------------------------------------------------------

Saturday, March 7, 2009

भाग --1 - 5

संगणकाची जादुई दुनिया
-------------------------------------------
भाग -- 1
संगणक म्हणजे काय?

आजच्या युगांत संगणक हा शब्द सर्वांना माहित आहे. आपल्या देशांत आता डिजिटल इंडियाचे वारे वाहू लागले आहेत संगणकामार्फत खूप सुविधा दिल्या जाणार आहेत . म्हणून आपण याची तोंड ओळख करून घ्यायला हवी.
खूप जणांनी संगणक पाहिलेले आहेत आणि त्यातील कित्येकांनी वापरलेलेपण आहेत. तरी पण चटकन कुणालाही विचारा संगणक म्हणजे काय? की तो माणूस गडबडलाच म्हणून समजा. आणि संगणकाच्या वापराबद्दल सुध्दा खूप गैरसमजूती आहेत. ज्यांनी संगणक पाहिला त्यापैकी किमान पन्नास टक्के लोकांना वाटतं - छे छे ते कांही आपल्याला जमणार नाही आणि वापरणं खिशालाही परवणार नाही. मग ज्यांना जमतं ते हसतात- अरे, हे तर किती सोप आहे!
एकूण कांय तर  संगणक अशी वस्तू आहे, जी एकाच वेळी कांही लोकांना खूप कठीण वाटते आणि कांही लोकांना खूप सोपी. काहींना वाटतं की ही खिशाला न परवडणारी गोष्ट आहे आणि काहींना वाटतं की हे परवडेल. आणि गंमत म्हणजे अस वाटण्यामध्ये त्यांच्या हुषार असण्याचा किंवा नसण्याचा फारसा संबंध नसतो.
===================================================
हे पुस्तक वाचतांना मूळ संकल्पना तेवढी सोपेपणाने कळावी हा उद्देश आहे. पण थोडे खोलात शिरुन पहायला कांय हरकत आहे असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी रेघेच्या खाली त्याच विषयाला धरुन कांही माहिती दिली आहे. ती न वाचताच पुढे गेले तरी चालेल अशा पध्दतीने मुख्य विषयाची मांडणी केली आहे.

----------------------------------------------------------------
भाग- 2
संगणक म्हणजे एक यंत्र
भाग -- 2, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
हे तर खरच. संगणकाबद्दल सगळ्यात आधी हेच सांगावे लागेल की संगणक हे एक यंत्र आहे. आपण खूप यंत्र दिवसभर पहात असतो. सायकल हे एक यंत्र आहे- पॅडल मारल की सायकल चालते आणि आपल्याला इकडून तिकडे नेते. घड्याळ हे एक यंत्र आहे. किल्ली किंवा सेल (बॅटरी) वर चालतं आणि आपल्याला वेळ दाखवतं. असेच फ्रीज, टीव्ही, मोबाईल, लिफ्ट, पम्प, ट्रॅक्टर, कार, स्कूटर ही सगळी यंत्र आहेत.
गावातला विहीरीवरचा रहाट, शेतावरचा पम्प, फवारणीचे यंत्र, स्प्रिंकलर, बोअरवेल व त्यावर बसवलेला हॅन्डपम्प, - ही सगळी यंत्रच आहेत.
पण संगणक आहे जादूगार यंत्र. कारण त्याच्या जवळ एक छोटासा मेंदू असतो - आता हा मेंदू पण यांत्रिक मेंदू असतो ते सोडा, पण मेंदू म्हणजे मेंदू. म्हणून मग संगणक वेगवेगळ्या ब-याच त-हेची कामं करु शकतो. लिहू शकतो, वाचू शकतो, गाण गाऊ शकतो, सिनेमा दाखवतो, सिनेमा बनवतो, चित्र काढतो, आपल्या सोबत खेळतो, जगाच्या एका कोप-यातून दुस-या कोप-यात एका क्षणात संदेश पाठवू शकतो, हीSS भली मोठ्ठी गणित पण करु शकतो आणि हो, चंद्रावर जाण्याला पण मदत करतो.
----------------------------------------------------
भाग- 3
संगणक म्हणजे युक्तीबाज जादूगर
भाग -- 3, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
खरतर संगणक आहे एक युक्त्या करणारा जादूगर. पण
एकदा काही जणांनी मला सांगितले की, संगणक म्हणजे अंधा-या खोलीतील भूत.  म्हणून माझ विचारचक्र सुरू झाल ,की यांना कस समजवायच?
भुताला आपण खूप घाबरतो. मुळात खोलीत अंधार असल्याने कांही दिसत नसतं. त्यात आपल्या डोक्यातील भूत-बीत अशा कल्पना बाहेर डोकावू लागतात. मग आपण घाबरतो. पण याला सोपा उपाय हाच की त्या खोलीत उजेड करायचा - एखादी खिडकी उघडायची किंवा दिवा लावायचा की भुताची सगळी भिती एका क्षणात निघून जाते.
संगणकाबद्दलही अशी धास्ती असते की, आपण एखाद चुकीच बटण दाबल की यांत कांही तरी बिघडेल- कुणी तरी आपल्याला ओरडेल. तर मग आधी हे समजून घ्यायला पाहिजे की संगणकात नवख्या माणसाने वापरल्यामुळे बिघडून मोठे नुकसान हा प्रकार फारच क्वचित होतो, जवळ-जवळ नाहीच.
धास्तीचे दुसरे एक कारण आहे. संगणकावरील प्रत्येक काम एका विशिष्ट पध्दतीनेच करावे लागते. ती पध्दत येत नसेल तर संगणक पुढे जातच नाही. अडेलतट्टूसारखा अडून बसतो. अशावेळी नेमकं कांय कराव हे न समजल्यावर आपण  इकडचे तिकडचे दोन-पाच प्रयत्न करुन सोडून देतो. पुढे काय करावे हे न सुचल्यामुळे उत्साह संपून जातो, आणि संगणक हा पुन्हा एकदा अंधा-या खोलीतल्या भुतासारखा वाटू लागतो. याचसाठी आपल्याला संगणकाकडून नेमके कांय काय करुन घ्यायचे आहे आणि त्या साठी करायच्या क्रियांचा क्रम  हे समजावे लागते. हे इतक सोप आहे की करायला बसेपर्यंत हे सोप आहे हे उमजतच नाही मुळी. करायला बसल की अगदी एक दोन वेळा करुनच हात बसतो, कारण त्यातील जादूच्या युक्त्या कळतात. म्हणूनच संगणक म्हणजे अंधाऱ्या खोलीतील भूत नसून युक्त्या करणारा जादूगर असतो. त्याच्या अगदी छोट्या छोट्या युक्त्या असतात. त्या शिकून घेतल्या पाहिजेत.
भुताची भिती घालवायला आपण एखाद्या मित्राचा हात धरून अंधा-या खोलीत जातो. तसच संगणकाचं. सुरुवातीला याच्या छोट्या छोट्या युक्त्या मित्रांकडून शिकून घेतल्या तर भिती नाही वाटणार. मात्र शिकून झाल्यावर आपणही इतरांना शिकवण्याची मनोवृत्ती ठेवलीच पाहिजे.
-------------------------------------------
भाग- 4
संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल
(या भागांतील शब्दावली -- सीपीयू = कारभारी डबा, स्क्रीन = पडदा , की-बोर्ड = कळपाटी, माउस = उंदीर,
आयकॉन = खूणचित्र, क्लिक = टिचकी)

पाटी-पेन्सिल कुणाला माहित नाही? पाटी-पेन्सिलचा मोठा गुण म्हणजे कांहीही लिहा- कितीही चुका करा- पुसून टाका- पुन्हा लिहा- चुकल अस वाटत असेल तर पुन्हा पुसा आणि लिहा. जे काम झाल ते पुसून टाकल की नवीन गोष्टी लिहायला किंवा नवीन गणित करायला आपली पाटी पुन: तयार.
ज्यांना अस वाटत, की आपल्याला संगणक यावा, पण त्याचसोबत आपल्याला संगणक येईल का अशी भितीपण वाटते, त्यांनी आधी समजून घ्यावे  की संगणक म्हणजे पाटी-पेन्सिल.
संगणक एखाद्या को-या पाटीसारखाच असतो, पण या पाटीची लांबी आणि रुंदी कितीही वाढवून चालते, त्यामुळे मोठे मोठे लेख, मोठाली चित्र, मोठाली गणित अस या पाटीवर लिहीता येत. लिहीलेल सगळ वाचून काढल्यावर अधे मधे झालेल्या चुका तेवढा भाग पुसून दुरुस्त करता येतात. एखादा परिच्छेद संपूर्ण पुसून पुन्हा नव्याने लिहीता येतो.
पाटी-पेन्सिलने लिहीण्यासाठी तीन गोष्टी लागतात. पाटी, पेन्सिल आणि आपला मेंदू. संगणकाच्या पाटी-पेन्सिलवर लिहीण्यासाठी आपल्या मेंदूच्या सोबत संगणकाचा मेंदू पण वापरावा लागतो. तो मेंदू इतर यांत्रिक भागांसोबत एका मोठ्या चौकोनी डब्यात बंद केलेला असतो.( धूळ इत्यादी पासून सुरक्षेसाठी.) आपण याला कारभारी डबा म्हणू या. कारण संगणकाची नव्वद टक्के कामं या डब्यातील मेंदू व इतर यंत्रांमुळेच होतात. आपण नवा संगणक आणला की समोर या चार गोष्टीच दिसतात – कारभारी डबा (सीपीयू), पडदा (स्क्रीन), की-बोर्ड (कळपाटी) आणी उंदीर (म्हणजे माउस नांवाचं एक उपकरण).
संगणकाचा पडदा ही पाटी, की-बोर्ड व उंदीर (माऊस) या त्याच्या दोन त-हेच्या पेन्सिली आणि  कारभारी डबा– सीपीयू. यांचा एकत्र वापर करण्याआधी  याना  हाताळण्याची युक्ती शिकून घ्यावी लागेल.
कारभारी डबा आणि पडदा हे विजेवर चालतात. म्हणून त्यांना सुरु करायला आधी वीजेचे बटण चालू करायचे. कारभारी आणि पडदा हे एका वेगळ्या जाड तारेने आपसात पण जोडलेले असतात. कारभारीचा मेंदू चालू करण्यासाठी एक वेगळे बटण असते ते पण चालू करावे लागते. मग अंदाजे एक मिनिटात संगणक स्वतःच्या आतली सर्व यंत्रणा सज्ज करतो आणि तुमच्या पुढल्या सूचनेची वाट पहात बसतो.
हल्ली लॅपटॉप वापरणे जास्त सोईचे झाले आहे .त्याची सुरवात देखील त्याच्याकडील पॉवरचे बटण दाबूनच होते
कारभारी यंत्रालाच एका वायरने उंदीर आणि दुस-या वायरने की-बोर्ड जोडलेला असतो. संगणकाला देण्याच्या सर्व सूचना या दोघांच्या सहाय्याने दिल्या जातात.
आपण टेबलावर उंदीर सरकावला की पडद्यावर एक बाण त्याप्रमाणे डावी-उजवीकडे किंवा वर-खाली हलतो. ज्या जागी आपल्याला कांही काम करायच आहे, तिथे बाण आणून ठेवायचा आणि संगणकाला सूचना देण्यास सुरुवात करायची.
संगणकाला आपण काय सूचना दिल्या, त्याला काय समजल्या आणि त्यावर संगणकाने काय केले हे आपल्याला कसे समजावे? याचसाठी संगणकाचा स्क्रीन किंवा पडदा असतो. मी याला पाटी म्हणते कारण आपण पाटीवर लिहीतो, पुसतो, पुन्हा लिहीतो, चुकलेल गणित पुन्हा करतो, तसचं आपल्याला संगणकावर करता येत आणि जे केलं ते या पाटीवर किंवा स्क्रीनवर पहाता येत. चुकल असं वाटल तर पुसून दुरुस्त करता येतं.
इथे पडद्याचा फोटो नव्या प्रकारच्या स्क्रीनचे चित्र, पुढे माउस व कीबोर्डाचे पण
मात्र पडदा सुरु केल्यावर आपल्याला कोरी पाटी न दिसता त्यावर ब-याच आकृत्या व त्याखाली  थोडेसे वर्णन लिहीलेले दिसते. कारण पडदा हा फक्त पाटी नसून त्यावर कामांची यादी पण असते. प्रत्येक आकृती म्हणजे एका नवीन कामाची सुरुवात. या आकृतीना इंग्लीशमध्ये आयकॉन म्हणतात. आपण त्यांना खूणचित्र म्हणू या. जे काम करायचे असेल त्या आकृतीवर बाण आणून ठेवायचा आणी कामाला सुरुवात करायची.
हे शिकायला, म्हणजे उंदीर हलवून हवा त्या ठिकाणी बाण कसा आणावा हे शिकायला एखादा दिवस लागू शकतो. खूपदा बाण पडद्याबाहेर पळून जातो आणि आपण म्हणतो मरु दे ते संगणकाच शिक्षण. पण एकदा हात बसला की गंमत येते. आपण म्हणतो आता अजून या उंदीराबद्दल काय काय शिकायचे आहे? चला सांगून टाका.
उंदीराच्या पाठीवर एक चक्री आणि तिच्या डावी-उजवीकडे दोन बटणं असतात. हव्या त्या आकृतीवर बाण नेऊन डावे बटण दाबले की त्या कामाला सुरुवात होते. याला लेफ्ट क्लिक असे म्हणतात. लेफ्ट क्लिकने ते ते काम किंवा ती ती फाईल उघडते आणी आपण त्यांच्या आत पोचून फाईल मधील काम करु शकतो, जसे की एखादा लेख लिहायला सुरुवात केलेली असेल तर ती फाईल उघडून लेखाचा पुढचा भाग लिहीणे.
या उलट आपण जर उजवे बटण दाबले, म्हणजे राईट क्लिक केले तर आपण त्या फाईल संबंधाने कांही काम करु शकतो. उदा. फाईलची प्रत काढणे, मित्रांना पाठवणे, फाईलला कांही तरी नांव देणे किंवा नांव बदलणे इत्यादी.
आणी चक्रीचे काम काय? आपण एखादी फाइल उघडलेली असेल तेंव्हा दोन्ही बटनांच्या मधील चक्री फिरवल्याने त्या फाईलची पाने भराभर मागे-पुढे सरकतात
लेफ्ट क्लिकचा वापर खूप जास्त असल्याने त्याला लेफ्ट क्लिक ऐवजी नुसतं सुटसुटीत क्लिक असच म्हणतात. तसच बहुतेक सर्व संगणकांची सेटिंग अशी करतात ज्यामधे उंदीराचे डावे बटण एकदाच क्लिक केले तर फक्त त्या फाइलची माहिती झरकन समोर येते, प्रत्यक्ष फाइल उघडायला ते बटण घाईघाईने दोनदा क्लिक करावे लागते. म्हणून त्याला डबल क्लिक म्हणतात.
पडद्याला स्क्रीन म्हणतात तसेच डेस्क-टॉप देखील म्हणतात. पण पडद्यावर दिसणा-या कामांची किंवा खूणचित्रांची यादी या अर्थानेही डेस्कटॉप शब्द वापरतात. हा शब्द तरी कुठून आला असेल? आपल्या कार्यालयातील कामाचे टेबल आठवा. त्यावर कांही कामांच्या फाइली असतात आणी इतर कांही सोईच्या वस्तू उदा. फोन, कॉलबेल, पेनं इ. असतात. तोच प्रकार संगणकाच्या डेस्कटॉपचा. त्यावरील कांही खूणचित्रे आपण तिथे ठेवलेल्या फाइलींची आणि कांही खूणचित्रे इतर सोईच्या कामांसाठी लागणा-या प्रोग्राम्सची असतात. त्यातील एखाद्या  खूणचित्रावर किंवा फाइलवर क्लिक केल्यावर त्या कामासाठी एक नवी पाटी उघडते आणी अशा त-हेने कामाला सुरुवात होते.
========================================
साधारणपणे जिथे क्लिक हा शब्द असेल त्याचा अर्थ लेफ्ट व डबल क्लिक. राइट क्लिक असा अर्थ असेल तिथे तसा स्पष्ट उल्लेख करतात. तसेच आपल्याला डबल क्लिकची कटकट वाटली तर आपण संगणकाच सेटिंग बदलून एकाच क्लिकने फाईल उघडेल असं करू शकतो.
----------------------------------------------------------------------------------
भाग- 5
संगणक म्हणजे खेळगडी
भाग -- 5, दुरुस्त्या केल्या -- 7 फेब. रोजी final on 7th MArch also verified/corrected on 7th june deleted in 1st set of print out
संगणकाचा सराव करण्याचा सगळयांत सोपा उपाय म्हणजे संगणकावर खेळण किंवा संगणकाबरोबर खेळण.
यासाठी तीन गोष्टी याव्या लागतील –
संगणक सुरु आणि बंद करणे,
संगणकावर खेळ कुठे आहे ते शोधून खेळ सुरु करणे, आणि
संगणकावर खेळण्यासाठी उंदीर किंवा माऊस वापरता येणे. जॉय स्टिक नांवाची अजून एक पध्दत असते. खूपसे खेळ माउस ऐवजी  जॉय स्टिक ने जास्त छान खेळता येतात.
(शिवाय खेळ तर खेळता यायला पाहिजेच.)
आ पणाला हवा तो खेळ संगणकावर कुठे आहे ते शोधायला लागू नये यासाठी त्याचे खूणचित्र डेस्क टॉपवर आणून ठेवणे हा सोपा उपाय आहे. तस एकदा केलं की नंतर कधीही संगणक उघडल्यावर आपण त्या खेळाच्या खूणचित्रावर बाण नेऊन क्लिक केले की खेळ उघडतो आणि आपण खेळायला सुरुवात करु शकतो.
बुध्दिबळ खेळायला दोन गडी लागतात. तरी आपण एकटे संगणकावर बुध्दीबळ खेळू शकतो. कारण दुस-या भिडू ऐवजी संगणकच आपल्याशी खेळतो. आपण अगदी नवखे असलो तर संगणकाला आधीच सांगून टाकायचे की तू पण पहिल्या पातळीवरचा भिडू आहेस अस समजून खेळ. हळूहळू आपण वरच्या पातळीवर जायला सांगितले की, संगणक अधिकाधिक पक्क्या भिडू प्रमाणे खेळू लागतो.
असे कित्येक खेळ संगणकावर असतात. ज्या खेळांना भिडू लागतात तिथे एका किंवा अनेक भिडूंचे डाव संगणक स्वतःच खेळतो. पत्त्यांचे खेळ, कार-रेसिंग, लढाया, गुप्त हेरगिरी असे कित्येक खेळ खेळता येतात. संगणकावर खेळण्यासाठी नवीन खेळ बनवणे हे एखादा नवा सिनेमा बनविण्यापेक्षाही जास्त जिद्दीचे आणी नव्या सिनेमापेक्षा जास्त पैसा मिळवून देणारे काम असते.
मध्यंतरी संगणकावर अति लोकप्रिय झालेला खेळ होता स्टार क्राफ्ट. हा तासनं तास चालतो. कोरियामध्ये याच्या इंटरनॅशनल टुर्नामेंटस् होतात आणि जसे दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवतात, तसेच इंटरनेटवर आणी कोरियन टीव्ही वर आता स्टारक्राफ्ट चे सामने पण दाखवतात. यावर कळस म्हणून की काय, बर्कले युनिर्व्हसिटी ने जे बरेच शैक्षणिक धडे तयार केले आहेत, त्यामध्ये स्टारक्राफ्ट खेळावर आधारित सीडी पण आहेत – त्याचे होमवर्क दिलेले आहे, वगैरे – जेणेकरून त्यांतून विद्यार्थ्यांनी गेम थिअरी तसेच स्ट्रॅटेजिक प्लानिंगचे धडे वगैरे शिकायचे असतात.
नुकताच लोकप्रिय झालेला खेळ म्हणजे पोकेमॅन .शिवाय अगदी लहान मुलांनाही गुंगवून ठेवील असेही खेळ असतात.
असा हा खेळकर खेळगडी संगणक.
------------------------------------------------------------